Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

मंगळवार, १ मे, २०१२

न्यायमंडळ


न्यायमंडळ


प्रियदर्शनी मट्टू खून प्रकरणात प्रमुख आरोपी संतोषकुमार सिंग याला दिल्ली हायकोर्टाने दिलेली फाशीची शिक्षा दिल्ली सुप्रीम कोर्टाने जन्मठेपेत परावर्तित केली.

प्रियदर्शनी मट्टू या तरूणीचा १९९६ साली दिल्लीमध्ये संतोषकुमार सिंग या आयपीएस अधिका-याच्या मुलाने बलात्कार करून खून केला होता.

सीबीआयने महाराष्ट्रात मुंबई येथे तीन कोर्ट , पुणे , अमरावती व नागपूर येथे प्रत्येकी एक कोर्ट स्थापन करण्यास मान्यता दिली.

महाराष्ट्रात नवीन २५ ग्राम न्यायालय सुरू :

सन २००९ साली महाराष्ट्रात ८ ग्राम न्यायालय सुरू करण्यात आली होती.

१) राळेगण सिध्दी, जि. अहमदनगर २) खरावली, जि. रायगड ३) सेवाग्राम , जि. वर्धा ४) उरूळी, कांचन , जि. पुणे, ५) गडचांदुर , जि. चंद्रपूर ६) निजामपूर , जि. धुळे ७) पाली, जि. रत्नागिरी ८) जव्हार, जि. ठाणे.

महाराष्ट्रात ही न्यायालय ग्राम न्यायालय कायदा २००८ नुसार स्थापन करण्यात आली.

सर्वोच्य न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला १० लाख रुपये दंड थोटावला.

विदर्भातील काँग्रेस आमदार दिलीप सानंदा यांच्या वडिला विरुध्दच्या एका फौजदारी खटल्यात पोलीस कार्यवाहीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हस्तक्षेप केला होता. म्हणून हा दंड थोटावण्यात आला.

प्रसिद्ध मानवाधिकारवादी नेते डॉ. विनायक सेन यांना जन्मठेपेची शिक्षा :

रायपूर जिल्हा न्यायालयाने डॉ. विनायक सेन व माओवादी नेते पियुष गुहा व नारायण सन्याल यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली .

देशातील पहिले बाल न्यायालय दिल्ली येथे फेब्रुवारी २०११ मध्ये सुरु होईल .

बाबरी मस्जीद – रामजन्मभूमी विवाद :

या विवादाचे प्रमुख याचिका कर्ते – महंमद हाशिम अन्सारी

हिंदू महासभेतर्फे प्रमुख वकील म्हणून भाजपा नेते ऍड. रविशंकर प्रसाद यांनी काम केले.

दि. ३० सप्टेंबर २०१० रोजी अयोध्येतील २.७ एकर वादग्रस्त जागेचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने तीन भागात समान विभाजन करण्याचा निकाल दिला.

एक भाग सुन्नी वक्फ बोर्ड, एक भाग निर्मोही आखाडा, एक भाग राममल्ला मंदिरास समितीस देण्यात आला.

हा निकाल न्यायमुर्ती एस.यु.खान, न्यायमुर्ती डि.व्ही.शर्मा, न्यायमुर्ती सुधीर अगरवाल या तीन न्यायमुर्तीच्या खंडपीठाने दिला.

१९५० साली या वादग्रस्त जागेच्या मालकीबद्दल याचिका दाखल करण्यात आली होती.

हा निकाल तबद्दल ६० वर्षांनी देण्यात आला.

हा निकाल सुरुवातीला २४ सप्टेंबरला दिला जाणार होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून २८ सप्टेंबरला देण्याचे जाहीर केले. नंतर ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात आला.

अयोध्या हे शहर शरयू/ घागरा या नदीच्या किनारी फैजाबाद जिल्ह्यात उत्तर प्रदेश या राज्यात आहे.

देशातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश – न्यायमुर्ती रेखा दोशीत . जून २०१० मध्ये पाटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी रेखा दोशीत यांची निवड करण्यात आली.

दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश – न्यायमुर्ती दिपक मिश्रा

राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तीना राज्याचे राज्यपाल हे पद व गोपनियतेची शपथ देतात.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमुर्ती मोहित शहा यांची नियुक्ती करण्यात आली.

मोहित शहा हे मुंबई उच्च न्यायालयाचे ३८ वे मुख्य न्यायाधीश आहे.

केंद्रीय मंत्री मंडळाचे उच्च न्यायालयातील न्यायधीशांचे निवृत्तीचे वय ६२ वरून ६५ करण्याचे विधेयक मंजूर केले.

म्हणजे वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत उच्च न्यायालयातील न्यायाधीश पदावर काम करू शकतील .

इव्हीनिंग कोर्ट देशात स्थापन करणारे पहिले राज्य गुजरात, दुसरे राज्य तामिळनाडू तर सातवे राज्य महाराष्ट्र ठरले .


भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान विकास



भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान विकास

विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास करणे व विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासातून राष्ट्रीय विकास साधने भूमिकेतून भारताने पहिले वैज्ञानिक धोरण जाहिर केले. – ४ मार्च १९५८ (पं. नेहरू)
राष्ट्राच्या प्रगतीतील तंत्रज्ञानाचे महत्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने तंत्रज्ञानाविषक निवेदन (Technology Policy Statement) जाहिर केले-१९८३
विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रासाठी पंचवार्षिक योजनांतून दरवर्षी आर्थिक तरतूद करण्यात येते.

विज्ञान व तंत्रज्ञान नियोजनाचे तीन विभाग ( डी. एस. टी. स्थापना, मे १९७१ )

१) विज्ञान आणि तंत्रज्ञान, औद्यागीक संशोधन, सागरी विकास , अवकाश संशोधन, अणुऊर्जा

२) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), भारतीय कृषी संशोधन परिषद ( ICAR), दळणवळण विभाग, इलेक्ट्रॉनिक्स विभाग, अपारंपारिक ऊर्जा विभाग, जलसिंचन विभाग, उद्योग विभाग इ. ३० विभाग

३) राज्ये व संघराज्य प्रदेशांसाठी शास्त्र व तंत्रज्ञानाचा स्वतंत्र विभाग

केंद्रशासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञानविषयक संशोधन संस्था -

१. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद ( CSIR ) १९४२

२. भारतीय कृषी संशोधन परिषद ( ICAR )

३. भारतीय वैद्यकीय परिषद – ICMR

४. इलेक्ट्रॉनिक्स विभाग -DOE

५. संरक्षण व विकास संघटना – PRDO

६. पर्यावरण विभाग – DOEN

७. अणुऊर्जा विभाग – DAE

८. अवकाश विभाग – DOS

९. सागरी विकास विभाग-DOD

विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय –

१. विज्ञान तंत्रज्ञान

२. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन

३. विक तंत्रज्ञान

ह्याच प्रकारे केंद्र सरकारच्या व अन्य मंत्रालयाच्या संशोधन संस्था, सार्वजनिक उद्योगांची संशोधन व विकास कामांसाठी स्थापन केलेल्या संस्था, राज्य सरकारांनी शासकीय स्तरावर स्थापन केलेल्या संस्था त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठे व त्या अंतर्गत कार्य करणा-या संशोधन संस्था. देशातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राचा विचार करता शिक्षण, संशोधन व विकास यातील कार्य करणा-या संस्थांची संख्या जवळपास तीन हजारापर्यंत आहे.

महाराष्ट्र राज्यात २००५ मध्ये डॉ. वसंत गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी विज्ञान, तंत्रज्ञान आयोगाची स्थापना करण्यात आली.

१८ स्वायत्त वैज्ञानिक संस्था

१. बोस इन्स्टिट्युटः कोलकाता

२. आगरकर रिसर्च इन्स्टिट्युटःपुणे

३. श्री चित्रा तिरूनाल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नोलॉजीः तिरूअनंतपूरम (केरळ)

४. इंडियन असोसिएशन फॉर दि. कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेसः कोलकाता

५. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ऍस्ट्राफिजिक्सःबंगळूर

६. इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ ट्रापिकल मटेरिलॉजीः पुणे

७. जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ऍडव्हान्स सायंटिफिक रिसर्चः बंगळूर

८. रामन रिसर्च सेंटरः बंगळूर

९. बिरबल सहानी इन्स्टिट्युट ऑफ पॅलिओ बॉटनीः लखनौ

१०. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ जिओमॅग्नेटिझमः मुंबई

११. वाडिया इन्स्टिट्युट ऑफ हिमालयीन जिऑलॉजीः डेहराडून

१२. इंटरनॅशनल ऍडव्हान्स सेंटर फॉर पॉवडर मेटॉलॉजी ऍन्ड न्यु मटेरिअल्सः हैद्राबाद

१३. एस. एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेसः कोलकाता

१४. टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फॉर कास्टींग ऍण्ड असेसमेंट कौन्सिल – नवी दिल्ली.

१५. विज्ञान प्रसार संस्था- नवी दिल्ली

१६. राष्ट्रीय परिक्षण आणि अंशाकन बोर्ड – नवी दिल्ली.

१७. द्रव क्रिस्टल शोध केंद्र- बंगलोर.

१८. आर्यभट्ट संशोधन वेधशाळा – नैनिताल.

देशात विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची स्थापना – १९७१.
कार्य – विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील बाबींचा विकास करणे. धोरणात्मक निवेदने प्रसारण करणे, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्थांना आवश्यक ते तंत्रज्ञान पुरविणे, वैज्ञानिक संशोधन संस्थांना अनुदान देणे. इ.
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाची (NSTEDB) ची स्थापना – जाने. १०८२
ग्रामिण जनतेमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाच्या विषयी जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने भारतीय जन विज्ञान जथ्थाचे आयोजन केले होते. – १९९२
द इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सेस,- बंगलोर (१९०१)
इंडियन सायन्स कॉंग्रेस असोसिएशन - (ICSA) – (१९१४) कोलकाता
दि जिऑजिकल सर्व्हे ऑफ इंडिया – (१८५१) डेहरादून
भारतीय हवामान खाते – १८७५ , कार्यालय – दिल्ली, कुलाबा, मद्रास, कलकत्ता, नागपूर, रांची, तिरूचिरापल्ली.
भारतीय सर्वेक्षण संस्था, डेहराडून या संस्थेचे ब्रिद वाक्य – आ सेतु हिमाचल
भारतीय सर्वेक्षण विभागाने UNO च्या NDP चे सहाय्य घेऊन सर्वेक्षण आणि मानचित्र निर्मिती याचे प्रशिक्षण देणारे आशियातील पहिले केंद्र व संशोधन विभाग सुरू केला – (१९७०) हैद्राबाद
मानचित्र मुद्रण कार्य – कोलकाता, हैद्राबाद, डेहराडून
भारतीय विज्ञान अकॅडमी – बंगलोर
भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकॅडमी – दिल्ली
राष्ट्रीय विज्ञान अकॅडमी – अलाहाबाद

थेट पंतप्रधानांची जबाबदारी असणारी मंत्रालये – अणुऊर्जा, सागर विकास, विज्ञान व तंत्रज्ञान

बोर्ड ऑफ हाईट मॅथमेटिक्स – मुंबई
भारतीय वन सर्व्हेक्षण – डेहराडून, प्रादेशिक कार्यालय – नागपूर, कोलकाता, बंगळूर, सिमला
भारतीय राष्ट्रीय इंजिनिअरिंग अकॅडमी – दिल्ली
राष्ट्रीय विज्ञान दिन – २८ फेब्रुअवारी
इन्स्टिट्युट ऑफ नॅनो सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजीची स्थापना केली जाणार आहे. – मोहाली
वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद ( सीएमआयाआर) – ही देशातील सर्वोच्च सर्वोत्तम व विकास संस्था आहे. हिच्या अंतर्गत ३८ प्रयोगशाळा व ३९ क्षेत्रीय केंद्र आहे. याचा उद्देश विज्ञान व तंत्रज्ञान यात उच्च यश प्राप्त करून ते आंतरराष्ट्रीय स्पर्धाक्षम बनविणे हे आहे.
कलिंगा पारितोषिक – विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-यांना युनेस्कोतर्फे हा पुरस्कार दिला जातो.

भारतातील अणुऊर्जा संशोधन

भारतीय अणुशक्तीचे जनक – डॉ. होमी भाभा.
टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च – मुंबई (१९४५)
अणु शक्ती किंवा अणु ऊर्जा आयोगाची स्थापना ऑगस्ट १९४८, डॉ. होमी भाभा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. उद्देश- शांततेच्या कार्यासाठी अणु ऊर्जेचा भारतात वापर करणे.
अणु ऊर्जा या स्वतंत्र खात्याची स्थापना – १९५४
तुर्भे (ट्रॉम्बे) येथे अणुसंशोधन केंद्रकाची स्थापना – १९५७

त्याचेच नामकरण- भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर (BARC)- असे करण्यात आले – १९६७

ऍटोमिक एनर्जी रेग्युलेटिंग बोर्ड – १९८३
अणु ऊर्जा समिती मंडळ – ऑगस्ट १९८४
अणु ऊर्जा विकास महामंडळ – १७ डिसे. १९९७.`

देशातील अणुभट्ट्या (शोध रियॉक्टर)
क्र. नाव पासून कार्यरत मदत क्षमता स्थळ
१. अप्सरा ४ ऑगस्ट १९५६ ब्रिटन १ मे. वॅट ट्रॉम्बे
२. सीरस १० जुलै १९६० कॅनडा ४० वॅट ट्रॉम्बे
३. झर्लिना १४ जुलै १९६१ स्वदेशी १०० मेगा वॅट ट्रॉम्बे
४. पूर्णिमा २२ मे १९७२ ———– १ मेगा वॅट ट्रॉम्बे
५. ध्रुव ८ ऑगस्ट १९८५ स्वदेशी १०० मे. वॅट ट्रॉम्बे
६. कामिनी १९८८ स्वदेशी ४० मेगा वॅट कल्पकम
(कोड - अ स. झ. प. ध. का.)

५६ ६० ६१ ७५ ८५ ८८


अणुविद्युत प्रकल्प
केंद्र राज्य स्थापना सहकार्य क्षमता
तारापूर महाराष्ट्र १९६९ अमेरिका १४०० मे. वॅ.
रावतभाट्टा राजस्थान

१)१९७२

२)१९८०
कॅनडा ७४० मे. वॅ.
नरोरा उत्तरप्रदेश

१)१२ मार्च १९८९

२) २४ ऑक्टो १९९१
४४० मे. वॅ.
कल्पकम तामिळनाडू

१)जाने. १९८४

२)२१ मार्च १९८६
स्वदेशी

४४० मे. वॅ.

६६० मे. वॅ.
कैगा कर्नाटक-१९९३
काक्रापारा गुजरात – १९९५

(जगातील अत्युच्च दर्जाचे)
४४० मे. वॅ.
उमरेड महाराष्ट्र निर्माण कार्य स्वरूप
कुंडाकुलम तामिळनाडू रशिया

अणुभट्ट्यामध्ये झालेले अपघात – अमेरिकेतील लॉग आयलँड व रशियातील चर्नोअबल येथे घडला आहे.
भारतातील सर्वाधिक क्षमतेचा (५४०मेगावॅट) अणूऊर्जा प्रकल्प ६ मार्च २००५ रोजी तारापूर (मुबंई) येथे कार्यान्वीत झाला.
जैतापूर ( रत्नागिरी) – प्रस्तावित अणू विद्युत प्रकल्प.
देशातील पहिला फार्स्ट ब्रिडर न्युक्लिअर रिऍक्टर – कल्पकम तामिळनाडू.
दि. ११ ऑक्टोबर २००८ रोजी भारत व अमेरिका यांच्या दरम्यान आण्विक करार झाला. यामुळे जगातील ४५ अणु इंधन पुरवठा करणा-या देशांनी या करारास मान्यता दिली. त्यामुळे भारतास अणु इंधन मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला.
या करारास हेन्री हॉईड करार (कलम १२३) असेही म्हणतात.
यामुळे भारातातील २२ अणुभट्ट्यांतील १४ अणु भट्ट्या आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा आयोगाच्या निरक्षणाखाली येणार आहे.
अमेरिकेत पूर्वी ३० सप्टे. २००८ रोजी भारताने फ्रान्स सोबत अणुकरार केला. फ्रान्सनंतर असा करार करणारा अमेरिका हा दुसरा देश ठरला.
भारताच्या अणुबॉम्ब चाचण्या -

१) शास्त्रज्ञ राजा रामोण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १८ मे१९७४ रोजी ‘आणि बुध्द हसला” या सांकेतिक नावाने २ यशस्वी अणु चाचण्या घेण्यात आल्या.

२) दि. ११ व १३ मे १९९८ रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोखरण येथे पाच अणु बॉम्ब चाचण्या घेण्यात आल्या. यात एक हायड्रोजन बॉम्ब होता.

अणु विकास

जडपाणी प्रकल्प – जडपाण्याचा संचलन व शीतकरण घटक म्हणून अणुभट्टीत वापर केला जातो.
देशातील पहिले जडपाणी प्रकल्प पंजाबमध्ये – नानगल या ठिकाणी १९६१ मध्ये सुरू झाला.
अमोनिआ – हायड्रोजन प्रक्रियेद्वारा जडपाणी निर्मिती करणारे प्रकल्प – नानगल (पंजाब), बडोदरा (गुजरात), तालचेर (ओरिसा), तूतीकोरीन (तामीळनाडू), थळ (महाराष्ट्र), हाजिरा (गुजरात)
हायड्रोजन सल्फाईडद्वारा जडपाणी निर्मिती करणारे प्रकल्प – रावतभाटा (राजस्थान) व मणगुरू (आंध्रप्रदेश)
अणुऊर्जा खात्याच्या अखत्यारीत काम करणा-या संस्था

१. भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर (BARC) – मुंबई – १९५७

२. इंदिरा गांधी सेंटर फॉर ऍटोमिक रिसर्च ( IGCAR ) – कल्पकम ( तामिळनाडू)

३. सेंटर फॉर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी – (CAT) इंदोर (म. प्रदेश)– १९८४

४. व्हेरिएबल एनर्जी सायक्लोन सेंटर (VECC) – कोलकाता (प. बंगाल)

५. ऍटोमिक मिनरल्स डिव्हीजन ( AMD) – हैद्राबाद (आंध्रप्रदेश)

मंदायक (मॉडरेटर) म्हणून वापर करतात. – ग्राफाइट
शोषक (ऑब्जर्वर) म्हणून वापर करतात. – कॅडमियम, बोरॉनयुक्त पोलाद. बेरेलियम.
औद्योगिक संस्था

१. हेवी वॉटर बोर्ड (WHB) , मुंबई

२. न्युक्लिअर फ्युएल कॉम्प्लेक्स (NFC) , हैद्राबाद (A.P.)

३. बोर्ड ऑफ रेडिएशन ऍन्ड आयसोटोप टेक्नॉलॉजी ( BRIT) , मुंबई

सार्वजनिक निगम-

१. न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCL) , मुंबई

२. युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL), जादूगोडा (झारखंड)

३. इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड (IRE), केरळ

४. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL), हैद्राबाद (आंध्रप्रदेश)

अणु ऊर्जा खाते पुढील ७ स्वायत्त संस्थाना अर्थसाहाय्य करते.

१. टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), मुंबई

२. टाटा मेमोरिअल सेंटर (TMC) , मुंबई

३. सहा इन्स्टिट्युट ऑफ न्युक्लिअर फिजिक्स ( SINP) , कोलकाता

४. इन्स्टिट्युट ऑफ फिजिक्स ( IOP ) , भुवनेश्वर (ओरिसा)

५. मेहता रिसर्च इन्स्टिट्युट ( MRI) , अलाहाबाद, (U.P)

६. इन्स्टिट्युट ऑफ मॅथेमेटिकल सायन्सेस (IMSC), चेन्नई.

७. इन्स्टिट्युट फॉर प्लाझमा रिसर्च (IPR) , गांधीनगर (GJ)

अवकाश संशोधन

पृथ्वी ही मानवी मनाचा पाळणा आहे. पण पाळण्यात कोणी कायम राहू शकत नाही. – जिओलोव्हस्की (रशिया)
मानवाने सोडलेला पहिला उपग्रह ज्याद्वारे अवकाश युगाची सुरूवात झाली- स्फुटनिव -१

हा उपग्रह रशियाने ४ ऑक्टो, १९५७ ला सोडला, (स्फुटनिकचा अर्थ – सहप्रवासी किंवा उपग्रह)

अमेरिकेने सोडलेला पहिला उपग्रह – ( ३१ जाने. १९५८), एक्सप्लोरर -१
अंतराळात जाणारा पहिला मानव – युरी गागारीन (रशिया) (१२ एप्रिल १९६१- व्होस्टोक – १द्वारे)
अंतराळात जाणारा पहिला प्राणी – कुत्रा, लायका नावाची कुत्री, स्फुटनिक -२ द्वारे
अंतराळात चालणारा पहिला मानव – ऍलेक्सी लिआनोव्ह (व्होस्टोक -२)
अंतराळात जाणारी पहिली महिला – व्हॅलेंटिना तेरेस्कोव्हा (रशिया ),१६ जून १९६३ व्होस्टोक – ६द्वारा)
पहिली अमेरिकन पृथ्वी प्रदक्षिणा – ऍलन शेफर्ड (५ मे १९६१, फ्रिडम -७)
चंद्रावर गेलेले पहिले मानवरहित यान – (३ फेब्रु. १९६६००) ल्युना -१
रशियाचे १९६९ मध्ये पहिले अवकाश स्थानक – स्कायलॅब
रशियाची १९७० मध्ये पहिली मानवरहित अवकाश प्रयोगशाळा - सॅल्यूत
चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल टाकले गेले – २० जुलै १९६९

नील आर्मस्ट्राँग आणि एडविन आल्ड्रिन, अपोलो – ११द्वारे

मंगळ ग्रहाच्या संशोधनासाठी अमेरिका व रशियाने सुरू केलेली मालिका -१९७५ पासून अपोलो सोयूज, दुसरी मालिका – १९९५ पासून अटलांटिक मीर
अमेरिकेने मंगळावर पाठविलेले यान – पाथ फाइंडर ( ४ जलै, १९९७
अमेरिकेने पाठविलेले पहिले स्पेस शटल – कोलंबिया (१२ एप्रिल १९८१) – नष्ठ – १ फेब्रु २००३
त्यानंतर पाठविलेले स्पेस शटल – चॅलेंजर, डिस्कव्हरी आणि अटलांटिस
रशियाने स्थापन केलेल्या अवकाश केंद्र किंवा स्थानक – मीर ( २० फेब्रु, १९८६ वजन १३० टन)
लोकांना दूरदर्शनद्वारा पहिले रॉकेटचे प्रत्यक्ष प्रक्षेपण बघायला मिळाले. – ३ मार्च १९८६ मध्ये पाठवलेले रशियाचे सोयुज – १५ या उपग्रहाचे
१९९ देशांच्या सहकार्याने बनलेली युरोपियन अंतरिक्ष एजन्सिने (E.S.A.) सोडलेले रॉकेट- एरियन रॉकेट
जगात अंतराळ पर्यटन करणारे मानव

१. डेनिस टिटो, अमेरिका

२. मार्क शटल बर्थ- आफ्रिका

३. ग्रेगरी ओल सेन – अमेरिका

४. अनुशेह अन्सारी (इराण – अमेरिकी)

भारत आणि अवकाश संशोधन

१९६२ मध्ये इंडियन नॅशनल कमीटी फॉर स्पेस रिसर्च या समितीची स्थापना विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
अग्णिबाण प्रक्षेपण केंद्र – थूंबा १९६३ (केरळ)
थूंबा हे चुंबकीय विषुववृत्तावर आहे.
थूंबा येथून अमेरिकेने बनावटीचे नायके अपाचे हे पहिले रॉकेट भारताने सोडले – २१ नोव्हे. १९६३
अंतराळ संशोधन विषयक सर्व संस्थांना जोडणारी भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO)-१९६९ (बंगळूर)
केंद्र सरकारने अंतरिक्ष आयोग (स्पेस्स कमिशन) अवकाश विभागाची स्थापना केली- १९७२, मुख्यालय -बंगळूर
१९ एप्रिल १९७५ या दिवशी रशियाच्या सहकार्याने भारताचा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला – आर्यभट्ट (वजन ३६० कि. ग्रॅ.)
सॅटेलाइट ट्रेकिंग ऍन्ड स्टेशनची (उपग्रह स्थानक ) ची स्थापना – कावलूर ( तामिळनाडू) – १९७७
देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र १९७१ पासून कार्यरत आहे – आर्वी ( पुणे-महाराष्ट्र)
वैश्विक किरणांचे संशोधन करण्याच्या उद्देशाने अवकाश संशोधन केंद्र व भाभा अणुशक्ती केंद्र यांनी ४ वर्ष केलेल्या संशोधनानंतर ४५ किलो वजनाचा, ४८ से.मी. व्यासाचे,५३ से.मी. उंचीचे अनुराधा हे उपकरण अमेरिकेच्या चॅलेंजर अवकाश यानातून पाठविण्यात आले. या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक शास्त्रज्ञ डॉ. सुकुमार विश्वास हे होते.
अंतराळात जाणारा पहिला भारतीय म्हणून यांना मान दिला जातो. – स्कॉड्रन लिडर – राकेश शर्मा (सोयुझ टी- ११)
मानवास अंतराळात पाठविणारा भारत हा १४ वा देश, तर राकेश शर्मा १३८ वा अंतरिक्ष ठरला.
अंतराळात जाणा-या पहिल्या भारतीय महिला – कल्पना चावला (जन्म कर्नुल-हरियाणा) २० नोव्हे. १९९७ रोजी अवकाशात जाणा-या कोलंबिया या अवकाशात या यानाद्वारे प्रवास केला.
कोलंबिया दुर्घटनेनंतर अमेरिकेने डिस्कव्हरी हे स्पेस शटल अंतराळात पाठविले.
कल्पना चावला नंतर नासामध्ये संशोधन करणारी दुसरी भारतीय महिला – सुनिता विल्यम्स.
दोन वेळा अवकाशात भ्रमण करणा-या पहिल्या भारतीय महिला – कल्पना चावला
कोलंबिया यान पृथ्वीवर उतरतांना अपघातग्रस्त होवून सात अंतराळविरासह मृत्युमुखी – १ फेब्रु, २००३
केवळ हवामानविषयक अभ्यास संशोधन व निष्कर्ष यांच्याशी निगडीत असा भारताचा पहिल्या उपग्रहाचे नाव – मॅट सॅट (मॅट सॅट चे नामकरण – कल्पना – १ ) १२ सप्टेंबर,२००२
१५ ऑगस्ट २००३ ला भारताच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून चंद्रायान (सोमयान) ची घोषणा केली.
११ सप्टेंबर २००३ ला मिशन चंद्रयानाला मंजूरी दिली. चांद्रयान – १ ही भारताची पहिली चांद्रमोहीम आहे. दि. २२ ऑक्टो. २००८ रोजी आंध्र प्रदेशामधील श्रीहरीकोटा येथिल सतीश धवन आंतरिक्ष केंद्रावरून सायंकाळी ६.२० वा. धृवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन ( PSLV-C-11 ) द्वारे चांद्रायानचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
चांद्रयाण चंद्राच्या कक्षेत पोहोचले. – ८ नोव्हेंबर -२००८
भारताची मोहीम ही जगातील ६८ व्या चांद्र मोहीम होती. तर चंद्रयान पाठवणारा भारत हा देश ठरला – ६वा

अंतरिक्ष आयोगाचे प्रमुख केंद्रे-

१. विक्रम साराभाई स्पेस सेंटर – तिरूअनंतपूरम, केरळ (१९६२)

२. इंडिअन सायंटिफिक सॅटेलाईट प्रोजेक्ट (ISRO) – बंगळूर (१९७१)

३. स्पेश ऍप्लिकेशन सेंटर (SAC) – अहमदाबाद – (१९६८)

४. श्री हरिकोटा रेंज, श्रीहरीकोटा (SHAR) (आंध्रप्रदेश) (नामकरण – सतिश धवन)

५. मास्टर कंट्रोल फॅसिलिट (मुख्य नियंत्रण सुविधा) – हसन (कर्नाटक)

६. इस्त्रो टेलिमेट्री ट्रेकिंग अँड कमांड कम्युनिकेशन नेटवर्क – बंगळूर

७. लिक्वीड प्रोप्युलुझन सिस्टिम युनिट – तिरूअनंतपूरम

८. डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन कम्युनिकेशन युनिट – अहमदाबाद

९. नॅशनल रिमोट सेसिंग एजन्सी – हैद्राबाद

१०. भारताच्या अंतराळ तंत्रज्ञान क्षमतेचे व्यापारीकरण करण्यासाठी अंतरिक्ष कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. ची स्थापना करण्यात आली. – बंगळूर – १९९२

थुंबा रॉकेट केंद्र, थुंबा- तिरूअनंतपूरम
फिजीकल रिसर्च लॅब्रोटरी- अहमदाबाद (गुजरात) फिजिकल लॅब्रोटरी- दिल्ली
सॅटेलाईट लाँच व्हेईकल प्रोजेक्ट- तिरूअनंतपूरम –(केरळ)
आकाश विज्ञान विद्यापीठ – मुंबई.

भारतीय अंतराळ कार्यक्रम

भारतीय अंतराळ कार्यक्रम हा बव्हंशी नागरी आणि शांततापूर्ण कारणांसाठी आहे. यामध्ये ३ बाबींचा समावेश होतो.

१. उपग्रहांची बांधणी (दूरसंवेदन व दूरसंचार उपग्रह)

२. वाहकांची (लाँच व्हेईकल्स) निर्मिती आणि विकास

३. उपग्रहांना कक्षेत स्थिर करणे

भारतीय सुदूरसंवेदन उपग्रह (इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट)- यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ९०० कि. मी. (लोअर्थ आर्बीट) अंतरावरून निरिक्षण करण्याची व्यवस्था असते. यात पृष्ठभागांवरील वस्तूंची विकीरणाद्वारे(Radiation) माहिती मिळवितात. पृथ्वीच्या पृष्ठभागाला प्रत्यक्ष स्पर्श न करताही माहिती मिळविता येते असल्याने त्यास सुदूर संवेदन असे म्हटले जाते. सुदूर संवेदनाद्वारे विस्तृत भुभागाची सुव्यवस्थित व अचूक माहिती अल्पावधीत मिळविता येते.
भारताने IRS उपग्रहाद्वारे १९८८ पासून माहिती मिळण्यास सुरूवात केली. हे उपग्रह ध्रुवीय कक्षेत सोडतात. ते दक्षिण-उत्तर असे भ्रमण करतात व पृथ्वीभोवती ४ ते ५ दिवसांत एक फेरी पूर्ण करतात.
मे १९९७ IRS-P 4 मध्ये किंवा ओशियन सॅट PSLV – C 2 या वाहकाद्वारे श्रीहरीकोटा येथून सोडला. ओशियन सॅटच्या प्रक्षेपणाने भारताने आपले लक्ष भूपृष्ठावरून समुद्रविषयक भागावर केंद्रीत केले.
PSLV – C2 हे पहिले वाहक होते. ज्याद्वारे इतर देशांचे उपग्रह सोडण्यात आले उदा. –जर्मनी, द. कोरिया

दूरसंवेदनाचे महत्व व उपयोग-

१. उपग्रहाद्वारे एकाचवेळी अनेक गोष्टींचे निरीक्षण करता येते उदा. – खनिजे व नैसर्गिक तेल व वायु इ.

२. पिकाखालील क्षेत्र, पुराची पूर्वसुचना, नैसर्गिक खनिजे, हिमालयातील नद्या, हिमरेषांची हालचाल इ.

३. कृषी क्षेत्र – भूमी उपयोग, भाकित रोगांचे प्रमाण, टोळ धाडींची हालचाल, सिंचनासाठी धरणातील पाण्याची उपलब्धता इ. बाबींची माहिती मिळते.

४. प्लॅक्टनच्या उपलब्धतेनुसार समुद्रात मासेमारीची अधिक क्षमता कोठे आहे हे निश्चित करण्यासाठी.

५. वनक्षेत्र-वनक्षेत्र निश्चित करणे, झाडांच्या प्रजातिचे वितरण, प्राण्यांचे स्थलांतर, वणव्यांवर लक्ष ठेवणे इ.

६. २४ तास अगोदर हवामानाचा अंदाज वर्तविता येतो.

७. दूरसंवेदनाचे व्यापारी उपयोग- IRS द्वारे पुरविलेल्या डाटाच्या मार्केटिंगसाठी अंतरिक्ष कॉर्पोरेशन स्थापन करण्यात आले. अंतारिक्ष कॉर्पोरेशच्या करारामुळे भारतास १ बिलियन डॉलर इतकी प्राप्ती होईल.

८. कर्नाटक पोलिसांच्या टास्क फोर्सने चंदनचोर विरप्पनचा मागोवा घेण्यास दूरसंवेदनाचा डाटा वापरला होता. त्याप्रमाणे लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा थरच्या वाळवंटात शोध लावण्याकरिता दूरसंवेदन उपग्रहांच्या प्रतिमा वापरल्या.

भारतीय दूरसंचार उपग्रह व्यवस्था / Indidan National Satellite System ( INSAT)

दूरसंचार उपग्रह भूस्थिर – (Geo-Stationary) हा उपग्रह असून पृथ्वीपासून ३६ हजार कि. मी. इतक्या उंचीवर स्थिर केलेले असतात. पृथ्वीवरील निश्चित बिंदूवर (देशावर) हे उपग्रह स्थिर असून पृथ्वीच्या परिवलनाच्या वेगाइतकाच त्याचा वेग असतो. म्हणजेच भूस्थिर उपग्रह २४ तासात पृथ्वीभोवती १ फेरी पूर्ण करतात. हे उपग्रह पश्चिम ते पूर्व असे भ्रमण करतात.
या उपग्रहाची निर्मीती – प्रसार भारती कॉर्पोरेशन, भारतीय हवामान खाते, दूरसंचार विभाग यांच्या संयुक्तपणे इन्सॅट प्रणालीची निर्मिती केली जात असली तरी अवकाश विज्ञान मंत्रालयाकडे इन्सॅटची कार्यात्मक जबाबदारी सोपविली आहे.
इन्सॅट उपग्रह प्रणालीची सुरूवात १९८२ मध्ये झाली. सध्या इन्सॅटची चौथी पिढी अवकाशात स्थिर करण्याचे कार्य चालू आहे.

१. इन्सॅटची पहिली पिढी – इन्सॅट- १ – अ, १- ब, १- क, १- ड,

२. इन्सॅटची दुसरी पिढी – इन्सॅट -२-अ,२-ब, २-क, २-ड, २-इ,

३. इन्सॅटची तिसरी पिढी- इन्सॅट – ३-ब, ३-क, ३-अ, ३-इ,

४. इन्सॅटची चौथी पिढी – १) इन्सॅट – ४- अ दि. २५ डिसेंबर २००५ रोजी प्रक्षेपण

२)इन्सॅट – ४-ब, दि. १० मार्च २०१० रोजी प्रक्षेपण

३) इन्सॅट- ४ – क,दि. १० जुलै २००६ रोजी GSLV-F-02 , द्वारे श्रीहरी कोटा येथून GSLV- F- 04 द्वारे येथून यशस्वी प्रक्षेपण केले. याचा उपयोग डी. टी. एच सेवांचा विकास करण्यासाठी होणार आहे.

उपग्रह प्रणालीचे व्यावहारिक उपयोग-

१. दूरदर्शन देशातील ९०% लोकांपर्यंत पोहचू शकते. याचे श्रेय इन्सॅट उपग्रहाकडे जाते. इन्सॅट २ मुळे दूरदर्शन सेवा अग्नेय व मध्य आशियापर्यंत पोहचू शकते.

२. इन्सॅटमुळे देशातील लहानमोठी ठिकाणे दूरसंपर्क योजनेमुळे जोडली गेली आहेत.

३. हवामानाचा अंदाज वर्तविणे, आकाशवाणीचे प्रसारण, माहितीचे वहन, टेलिप्रिंटर, संगणक जाल, नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देण्यास इंटरनेट जाल यांसाठी उपयोगी आहे.

४. शोध आणि मदत कार्यांसाठी – जहाजांद्वारे संकटकालीन संदेश पाठवून मदत कार्य मिळविता येते.

भारतीय प्रेक्षपक वाहकांचा विकास ( लॉंच व्हेईकल)

उपग्रहांचे प्रक्षेपण व संरक्षण क्षेत्रासाठी प्रक्षेपक वाहकांचे अत्यंत महत्व आहे.
भारताने १९८० पासून प्रक्षेपक वाहनांच्या निर्मितीला सुरूवात केली.

SLV- सॅटेलाईट लाँच व्हेइकल – ३०० कि. मी.

ASLV- ऍग्युमेटेड सॅटेलाईट लाँच व्हेइकल – ७०० कि. मी.

PSLV- पोलार सॅटेलाईट लाँच व्हेइकल – १००० कि. मी.

GSLV – जियोसॅक्रोनाईस सॅटेलाईट लाँच व्हेइकल- ३६००० कि. मी

या चारही पिढ्यांतील प्रक्षेपक वाहनांची भारताने यशस्वीरित्या निर्मिती केली आहे. प्रक्षेपक वाहनातील इंधन तंत्रज्ञानावरही भारताने प्रभुत्व मिळवले आहे.

प्रक्षेपक वाहनांचे उपयोग व महत्व

१. भारतीय उपग्रहांचे प्रक्षेपण कमी खर्चात होऊ शकते.

२. इतर देशांचे उपग्रह अवकाशात सोडून परकीय चलनाची प्राप्ती होते.

३. भारताला हेरगिरीसाठी स्वतःचे उपग्रह सोडता येतील.

४. PSLV च्या यशस्वी प्रेक्षपणानंतर भारताची आंतरखंडिय क्षेपणास्त्राची क्षमता दिसून येते.

अग्निबाणाच्या ज्वलन कोटीचे तापमान २०००० C असते, त्यामुळे ज्वलन कोटीसाठी ग्रॅफाइट वापरतात.
भारतातील सर्वात मोठे कॉम्प्युटर नेटवर्क, अग्नीबाण व उपग्रह जुळणी केंद्र, ते उड्डाणास योग्य आहे की नाही याचा निर्णय, आवश्यक इंधन निर्मिती प्रकल्प श्रीहरीकोटा येथे आहे.
रेडिओ ऍस्ट्रॉनॉमी सेंटर – उटकमंड
भूस्थिर उपग्रह पृथ्वीभोवती एक फेरी २४ तासात पूर्ण करतात तर इतर उपग्रह १ फेरी पूर्ण करतात – ९० मिनिटांत
भारतीय बनावटीचे पहिले अंतरिक्ष प्रक्षेपन वाहन- SLV-3
इन्सॅट प्रक्षेपणानंतर नियंत्रणाची जबाबदारी- हसन (कर्नाटक)
धोक्याची सुचना देणारी यंत्रणा असणारा जगातील अवकाशात फिरणारा एकमेव उपग्रह – इन्सॅट 2A
अग्निबाणाच्या कार्यपध्दतीचे मुलत्वांचे वर्णन करणारा शास्त्रज्ञ – जिओलोव्हस्की (USSR)
अग्नी बाण शास्त्राचा जनक, पहिला द्रवरुप इंधनावर चालणारा अग्निबाण तयार करणारा शास्त्रज्ञ ; गोगार्ड
USA ची मंगळावरील मालिका – व्हायकींग
राज्यात रिमोट सेन्सीग ऍप्लीकेशन – नागपूर (१९८८)
कौरु (कोअरु) प्रक्षेपण स्थळ फ्रेंच गियाना (द. अमेरिका ) मध्ये आहे.
चीनने १५ आक्टो. २००३ मध्ये पाठवलेले यान -शेनझाऊ -V
याअंतराळ्याद्वारे अंतराळ्यात पाठविलेला पहिला अंतरिक्ष यात्री- यांग लीवी.

भारताचा उपग्रह कार्यक्रम – एक दृष्टीक्षेप
क्र. उपग्रह प्रक्षेपण वाहन प्रक्षेपण दिनांक कार्य
१. आर्यभट्ट

२. भास्कर-१

३. रोहिणी

४. रोहिणी RS 1

५. रोहिणी RSD 1

६. ऍपल

७. भास्कर -२

८. इन्सॅट १ ए

९. रोहिणी RSD२

१०.इन्सॅट १ बी

११.श्रोस-१

१२.इन्सॅट १ बी

१३.श्रोस -२

१४.इन्सॅट १सी

१५.इन्सॅट १ डी

१६.IRS -१ए

१७.श्रोस ३

१८.इन्सॅट २ ए

१९.इन्सॅट २ बी

२०.IRS -१

२१.श्रोस सी.

२२.I.R.S.P-2

२३.इन्सॅट २सी

२४.I.R.S-1c

२५.I.R.S-P3

२६.एन्सॅट २ डी

२७.I.R.S. D -१

२८.इन्सॅट २ ई.

२९.I.R.S. P-4

३०.इन्सॅट ३ बी

३१.सी-सॅट

३२.टी. ई.एस. ३२

३३.इन्सॅट ३ सी

३४.मॅट –सॅट(कल्पना)

३५.इन्सॅट ३ ए.

३६.जी –सॅट २

३७.इन्सॅट ३ ई

३८.रिसॉट सॅट

३९.एज्युसॅट

४०.हॅमसॅट व कार्टोसॅट

४१.इन्सॅट ४ सी

४२.कार्टोसॅट – २

४३.इटलीचा एजाईल

४४.इन्सॅट-४

४५.पोलरीज(इस्त्राईल)

४६.कार्टोसॅट -२ए

४७.चंद्रयाण -१
इंटर कॉसमॉस U.S.S.R.

इंटर कॉसमॉस U.S.S.R.

एस. एल.वी-३ (भारत)

एस. एल.वी-३ (भारत)

एस. एल.वी-३ (भारत)

एरियन ( युरोपिय अंतरिक्ष एजंसी)

इंटर कॉसमॉस U.S.S.R.

डेल्टा

एस. एल.वी-३ (भारत)

चॅलेजर शटल

एस. एल.वी- (भारत)

वास्तोक

एस. एल.वी- (भारत)

एरियन

डेल्टा

सेव्हियत रॉकेट

एस. एल.वी-४ (भारत)

डेल्टा ( सं. रा. अमेरिका)

एरियन (युरोपिय अंतरिक्ष एजंसी)

पी. एस. एल. व्ही.(भारत)

एस. एल.वी- ४(भारत)

एरियन (युरोपिय अंतरिक्ष एजंसी)

मोलनिया

पी. एस. एल. व्ही.डी.३

एरियन (युरोपिय अंतरिक्ष एजंसी

पी. एस. एल. व्ही.डी१

एरियन

पी. एस. एल. व्ही.सी २

एरियन ५

पी. एस. एल. व्ही.डी. १

पी. एस. एल. व्ही.सी. ३

एरियन -४

पी. एस. एल. व्ही.सी.(भारत)

एरियन ५ (युरोपिय अंतरिक्ष एजंसी)

जी. एस. एल.व्ही.

एरियन ५ (युरोपिय अंतरिक्ष एजंसी)

पी. एस. एल. व्ही.सी.-५

(राज्यसेवा २००६)

पी. एस. एल. व्ही.सी.६

जी. एस. एल.व्ही.-०२

पी. एल. व्ही.सी-७

पी.एस. एल. व्ही.एफ -४

सी.आर. जीएल. व्ही.एफ – ४

पी.एस. एल. व्ही.एफ –४

पी.एस. एल.व्ही.एफ-१०

पी.एस. एल.व्ही.एफ-११
१९/४/७५

७/६/७९

१०/८/७९

१८/७/८०

३१/५/८१

१९/६/८१

२०/११/८१

१०/४/८२

१७/४/८३

३०/८/८३

२४/३/८७

१९/३/८८

१३/७/८८

२२/७/८८

१२/६/९०

२९/८/९१

१९/५/९२

१०/७/९२

२३/७/९३

२०/८/९३

४/५/९४

१५/१०/९४

७/१२/९५

२८/१२/९५

२१/३/९७

४/६/९७

२९/९/९७

३/४/९९

२६/५/९९

२७/३/२०००

१८/४/२००१

२२/१०/२००१

२४/१/२००२

१२/९/२००२

१०/४/२००३

८/५/२००३

२८/९/२००३

१७/१०/२००३

२९/९/२००४

५/५/२००५

१०/७/२००६

१०/१/२००७

२३/४/२००७

२/९/२००७

२१/१/२००७

२८/४/२००८

२२/१०/२००८
वैज्ञानिक

पृथ्वी सर्वेक्षण

पृथ्वी सर्वेक्षण (अयशस्वी)

पृथ्वी सर्वेक्षण

वैज्ञानिक (अयशस्वी)

संचार

पृथ्वी सर्वेक्षण

बहूउद्देशिय

वैज्ञानिक

बहूउद्देशिय

तंत्रज्ञानिक

दूरसंवेदी

तंत्रज्ञान (अयशस्वी)

बहूउद्देशिय (अयशस्वी)

बहूउद्देशिय

दूरसंवेदी

तंत्रज्ञान

बहूउद्देशिय

बहूउद्देशिय

दूरसंवेदी(अयशस्वी)

तंत्रज्ञान

दूरसंवेदी

बहूउद्देशिय

दूरसंवेदी

दूरसंवेदी

बहूउद्देशिय

दूरसंवेदी

व्यावसायिक

समुद्र पर्यवेक्षण

बहूउद्देशिय

पृथ्वी सर्वेक्षण

औद्योग्यिक पर्यवेक्षण

बहूउद्देशिय

हवामान सर्वेक्षण

बहूउद्देशिय

बहूउद्देशिय

बहूउद्देशिय

दूरसंवेदी

शिक्षण

बहूउद्देशिय

अयशस्वी

यशस्वी

सफल

डी.टी.एच.

लष्करी वापर

यशस्वी


टिप ; पी.एस.एल.व्ही.-सी ने एकाच वेळी १० उपग्रह आकाशात सोडण्याचा भारताने पराक्रम केला. त्यात त्याने दोन भारतीय व आठ देशांचे आठ इतर उपग्रह होते.

मुलभूत संकल्पना – रसायनशास्ञ


मुलभूत संकल्पना – रसायनशास्ञ

रॉबर्ट बॉईल ( १६२७ – १६९१ ) याला रसायन शास्त्राचा जनक म्हणतात. कारण रसायनशास्त्राचा पध्दतशीरपणे अभ्यास करणारा तो पहिला शास्त्रज्ञ होय.

आधुनिक रसायनशास्त्राचा जनक – ए. लावासिए. ( त्याने ऑक्सिजनला नाव दिले.) द्रव्य व द्रव्याचे गुणधर्म (Matter & Properties of Matter) द्रव्यांच्या अवस्था – ४ १. स्थायुरूप अवस्था ( घन ) ( Solid State )
स्थायुरूप अवस्था

स्थायुरूप अवस्था

२. द्रवरूप अवस्था (द्रव ) (Liquid State )
द्रवरूप अवस्था

द्रवरूप अवस्था

३. वायुरूप अवस्था ( वायु ) (Gaseous state )
वायुरूप अवस्था

वायुरूप अवस्था

४. प्लाझ्मा ( Plasma)
प्लाझ्मा

प्लाझ्मा

यापैकी प्लाझ्मा ही अवस्था सूर्याच्या पृष्ठभागावर घडते, कारण त्या ठिकाणी अणुचे प्रचंड प्रमाणात आयनीभवन होते.

द्रव्याचे वर्गीकरण – १) मूलद्रव्ये (Elements ) २) संयुगे (Compounds) ३) मिश्रणे (Mixtures )

मूलद्रव्ये – ज्या पदार्थाचे भौतिक किंवा रासायनिक प्रक्रियेने अपघटन करता येत नाही, अशा पदार्थांना मूलद्रव्ये म्हणतात. आत्तापर्यंत रसायनशास्त्रज्ञांना १०९ ( इ. स. १९८४ ) मूलद्रव्यांचा शोध लावण्यात यश आले आहे. त्यापैकी ९२ मूलद्रव्ये निसर्गात आढळतात व इतर मूलद्रव्ये मानवनिर्मित आहेत.

मूलद्रव्याचे वर्गीकरण -१) धातू २) अधातू या प्रकारात करतात. १. धातू (Metals ) –
धातु

धातु

धातूंना चकाकी असते.
धातू तंतूक्षम / तन्य (Ductile) असतात.
हे वर्धनीय (Malleable) असतात.
हे उष्णता व विद्युत यांचे सुवाहक असतात. सर्व धातू स्थायूरूप असतात.
पारा हा धातू मात्र अपवाद असून तो कक्ष तापमानाला द्रवरूपात असतो.
धातूची उदा – तांबे(Cu) , लोखंड(Fe) , ऍल्युमिनिअम(Al) , सोने (Au)y , चांदी(Ag) , पारा(Hg) इ.

२. अधातू (Non – Metals) –
अधातू

अधातू

अधातू पदार्थ स्थायू, द्रव किंवा वायू अवस्थेत आढळतात.
सर्वसामान्यपणे अधातूंना चकाकी नसते. हे उष्णता व विद्युत यांचे दुर्वाहक आहेत.
अपवाद – आयोडिन स्फटिक चमकदार असतात, ग्रॅफाइट स्वरूपात ( अपरूपात) असलेला कार्बन विद्युत सुवाहक असतो.
अधातू वर्धनीय नाहीत. तसेच ते तन्यही नाहीत.
अधातू – फॉस्फरस, कार्बन, गंधक, आयोडिन हे स्थायुरूप आहेत तर ब्रोमीन द्रवरूप अवस्थेत असतो.
ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, क्लोरीन, निऑन हे सर्व कक्ष तापमानाला वायुरूप अवस्थेत असतात.

संयुगे ( Compounds )
संयुगे

संयुगे

– दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या विशिष्ट वजनी प्रमाणातील रासायनिक संयोगाने तयार होणा-या पदार्थांना संयुगे असे म्हणतात उदा – पाणी, साखर, मीठ.

गुणधर्म

संयुगाचे गुणधर्म त्याच्या मूलभूत घटकांपेक्षा अगदी वेगळे असतात.
कोणत्याही भौतिक पध्दतीने संयुगाचे विघटन, त्यांच्या मूलभूत घटकामध्ये करता येत नाही.
संयूगातील घटक मूलद्रव्ये विशिष्ट प्रमाणात असतात.
संयुग तयार होतांना किंवा त्यांचे अपघटन होताना उष्णता बाहेर पडते किंवा ग्रहण केली जाते

मिश्रणे (Mixture ) –
मिश्रणे

मिश्रणे

जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ (मूलद्रव्ये आणि संयुगे) रासायनिक अभिक्रिया न होता एकमेकात कोणत्याही प्रमाणात मिसळले असता मिश्रण तयार होते. उदा – हवा, समुद्राचे पाणी इ.

गुणधर्म - १) मिश्रणात घटकांचे गुणधर्म कायम राहतात. २) रासायनिक क्रिया न होता दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात एकत्र मिसळल्यास मिश्रण तयार होते, ३) साध्या सोप्या प्रक्रियांना मिश्रणाचे घटक वेगवेगळे करता येतात, ४) मिश्रणाच्या घटकांमध्ये रासायनिक अभिक्रिया घडत नसल्याने कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही. आम्ल – आम्लारी अनुमापन –

आम्ले व आम्लारी यांच्या उदासिनीकरणाच्या अभिक्रियेत त्यांची आकारमाने ही त्यांच्या प्रसामान्यतेच्या व्यस्त प्रमाणात असतात

दर्शक आम्लातील रंग आम्लारीतील रंग लिटमस लाल निळा फेनॉप्थॅलिन रंगहीन गुलाबी मेथिल ऑरेंज गुलाबी पिवळा हळद पिवळा लाल अणू – संरचना

थोर हिंदू तत्वज्ञ महर्षी कणाद यांनी द्रव्य हे अतिशय सूक्ष्म कणांनी बनले असावे असे विचार मांडले १)त्यांनी अणूला “ परमाणू” असे म्हटले. ग्रीक तत्वज्ञ डिमोक्रिट्स हाही याच मताचा होता. त्याने या सूक्ष्म कणांना “अणू( Atom)” म्हणून संबोधले
अणू ( Atom)– रासायनिक अभिक्रियेत भाग घेणारा व मूलद्रव्यांचे सर्व गुणधर्म असणारा लहानात लहान कण म्हणजे अणू होय.
रेणू (Molecule ) – मूलद्रव्यांचे किंवा संयुगाचे सर्व गुणधर्म असणा-या तसेच स्वतंत्र अस्तित्व असणा-या लहानात लहान ( सूक्ष्मतम ) कणास रेणू म्हणतात.

अणू व रेणू यांचे गुणधर्म- अणू १)
अणू व रेणू

अणू व रेणू

एकाच मूलद्रव्याचे सर्व अणू एकसारखे असतात २) अणूंना स्वतंत्र अस्तित्व नसते. परंतु निष्क्रीय वायू उदा – हेलिअम, न्यूऑन, ऑरगॉन, क्रिप्टॉन व झेनॉन या मूलद्रव्यांचे अणू स्वतंत्र अवस्थेत असतात. ३) एकाच मूलद्रव्यांचे सर्व अणू एकसारखे असतात. ४) टाचणीच्या डोक्यावर अब्जावधी अणू मावतात. रेणू- १) रेणूला त्या मूलद्रव्याचे अथवा संयुगाचे सर्व गुणधर्म असतात. २) वेगवेगळ्या पदार्थाचे रेणू वेगवेगळ्या गुणधर्माचे असतात. ३) मूलद्रव्यांचा रेणू दोन अथवा अधिक एकसारख्या अणूंचा बनलेला असतो. ४) संयुगाचा रेणू वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणूंचा बनलेला असतो. डॉल्टनचा अणू सिध्दांत –

जॉन डॉल्टन या शिक्षकी पेशात असलेल्या इंग्लीश व्यक्तीने १८०८ मध्ये अणू सिध्दांताची कल्पना मांडली. त्याच्या मते –

१) प्रत्येक पदार्थ अणूने बनलेला आहे. २) अणू अविभाज्य (विभाजन करता येत नाही ) आहे. ३) अणू अविनाशी असतात. अणूची निर्मिती अथवा नाश करता येत नाही. ४) एकाच मूलद्रव्याचे अणू एकरूप असतात व त्यांचे वस्तूमान व गुणधर्म समान असतात. ५) निरनिराळ्या मूलद्रव्याचे अणू एकत्र येऊन संयुगे बनतात.

डॉल्टनच्या अणू सिध्दांतातील अणू हा अविभाज्य हे गृहीत चुकीचे ठरले आहे. तरी त्यांचा हा सिध्दांत रसायनशास्त्राचा पुढील प्रगतीचा पाया ठरला आहे.

अणू – संरचनेसंबंधी सध्याची कल्पना –

युरेनिअम क्षारांपासून निघणा-या अदृश्य किरणांचा शोध १८९६ मधे हेन्री बेक्वेरेल यांनी लावला. नंतर हे अदृश्य किरणे – १) अल्फा(α) (धन प्रभारीत कण ) , २) बीटा(β) (ऋण प्रभारीत कण), ३) गॅमा(γ) असतात याचा शोध लागला.
विद्युत चुंबकीय प्रारणे या शोधामुळे अणूमधे काही सूक्ष्म कण असले पाहिजे याची शास्त्रज्ञांना कल्पना आली.

अ) कॅथोड किरणांचा शोध (Discovery of chathode rays ) – इ. स. १८७९ मधे सर विल्यम क्रुक यांनी कॅथोड किरणांचा शोध लावला. १. कॅथोड किरण हे ॠणप्रभारीत असतात. २. विप्रभार नळीत कोणत्याही मूलद्रव्याची वाफ किंवा वायूरूप मूलद्र्व्य असले तरी कॅथोड किरणाचे गुणधर्म कायम राहतात. ३. या कणांनाच आता इलेक्ट्रॉन असे म्हणतात. आ) प्रोटॉनचा शोध – इ. स. १८८६ मधे ई. गोल्ड्स्टाइनने अणूमधे धन प्रभारीत किरण मिळविले. जे. जे. थॉमसनने सखोल संशोधन करुन धन प्रभारित कणांचा शोध लावला. या धन प्रभारित कणांनाच प्रोटॉन म्हणतात. अणूकेंद्रक आणि केंद्रक बाह्य भाग – १. सर जे. जे. थॉमसन यांनी १८९८ मधे अणूच्या स्वरूपासंबंधी पहिली प्रतिकृती सुचविली. १९९१ मध्ये ही प्रतिकृती चुकीची असल्याचे लॉर्ड रूदरफोर्डने सिद्ध केले. २. सन १९९१ मधे रुदरफोर्ड याने अणूकेंद्रकाचा शोध लावला. अ. अणू केंद्रकात – अणूचा सर्व धन प्रभार आणि अणूचे जवळ जवळ सर्व वस्तुमान केंद्रकापाशीच एकवटलेले असते. आ. केंद्रकाभोवती पोकळी असते. इ. अणू केंद्रकाभोवती वर्तुळाकार कक्षामधे इलेक्ट्रॉन परिभ्रमण करीत असतात. अणू संरचना सूर्यमालेप्रमाणे आहे .अणूचे केंद्रक म्हणजे सूर्य आणि केंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन म्हणजे ग्रह अशी कल्पना मांडण्यात आली .म्हणूनच या प्रतिकृतीला ग्रह गोलीय प्रतिकृती असे संबोधण्यात येते. ३) न्यूट्रॉनचा शोध –

इ. स. १९२० मध्ये अणू केंद्रकातील प्रोटॉन बरोबरच उदासिन कणांचे अस्तित्व असले पाहिजे असे रुदरफोर्डने भाकित केले.
१९३२ मध्ये चॅडविकने उदासिन कणांचा शोध लावला. या उदासिन कणांनाच त्याने न्यूट्रॉन असे नाव दिले.
प्रोट्रॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन हे अणूचे मूलभूत घटक असल्याचे सिध्द होते.
केंद्र्कात न्यूट्रॉन व प्रोट्रॉन असतात. अणूकेंद्र्काच्या सभोवतालच्या पोकळीत फिरत असतात. त्यांना ग्रहांप्रमाणे फिरणारे (प्लॅनेटरी ) इलेक्ट्रॉन म्हणतात.
कोणत्याही अणूमध्ये प्रोट्रॉनची संख्या ही त्यामधील इलेक्ट्रॉनच्या संख्येइतकीच असते. विद्युतदृष्ट्या अणू उदासिन असतो.

अणूक्रमांक (Atomic Number – z )
अणूक्रमांक

अणूक्रमांक

१) अणू केंद्रकामधील प्रोट्रॉनची संख्या त्या अणूमधील इलेक्ट्रॉनच्या संख्येएवढीच असते. प्रोट्रॉनच्या संख्येलाच त्या अणूचा अणूक्रमांक असे म्हणतात २) तो पूर्णांकात असतो. ३) अणूक्रमांक मूलद्रव्याचे लक्षण होय. ४) तो “Z” अक्षराने दर्शवितात. १) इलेक्ट्रॉन – १)हा एकक ॠण प्रभार असलेला कण असतो. २) अशा सुमारे १८५० इलेक्ट्रॉनचे वस्तुमान एक प्रोटॉन इतके असते. ३) म्हणून इलेक्ट्रॉनचे वस्तुमान इतर कणांच्या तुलनेत नगण्य मानतात. ४) अणूंची रासायनिक क्रियाशीलता इलेक्ट्रॉनवर अवलंबून असते. २) प्रोटॉन – १) हा एकक धन विद्युतप्रभार असलेला कण असतो. २) त्याचे वस्तुमान जवळ जवळ हायड्रोजनच्या एका अणू इतके असते. ३) प्रोटॉनमुळे अणूकेंद्रकाला धनप्रभार प्राप्त होतो. ३) न्यूट्रॉन – १) हा बिद्युत प्रभाररहित कण असतो. २) त्याचे वस्तुमान जवळ जवळ प्रोटॉन इतके असते. इलेक्ट्रॉन संरुपण (Electronic Configuration ) – अणूच्या निरनिराळ्या कक्षांमध्ये असलेली इलेक्ट्रॉनची विभागणी म्हणजेच संरुपण होय. इलेक्ट्रॉनची वाटणी विविध कक्षांमध्ये 2N2 या सुत्राने होते. N=कक्षेचा क्रमांक
कक्षा कक्षेचे नाव कक्षेत असणारे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन
1 K 2×12=2 2
2 L 2×22=8 8
3 M 2×32=18 18
4 N 2×42=32 32

परंतू कोणत्याही अणूच्या अंतिम (बाह्यतम) कक्षेत मात्र ८ इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त इलेकट्रॉन नसतात.
इ. स. १९१३ मध्ये नील्स बोहर यांनी अणूतील निरनिराळ्या कक्षांमधील इलेक्ट्रॉनच्या विभागणीचे निश्चितीकरण केले.

संयुजा आणि संयुजा इलेक्ट्रॉन (Valency & Valency Electrons) –
संयुजा आणि संयुजा इलेक्ट्रॉन

संयुजा आणि संयुजा इलेक्ट्रॉन

एखाद्या अणूच्या अंतिम कक्षेत ८ इलेक्ट्रॉन असल्यास तो अणू संयुगक्षम नसतो.
ज्या अणूच्या अंतिम कक्षेत ८ इलेक्ट्रॉन नसल्यास तो अणू संयुगक्षम असतो.
संयुग निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याच्या अणूच्या क्षमतेला त्या मूलद्रव्याची संयुजा म्हणतात.
अणूच्या बाह्यतम कक्षेत भ्रमण करणा-या इलेक्ट्रॉनांना संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतात.
अणूच्या बाह्यतम कक्षेत अष्टक स्थिती प्राप्त होण्याच्या दृष्टीने दिल्या किंवा घेतल्या जाणा-या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्या मुलद्रव्यांची संयुजा होय.
अष्टक स्थिती येण्यासाठी मुलद्र्व्याच्या अणूला जितके कमी इलेक्ट्रॉन द्यावे लागतील किंवा घ्यावे लागतील किंवा भागीदारी करावी लागेल तितके ते मुलद्रव्य जास्त क्रियाशील असते.
ज्यावेळी एखादा अणू आपली बाह्यतम कक्षा होण्यासाठी इलेक्ट्रॉन मिळवितो, तेव्हा त्यावरील ऋणप्रभार वाढतो. परिणामी, तो अणू ॠणप्रभारित होतो. यालाच ॠण आयन म्हणतात.

अणुवस्तुमानांक (Atomic Mass Number )
अणुवस्तुमानांक

अणुवस्तुमानांक

१) अणुच्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या एकूण संख्येला अणुवस्तुमानांक म्हणतात. २) अणुवस्तुमानांक “A” या अक्षराने दाखविला जातो. ३) त्याची किंमत नेहमी पूर्णांकात असते. अणुवस्तुमानांक = अणुअंक+न्युट्रॉनची संख्या (A= z + n ) समस्थानिके ( Isotopes )

अलिकडे संशोधनाने असे सिध्द झाले आहे की, एकाच मूलद्रव्याचे सर्व अणू एकरूप असतातच असे नाही. त्यांच्या अणुवस्तुमानांमध्ये फरक आढळतो. अशा अणूंना त्या मुलद्रव्यांची समस्थानिके म्हणतात.
एकाच मुलद्रव्यांच्या भिन्न अणूंचा अणुक्रमांक एकच असून त्यांचे अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतील तर अशा अणूंना त्या मुलद्रव्याची समस्थानिके असे म्हणतात.
समभारी (Isobar) – ज्या मूलद्रव्याच्या अणुचा अणुवस्तुमानांक समान परंतु अणुक्रमांक वेगळा असतो त्यांना आयसोबार म्हणतात.
आयसोटोन्स ( Isotones ) – वेगवेगळ्या मुलद्रव्यांच्या अणूमध्ये न्यूट्रॉनची संख्या समान असते त्यांना आयसोटोन्स म्हणतात.
अणूभारांक ( Atomic wight ) – अणूमधील प्रोटॉन आणि न्योट्रॉन यांच्या वस्तुमानांची बेरीज म्हणजेच त्याचा अणूभारांक होय.
रेणूभारांक (Molecular weight ) – रेणूच्या वजनाला रेणूभारांक असे म्हणतात किरणोत्सारिता (Radioactivity)
हेन्री बेक्वेरेल यांना १८९६ मध्ये अचानकपणे किरणोत्साराचा शोध लागला.
युरेनिअम, थोरिअम, रेडिअम इ. सारखी जड मूलद्रव्ये आणि त्यांची संयुगे सातत्याने व उत्स्फुर्तपणे प्रारणे (Radiations) उत्सर्जित करीत असतात. या प्रमाणे प्रारणे उत्सर्जित करणा-या पदार्थांना किरणोत्सारी पदार्थ असे म्हणतात.
मादाम क्युरी आणि जी. सी. श्मिड (१८९८) यांनी स्वतंत्रपणे थोरिअम क्षार ही किरणोत्सार करतात. हे सिध्द केले.
मादाम क्युरी आणि पिअरी क्युरी यांनी युरेनिअम आणि त्याचे खनिज पिच ब्लेंड यांच्या किरणोत्साराचा अभ्यास केला. त्यांनी पिच ब्लेंड पासून पोलोनिअम आणि रेडिअम ही दोन नवीन किरणोत्सारी मूलद्रव्ये वेगळी केली. या शोधाबद्द्ल १९०३ मध्ये एम. क्युरी, पी. क्युरी आणि बेक्वेरेल यांना संयुक्तपणे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

प्रारणांचे स्वरूप –
प्रारणांचे स्वरुप

प्रारणांचे स्वरुप

अल्फा (α) व बीटा (β) प्रारणाचा शोध १८९८ मध्ये रूदरफोर्डने लावला.
गॅमा (ϒ) प्रारणाचा शोध विलार्डने लावला.

किरणोत्सारी मुलद्रव्याचे विच्छेदन किंवा –हास प्रक्रिया –

रूदरफोर्ड आणि सॉडी यांच्या मते किरणोत्सारिता ही केंद्रकीय प्रक्रिया आहे. जड मुलद्रव्यांची (८२ अणुक्रमांकानंतरची) केंद्रके अस्थिर असतात. स्थिरता प्राप्त करण्यासाठी केंद्रकातील अल्फा आणि बीटा किरणाच्या रूपात बाहेर टाकले जातात. या घटनेचा दुय्यम परिणाम म्हणजे गॅमा किरणांचेही उसर्जन होते. अकिरणोत्सारी स्थिर केंद्रकाचे मुलद्रव्य तयार होईपर्यंत ही प्रक्रिया चालू राहते. या प्रक्रियेलाच किरणोत्सारी मूलद्रव्याचे विच्छेदन किंवा –हास असे म्हणतात.

१. अल्फा कणाचे उत्सर्जन – जेव्हा मूलद्रव्यातून अल्फा कण उत्सर्जित होतो तेव्हा अणूचा अणू अंक २ ने कमी तर अणूवस्तुमानांक ४ ने कमी होतो. २. बीटा कणाचे उत्सर्जन – जेव्हा मूलद्रव्यातून बीटा (β) कण उत्सर्जित होतो तेव्हा मूलद्रव्याचा अणूक्रमांक १ ने वाढतो. परंतु अणुवस्तुमानात बदल होत नाही. परिणामी अपत्य मूलद्रव्याचे आवर्तसारणीमधील स्थान एक स्तंभ उजवीकडे गेल्याचे आढळ्ते. ३. अल्फा आणि बीटा प्रारणे उत्सर्जित झाल्यावर अपत्य मुलद्रव्याचे केंद्रक उत्तेजित अवस्थेत असते. ही अवस्था अधिक उर्जायुक्त असल्यामुळे जास्त असलेली ऊर्जा गॅमा प्रारणाच्या स्वरूपात उत्सर्जित केली जाते. अर्ध आयुष्य काळ (Half life Perod)

किरणोत्सारी मूलद्रव्याचे विच्छेदन होताना सुरूवातीला असलेल्या अणुसंख्येच्या निम्म्या अणूंचे विच्छेदन होण्यासाठी लागणा-या कालावधीला अर्ध आयुष्य काळ म्हणतात.
कृत्रिम किरणोत्सारीता(Artificial radioactivity) –
आयरिन क्युरी (मादाम क्युरीची मुलगी ) आणि तिचा पती फ्रेडरिक जोलिओट (१९३४) यांनी हलक्या मूलद्रव्यांवर अल्फा कणांचा मारा केला असता मुलतः किरणोत्सारी नसलेल्या मूलद्रव्याची किरणोत्सारी मूलद्रव्यात रुपांतर झाल्याचे आढळले.
स्थिर मूलद्रव्याची किरणोत्सारी समस्थानिके कृत्रिम त-हेने तयार करता येतात. याप्रमाणे किरणोत्सारी समस्थनिके दर्शवित असलेल्या किरणोत्सारीला कृत्रिम किरणोत्सारीता असे म्हणतात.

किरणोत्सारी समस्थानिकांचे उअपयोजन :- १) कृषीक्षेत्रः- a) बियाणेउद्दीपनासाठी – अंकुरण क्षमतेत वाढ, रोपांची जलद वाढ व अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी b) वनस्पती वाढीसाठी आवश्यक असलेल्या किरणोत्सारी समस्थानिकाच्या साह्याने करता येते. c) कांदे, बटाटे इ. च्या साठवणीत त्यांना मोड येऊ नये म्हणून त्यांचे उद्दीपन करता येते. d) हवाबंद डब्यात साठविलेले खाद्यपदार्थ व धान्य उद्दीपनाने टिकविता येते २)वैद्यकशास्त्र ;- रोगांचे निदान करण्यासाठी आणि उपचारासाठी किरणोत्सारी समस्थानिकांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. उदा. a) फॉस्फरस ३२ –ल्युकेमियावरील ( ब्लड कॅन्सर) उपचारासाठी. b) आयोडिन व आर्सेनिकचा – मेंदूतील ट्यूमर ओळखण्यासाठी (Brain Tumour ) c) आयोडिन १३१ – कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखणे व उपचार करणे d) कोबाल्ट ६० – कॅन्सरवरील उपचारासाठी e) सोडिअम २४ – रक्तभिसरणातील बिघाड तपासण्यासाठी ३)औद्योगिक क्षेत्र- a) इंजिनमधील झीज आभ्यासणे. b) धातूच्या ओतकामातील भेगांचा शोध घेणे. केंद्रकीय विखंडन आणि संमीलन (Nuclear fission & fusion );-

एखाद्या जड अणुकेंद्रकाचे विभाजन होऊन त्याचे कमी वस्तुमान असलेल्या दोन अणू केंद्रकात रुपांतर होणे या क्रियेला केंद्रीय / केंद्रकीय विखंडन असे म्हणतात.
केंद्रकीय विखंडनाचा शोध १९३९ मध्ये ऑटो हॉन आणि स्ट्रॉसमन यांनी लावला.
युरेनिअम २३५ वर मंदगती न्युट्रॉनचा मारा केला असता युरेनिअमच्या केंद्रकाचे बोरिअम व क्रिप्टॉन यांसारख्या कमी वस्तुमानाच्या किमान दोन मूलद्रयात विखंडन होते. आणि ३ न्युट्रॉन मुक्त होतात असे आढळले. तसेच ऊर्जा मुक्त होत असल्याचे आढळले.
केंद्रीय / केंद्रकीय संमीलन – दोन हलक्या मूलद्रव्यांच्या ( वस्तुमानांक २० पेक्षा कमी) केंद्रकांच्या संमीलन प्रक्रियेमुळे तुलनात्मक दृष्ट्या वजनदार मूलद्रयांचे केंद्रक तयार होणे या प्रक्रियेला संमीलन असे म्हणतात.

१) संमीलन प्रक्रिया अतिशय उच्च तापमानाला ( लक्षावधी अंश सेल्सिअस तापमानाला) घडून येते. २) अशा प्रक्रियेला औष्णिक केंद्रकीय प्रक्रिया (Thermonuclear reaction) असे म्हणतात. ३) दोन हलक्या मूलद्रव्यांच्या केंद्रकाचे संमीलन होऊन जड मूलद्रव्याचे केंद्रक तयर होत असतांना काही वस्तुमानाचे ऊर्जेत रुपांतर होते. केंद्रकीय ऊर्जा ( Nuclear energy) – विखंडन आणि संमीलन प्रक्रियांमध्ये मुक्त होणा-या ऊर्जेला केंद्रकीय ऊर्जा असे म्हणतात.

वस्तुमानात येणारी घट आईनस्टाईनच्या E=mc2 या समीकरणाप्रमाणे ऊर्जेच्या रुपात मुक्त होते.मुक्त होणारी

ऊर्जा = E, घटलेले वस्तुमान =m , प्रकाशाचा वेग =c

युरेनिअम २३५ च्या विखंडनात ०.१ % वस्तुमान कमी होते. या वस्तुमानाचे सुमारे २०० MeV (२०० मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट ) म्हणजेच १०० टन शुध्द कार्बन जाळून मिळनारी ऊर्जा होय.
अणू केंद्रक विखंडनाच्या प्रक्रियेला शृखंला अभिक्रिया असे म्हणतात.
अनियंत्रित शृंखला अभिक्रिया (uncontrolled cain reaction ) – शॄखंला अभिक्रिया ही एक अनियंत्रित शृखंला अभिक्रिया असून अणूबाँबची निर्मिती अनियंत्रित शृखंला अभिक्रियेच्या तत्वावर केलेली असते.

नियंत्रित शृंखला अभिक्रिया –

बोरॉनयुक्त पोलाद किंवा कॅडमिअम कांड्यांचा उपयोग शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी होतो. त्या कांड्या बरेचसे न्यूट्रॉन शोषून घेतात. त्यामुळे फारच थोडे न्यूट्रॉन अभिक्रिया पुढे चालू ठेवू शकतात. यालाच नियंत्रित शृंखला अभिक्रिया असे म्हणतात.

मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण-

मूलद्रव्यांचे अणुचे वस्तुमान त्या मूलद्रव्याच्या गुणविशेष आहे असे डाल्टनने आपल्या अणुसिध्दांतामध्ये सुचविले होते. त्या अधारावर मूलद्रव्याचे असे वर्गीकरण करणारा डोबेरायर (१८२९) हा पहिला शास्त्रज्ञ होय. त्याने रासायनिक गुणधर्मात साम्य असलेल्या तीन मूलद्रव्यांचा एक गट, याप्रमाणे काही विशिष्ट

मू लद्रव्यांचे वर्गीकरण केले. त्या गटांना त्याने त्रिके (Triads) असे नाव दिले. न्यूलॅन्डसने अष्टके ( Newlands octet )

न्यूलॅन्डसने (१८६४) अणुभारांकांच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची मांडणी केली. संगीतातील अष्टकांप्रमाणे प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्या प्रमाणे असल्याचे त्याला आढळले.
मेंड्लिफचा आवर्ती नियम (Mendeleef’s periodic low );-
मेंडलिफने (१८६९) अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची मांडणी केली. तेव्हा मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुभारांकांचे आवृत्तीफल आहेत असे त्याला दिसून आले. मेंडलिफने तयार केलेल्या सारणीलाच मेंडलिफची आवर्तसारणी म्हणतात. मेंडलिफची सुधारीत आवर्तसारणी वैशिष्ट्ये
उभे आठ स्तंभ – गण
सात आडव्या ओळी – आवर्तने ( Periods)
मेंडलिफने आपल्या आवर्तसारणीमध्ये अज्ञान मूलद्रव्यांच्या तीन जागा रिक्त सोडल्या होत्या आणि त्यांच्या गुणधर्मासंबंधी भाकित केले होते. त्या तीन मूलद्रव्यांना शोध लावल्यानंतर दिलेली नावे.

इका बोरॉन ला – स्कॅडिअम इका ऍल्युमिनिअमला गॅलिअम इका सिलिकॉनला जर्मेनिअम मेंडलिफच्या आवर्तसारणीतील त्रुटी;- १) समान रासायनिक गुणधर्म असलेली मूलद्रव्ये ही भिन्न गणात. तर काही भिन्न गुणधर्म असलेली मूलद्रव्ये एकाच गणात आल्याचे आढळले. उदा. – अणुभारांक- ऑरगॉन ४० व पोटॅशिअम ३९ २) नंतर शोध लागलेल्या समस्थानिकांना मेंडलिफच्या मूळ आवर्तसारणीमध्ये स्वतंत्र स्थान देता येत नाही. आधुनिक आवर्तसारणी

अणूअंक – केंद्रकातील प्रोटॉन/ केंद्रकाभोवती फिरणा-या इलेक्ट्रॉनच्या संख्येइतका असतो असे मोस्ले याने दाखवले. त्यांनी असेही सुचविले की मूलद्रव्यांच्या अणूभारांकापेक्षा अणूअंक हाच मूलद्र्व्याचा पायाभुत गुणविशेष आहे.
मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुअंकाचे आवृत्तीफल आहेत.
आधुनिक आवर्तसारणीलाच दीर्घश्रेणी आवर्तसारणी असे म्हणतात.
आधुनिक आवर्तसारणीलाच मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुक्रमांकाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे की ज्यामुळे समान गुणधर्म असलेली मूलद्रव्य एकाच स्तंभात येतात. यात उभे अठरा स्तंभ असून त्यांना गण म्हणतात. सात आडव्या ओळी असून त्यांना आवर्तने असे म्हणतात.

१) पहिल्या आवर्तनात दोनच मुलद्रव्ये आहेत. २) दुस-या व तिस-या आवर्तनांना लघु आवर्तने असे म्हणतात. यात प्रत्येकी आठ मूलद्रव्य आहेत. ३) चौथे व पाचवे ही दोनही आवर्तने असून त्या प्रत्येकात अठरा मूलद्रव्ये आहेत. ४) सहावे आवर्तन हे सर्वात प्रदीर्घ आवर्तन असून त्यात एकूण ३२ मूलद्रव्य आहेत. ५) सातवे आवर्तन अपूर्ण असून त्यात ८७ ते १०९ अणुअंक असलेली २३ मुलद्रव्य आहेत. दीर्घ श्रेणीच्या आवर्तसारणीची प्रमुख वैशिष्ट्ये ;- १) आवर्तसारणीतील मूलद्रव्यांचे स्थान त्यांच्या इलेक्ट्रॉन संरुपणाशी निगडीत आहे. २) प्रत्येक आवर्तनाची सुरुवात मूलद्रव्याच्या अणूतील नवीन कक्षेने होते. तर शून्य गणातील मूलद्रव्याचा पूर्ण भरलेल्या आवर्तनाचा शेवट होतो. आवर्तसारणीच्या आधारे मूलद्रव्याचे वर्गीकरण ;- अणुंच्या बाह्य कक्षा पूर्ण भरलेल्या असतील किंवा अपूर्ण असतील त्याचप्रमाणे त्यांचे चार प्रकारात वर्गीकरण करतात.

निष्क्रिय वायू मूलद्रव्ये – राजवायू
सामान्य मूलद्रव्ये
संक्रमक मूलद्रव्ये
आंतरसंक्रामक मूलद्रव्ये.

निष्क्रिय वायू मूलद्रव्य(राजवायू) :- बाह्यतम कक्षेसह सर्व कक्षा पूर्णतः भरलेल्या असतात. रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत.
सामान्य मूलद्रव्ये;- ज्या मूलद्रव्यांच्या अणूमधील बाह्यतम कक्षेशिवाय अन्य सर्व कक्षा पूर्ण भरलेल्या असतात. अशी मूलद्रव्ये सामान्य मूलद्रव्य या प्रकारात मोडतात.
संक्रमक मूलद्रव्ये- ज्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या शेवटच्या दोन कक्षा अपूर्ण असतात. त्यांना संक्रामक मूलद्रव्ये असे म्हणतात. ही मूलद्रव्ये परिवर्ती संयुजा दर्शवितात. त्यांच्यातील बहुसंख्य मूलद्रव्ये उत्प्रेरकाचे कार्य करतात.
आंतरसंक्रामक मूलद्र्व्ये;- ज्या मूलद्रव्यात अणुंच्या शेवटच्या तीन कक्षा अपूर्ण असतात. त्यांना आंतरसंक्रामक मूलद्रव्ये असे म्हणतात. लॅथॅनाइड व ऑक्सिनाईड मालिकेतील मूलद्रव्यांचा या गटात सामावेश होतो. आवर्तसारणीच्या तळाशी त्यांना स्वतंत्र स्थान देण्यात आले आहे.

तिस-या आवर्तनातील मूलद्रव्ये – Na, Mg, Al, Si, P, S,Ar 1) इलेक्ट्रॉन संरुपण – तिस-या कक्षेत सोडिअम पासून इलेक्ट्रॉन भरण्यास सुरुवात होऊन ऑरगॉनमध्ये ती कक्षा पूर्ण भरते. 2) Na पासून Si पर्यंत संयुजा वाढते. Si पासून Ar पर्यंत संयुजा कमी होत जाते. 3) धातूगण – एकाच आवर्तनात डावीकडून उजवीकडे धातू गण कमी कमी होत जातो आणि अधातू गण वाढत जातो. 4) डावीकडून उजवीकडे मुलद्र्व्याचा क्षपणक गुणधर्म कमी कमी होत जातो. तर ऑक्सिडीकारक गुणधर्म वाढत जातो. धातू आणि त्यांची संयुगे

तांबे (cupper);- संज्ञा Cu – (लॅटिन – cuprum)

अणूअंक-२९, अणुभारांक -६३.५, इलेक्ट्रॉन संरुपण (२,८, १८,१) किंवा (२,८,१७,२)
संयुजा – १ किंवा २, तांब्याची धातूके -१) कॉपर पायराईट किंवा कॅल्पोपायराइट (CufeS2 ) २) क्युप्राइट (CuZO) ३)कॉपर ग्लास किंवा कॅल्फोसाइट( Cu2S )

उपयोग – १. भांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी , २) नाणी तयार करण्यासाठी ३) विद्युत विलेपणासाठी ४) उत्प्रेरक म्हणून तांब्याची संयुगे – १. कॉपर सल्फेट ( मोरचूद – Blue Vitriol – CuSo45H2O) उपयोग – १. बुरशीनाशक म्हणून बोर्डो मिश्रणात वापर, २. औषधात व प्रयोगशाळेत उपयोग. तांब्याची संमिश्रे
नाव घटक वैशिष्ट्ये उपयोग
१) पितळ ६० ते ९०% तांबे ४० ते १०% जस्त गंजरोधक, कठीण धातूची भांडी, पाईप, काड्तुसाचे ओतकाम सहजगत्या करता येते. साचे व संघननी नलिका तयार करण्यासाठी
२) ब्राँझ ८० ते ९०% तांबे १९ ते १०% कथिल गंजरोधक व कठीण, गोठताना प्रसरण पावते. पुतळे, पदके, भांडी आणि नाणी तयार करण्यासाठी तसेच बेअरिंग व जहाजांच्या बांधणीत उपयोगी पडते.
३) जर्मन ५०% तांबे सिल्वर २५% जस्त २५% निकेल उच्च प्रतीचे विद्युतरोधक विद्युत शेगड्या व विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी
४) बेल मेटल ७८% तांबे २२% कथिल नाद जनकता घंटा व तासाच्या थाळ्या बनविण्यासाठी
५) गन मेटल ८८% तांबे १०% कथिल २% जस्त गंजरोधक असते. बंदुकीच्या नळ्या व बॉयरलचे सुटे भाग बनविण्यासाठी
६) ऍल्युमिनिअम ब्राँझ तांबे व ऍल्युमिनिअम

चांदी (Silver) – संज्ञा – Ag

अणूअंक – ४७, अणुभारांक १०७.३७ इलेक्ट्रॉन संरुपण – (२,८,१,१८,१८,१)
संयुजा – १

धातुके – १. सिव्हर ग्लान्स किंवा अर्जेंटाइट (Ag2S) २. हॉर्न सिल्व्हर ( Agcl )

चांदी संयुक्त स्थितीत आणि मुक्त स्थितीतही आढ्ळ्ते.

उपयोग १. दागिने, २. उच्च दर्जाचा विद्युत वाहक सिल्व्हर नायट्रेट – साठविण्यासाठी अंबर रंगाच्या बाटल्या वापरतात. याचा उपयोग १. नाक, कान आणि डोळे यांच्यासाठी रोगाणुरोधक म्हणून, २. विद्युत विलेपणासाठी, ३. छायाचित्रणात ४. पुसली न जाणारी शाई तयार करण्यासाठी ५. प्रयोग शाळेत अभिकारक म्हणून वापरता. C. शिसे –

संज्ञा – pb, अणुअंक ८२, अणुभारांक – २०७ , इलेक्ट्रॉन संरुपण ( २,८,१८,३२,१८,४)
संयुजा २ आणि ४ धातूके – प्रमुख गॅलेना (Pbs)
अन्य – १) ऍग्लिसाइट (Pbso4) २) सीरूसाइट (Pbco3)

उपयोग – १. मुद्रण – धातू तयार करण्यासाठी, २. दारूगोळा तयार करण्यासाठी, ३. तारायंत्र आणि टेलिफोन यांच्या केबल तयार करण्यासाठी ४. किरणोत्सारी द्रव्यांतून निघणा-या प्रारणांपासून संरक्षक ढाल करण्यासाठी ५. डाग देण्याचा धातू ( Solder) आणि सहज वितळणारी संमिश्रे तयार करण्यासाठी शिशाची संयुगे. – अ) लेड मोनॉक्साईड (लिथार्ज Litharge) PbO – उपयोग १. चिनी मातीच्या भांड्यांना झिलई देण्यासाठी २. फ्लिंट ग्लास तयार करण्यासाठी ३. रंग आणि रोगण (Vrnish) तयार करण्यासाठी, ४. शिशाचे क्षार तयार करण्यासाठी ब) लेड नायट्रेट pb(No3)2 उपयोग - १. कापड रंगवितांना व छपाई करताना ( कॅ लिको प्रिटिंग ) रंगबंधक म्हणून २. लेड क्रोमेट व शिशाचे इतर क्षार करण्यासाठी ३. स्फोटक द्रव्य तयार करण्यासाठी D. लोखंड

संज्ञा – Fe, लॅटिन Ferrum, अणुभारांक – ५५.८४, अणूक्रमांक – २६
इलेक्ट्रॉन संरुपण – (२,८,१४,२) ,संयुजा- २ किंवा ४
उल्कांमध्ये हा धातू सापडल्यामुळे प्राचीन लोक या धातूला स्वर्गातील धातू म्हणून मानत असत.
धातूके – मॅग्नेटाईट (Fe3O4 फेरोसोफेरिक ऑक्साइड) ,हेमेटाइट ( Fe2O3) ,लिमोनाईट ( 2Fe2O3, 3H2O) ,आयर्न पायराइट ( FeS2) आणि कॉपर पायरायटस ( CuFeS2)
झोतभट्टीमध्ये (Blast Furnace) क्षपण पध्दतीने धातुकापासून लोखंड निष्कर्षण करतात.
इ. स. १३५० मध्ये जर्मनीमधे झोतभट्टीचा प्रथमच उपयोग करण्यात आला.

लोखंडाचा प्रकार कार्बनचे प्रमाण विलय बिंदू शुध्दता उपयोग
ओतीव ०.५ ते ४.२ १२०००C अशुध्द नळ, कठडे, वजने, यंत्राचे अवजड भाग
घडीव ( नरम ) जास्तीत जास्त ०.०३५ १५०००C सर्वात शुध्द साखळ्या, नट,बोल्ट,तार, खिळे इ.
पोलाद ०.०२५ ते १.५ १२०० ते १५०००C एक संमिश्र

· बेसिमर भट्टीचा उपयोग करून ओतीव लोखंडापासून पोलाद तयार करतात.
· ओतीव लोखंडापासून पोलाद मिळविण्यासाठी विवृत्त भट्टी पध्दतीचाही उपयोग करतात.

संमिश्र पोलाद
पोलाद प्रकार घटक वैशिष्ट्ये उपयोग
१. स्टेनलेस स्टील ७३% लोह १८% क्रोमिअम १% कार्बन ८% निकेल गंजत नाही तीक्ष्ण हत्यारे, भांडी, अवजारे, वाहनांचे सुटे भाग, दुध डेअरीतील यंत्रे यासाठी
२. टंगस्टन ९४% लोह ५% टंगस्टन अति कठिण असते, धारदार बनविता येते. कठिण वस्तू जलद कापण्याच्या हत्यारांसाठी
३. मँगनीज स्टील लोह व लक्षणीय प्रमाणात मँगनिज अत्यंत टणक खडकांना छिद्रे पाडण्याच्या हत्यारांसाठी
४. क्रोम स्टील लोह व लक्षणीय प्रमाणात क्रोमिअम कठीण व टणक बॉल बेअरिंग, रोलर्स, बोअरिंग यंत्रे, स्वयंचलित वाहनांचे सुटे भाग यांसाठी उपयुक्त

E) जस्त ( Zinc);-

संज्ञा – Zn, अणुभारांक – ६५.४, अणुक्रमांक -३०
इलेक्ट्रॉन संरुपण – (२,८,१८,२ ), संयुजा – २
प्राचीन काळी जस्ताला यशदा म्हणत असत.
धातुके – कॅलॅमिन (ZnCo3 ), झिंक ब्लेंड (Zns), झिंकाइट (Zno) इ.

जस्ताचे निष्कर्षण – १) क्षपण पध्दती २) विद्युत अपघटन पध्दती गुणधर्म; - १) जस्त हा निळसर पांढरा धातू आहे. २) नेहमीच्या तापमानाला जस्त ठिसूळ असतो. ३) १०००C ते १५००C वर्धनीय तंतूक्षम. ४) २०००C पेक्षा अधिक ठिसूळ ५) द्रावणांक (M.P.)-४२९.४०C ६) उत्कलनबिंदू (B.P.) ९३००C आहे. उपयोग १) लोखंड व पोलाद गंजू नये म्हणून त्याच्यावर लेप देण्यासाठी (Galavanizing) प्रामुख्याने जस्ताचा उपयोग केला जातो. २) डॅनिअलचा विद्युत घट, लेक्लांशेचा विद्युत घट आणि कोरडा विद्युत घट. या घटांमध्ये जस्ताचा इलेक्ट्रॉड म्हणून उपयोग करतात. प्रयोग शाळेत हायड्रोजन वायू तयार करण्यासाठी दाणेदार जस्ताचा उपयोग करतात. ३) जस्ताचा क्षपण म्हणून उपयोग होतो. ४) पितळ (जस्त आणि तांबे), जर्मन सिल्व्हर (जस्त, तांबे आणि निकेल)इ. संमिश्रे तयार करण्यासाठी. ५) चांदी आणि सोने यांच्या निष्कर्षण प्रक्रियेत जस्त वापरतात. F) पारा ; -

लॅटिन नाव – Hydrargyrm,संज्ञा Hg, अणुभारांक -२००.६, अणुक्रमांक -८०
इलेक्ट्रॉन संरुपण –(२,८,१८,३२,८,२) संयुजा – १किंवा २
या धातुला ऍरिस्टॉटलने क्विक सिल्व्हर असे म्हटले.
धातुके – सिन्नाबार (Hgs) मरक्युरीक सल्फाईड.

गुणधर्म -१) द्रवरुप धातु २) रुपेरी पांढरा ३) घनता १३.६ g/Cm३ ४) विद्युत व उष्णता यांचा सुसंवाहक आहे.

उत्कलन बिंदू (B.P.) -३५७०C, गोठणबिंदू (F.P.) -३९०C
पा-याची वाफ विषारी असते.

उपयोग – १) हवादाबमापी आणि तापमापीमध्ये पा-याचा उपयोग करतात. २) पा-याच्या बाष्पदीपात त्याचा उपयोग करतात. ३) पा-याच्या काही संयुगांचा उपयोग औषधांमध्ये करतात.(मकरध्वज औषध) G) सोडिअम ;-

संज्ञा –Na, अणुभारांक -२३, अणुक्रमांक -११, संयुजा-१, इलेक्ट्रॉन संरुपण- ( २,८,१)
सोडिअमची दैनंदिन वापरातील संयुगे मीठ, वॉशिंग सोडा, खाण्याचा सोडा इ.
१८०७ मध्ये सर हॅप्रे डेव्हीने प्रथमच सोडिअम धातू मुक्त स्थितीत मिळविला.
निसर्गात मुक्त स्थितीत आढळत नाही, कारण अतिक्रियाशील असतो.
संयुगे – साधे मीठ Nacl, चिली सॉल्टपीटर – NaNo3, सोडिअम कार्बोनेट – Na2Co3, , बोरॅक्स – टाकणखार – Na2B4O7, सोडिअम सल्फेट – Na2 So4
द्रवणांक 804०C आहे. त्याचा द्रवणांक सुमारे ६०० अंश सेल्सिअस पर्यंत कमी करण्यासाठी त्यामध्ये कॅल्शिअम क्लोराइड मिसळतात. या द्रावणाचे विद्युत अपघटनाने हा धातू मिळवितात. या पध्दतीला डाऊन्स सेक पध्दती म्हणतात.
वितळलेल्या कॉस्टिक सोड्याचे विद्युत अपघटन करुनही सोडिअम धातुचे निष्कर्षण करता येते. याला कासनेरची पध्दती म्हणतात.

उपयोग ;- १) सोडिअम बाष्प दीपांमध्ये सोडिअमचा उपयोग करतात. २) सोडिअम पारद संमिश्राचा क्षपणक म्हणून उपयोग करतात. ३) उच्च तापमानदर्शक तापमापीमध्ये त्याचा उपयोग होतो. ४) सोडिअम पेरॉक्साइड, सोडिअम सायनाइड आदी संयुगे तयार करण्यासाठी ५) सुती कापडाच्या रेशमीकरणासाठी सोडिअम हायड्रोक्साईड वापरतात. H) मॅग्नेशिअम ;-

संज्ञा- Mg अणुभारांक –२४.३, अणुक्रमांक -१२
इलेक्ट्रॉन संरुपण – (२,८,२ ), संयुजा – २ दिवाळीत शुभ्रोष्ण ज्योतीने जळणारी मॅजिक वायर म्हणजेच मॅग्नेशिअम धातूच होय.
मुक्त स्थितीत आढळत नाही.
संयुगे – मॅग्नेसाइट MgCo3 -, डोमालाईट- CaCo3 MgCo3 , कार्नेलाईट Kck3 MgCl2 6H2O, इप्सम सॉल्ट MgSo4 7H2O
द्रवणांक ( M.P.)-650०C, उत्कलनबिंदू(B.P.)1107 ०C

उपयोग ;- १) क्षणदीप्ती छायाचित्रणात (Flash Photography) मॅग्नेशिअमचा उपयोग करतात. २) शोभेच्या दारुत त्याचा उपयोग करतात. ३) मॅग्नेलिअमसारखी ( मॅग्नेशिअम आणि ऍल्युमिनिअम यांचे संमिश्र) संमिश्रे तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. विमाने, मोटारी यांचे सुटे भाग करण्यासाठी. ४) थाईमाइट मिश्रण ( फेरिक ऑक्साइड आणि ऍल्युमिनिअमची पूड) जोड कामासाठी वापरतात. ५) धातूंच्या निष्कर्षणात मॅग्नेशिअमचा क्षपणक म्हणून उपयोग होतो. I) ऍल्युमिनिअम ;-

संज्ञा- Al, अणुभारांक –26.98, अणुक्रमांक -13
इलेक्ट्रॉन संरुपण – (२,८,३ ), संयुजा – 3
वोलहरने १८२७मध्ये प्रथमच ऍल्युमिनिअमचे निष्कर्षण केले.
भूकवचात ७.३% आढळतो.

क. ऑक्साइड – बॉक्साइट (Al2O3, 2H2O ), कोरंडम, माणिक, रत्ने इ. ख. सिलिकेट – फेल्सपार(Kalsi 3 O8), अभ्रक, केओलिन, चिकणमाती इ. ग. फ्लोराइड – क्रायोलाइट (Alf3, 3Naf) इ.

बॉक्साइटच्या शुध्दीकरणाच्या पध्दतीलाच बेयरची पध्दती (Bayer’s Process)

उपयोग ;- १) घरातील भांडी, विमानांचे भाग, फोटोफ्रेम इ. साठी २) चॉकलेट, सिगारेट आदी वस्तुंच्या आवरणासाठी ऍल्युमिनिअमचा वर्खाचा उपयोग होतो. ३) ऍल्युमिनिअमच्या तारा विद्युत वाहक म्हणून उपयोगी पडतात. ४) क्षणदीप्ती छायाचित्रणात त्याचा उपयोग होतो. ५) ऍल्युमिनिअमची पूड जवसात तेलात मिसळून रुपेरी रंग म्हणून वापरतात. ६) मॅग्नेलिअम (Al आणि Mg ) ऍल्युमिनिअम ब्राँझ (Al आणि Cu )आणि ड्युरॅल्युमिन (Al, Cu आणि Mg) यासारखी संमिश्रे तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करतात.
ऍल्युमिनिअमची संमिश्रे घटक वैशिष्ट्ये वैशिष्ट्ये उपयोग
१) ड्युरेल्युमिन 75 % Al 4% Cu 1% Mg & Mn वजनाला हलके व मजबूत आघात रोधक, वर्धनीय हवाई वाहने, मोटारी, स्वयंपाकाची भांडी, साचे, वजन पेण्याचे सामर्थ्य, भुयारी आगगाडी इ. साठी
२) ऍल्यूमिनिअम ब्रॉंझ ९०% ते ९६ %Cu २.३% ते १०.५% Al अल्प प्रमाणात लोखंड व कथिल उच्च प्रतीची तन्यता, कठीणपणा, आघात रोधकता असून रसायने व समुद्राचे पाणी यांचा परिणाम नाही. रंग व शाईमध्ये तसेच वर्णकामध्ये
३) मॅग्नेलिअम ९०% Al १०%Mg वजनाला हलके, मजबूत व गंज रोधक शास्त्रिय तराजूच्या दांड्यात, घरगुती उपकरणे, हवाई वाहने
४) अल्निको संमिश्र मुख्य घटक Al व कार्बन मोनॉक्साईड निकेल चुंबकीय गुणधर्म असतो. उत्तम टिकाऊ, चुंबक तयार करण्यासाठी

अधातू १) फॉस्फरस (phosphorus) –

संज्ञा – P,रेणुसूत्र- P4 अणुभार -३१, अणुअंक – १५, इलेक्ट्रॉन संरुपण – (२,८,५), संयुजा – ३ आणि ५
फॉस्फरसचा शोध १६७४ मध्ये जर्मन शास्त्रज्ञ ब्रॅंड ने लावला

फॉस्फरसची खनिजे- १. फोस्फोराईट Ca3 (Po4)2 २. फ्ल्यूर ऍपेटाईट 3Ca3(Po4)2 CaF2 ३. क्लोर ऍपेटाईट 3Ca3(Po4)3 Cacl2 ४. वेव्हेलाइट 4 AlPo4, 2Al (OH)3, 9H2O गुणधर्म – १. पिवळा फॉस्फरस अंधारात चकाकतो २. हवेत उघडा रारिल्यास पेट घेतो, (ज्वलनांक ३००C) त्यामुळे तो पाण्याखाली ठेवतात ३. उष्णतेने पिवळ्या फॉस्फरची वाफ होऊन तिचे सावकाश ऑक्सिडीकरण होते. आणि शीत ज्योत दिसते या ज्योतीत आगकाडी धरल्यास पेट घेत नाही. ४. शुध्द फॉस्फरसचा रंग पांढरा असतो,तर अशुध्द फॉस्फरसचा रंग पिवळा असतो. ५. पिवळा फॉस्फरसचा पाण्यातील विलय बिंदू ४४०C इतका असतो. उपयोग – १. आगकाडी उद्योगात २. फॉस्फरस ब्राँझ हे संमिश्र तयार करण्यासाठी, ३. स्मोक बाँम्ब, शोभेचे दारूकाम इ. च्या उत्पादनात, ४. उंदरांसाठी विष म्हणून उपयोगी पडणारे झिंक फॉस्फाइड तयार करण्यासाठी, ५. फॉस्फरस ट्रायक्लोराईड आणी फॉस्फरस पेंटा क्लोराईड तयार करण्यासाठी फॉस्फरस पेंटाऑक्साईड (P2O5) – उपयोग – १. निर्जलक पदार्थ म्हणून उपयोग करतात, २. वायू कोरडे करण्यासाठी, ३. फॉस्फोरिक ऍसिड तयार करण्यासाठी. २) गंधक

संज्ञा – S रेणुसुत्र – S8 , अणुभारांक – ३२, अणुअंक – १६, इलेक्ट्रॉन संरुपण (२,८,६)
संयुजा – २,४ आणि ६
गंधकमुक्त तसेच संयुक्त स्थितीत आढळते
संयुक्त स्थितीत – आयर्न पायराइट (FeS2 ) , झिंक ब्लेंड ( Zns) , गॅलेना ( Pbs ) , कॉपर पायराइट ( CuFeS2) , कीझेराइट (MgSo4, H2o)
प्राणी आणि वनस्पतीतून मिळणा-या काही पदार्थातही गंधक आढळते. उदा – अंडी, केस, कांदा, लसूण, पेट्रोलिअम वगैरे.
गंधक निष्कर्षणासाठी फ्राश पध्दती (Frasch process ) वापरतात.

उपयोग – १. गंधकाम्ल ( सल्फ्युरिक ऍसिड ) हे गंधकापासून मिळणारे महत्वाचे उत्पादन आहे. २. सल्फर डायऑक्साइड व कार्बन डायऑक्साइड यांच्या निर्मितीसाठी. ३. औषधी उपयोगाची कार्बनी संयुगे तयार करण्यासाठी ४. किटकनाशके तयार करण्यासाठी ५. बंदुकीची दारू, स्फोटकद्रव्ये यामध्ये वापरतात ६. रबराचे व्हल्सनायझेशन ( Vulcanisation ) करण्यासाठी हायड्रोजन सल्फाइड (H2S)

हायड्रोजन सल्फाइड वायू तयार करण्यासाठी किपच्या उपकरणाचा किपच्या उपकरणाचा उपयोग करतात.
H2S हा रंगहीन असून त्याला नकोसा वाटणारा, सडक्या अंड्यासारखा वास असतो. तो हवेपेक्षा जड असून पाण्यात अल्प प्रमाणात द्रावणीय आहे.

उपयोग – १. धातूची धन मूलके ओळखण्यासाठी, २. क्षपणक म्हणून उपयोग होतो. सल्फरडाय ऑक्साइड So2 , सल्फर ट्राय ऑक्साइड So3 यांचा उपयोग सल्फ्युरिक ऍसिडच्या उत्पादनासाठी होतो. सल्फ्युरिक ऍसिडला ( H2So4) रसायनांचा राजा म्हणतात. उपयोग- १. साखर, कृत्रिम धागे इ. विरंजनासाठी २. कागद उद्योगात उपयोगी पडणा-या कॅल्शिअम बाय सल्फाइट सारखी संयुगे तयार करण्यासाठी ३. द्रवरूप सल्फर डायऑक्साइड पेट्रोलिअम शुध्दीकरणासाठी. सल्फ्यूरिक ऍसिडचे उपयोग (H2So4)

अमोनिअम सल्फेट, सुपर फोस्फेट यासारख्या खतांच्या उत्पादनात
रंग, प्लॅस्टिक, रेयॉन इ. उत्पादनात
कागद आणि कापड उद्योगात.
विद्युत संचायकात (Lead Accumulator)
प्रयोगशाळेत अभिकारक म्हणून
सल्फेट क्षार, हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड इ. निर्मितीमध्ये
पेट्रोलिअमच्या शुध्दीकरणात असंतृप्त संयुगे वेगळी करण्यासाठी

३) कार्बन (C)

संज्ञा – C, अणुअंक – ६ , इलेक्ट्रॉन संरुपण – (२,४), संयुजा – ४
निसर्गात विस्तृत प्रमाणावर कार्बन विखुरलेला आहे. मुक्त स्थितीत तो हिरा आणि ग्रॅफाईट या रूपात आढळतो
संयुक्त – Co2, वातावरणात – ०.०३%
चुनखडी ( लाइमस्टोन CaCo3), डोलोमाईट ( CaCo3, Mgco3) , मॅग्नेसाईट ( MgCo3)
कार्बन हा वनस्पती आणि प्राणी यांचा महत्वाचा घटक असून तो कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन या संयुगाच्या स्वरूपात असतो.

कार्बन स्फटिक रूपे अस्फ्टिक रूपे १. हिरा लोणारी कोळसा २. ग्रॅफाइट काजळी, कोक (टीप – आता ही सूक्ष्म अशा ग्रॅफाइटचीच बनलेली आहेत असे मानतात. ) १. हिरा – हिरा हे कार्बनचे सर्वात शुध्द रूप होय. तो पारदर्शक असून सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. त्याचा अपवर्तनांक (२.४२) सर्वात जास्त आहे. त्याची घनता ३.१५ g/cm3 आहे. द्रवणांक ३९३० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त आहे. उपयोग- १. हि-याचा रत्न म्हणून उपयोग होतो. २. ओढून तारा तयार करण्यासाठी ३. काळ्या अशुध्द हि-याचा उपयोग कापण्याची हत्यारे आणि पदार्थ घासण्यासाठी होतो. २. ग्रॅफाइट – ग्रॅफाइट हा धातूसारखी चकाकी असलेला गडद करड्या रंगाचा स्थायू पदार्थ आहे. तो अपारदर्शक आहे. तो मउ असून थरांनी बनलेला असतो. घनता २.२५ g/cm3 आहे. कागदावर ओढल्यास त्याच्या काळ्या खुणा उमटतात. ग्रॅफाइट अधातू असूनही विद्युत सुसंवाहक आहे. उपयोग – १. शिसपेन्सिल तयार करण्यासाठी २. उच्च तापमानाला वंगण म्हणून ३. रंगामध्ये रंगद्रव्य म्हणून ४. अणुभट्टीमध्ये युरेनिअमचे रूळ साठविण्यासाठी १. कार्बन मोनॉक्साईड ( Co) – उपयोग – १. कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांचे मिश्रण म्हणजेच वॉटर गॅस होय. त्याचा उपयोग इंधन म्हणून तसेच धातूशास्त्रात क्षपणक म्हणून होतो. २. कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन यांचे मिश्रण (Co+N2) म्हणजे प्रोड्यूसर गॅस होय. याचाही इंधन म्हणून उपयोग होतो. ३. कार्बोनिल क्लोराइडला फॉस्जिन असे म्हणतात. त्याचा उपयोग रंगाच्या कारखान्यात तसेच युध्दामध्ये विषारी वायू ( Chemical war ) म्हणून उपयोग करतात २. कार्बनडायऑक्साईड (Co2)- वातावरणामध्ये आढळतो. ज्वलन, श्वसन आणि किण्वन (Fermentation) या क्रियांमध्ये तयार होते. उपयोग १. धुण्याचा सोडा (NaCO3 ) आणि सोडिअम बायकार्बोनेट (NaHCO3) यांच्या उत्पादनात २. वायुमिश्रित जल (Aerated water ) तयार करण्यासाठी ३. अग्निशामक म्हणून ४. स्थायूरूप कार्बन डायऑक्साईड ( शुष्क बर्फ ) अन्नपदार्थाचा साठा व त्यांची वाहतूक यामध्ये शीतक म्हणून उपयोगी पडतो

मिथेनला मार्श गॅस ( Marsh Gas ) असेही म्हणतात. कारण दलदलीच्या भूभागात (Marshy Land) वनस्पतीच्या अपघटनाने नैसर्गिकरित्या तो तयार होतो. तो कोलगॅसमध्ये (५० ते ९७% ) आढळतो. पेट्रोलिअमच्या भंजन प्रक्रियेतही ( Cracking Process) त्याचे उपउत्पादन होते. गोबर गॅस आणि स्यूएज गॅस (Sewage Gas ) यांच्यामध्येही तो प्रमुख घटक म्हणून आढळतो.

उपयोग- १. गोबर गॅस आणि नॅचरल गॅसच्या रूपात मिथेनचा दीप्तीदायी (Illuminant) घरगुती इंधन म्हणून. २. ऊर्जानिर्मिती केंद्रामध्ये इंधन म्हणून, ३. हायड्रोजनच्या उत्पादनासाठी, ४. काजळी,कार्बन ब्लॅक तयार करण्यासाठी. इथिलीनचे उपयोग १. ऑक्सि – इथिलिन ज्योत, २. कृत्रिम रीतीने फळे पिकविण्यासाठी, ३. पॉलिथिन पिशव्या, प्लॅस्टिकचे कापड, नळ, तारा वगैरे तयार करण्यासाठी लागणा-या पॉलिथिन प्लॅस्टिकच्या उत्पादनासाठी उपयोग करतात. बेंझिनचे उपयोग (C6H6) – १. ड्रायक्लिनिंगसाठी, २. पेट्रोल तुटवड्यांच्या काळात मोटारच्या इंधनातील घटक म्हणून उपयोग.

लोणारी कोळसा – मर्यादित हवेत लाकडाचे ज्वलन करून लोणारी कोळसा तयार करतात. त्याचा उपयोग पाणी शुध्दी करणासाठी होतो.
प्राणिज कोळसा – मर्यादित हवेत हाडांचे ज्वलन करून तयार करतात, याचा उपयोग जलशुध्दीकरण व उद्योगात होतो.

कोळसा प्रकार कार्बनचे प्रमाण
पीट ३०- ५०%
लिग्नाईट ६५-७५%
बिटूमिनस ७५-९०%
अँथ्रासाईट ९०-९५%
रंग धातूच्या ऑक्साइड्स
१) हिरवा क्रोमिअम ऑक्साइड किंवा फेरस ऑक्साइड
२) लाल क्युप्रस ऑक्साइड
३) निळा कोबाल्ट ऑक्साइड
४) पिवळा अँटिमनी सल्फाइड
५) जांभळा मँगनीज डायऑक्साइड
६) अपारदर्शक / दुधी टिन ऑक्साइड किंवा कॅल्शिअम फॉस्फेट

विशेष प्रकारच्या काचा ः- १) सुरक्षा काच- अ. चिवट काच – चिवट काच मोटारीच्या काचा बनविण्यासाठी वापरतात आ. स्तरीत काच – काचेच्या स्तरांमध्ये व्हायनिल प्लॅस्टिकचे पातळ पापुद्रे घालून ते उच्च दाबाखाली तापवून स्तरीत काच तयार करतात. ही काच आघात झाला असता तडकते पण तुकडे उडत नाहीत. उपयोग- १. मोटारीच्या काचा बनविण्यासाठी २. स्तरीत काचेच्या स्तरांची संख्या वाढविली म्हणजे तयार होणारी काच पिस्तुलाच्या गोळीला सुध्दा अभेद होते. २) तंतूकाच –

या काचेत उष्णता आणि विद्युतरोध्क गुणधर्म आहेत.

उपयोग – बोटीचे सुकाणू, मोटारीचे ढाचे आणि शिरस्त्राणे (Helmets) बनविण्यासाठी वापरतात कारण या प्रकारच्या काचेत पोलादासारखी ताकद असते. ३) काच विटा (Glass Bricks)-

काचेपासून पोकळ विटा बनवितात. वातानुकूलित घरांच्या बांधकामासाठी अशा विटा योग्य असतात.

४) संकोचित काच-

ही विशेष प्रकारची बोरोसिलिकेट काच असून १००० अंश सेल्सिअस तापमानावर काच वापरावयाची असली म्हणजे तिचा उपयोग करतात.

हवा हवा हे ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बनडाय ऑक्साइड, पाण्याची वाफ व काही दुर्मिळ वायूंचे मिश्रण आहे. हवेचे घटक टक्केवारी (%) नायट्रोजन ७८.३ ऑक्सिज २०.९९ कार्बनडाय ऑक्साइड ०.०३ ऑरगॉन ०.९४ हायड्रोजन, मिथेन, निऑन, हिलिअम ०.०१ पाणी

पाणी (H2O) हे एक संयुग आहे. पृथ्वीचा सुमारे ३/४ भाग (७१%) हा पाण्याने व्यापलेला आहे.
हेन्री कॅव्हेडिंश (१७८१) या रसायन शास्त्रज्ञाने १ भाग ऑक्सिजन व २ भाग हायड्रोजन एकत्र करून प्रयोग शाळेत पाणी तयार केले आणि पाणी हे संयुग आहे हे सिध्द केले.

ऑक्सिजन

संज्ञा – O, अणुक्रमांक – ८
ऑक्सिजन हा हवेतील क्रियाशील भाग आहे. ऑक्सिजन श्वसनासाठी तसेच ज्वलनासाठी आवश्यक आहे.
ऑक्सिजन वायू प्रथम तयार केला – कार्ल शिल (१७७७)
ह्या वायूला ऑक्सिजन हे नाव दिले – ए. लाव्हासिए – (१७७७)
याने ऑक्सिजन पाण्यापासून वेगळा केला – जोसेफ प्रिस्टले – (१७७४)
पाण्यात ऑक्सिजन व हायड्रोजनचे वजनी प्रमाण – ८ः१
पृथ्वीच्या कवचात ऑक्सिजनचे प्रमाण – ५०% तर हवेत तेच प्रमाण – २१%

उपयोग १. शुध्द ऑक्सिजन आणि ऍसिटीलीन वायू एकत्र करून जी ज्योत मिळते ती ज्योत – ऑक्सिऍसिटीलीन ज्योत (३०००० C) २. ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणातून तयार केलेले ज्योतीचे तापमान २८०००C असते. या ज्योती धातूंचे तुकडे जोडण्यासाठी व पत्रे कापण्यासाठी वापरतात. ३. अग्निबाणाच्या इंधनाच्या जलद ज्वलनासाठी द्रवरूप ऑक्सिजन वापरतात. ४. H2So4 ऍसिड बनविण्यासाठी ऑक्सिजन वापरतात. ५. ऑक्सिजन व नायट्रस ऑक्साइड यांचे मिश्रण भूल देण्यासाठी वापरतात. हायड्रोजन

संज्ञा – H, अणुक्रमांक -१
या वायूचा शोध लावला – हेन्री कॅव्हेंडीश (१७६६)
हा वायू सर्व मूलद्रव्यात हलका आहे. म्हणून हा वायू फुग्यांमध्ये शास्त्रीय उपकरणाद्वारे भरून अभ्यासासाठी हे फुगे अवकाशात तरंगत ठेवले जातात.
सूर्यावरील वातावरणात प्रामुख्याने हा वायू आढळतो
ज्वालामुखीतून जे वायू बाहेर पडतात. त्यात हायड्रोजन मुक्तावस्थेत आढळतो.
पाण्यामधे हायड्रोजचे वजनी प्रमाण – ११% असते.
कार्बन व हायड्रोजन यांची संयुगे या नावाने ओळखली जातात. – हायड्रोकार्बन्स

उपयोग – १. कोलगॅस, वॉटरगॅस व प्रोड्यूसर गॅस यांसारख्या वायूरूप इंधनाचा घटक असतो. २. खाद्यतेल, तुपासारखे पदार्थ घट्ट करण्यासाठी या वायूचा वापर करतात. ३. धातूंच्या ऑक्साइडपासून धातू मिळविण्यासाठी हायड्रोजन क्षपणक म्हणून वापरतात ४. ऑक्सिहायड्रोजन ज्योतीचा उपयोग धातूंचे पत्रे कापण्यासाठी होतो. नायट्रोजन

संज्ञा – N, अणुक्रमांक -७
डॅनिअल रूदरफोर्ड (१७७२) याने सर्वप्रथम हवेतून नायट्रोजन वायू वेगळा केला.
हवेतील प्रमुख घटक म्हणजे नायट्रोजन. याचे हवेतील आकारमान सुमारे ७८% आहे.
प्राणी व वनस्पती यांच्या वाढीसाठी नायट्रोजनची आवश्यकता असते.
निसर्गात जो नायट्रोजन आढळतो तो प्रामुख्याने सोडिअम नायट्रेट (NaNo3-चिली सॉल्ट पिटर) आणि पोटॅशिअम नायट्रेट (KNo3 – नायटर) या रूपांमध्ये आढळतो.

उपयोग- १. विद्युत दिव्यांमध्ये तंतूचे ऑक्सिडीकरण होऊ नये म्हणून त्यामध्ये नायट्रोजन व ऑरगॉन यांचे मिश्र्ण वापरतात. २. अमोनिया, नायट्रीक ऍसिड आणि खते तयार करण्यासाठी ३. उच्च तापमानाच्या तापमापीमध्ये याचा उपयोग करतात. ४. पोलाद कठीण करण्याच्या प्रक्रियेत नायट्रोजन वापरतात.

वातावरणातील नायट्रोजनचे नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर होण्याच्या क्रियेला नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणतात.
नायट्रोजनच्या परिभ्रमणाला नायट्रोजनचे चक्र म्हणतात.

अमोनिया (NH3) जोसेफ प्रिस्टले (१७७४) यांनी हा वायू तयार केला

नायट्रोजन आणि हायड्रोजन यांच्यापासून कृत्रिमरित्या मोठ्या प्रमाणावर अमोनिया वायू तयार करण्याची पध्दत – हेबर पध्दत
हेबर यांना नोबेल पारितोषिक मिळाले – १९१८

उपयोग- १. धुण्याचा सोडा, सोडिअम बायकार्बोनेट, नायट्रीक ऍसिड इ. च्या उत्पादनात. २. अमोनिया सल्फेट डायामोनियम फॉस्फेट, यूरिया इ. खतांच्या उत्पादनात. ३. बर्फ तयार करण्याच्या कारखान्यात प्रशीतक (Refrigerent) म्हणून. ४. औषधात वापर. ५. बेशुध्द माणसाला शुध्दीवर आणण्याकरीता.

अमोनियम क्लोराइड (NH4Cl – नवसागर ) हे संयुग – तांबे आणि पितळांच्या भांड्यांना कल्हई करण्यासाठी , लेक्लाशेंच्या विद्युतघटात आणि निर्द्रव विद्युतघटात आणि औषधांमध्ये यांचा वापर करण्यात येतो.
अमोनियम नायट्रेट (NH4No3) गोठण मिश्रणातील एक घटक म्हणून वापरतात
अमोनियम कार्बोनेट (NH4Co3), स्मेलिंग सॉल्ट तयार करण्यासाठी, बेकिंग पावडरमध्ये, कापडउद्योगांमध्ये रंगबंधक म्हणून वापरतात.

इंधने (Fules) निरनिराळ्या उद्देश्यांसाठी वापरली जाणारी उष्णता ऊर्जा ज्या पदार्थांचे दहन केले असता निर्माण होते, अशा पदार्थांना इंधने म्हणतात. इंधनाचे प्रकार- १. नैसर्गिक वायू इंधने- नॅचरल गॅस – कोळसा किंवा पेट्रोलियम खाणीच्या प्रदेशात नॅचरल गॅस आढळतो. त्यात मुख्यतः सुमारे ९५% हायड्रोकार्बन असतात. हायड्रोकार्बनची घटना विविध प्रकारची असते. त्यात सुमारे ८० ते ९०% मिथेन, ६ ते १०% इथेन, ३ ते ५% प्रोपेन, १ ते २% ब्युटेन हे वायू असतात. तसेच त्यात थोड्या प्रमाणावर नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड आणि हेलिअम हेही वायू असतात. नॅचरल गॅस थंड करून व खनिज तेलाच्या भागशः उर्ध्वपतनाने ब्युटेन व इतर वायू वेगळे करता येतात. नंतर तो पोलादी नळकांड्यात भरतात. हल्ली नॅचरल गॅस अन्न शिजविणे, प्रकाश मिळविणे इ. साठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. २. कृत्रिम वायू इंधने अ) कोल गॅस – दगडी कोळशाच्या भंजक उर्ध्वपातनाने कोल गॅस मिळविता येतो. तो मुख्यतः इंधन म्हणून वापरतात. तसेच प्रकाशासाठीही त्याचा उपयोग करतात. आ) ऑइल गॅस – केरोसीनचे भंजन करून ऑइल गॅस मिळवितात. केरोसीनचे मिथेन, इथेन, एथिलिन आणि हायड्रोजन यासारख्या वायूरूप हायड्रोकार्बनमध्ये रूपांतर होते. ऑइल गॅसचा प्रयोगशाळा आणि लघुउद्योगधंद्यांमध्ये उपयोग होतो. इ) पेट्रोल गॅस – पेट्रोलचे भंजन करून पेट्रोल गॅस मिळवितात. त्यात प्रोपेन, ब्युटेन, एथिलिन आणि ब्युटिलिन यासारखे हायड्रोकार्बन असतात. तो वायू प्रयोगशाळेत आणि घरगुती उपयोगासाठी इंधन म्हणून वापरतात. ई) वॉटर गॅस – वॉटर गॅस हे कार्बन मोनॉक्साइड वायू आणि हायड्रोजन वायू यांचे मिश्रण होय. त्यात ४५% कार्बन मोनॉक्साइड, ४५% हायड्रोजन आणि १०% अन्य वायू असे वैशिष्ट्यपूर्ण घटक असतात. सुमारे १४०० अंश सेल्सिअसला शुभ्रोष्ण कोक वरून पाण्याची वाफ जाऊ दिल्यास वॉटर गॅस तयार होतो. त्याचा इंधन म्हणून उपयोग होतो. शिवाय हायड्रोजन मिळविण्यासाठीही तो उपयोगी पडतो. वॉटर गॅस निळसर ज्योतीने जळत असल्यामुळे त्याला नील वायू (Blue gas) असेही म्हणतात उ) प्रोड्यूसर गॅस – हा वायू कार्बन आणि नायट्रोजन यांचे मिश्रण होय. त्यात ३०% कार्बन मोनॉक्साइड, ६०% नायट्रोजन आणि १०% अन्य वायू असे विशेष घटक असतात. रक्तोष्ण कोळशाच्या थरावरून अपु-या हवेचा झोत जाऊ दिल्यास प्रोड्यूसर गॅस तयार होतो. काच तयार करण्याच्या भट्टयांमधे आणि धातू मिळविण्याच्या भट्टयांमध्ये प्रोड्यूसर गॅसचा उपयोग करतात. अमोनिआ तयार करताना लागणारा नायट्रोजन मिळविण्यासाठीही त्याचा उपयोग करतात. ट्रॅक्टर, मोटारी, माल वाहतुकीच्या गाड्या चालविण्यासाठी वापण्यात येणा-या गॅस इंजिनांमधे त्याचा इंधन म्हणून उपयोग करतात. महत्वाची संयुगे
नाव व रेणुसुत्रे गुणधर्म उपयोग
१. खाण्याचा सोडा सोडीयम बाय कार्बोनेट १. पांढरी भुकटी २. पाण्यात द्रावणीय ३. मिरमिरी चव ४. उष्णतेने अपघटन व कार्बनडाय ऑक्साइड मुक्त ५. आम्लाची तीव्रक्रिया होऊन कार्बनडाय ऑक्साइड मुक्त १. बेकिंग पावडरमध्ये टार्टारिक ऍसिड बरोबर वापरतात त्यामुळे पाव, बिस्किटे, केक सच्छिद्रे व खुसखुशीत बनतात.
२. धुण्याचा सोडा सोडीयम कार्बोनेट १. पांढरा स्फटीक पदार्थ २. थोड्याशा उष्णतेने बरेसचे स्फटिक जल बाष्परुपात वेगळे होते व पांढरी भुकटी शिल्लक उरते. ( या क्रियेला जलत्सर्जन म्हणतात. ३. विरल आम्लांशी सहज अभिक्रिया होवून कार्बनडाय ऑक्साइड वायू मुक्त होतो. ४. सोडीयम कार्बोनेट ओला तांबडा लिटमस निळा बनवतो. म्हणजेच तो पदार्थ आम्लारीधर्मी आहे. ५. कठीण पाणी सोडीयम बायकार्बोनेटमुळे सिफेन बनते. १. कपडे, भांडी इत्यादींच्या स्वच्छतेसाठी २. पाणी सुफेन बनविण्यासाठी ३. टाकणखार (बोरॅक्स) कॉस्टीक सोडा, काच ४. धुण्याचा साबण व इतर उपमार्जकांमधे ५. अग्निशामकांमधे
३. चुनखडी कॅल्शिअम कार्बोनेट १. पांढरा चूर्ण रुप पदार्थ २. पाण्यात अद्रावणीय मात्र कार्बनडाय ऑक्साइडयुक्त पाण्यात द्रावणीय ३. सुमारे १००० सेल्सी. तापमानाला याचे रुपांतर चुनकळीत होते व CO2 मुक्त होतो. १. चुना, सिमेंट, काच, धुण्याचा सोडा यांच्या उत्पादनात वापरतात. २. खनिजांपासून धातू मिळवितांना ३. संगमरवराच्या स्वरुपात शिल्पकला, इमारती इ. ४. प्रयोगशाळेत कार्बनडायऑक्साइड तयार करण्यासाठी ५. रंग, दंतमंजन, खडू तयार करण्यासाठी
४. फेरस सल्फेट (ग्रिन व्हिट्रीऑल) (हिराकस) १. फिकट हिरव्या रंगाचा स्फटिक पदार्थ २. ब-यापैकी जलोत्सर्जक असल्याने लगेच चूर्णरुप पांढ-या रंगाचे फेरस सल्फेट तयार होते. ३. अमोनियम सल्फेटशी क्रिया होऊन फेरस अमोनियम सल्फेट म्हणजेच मोहर्स सॉल्ट म्हणतात. FeSO4(NH4)2SO46H2O फेरस सल्फेट क्षेपणक असल्याने पोटॅशिअम परमँगनेटचे जांभळ्या रंगाचे आम्लीकृत द्रावण त्यामुळे रंगहीन बनते. १. कपडे रंगविण्याच्या उद्योगात रंगबंधक म्हणून २. कृषी क्षेत्रात किटकनाशक म्हणून ३. प्रयोगशाळेत क्षपणक म्हणून ४. पेनाची शाई तयार करणे ५. कातडी कमविण्याच्या उद्योगात
५) कॉपर सल्फेट (ब्ल्यूव्हिट्रिऑल/मोरचूद) १. निळ्या रंगाचे स्फटिक २. पाण्यात द्रावणीय ३. स्वरूप विषारी ४. २५० सेल्सी. पर्यंत तापविल्यास स्फटिकजल स्फटिकातील स्फटिकजल बाष्परूपात निघून जाते व कॉपर सल्फेटचे पांढरे चूर्ण शिल्लक राहते. ५. कॉपर सल्फेटच्या द्रावणाचे अमोनियाबरोबर अभिक्रिया होवून प्रतम द्रावणीय निळसर पांढ-या रंगाच्या कॉपर हायड्रॉक्साईडचा अवक्षेप तार होतो पण जादा अमोनिया पाठवल्यास अवक्षेप विरघळून गडद निळे द्रावण तयार होते. ६. पोटॅशिअम आयोडाईड बरोबर कॉपर सल्फेटची अभिक्रिया होऊन आयोडिन मुक्त होते. १. किडनाशक म्हणून बोर्डो मिश्रणात. २. किडनाशक म्हणून तांब्याच्या विद्युत विलेपना साठी व तांब्याच्या शुध्दीकरणासाठी. ३. रंगबंधक म्हणून कापड उद्योगात ४. डॅनिअलच्या विद्युतघटात ५. तांब्याची अनेक संयुगे तयार करण्यासाठी ६. मधुमेहाच्या निदानासाठी वापरल्या जाणा-या फेलिंगच्या द्रावणात किंवा बेनिडीटच्या द्रावणात कॉपर सल्फेटच्या हा एक घटक असतो.
६) तुरटी १. पोटॅशिअम सल्फेट व ऍल्युमिनिअम सल्फेट मिळून तयार होणारा हा दुहेरी क्षार आहे २. चव तुरट ३. स्वरुप पांढरे स्फटिकमय ४. पाण्यात द्रावणिय ५. आम्लधर्मी ६. विकनयांक ९२ त्याहून जास्त तापविल्यास स्फटिकजल बाष्परुपात उत्सर्जित होवून तुरटी फुलारते. अशा तुरटीला लाही म्हणतात. १.कातडी कमविणा-या उद्योगात रंगबंधक म्हणून २.विशिष्ट औषधांध्ये तुरटी व तिची लाही वापरतात. ३. कागदाला चमक येण्यासाठी ४. रक्तप्रवाह थांबविण्यासाठी ५. निवळण्याच्या क्रियेने पाणी शुध्द करण्यासाठी

रासायनिक पदार्थ व त्यांची व्यावहारिक शास्त्रीय नावे
अ.क्र. व्यावहारीक नाव शास्त्रीय नाव
१) ब्ल्यू व्हिट्रीऑल २) व्हाईट व्हिट्रीऑल ३) ग्रीन व्हिट्रीऑल ४) धुण्याचा सोडा ५) खाण्याचा सोडा ६) कॉस्टिक पोटॅश ७) बेंगॉल सॉल्ट पिटर ८) साधे मीठ ९) लिथार्ज १०) फॉस्जिन ११) मार्श गॅस १२) जलकाच १३) जिप्सम १४) इप्सम सॉल्ट १५) ग्लोबर्स सॉल्ट १६) साल ऍमॉनिऍक १७) आयर्न पायराइट कॉपर सल्फेट झिंक सल्फेट फेरस सल्फेट सोडिअम कार्बोनेट सोडिअम बाय कार्बोनेट पोटॅशिअम हायड्रॉक्साइड पोटेशिअम नायट्रेट सोडिअम क्लोराइड लेड(लिड) मोनोक्साइड कार्बोनिल क्लोराइड मिथेन सोडिअम सिलिकेट कॅल्शिअम सल्फेट मॅग्नेशिअम सल्फेट सोडिअम सल्फेट अमोनिअम क्लोराइड आयर्न सल्फाइड

काही महत्वाची रासायनिक संयुगे व रेणूसूत्रे
क्र. रासायनिक संयुगे रेणूसूत्रे
१. नायट्रोजन डाय ऑक्साइड २. नायट्रेस ऍसिड ३. नायट्रीक ऍसिड ४. अमोनियम क्लोराइड ५. अमोनियम सल्फेट ६. अमोनियम नायट्रेट ७. अमोनियम कार्बोनेट ८. कॅल्शिअम हायड्रॉक्साइड (विरलेला चुना) ९. पोटॅशिअम परमॅगनेट १०.मॅगनीज डायऑक्साइड ११.हायड्रोजन सल्फाइड १२.ऍटिमनी ट्रायआयोडाइड १३.पोटॅशिअम सल्फेट १४.मँग्नेशिअम हायड्रॉक्साइड १५.ऍल्युमिनिअम ऑक्साइड १६.क्युप्रस क्लोराइड १७.क्युप्रिक क्लोराइड १८.फेरस सल्फेट ( हेराकस) १९.कॉपर सल्फेट २०.झिंक सल्फेट २१.मँग्नेशिअम सल्फेट २२.झिंक ऑक्साइड ( झिंक सफेदा) २३.मँग्नेशिअम कार्बोनेट २४.सिल्व्हर नायट्रेट २५.मर्क्युरस क्लोराइड २६.सोडिअम हायड्रॉक्साइड (कॉस्टिक सोडा) २७.पोटॅशिअम ऍल्युमिनिअम सल्फेट (तुरटी) २८.लेड मोनॉक्साइड ( लिथार्ज) २९.लेड नायट्रेट ३०.फॉस्फरस पेंटॉक्साइड ३१.क्रोमिअम ट्रायऑक्साइड ३२.स्टॅनिक ऑक्साइड ३३.शेंदूर ३४.चिली सॉल्ट पीटर ( सोडिअम नायट्रेट) ३५.बोरॅक्स (टाकणखार) ३६.कॉपर सल्फेट ३७.ऍल्युमिनिअम सल्फेट ३८.सोडिअम ऍल्युमिनेट ३९.ऍसिटीक ऍसिड ४०.सोडिअम कार्बोनेट ४१.सोडिअम बायकार्बोनेट ४२.मिथेन ४३.ऍसिटीलीन ४४.यूरिया ४५.पोटॅशिअम नायट्रेट ४६.सोडिअम सल्फेट ४७.ग्लुकोज ४८.साखर ४९.क्लोरोफार्म ५०.B. H. C. ५१.जिप्सम ५२.प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) ५३.पॉलिथीन प्लॅस्टिक NO2 HNO2 HNO3 NH4Cl (NH4)2 SO4 NH4NO3 (NH4)2 CO3 Ca(OH)2 KMNO4 MNo2 H2S Sbl3 K2So4 Mg(OH)2 Al2O3 CuCl or Cu2Cl2 Cucl2 FeSO4 (Green Vitriol) CuSO4, 5H2O (Blue Vitriol) ZnSO4,7H2O (White Vitriol) MgCO4, 7H2O (Epsom Salt) ZnO MgCO3 (French Chalk) AgNO3 (Lunar Caustic) Hg2Cl2 (Calomel) NaOH K2So4 Al2 (So4) 24H2O PbO Pb (NO3)2 P2O5 CrO3 SnO2 Pb3O4 NaNO3 Na2B4O7 CuSO4 (मोरचूद) Al2 (SO4)3 NaAlO2 CH3COOH Na2CO3 (धुण्याचा सोडा) NaHCO3 (खाण्याचा सोडा) CH4 (मार्श गॅस) C2H2 NH2 CONH2 KNO3 (बेंगाल सॉल्ट पिटर) NaSO4 (ग्लोबर्स सॉल्ट) C6H12O6 C12H22O11 CHCl3 C6H6Cl6 CaSO4 (CaSO4) 2H2O (C2H4)n

धन प्रभार ॠण प्रभार न्यूट्रल ऍनोड कॅथोड – कॅटायन ऍनायन – अल्फा बिटा गॅमा हायड्रोजन ऑक्सिजन -
मुलद्रव्य संज्ञा अणू मूलद्रव्य संज्ञा अणू
हायड्रोजन H 1 हेलियम He 4
कार्बन C 12 नायट्रोजन N 14
ऑक्सिजन O 16 सोडियम NA 23
मॅग्नेशिअम MG 24 ऍल्युमिनीयम AL 27
सिलिकॉन SI 28 फॉस्फरस P 31
गंधक S 32 क्लोरीन CL 35
क्रोमीअम CR 52 कोबाल्ट CO 59
तांबे CU 64 कॅडमियम CD 112

संकीर्ण माहिती –

६४% लोखंड व ३६% निकेल वापरून तयार केलेल्या मिश्रधातुला इनव्हार म्हणतात.
ज्युव्हेनाइल हॉर्मोन किंवा निओटेनिन हे किटकांमध्ये सापडणारे संप्रेरक आहे.
केरोसिनला पॅराफिन तेल असेही दुसरे नाव आहे.
मधामध्ये लेव्हलोज ही साखर असते.
सोन्याचा खरेपणा ओळखण्यासाठी सोन्याचा तुकडा आम्लराज द्रावात बुडवून कसोटी दगडावर घासतात. हे द्रव हायड्रोक्लोरिक आम्ल व नायट्रीक आम्लापासून तयार करतात.
पी. व्ही. सी. म्हणजे पॉली व्हिनाइल क्लोराइड होय.
कृत्रिम रितीने तयार केलेल्या चामड्याला रेक्झिन म्हणतात. ते सेल्युलोजपासून बनवितात
पहिल्या महायुध्दात विषारी गॅस म्हणून ज्या तेलासारख्या वायूचा उपयोग केला गेला. त्याचे नाव मस्टर्ड गॅस असे आहे.
बॉक्साइट शुध्द करण्यासाठी कॉस्टिक सोडा वापरतात.
बर्फ व मीठ यांच्या योग्य मिश्रणाच्या साह्याने तापमान – २३0 से पर्यंत कमी करता येते.
द्राक्षाच्या रसापासून शॅम्पेन हा मद्याचा प्रकार बनवितात.
पॉलिजल ही पृथ्वीवरील सर्वात हानीकारक वस्तू मानली जाते. साधे पाणी केसासारख्या सूक्ष्म आकाराच्या नलिकेतून पाठवून ते तयार करतात. ते – ४०0 से. ला गोठते तर ५०० 0 से. ला उकळते.
चिंचेमध्ये टारटारिक आम्ल असते. तर लिंबामध्ये सायट्रीक आम्ल असते.
वाईन (दारु) मध्ये १२ % इथिल अल्कोहोल असते.
जाहिरातीमध्ये वेगवेगळे रंग आणण्यासाठी निऑन वायू वापरतात.
गंधकाबरोबर रबर तापविण्याच्या क्रियेला वल्कनायझेशन म्हणतात.
कार्नोबा मेण हे पेट्रोलिअम मेण असते.
फॉस्फरसच्या रेणूतील अणू -४
हायड्रोजन सल्फाइड वायू आम्लधर्मी आहे.
परागकण हे नैसर्गिक प्रदूषक आहे.
पिवळा फॉस्फरस पाण्याखाली ठेवतात.
सोडीअम धातू रॉकेल खाली ठेवतात.
ऊसाच्या चिपडाला बगास म्हणतात.
वाफाळ सल्फ्युरिक ऍसिडला म्हणतात. –ओलीयम
पिवळा फॉस्फरस बेझिंनमध्ये द्रावणीय आहे.
निश्चित आकार नसणारा स्थायू- स्टार्च
स्फोटक – TNT- ट्रायनायट्रो टॅल्वीन
विमानाच्या टायरमध्ये असणारा वायू – हेलीयम
१८ कॅरेट सोने – ७५ % शुध्द
वायूच्या विसरणाचा नियम –ग्राहम
प्रकाश विद्युत घटातील लवण – लिथीयम
एअर कंडीशनर मधील प्रशितक – फ्रिऑन
टाल्कम पावडर तयार करतात – मॅग्नेशियम सिलीकेट
कापड गिरण्यांमध्ये विरंजक – सोडीयम परबोरेट
सर्वात हलका धातू- लिथियम, जड –प्लुटेनियम
नायट्रीक आम्ल साठविण्यासाठी टाक्या – ऍल्युमिनीयम
तीव्र आम्ल साठविण्यासाठी टाक्या – शिशाच्या
अतिशय सप्लवनशिल द्रव – नॅप्थॅलिन
चांदीच्या भांड्यात अंडे उकडल्यास – अंडे काळे होते.

कृषी तंञज्ञानातील क्रांती



कृषी तंञज्ञानातील क्रांती

भारत हा शेती प्रधान देश आहे. परंतु भारतीय कृषी तंत्रज्ञान अतिशय मागास होते. १९४७ मध्ये भारत पाकिस्तानची फाळणी झाली. त्यात भारताच्या वाटयाला ८२% लोकसंख्या, ७५% तृणधान्याखालील क्षेञ व ६९% बागायत क्षेत्र भारताकडे आले.
स्वातंत्रोत्तर काळात भारताला शेतीप्रधान देश असूनही पी एल ४८० करारानुसार १९५५ मध्ये अमेरिकेकडून गहू आयात करावा लागला.

शेती उत्पादन वाढविण्यासाठी योजना

१९४८ मध्ये अधिक धान्य पिकवा मोहिम सुरू झाली.

हरितक्रांती

हरितक्रांती

हरित क्रांतीः-

१९६४ मध्ये मेक्सिकोचे शास्त्रज्ञ डॉ. नॉर्मन बोर्लांग यांनी गडद हिरवा रंग असलेल्या बुटक्या, खताला व पाण्याला प्रतिसाद केणा-या व कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणा-या संकरीत जातींचा शोध लावला. त्यामुळे गव्हाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. म्हणून त्यांना जागतिक हरीत क्रांतीचे जनक म्हणतात. याबद्दल त्यांना १९९० चा नोबेल पुरस्कार मिळाला.
अन्नधान्याच्या उत्पादनातील प्रचंड वाढीस विल्यम गॅड (युएसए) यांनी ग्रीन रिव्हॅल्यूशन असे नाव दिले.
भारतातील हरित क्रांती घडविण्यासाठी लालबहादुर शास्त्रींनी, केंद्रीय कृषीमंत्री सी. सुब्रमण्यम्, कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम.एस. स्वामीनाथन व शिवरामन या शेती शास्त्रज्ञांचा एक कार्यगट नेमला. यांच्या नेतृत्वाखाली अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी आराखडा तयार केला. त्या अंतर्गत १९६०-६१ मध्ये भारत सरकारने सधन/प्रकर्षित शेती जिल्हा कार्यक्रम (Intensive Agricultural District Programme)) हा पथदर्शी प्रकल्प (Pilot Projet) हाती घेतला. त्या अंतर्गत १७ जिल्हयांत अधिक उत्पन्न देणा-या वाणांचा कार्यक्रम (HYVP) १९६६ मध्ये सुरू झाला. त्याला यश मिळाल्याने हा कार्यक्रम पुढे ११४ जिल्हयांमध्ये राबविण्यात आला. याचीच परिणिती म्हणजे हरीत क्रांती होय. अन्नधान्याच्या उत्पादनात प्रत्यक्ष वाढ १९६७-६८ मध्ये झाली.
भारतीय हरीत क्रांतीचे जनक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांनी भारतीय वातावरणास पोषक अशा मेक्सिकन जातीच्या चाचण्या पंतनगर (युपी) व लुधियाना येथे घेतल्या .या जातींनी उत्पादनात प्रचंड क्रांती केली.या कार्याबद्दल एम.एस.स्वामीनाथन यांना १९९८ मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला, तर सी.सुब्रम्ण्यम यांना भारतीय हरितक्रांतीचे शिल्पकार म्हटले जाते.
मेक्सिकोहून आयात केलेले रोजो, सोनालिका ६४ व कल्याणसोना हे बियाणे १९६४-६५मध्ये उपलब्ध झाले.या बियाण्याची चाचणी पंजाब,हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेशातील ११४ जिल्हयात करण्यात आली. त्यानंतर भारतीय शास्त्रज्ञांनी शोधलेली पहिली संकरित जात म्हणजे पी व्ही १८ ही गव्हाची जत शेतक-यांना उपलब्ध करून देण्यात आली.
भात पीकाची तायचुंग नेटीव्ह १ ही जात जैवानमधुन आणली. त्यापासून अनेक संकरीत जाती तयार केल्या. त्यापैकी जया ही एक जात आहे.
भारतात भात व गहू या पीकांचा हरीतक्रांतीत मोठा वाटा होता.
भारतातील हरीतक्रांती सुरू झाल्याचे वर्ष – १९६५-६६
भारताने अन्नधान्याची आयात थांबविली – १९७१
भारताने सर्वप्रथम धान्य निर्यात केले – १९७५

महाराष्ट्र व हरीतक्रांती –

महाराष्ट्रात हरीतक्रांती यशस्वी करणारे – वसंतराव नाईक
महाराष्ट्रात हरीतक्रांती घडवून आणणारे पीक – ज्वारी
१ जुलै १९८९ पासून वसंतराव नाईक यांचा जन्मदिन राज्यात कृषीदिन म्हणून साजरा करतात.
भारताच्या कृषी उत्पादनात महाराष्ट्रात वाटा घटत आहे.
महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत तुटीचे राज्य असून २० % अन्नधान्य आयात करावे लागते.
महाराष्ट्रात हरीत क्रांती यशस्वी न होण्याचे कारण – जलसिंचनाचा अपुरा पुरवठा

हरितक्रांतीचे फायदे –१) अन्नधान्य उत्पादनात देश स्वयंपुर्ण झाला .

२)दर हेक्टरी उत्पादनात वाढ. ३)शेती किफायशीर झाली.

४)परकीय चलनाची बचत.

हरितक्रांतीवर आक्षेप१) फक्त गहू व भाताच्या उत्पादनातील क्रांती २) आर्थिक विषमतेत वाढ ३) जमिनी नापीक झाल्या.

भारतात दुसरी हरीतक्रांती झाली – १९८३-८४

भारतात तिसरी हरीतक्रांती – सप्तरंगी क्रांती – १) हरीत २) नील ३) श्वेत ४) धवल ५) तपकीरी ६) पीत ७) कृष्णक्रांती

अन्नधान्य उत्पादन –

भारत महाराष्ट्र

१) १९५१-५१ दशलक्ष टन १) १९७७-७८- १०.५ लाख टन

२) २००७-०८ २३०.०८ दशलक्ष टन २) २००७-०८ – १५.४ दशलक्ष टन

३) २००८-०९ २३३.८८ दशलक्ष टन ३) २००८-०९ -११.७ दशलक्ष टन

देशाच्या अन्नधान्य उत्पादनात राज्यांचा वाटा – १) उत्तरप्रदेश – २०.४% २) पंजाब – ११.१% ३) म. प्रदेश – ९.९% ४) बिहार – ७% ५) महाराष्ट्र – ६.९%

भारतात अन्नधान्याची सर्वाधिक दरडोई उपलब्धता – पंजाब (१०३१.६ किलो)
भारतात अन्नधान्याची दरडोई सर्वात कमी उपलब्धता – दिल्ली (२.८ किलो), केरळ (२४.२ किलो)
महाराष्ट्रातील अन्नधान्याखाली सर्वाधिक क्षेत्र असणारे जिल्हे – अहमदनगर, पुणे, परभणी इ.

विविध उत्पादनातील क्रांती

अन्नधान्य उत्पादनात झालेली प्रचंड वाढ – हरीतक्रांती

मत्स्य उत्पादनात झालेली क्रांती – निलक्रांती

दुग्धोत्पादनात झालेली वाढ – धवलक्रांती

कापुस व रेशीम उत्पादनातील क्रांती – श्वेतक्रांती

फळे, तेलबिया व अंडी उत्पादनातील क्रांती – पितक्रांती

झिंगा उत्पादनातील क्रांती – गुलाबी क्रांती

कोको उत्पादनातील क्रांती – ब्राउन क्रांती

खाद्यतेल उत्पादनात वाढ करण्यासाठी कार्यक्रम – ऑपरेशन गोल्डन फ्लो

दुध उत्पादनात वाढ होण्यासाठी कार्यक्रम – ऑपरेशन फ्लड (दुधाचा महापुर)

हरीत क्रांती यशस्वी होण्यासाठी आवश्यक घटक

संकरीत बियाणे, रासायनिक खते व जलसिंचन
बियाणे

बियाणे

१) बियाणे

बियाणे विकासाचे नवे धोरण – १९४८
राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे स्थापना (NCP) – १९६३
संसदेने बियाणे कायदा पास केला – १९६६
१९६८ मध्ये बियाणे अधिनियम तयार झाला. जाने १९७३ मध्ये हा कायदा देशभर लागू केला.
१९६९ मध्ये भारतीय राज्य कृषी महामंडळाची (SFCI) स्थापना झाली. देशात सध्या १३ राज्य बियाणे महामंडळ आहेत.
बियाणे
National Seeds Training Centre – Varanasi
जागतिक बँकेच्या मदतीने अकोला येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची (महाबीज) स्थापना झाली – २८ एप्रिल १९७६
बीज परीक्षणाची पहिली प्रयोगशाळा सुरू करणारा देश – जर्मनी
राज्यातील बीज तपासणी प्रयोग शाळा – १) नाशिक २) पुणे ३) नागपुर ४) औरंगाबाद ५) अकोला ६) परभणी

बीज प्रक्रिया – बीजप्रक्रियेमुळे बियानण्याची उगवणक्षमता वाढते. पेरणीस सुलभता होते.

रोग किडीपासून संरक्षण मिळते, उत्पादनात वाढ होउन प्रत सुधारते.

कपाशीची पेरणी सुलभ होण्यासाठी बीजप्रक्रिया करतात – सल्फ्युरिक ऍसिडची.
बाजरी आणि भाताचे रोगट बियाणे बाहेर काढण्यासाठी व बाजरीतील अरगट, भातावरील करपा, कडा करपा नष्ट करण्यासाठी बीज प्रक्रिया – मिठाच्या द्रावणात बुडविणे.
बटाटयाची सुप्तावस्था २ ते ३ महिने अगोदरच संपविण्यासाठी बटाटयाचे काप बुडवितात – १% थाइ ‘युरियात
कोबीवर्गीय भाजीपाल्याच्या बियाण्यास काळीकुज व अल्टरनेरिया रोगास प्रतिबंध करण्यासाठी बीजप्रक्रिया – उष्णजल प्रक्रिया
उष्णजल प्रक्रियेसाठी बियाणे ४९ अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात ५ मिनीटे बुडवितात.

अ.क्र पीक रोग तापमान (अंशC) बुडविण्याचा काळ
१)

२)

३)

४)

५)
गहू

बार्ली

फ्लॉवर/ काकडी

वांगी, कोबी, टोमॅटो

उस

चाबूक, काणी
काळी

काळी

बुरशी

बुरशी

गवताळ वाढ

खुजा रोग
५४

५२

५०

५०

५०
१० मिनीटे

१३ मिनीटे

२० मिनीटे

२८ मिनीटे

२ तास

टोमॅटोवरील मोझॅकचे नियंत्रण करण्यासाठी थंडजल प्रक्रिया करतात.
गहू व बालीच्या मोकळ्या काणीच्या नियंत्रणासाठी बियाणे पोत्यात सैल बांधून १५ ते २२ अंश सिल्सिअस तापमानाच्या पाण्यात ४ तास भिजवतात.
द्विदल वर्वातील पीकाच्या बियाण्यास -हायझोबियम सारखे जीवाणू संवर्धक चोळल्यास बिजांकुरण वेगाने होते.
तसेच हेत्टरी २० ते २५ कि लो नञ वाचते.
बियाण्यात तणांच्या बिया, तुस, काडया, खडे यांचे प्रमाण २% पेक्षा जास्त असल्यास बियाणे अयोग्य समजतात.

बिजोत्पादनः–

ज्वारी व बाजरीचे बीजोत्पादन घेण्यासाठी नर व मादीचे झाडांचे प्रमाण २:४ व २:६ या प्रमाणात घेतात.

उती संवर्धन (टिश्यू कल्चर) – सजिवांच्या पेशी, उती किंवा अवयव निजंर्तुक माध्यमावर काचपात्रात प्रयोग शाळेत योग्य तापमान व प्रकाश देउन वाढविणे व रोपे तयार करण्यास उतीसंवर्धन म्हणतात.

फायदे –

१) सुक्ष्म अग्रांकूर संवर्धनाद्वारे मातृवनस्पती सारखीच गुणधर्म असलेली प्रजा थोडया कालावधीत मोठया प्रमाणावर तयार होते.

२) रोपे एकाच वेळी परिपक्व होतात व रोगमुक्त असतात. उदा – अ) केळी व उसाचे रोपे एकाच तयार करण्यासाठी उती संवर्धनाचा वापर करतात ब) हरीतगृहात लागवडीस योग्य जरबेरा, आर्कीड, ऍन्थुरीयम इ. फुलझाडांच्या अभिवृध्दीसाठी उती संवर्धनाचा वापर करतात.

३) उसाची कांडीपासून एकशाकीय लागवड केल्यास काणी, लाल्या, गवताळवाढ, मोझेक सारखे रोग पुढील पिढीत जातात हे उती संवर्धनात टाळता येते व हजारो हेक्टर क्षेत्रात उत्पादन घेता येते.

जैव तंत्रज्ञान – सजिवांच्या पेशीमध्ये अनुवंशीय बदल घडवून त्यांची कार्यक्षमता वाढविणे. मानवी उपयोगाचे पदार्थ मिळविण्याच्या शास्त्राला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. जैवतंत्रज्ञानाच्या रेणूविय जैवशास्त्र व अनुवांशिकी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाद्वारे बदल घडवून अधिक उत्पन्न घेता येते. यामुळे अधिक उत्पन्न देणा-या अधिक पोषक द्रव्य असणा-या रोग प्रतिबंधक व दुष्काळ प्रतिकारक्षम पीकांच्या जाती निर्माण करता येतील.

उदा – मॉन्सेन्टो या बहूराष्ट्रीय अमेरिकन कंपनीने बी. टी (बॅसिलस थुरिजेनसिस) नावाचे कापसाचे बियाणे विकसित केले असून त्यात बोंड अळीचा नाश करणारे बॅसिलस थुरिजेनसिसचे जीवाणूचे जनुक समाविष्ट केले आहे. त्यामुळे औषधावर होणारा हजारो कोटी रूपयांचा खर्च वाचणार आहे व उत्पादनात ३०% वाढ होणार आहे. या बियाण्याच्या व्यापारी तत्वावरील लागवडीस २३ मार्च २००२ रोजी केंद्रीय पर्यावरण व वन मंञालयाच्या अखत्यारित जनुकीय अभियांत्रिकी समितीने मंजुरी दिली. याला महाराष्ट्रात सहाकार्य महिकोचे आहे.बी.टी.कॉटनच्या जाती – मेक १२,मेक १६२ मेक १८४ इ.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने २००२ मध्ये प्रसारीत केलेले वाण

१) पंचवटी (NIDW-15) – हा गव्हाचा वाण, N- ५९ पेक्षा २५% जास्त उत्पादन

२) फुले हरीत (JB-16) – ही भरीतासाठी योग्य असणारी जास्त उत्पादनक्षम वांग्याची जात आहे.

३) कृष्णा पान (DPB-6) – कमी तिखट व फिक्कट हिरव्या रंगाचे पानवेल

४) फुले प्रेरणा – (GKGL-42) – ग्लॅडिओलसची लवकर येणारी व फुलदाणीत १० दिवस टिकणारी जात

२)टर्मिनेटर जीन – या तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या बियाण्यामुळे उत्पन्नात प्रचंड वाढ होणार असून जेव्हा पीकाचे उत्पन्न येईल व ते पिकाचे उत्पादन बियाणे म्हणून वापरल्यास नवीन उत्पन्न झाडापासून अन्नधान्य मिळणार नाही. तसेच परागिभवनामुळे इतर पिकांवरही त्याचा दुष्पपरिणाम होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतक-यांना दरवर्षी बहुराष्ट्रीय कंपन्याकडून बियाणे विकत घ्यावे लागेल. त्यामुळे या तंत्रज्ञानाला जगात सर्वत विरोध होत आहे.

२)पीक संरक्षण –

राष्ट्रीय पीक संरक्षण संस्था – हैद्राबाद
हिंदुस्थान इन्सेक्टीसाईडची स्थापना – १९५४
हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल लिमिटेडची स्थापना – १९६०

वनस्पतीवर पडणारे रोग –

कारण होणारे रोग

१) कवक – काजळी, तांबेरा (रस्ट), भूरी, अरगट, वादी, डिंक्या, काणी, केवडा (डावूनी मिल्डयू), टिका इ.

२) जीवाणू – खै-या / सायट्रस कँकर [ लिंबू ], मर (विल्ट) [ तंबाखू ], भाजीपाला सडणे, कापसाच्या पानावरील काळे ठिपके, जीवाणू करपा इ.

३) विषाणू – गवत्या (उस), घेवडा, भेंडी, टोमॅटोवरील ठिपके, पपईची पाने पिवळी पडणे, केळीवरील शेंडे झुपका (बंची टॉप) , उसावरील केवडा (मोझॅक) गवताळ वाढ (ग्रासी शुट), बोकडया, मिरचीचा चुरडामुरडा, भेंडीचा केवडा, मोसंबीचा डायबॅक (सलरोग) इ.

डी.डी,टी नावाचे पहिले किटक १९३९ मध्ये स्वित्झरलंडमध्ये तयार करण्यात आले.
पीकांवरील किटकांची संख्या वाढून जेव्हा ती आर्थिक सीमा गाठते तेव्हा त्यास किड म्हणतात.
किड नाशके ही व्यापक संकल्पना असून त्यात किटक नाशकांचा समावेश होतो.
किटकनाशकात असणा-या क्रियाशील घटकांचे प्रमाण – ९० %
किटकनाशकात भूकटीच्या रुपात असणारे क्रियाशील घटक – १०%
पाण्यात मिसळणा-या भूकटीत असणारे क्रियाशील घटक – २० ते २५ %
पाण्यात विरघळण्या-या किटकनाशकांना म्हणतात. इमल्शन कॉन्सेन्ट्रेटर (EC)स
साठविलेल्या धान्यात ओलावा १० % च्या जवळपास ठेवल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

पीक रोग /कीड किटकनाशके/ औषधे
बाजरी

भात

गहू

भूईमुग
गोसावी, केवडा

रागी बुरशी, करपा

तांबेरा

टिक्का व तांबेरा
मेटॅलॅक्झिन एमझेड एमझेड – ७२

बोर्डोमिश्रण (ताम्रयुक्त)

मॅन्कोझेब

गंधक किंवा मॅन्कोझेब

१८७४ मध्ये आफ्रीकेतील मादागास्कर मधून भारतात आलेली, १९९३ मध्ये औरंगाबाद व १९९८ मधये नाशिक व २००१ मध्ये कोपरगावला पोहचलेली गोगलगाय – राक्षसी शंखी गोगलगय (आफ्रीकन स्नेल)

जैविक कीड नियंत्रण

भारत सरकारने राज्य सरकारच्या सहाय्याने १९९४ मध्ये भात व कपाशीच्या कीड नियंत्रणासाठी सुरू केलेला कार्यक्रम – एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रम .
निसर्गातील ९८% किडीचे नियंत्रण नैसर्गिक रित्याच होत असते.
किडींचे परोपकारी अथवा परीभक्षी किटक किंवा अन्य प्राणी आणि रोगजंतुचा वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली नियमित करणे म्हणजे जैविककिड नियंत्रण होय.
ज्वारी, बाजरी, हरभरा, तुर, कपाशी, सुर्यफुल यावरील किटकनाशकांस दाद न देणा-या घाटेअळी (हेलीकोव्हरपा) चा न्युक्लिओ पॉली हायड्रॉसिस व्हायरस (NPV) मुळे आपोआप नाश होतो.
कडधान्ये, तृणधान्ये, गळीतधान्ये कापुस यावरील घाटेअळी ठिबक्याचे बोंडअळी व शेंदरी बोंडअळी यांचे पतंग पकडण्यासाठी सापळा – फे रोमोन सापळे (लिंग प्रलोभन)
नर फळमाशांना सापळयात अडकविण्यासाठी रसायन – मिथील युरेनॉल
अळी नियंत्रानासाठी विषाणू – हेलीकोव्हरपा, स्पोडोप्टेरा इ.
किड नियंत्रणासाठी परोपजीवी किटक – ट्रयकोग्रामा, परभक्षी किटक – क्रायसोपरला
कोबी,टमाटे. वांगी, कापुस, सोयाबीन यावरील पतंग वर्गातील अळयांच्या नियंत्रणासाठी जीवाणू – बॅसिलस थुरिजेनसिस
उस, ज्वारी, मका व भात यावरील खोडकिडयाच्या नियंत्रणासाठी जैविक घटक – ट्रायकोग्रामास्पेसिज
सर्व पिकांवरील मावा, तुडतुडे, फुलकिडे, किडिची अंडी, लहान अळया, पिल्ले यांच्या नियंत्रणासाठी जैविक घटक - क्रायसोपर्ला कार्निया
सर्वच पिकांवर पडणा-या मर व मुळ कुजव्या रोग इ. बुरशीजन्य रोगांवर परजीवी पध्दतीने जगणारा व रोग नियंत्रणासाठी घटक - ट्रायकोडर्मा व पेसिलोमायसिन
पिकांवरील सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी पिकांत आफ्रिकन अथवा फ्रेंच झेंडूचे मिश्र पीक घ्यावे. झेंडूच्या मुळातील रसायनात सुत्रकृती नाशकाचे गुणधर्म असतात.
केवडा, करपा रोगावर उअयुक्त बोर्डो मिश्रणे तयार करण्याची पध्दत – १०० लि. पाणी, १ किलो चुना व १ किलो मोरचुद
पेशी अंतर्गत कार्य करणारी बुरशीनाशके – ऑक्झॅथीन, बेनोमिल, माफॉलीन, काबैन्डेझीम इ.
लिंबू, द्राक्षे, टोमॅटो, कापूस यावरील अणूजीवजन्य रोगावरील प्रतिजैवक-

स्ट्रेप्टोसायक्लीन

विषाणू किटकामार्फत होणारा प्रसार सर्वप्रथम शोधला – तकामी (१९०१)
परिभाषिक शब्द-बटाट्यातील पोकळपणा – हॅलोहर्ट रोग, शेंडे मर – डायबॅक, डिंक्या रोग – गम्मॉसिस इ.
खते :–
वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी मुलद्रव्ये – २०
शेतीसाठी शेणखत वापरण्याची सुचना करणारा शास्ञज्ञ – झायनोफोन
पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्याची गरज असते असे १८७० मध्ये सांगणारा शास्त्रज्ञ – लायबीग
पीकांना १६ अन्नद्रव्यांची नितांत आवश्यकता असते असे सिध्द करणारा शास्त्रज्ञ – अरनॉन
कृत्रिमरित्या युरिया तयारा करणारा शास्त्रज्ञ – फेड्रिक व्होलर (१८२८)
युरोपमध्ये १९०५ साली नत्र खताचा व १९११ साली जर्मनी येथे स्फुरद खताचा पहिला कारखाना सुरू झाला.
भारतातील पहिला खत प्रकल्प – सिंद्री (झारखंड) (१९५१)
भारतात उत्पादनासाठी ९ राष्ट्रीय महामंडळे आहेत.
खतांसंबधी भारताचा नविन कायदा (नियंत्रण आदेश जारी) – १९८५
देशात खतांसंबंधी नियंत्रण ठेवणा-या ४३ प्रयोगशाळा असून गाझियाबाद हे मध्यवर्ती केंद्र आहे. तर मुंबई, कलकत्ता, चेन्नई येथे निभागीय केंद्र आहेत.
भारतातील ८०% खतांचा वापर भात, गहू व उस या पीकांसाठी करतात.
नत्र खताच्या निर्मितीत भारताचा जगात क्रमांक – तिसरा (२००४)
राज्यातील रासायनिक खत नियंत्रण प्रयोगशाळा – १) पुणे २) नाशिक ३) औरंगाबाद ४) अमरावती
आशिया खंडातील सर्वत मोठा अमोनिया प्लॅट – थळवायशेत (रायगड)

खत वापर:-

महाराष्ट्र (१९३०) १ लाख टन (२०००-२००३) १८.१ लाख टन

भारत (१९५०) ७० हजार टन (१९९९-२०००) १८०.७ लाख टन (२००३-०४) १७५ ला. टन

जगाचा दर हेक्टरी खत वापर – १०० किलो.
जगात जपानचा दर हेक्टरी खत वापर – २५० किलो’
भारताचा दर हेक्टरी खत वापर – ८७.५६ किलो
पंजाबचा दर हेक्टरी खत वापर – १६३.३५ किलो
भारतात खताचा दर हेक्टरी सर्वाधिक वापर – आंध्रप्रदेश (१७९.२० किलो)
भारतात सर्वात कमी खत वापर – सिक्कीम (७.६ किलो)
महाराष्ट्राचा दर हेक्टरी खत वापर – ७५.७३ किलो
राज्याचा खत वापराचा उतरता क्रम – नत्र, स्फुरद, पालाश.

खते देण्याच्या पध्दती :-

१) फेकून देणे २) पट्टा पध्दत ३) इंजेक्शन पध्दत ४) गोळी करून (भातासाठी) ५) बियांना चोळून ६) फवा-याद्वारे खत देण्यास फोलिअरऍप्लिकेशन अशी संज्ञ आहे.
ओलीताच्या पाण्याबरोबर खते देण्यास संज्ञा – फर्टिगेशन
खतांचा वापर योग्य होतो की नाही हे पाहण्यासाठी वापरतात – रेडिओ फॉस्फ रस
जमिनीची सुपीकता ठरविण्याची आधुनिक पध्दत – कार्बन, नायट्रोजन गुणोत्तर
भारतीय जमिनीचे कार्बन – नायट्रोजन जन (C : N) गुणोत्तर सरासरी पेक्षा कमी आहे. – १४
पीकांच्या योग्य वाढीसाठी नत्र स्फुरद व पालाशचा संतुलीत वापर – ४:२:१
पीकांच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक – नायट्रोजन (नत्र)
वनस्पतीच्या पोषणासाठी आवश्यक अन्नद्रव्ये – १) नायट्रोजन ५० ते ६०% २) पोटॅशियम १० ते २०% ३) सल्फर १० ते २०%
जमिनीत हेक्टरी ५६ किलो स्फुरद आवश्यक असते. कमी असल्यास हेक्टरी २२.५ किलो ची मात्रा देतात.
केळी, बटाटा, टोकॅटो, फुलकोची यांना पालाशची जास्त गरज असते.

खताचे प्रकार

सेंद्रिय खते रासायनिक खते जैविक खते

नञयुक्त (N) स्फुरद (P) पालाश (K) संयुक्त

१) सिंद्रिय खते – ही खते वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांपासून मिळतात.

अ) भरखते – यात पोषकद्रव्ये कमी असतात. ही खते सावकाश लाहगू पडतात. या खतांमुळे जमिनीचा पोत व

जलधारण क्षमता वाढते. उदा – शेणखत, कंपोस्ट खत इ.

ब) जोरखते – यात पोषणद्रव्ये जास्त असतात. उदा – सर्व पेंडी, हाडांचा चुरा, मासळीखत इ.

निसर्गशेतीचा (सेंद्रीय शेतीचा) जनक – मसानाबू फुफुओका (जपान) यांनी वन स्ट्रॉनिव्होल्यूशन हे पुस्तक लिहिले, निसर्गशेतीची तत्वे – १) जमिनीची मशागत न करणे २) रासानिक असेंद्रिय खते न वापरणे ३) तणनाशक न वापरणे
आम्लयुक्त जमिनीत भातासाठी उपयुक्त हिरवळीचे खत – धैंचा, ग्लिरीसिडीचा इ.स
आम्लारीयुक्त जमिनीसाठी उपयुक्त हिरवळीचे खत – सुबाभळीची पाने
शेतीत तयार होणारे सेंद्रीय पदार्थ शास्त्रीय पध्दतीने जीवाणूंच्या साहाय्याने कुजवून तयार होणारे खत – कंपोस्ट खत
कंपोस्ट खत तयार करण्याची बंगळूर पध्दत विकसित केली – डॉ. सी. एन. आचार्य
जनावरांपासून मिळणा-या मलमुत्रापैकी कोंबडीच्या विष्टेत सर्वाधिक नत्र, स्फुरद व चुना असतो.
सर्वाधिक नत्र स्थिर करणारे हिरवळीचे खत हेक्टरी – हरभरा (१२० कि), ताग (९० कि) सोयाबीन (९० कि)

सेंद्रिय खतातील प्रमुख अन्नद्रव्यांचे प्रमाण
खताचे नाव अन्नद्रव्यांचे प्रमाण (टक्के)
नत्र स्फुरद पालाश
१) शेणखत

२) लेंडीखत

३) कंपोस्ट खत

४) सोनखत

५) भूईमुग पेंड

६) सरकी पेंड

७) एरंडी पेंड

८) लिंबोळी पेंड

९) हाडचुरा

१०) मासळी खत
०.८० ०.६५ १.००

०.६० ०.५० ०.७०

०.५० ०.६५ ०.८८

१.३० १.१० ०.३५

७.१० १.४० १.३०

६.४० २.८० २.५०

४.५० १.७० ०.७०

५.०० १.०० १.५०

३.५० २१.५० -

४.१० ०.९० ०.३०

२) रासायनिक खते –

मुख्य अन्नद्रव्ये – १) नत्रखते-

अमाईडच्या स्वरूपात नत्र पुरविणारे खत – युरिया
नायट्रेटच्या स्वरूपात नत्र शोषणा-या वनस्पती – टोमॅटो, सेलेरी इ.
आमोनियाच्या आयन स्वरूपात नत्र शोषणा-या वनस्पती – भात
अमोनिया शुभ्र पांढ-या स्फ्टीकरूपाचा असून पिकांना त्वरीत लागू पडतो व तिच्याव्दारे नाश नाही.
कोणत्याही स्वरूपातील नत्र शोषणा-या वनस्पती – बटाटा,शुगरबीट, अननस इ.
पीकांच्या उत्तम वाढीसाठी नायट्रेट व आमोनियाचे प्रमाण – ८०:२०
पीकांच्या उत्तम वाढीसाठी हेक्टरी आवश्यक बोरॉन व मॉलिब्लेंडम – ३० ग्रॅम व ३ ग्रॅम
फ्लॉवरवर ब्राउनिंग हा रोग बोरॉनच्या कमतरतेमुळे येतो.
हरीतद्रव्यातील महत्वाचा अन्न घटक – मॅग्नेशियम
वनस्पतीतील पेशी व पानांची वाढ होण्यासाठी आवश्यक घटक – मॅग्नेशियम व कॅल्शियम
वनस्पतीत स्टार्च मिर्मितीसाठी आवश्यक घटक – पोटॅशिअम
वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक घटक – गंधक व लोह
नत्र– हरीतद्रव्य निर्मिती, पालवीला हिरवा रंग येतो
स्फुरद – वनस्पतीचे श्वसन, वाढ उत्पत्तीत महत्वाचे कार्य ,जोमदार वाढ .
पालाश – मुळात रोग कीड,थंडीपासून प्रतिकार क्षमता वाढते.
गंधक – पानात हरितद्रव्य तयार करणे,तेलबियात तेलाचे प्रमान वाढवणे,

द्विदल मुळात गाठी तयार करणे.

कॅल्शिअम – पेशींची वाढ ,पेशी विभाजन, पेशींना बळकटी इ.
मॅग्नेशिअम – हरितद्रव्याचा महत्वाचा घटक (१५ ते २०%) प्रकाश संश्लेषणात सहभागी.
जस्त – हरितद्रव्य निर्मितीस सहाय्य, स्टार्च निर्मितीशी संबंधीत.
तांबे – अ जीवनसत्व तयार करणे.
बोरॉन – नवीन पेशींची वाढ, परागसिंचन, परागणात वाढ करणे.
मॅगनिज – नत्र संचयन आणि वितंचकांना चालना देणे. सिंथेसिस, संश्लेषण
सिलीकॉन – झाडे टनक बनतात, लोळत नाही, रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
तांब्याच्या अभावी समर डायबॅक.
बोरॉन – याच्या अभावी होणारे रोग-शुगरबीट, रताळी (कँकर), लिंबावर डिंक्यू इ.

प्रमुख अन्नद्रव्ये पुरविणारी खते
खताचे नाव अन्नद्रव्यांचे प्रमाण (टक्के)
नञ स्फुरद ऑक्साईट पालाश ऑक्साईट
नत्रयुक्त खते

१) अमोनियम सल्फेट

२) कॅल्शियम अमोनियम नायट्रेट

३) अमोनियम सल्फेट नायट्रेट

४) युरिया स्फुरद युक्त खते

१) सिंगल सुपर फॉस्फेट

२) ट्रिपल सुपर फॉस्फेट

३) डायकॅल्शियम फॉस्फेट

पालाशयुक्त खते

१) म्युरेट ऑफ पोटॅश

२) सल्फेट ऑफ पोटॅश

संयुक्त खते

१) नायट्रो फोस्फेट

२) नायट्रो फोस्फेट (पोटॅशसह)

३) मोनो अमोनियम फॉस्फेट

४) डाय अमोनियम फॉस्फेट

कृषी विकास

सुफला

महाधन

भगिरथ

युरमफॉस
२०.६

२५.०

२६०.

४६.०

-

-

-

-

-

२०.०

१५.०

११.०

१८.०

१५

१५

२३

१८

२८
-

-

-

१६.०

४२.५

२६.०

-

-

२०.०

१५.०

५५.०

४६.०

०५

१५

२३

१८

२८
-

-

-

-

-

-

५८.०

४८.०

-

१५.०

-

-

०५

१५

००

१०

००

सुक्ष्म अन्नद्रव्ये पुरविणारी खते
खताचे नाव अन्नद्रव्य शेकडा प्रमाण
१) फेरस स्लफेट

२) अमोनियम फेरस सल्फेट

३) मॅगनिज सल्फेट

४) बोरॅक्स

५) बोरीक ऍसिड

६) अमोनियम मॉलिब्लेंट

७) कॉपर सल्फेट

८) झिंक सल्फेट
लोह

लोह

मंगल

बोरॉन

बोरॉन

मॉलिब्डेनम

तांबे

जस्त
२०.००

१४.००

२४.३०

११.००

१७.००

५४.००

२५.००

२२.००

अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे व त्यावरील उपाय
अन्नद्रव्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे व उपाय
१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)
नत्र

स्फूरद

पालाश

लोह

बोरॉन

जस्त

मंगल

मॉलिब्डेनम

तांबे

गंधक
झाडाची पाने पिवळी होतात, मुळाची व झाडांची वाढ थांबते १% युरियाची फवारणी करावी.

पाने हिरवट लांबट होउन वाढ खुंटते, पानाची मागील बाजू जांभळट होते. १% डायअमोनियम फॉस्फेटची फवारणी करावी.

पानांच्या कडा तांबटसर होउन पानावर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखूड होउन शेंडे गळून पडतात. ५% सल्फेट ऑफ पोटॅशची फवारणी करावी.

शेंडयाकडील पानांच्या शिरामधील भाग हिराकसची अथवा फेरस पिवळा होतो व झाडांची वाढ खुंटते. अर्धा ते १% अमोनियम सल्फेटची फवारणी करावी.

झाडाचा शेंडा व कोवळी पाने पांढरट होवून मरतात. पानावर सुरकत्या पडून पिवळे चट्टे पडतात. अर्धाग्रॅम बोरॅक्स १०० लि. पाण्यातून फवारणे.

पाने लहान होउन शिरामधील भाग पिवळा होतो व पाने ठिकठिकाणी वाळलेले दिसतात. हेक्टरी २ ते १० कि. झिंक सल्फेट जमिनीतून देणे किंवा १ कि. झिंक सल्फेट १०० लि. पाण्यातून पिकावर फवारावे.

पानांच्या शिरा हिरव्या/ शिरामधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होतो. व नंतर पांढरट व करडा संपुर्ण पान फिकट पिवळसर दिसते. पानांची वाढ कमी होवून नंतर पान गळते. हेक्टरी ८/२५ कि. मॅगनीज सल्फेट जमिनीतून द्यावे किंवा १% मॅगनीज सल्फेट फवारावे.

पाने पिवळी होउन त्यावर तपकिरी ठिपके पडतात, पानाच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव स्त्रवतो. हेक्टरी पाव ते अर्धा किलो मॉली ब्लेंडम फवारावे.

झाडांच्या शेंड्याची वाढ खुंटते. झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो व खोडाची वाढ कमी होते, पाने लगेच गळतात. मोरचूद ४ ग्रॅम १ लि. पाण्यात मिसळून फवारावे.

झाडांच्या कोवळ्या पानांचा मुळ्चा हिरवा रंग कमी कमी होतो. व नंतर पाने पुर्ण पिवळी पडतात. हेक्टरी २० ते ४० कि. गंधक जमिनीतून दयावे.

३) जीवाणू खते –

ऍझॅटोबॅक्टर या जीवाणूचा १९०१ मध्ये सर्वप्रथम शोध लावणारा शास्त्रज्ञ – बायरीक – डॉ. जोहान्ना डोबेरीनर
ऍझॅटोबॅक्टर पेक्षा ऍझोस्पिरिलम जास्त नत्र स्थिरीकरण करतात असा शोध लावला – डॉ. जोदन्ना, डॉ. बेरीनर
नत्र स्थिर करणा-या जीवाणू खतास संज्ञा-जीवाणू संवर्धन / बॅक्टेरियल कल्चर किंवा बॅक्टेरियल इनाक्यूलंट.निळ्या हिरव्या शैवालातील हेट्रोसिस्ट या पेशी नत्र स्थिर करतात . हरितद्रव्यामुळे हे हिरवे दिसते तर फायकोसायनिन मुळे निळे दिसते.
नत्र स्थिर करणा-या जीवाणूस संज्ञा – नायट्रॉजन फिक्सर
पेरणीपुर्वी १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम जीवाणू खते चोळल्यास नत्राची हेक्टरी ३०% बचत होते व उत्पादनात १० ते २०% वाढ होते.
जैविक खताच्या विकासासाठी राष्ट्रीय केंद्र – गाझियाबाद (उ. प्रदेश) येथे असून नागपुर. बंगलोर, जबलपुर, हिस्सार, भूवनेश्वर व इंफाळ येथे विभागीय केंद्रे आहेत.
महाराष्ट्रात लोणेर (रायगड), इगतपुरी (नाशिक), पालशेत (रत्नागिरी), मालवण (सिंधुदुर्ग) , डमरी (नागपुर), मालडोंगरी (भंडारा), बाभोडी (चंद्रपुर), पालोरा (गडचिरोली) व राधानगरी (कोल्हापुर) इ. नउ ठिकाणी निलहरीत शैवाल निर्मितीचे केंद्रे आहेत.

जीवाणू खताचे प्रकार –

१) –हायझोबियम (सहजीवी Symbiotic) – याचे जीवाणू द्विदल (शेंगवर्गीय) वर्गीय वनस्पतीच्या मुळावर गाठी करून राहतात. हे जीवाणू अन्न वनस्पतीकडून घेतात. व हवेतील मुक्त नायट्रोजनचे स्थिरीकरण करून अमोनियाच्या रूपाने वनस्पतींना मुळावाटे पुरवितात. मुळावरील एका गाठीत लाखो जीवाणू असतात. पुर्ण वाढलेल्या गाठी लोह हिमोग्लोबीन मुळे गुलाबी दिसतात.

२) ऍझोस्पिरिलय (सह सहयोगी Associative) – हे जीवाणू तृणधान्याच्या व भाजीपाला पीकांच्या मुळामध्ये व मुळाभोवती राहून नत्र स्थिर करण्याचे कार्य करतात. हे ऍझॉटोबॅक्टर पेक्षा दिडपट ते दोनपट नञ पिकांना पुरवितात.

३) ऍझॅटोबॅक्टर (असहजीवी Non-symbiotic) – शेंगावर्गीय पीके वगळता इतर एकदल व तृणधान्यात पीकांच्या मुळाभोवती राहून असहजीवी पध्दतीने नत्र वायूचे अमोनियात रूपांतर करतात. उदा- ज्वारी, बाजरी, उस, गहू, मका, कापुस, सुर्यफुल, इ. भाजीपाला – टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, नवलकोल, कांदा, बटाटा, फळझाडे व फुलझाडे.

४) बायजेरिंकीया – (असहजीवी) – हे जीवाणू मुख्यतः आम्लधर्मी जमिनीत आढळ्तात व शेंगावर्गीय पीके वगळून एकदल व तृणधान्य पीकांसाठी वापरतात. उदा- भात.

५) निळे हिरवे शैवाल – निळे हिरवे शैवाल हे एकपेशीय किंवा फांद्यासह किंवा फांदयाविरहीत तंतू असतात. या शेवाळात ऍलोसिरा, टॉलीपोथ्रिक्स, नॉस्टॉक व ऍनाबेना यांचा समावेश होतो. निळया हिरव्या शैवालातील हेट्रोसिस्ट या पेशी नत्र स्थिर करतात. हरितद्रव्यामुळे हे हिरवे दिसते. तर फायकोयायनिन मुळे निळे दिसते. यांची वाढ भात शेतात चांगली होते. हे हेक्टरी ३० किलो वापरल्यास नत्राची २५% बचत होते.

६) अझोला – अझोला पाणवनस्पतीच्या पेशीत नेचे वर्गीय ऍनाबेना अझोली ही निळे हिरवे शैवाल सहयोगी पध्दतीने वाढते. वनस्पती अन्न तयार करते व शैवाल हवेतील नत्र स्थिर करते व अझोला त साठविते. अझोलामुळे प्रतिवर्षी प्रति हेक्टरी २० ते ४० किलो नत्र मिळू शकते. भारतात अझोलाची, अझोला पिनाटा जात सर्वत्र आढळते.

७) स्फुरद विरघळणारे जीवाणू (फॉस्फे टसोल्यूबिलायझर) –

स्फुरदमुळे कर्बयुक्त पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया जोमाने होते. पिकांच्या मुळांची जोमदार वाढ होते. जमिनीत विरघळण्यास स्फुरद खते सर्वात कठीण आहे.
पीक फॉस्फरीक ऍसिडच्या रूपाने स्फुरद घेतात.
काही जीवाणू सायट्रीक आम्ल, लॅक्टीक आम्ल, सिक्सिलीक आम्ल, फ्यूमारिक आम्ल, फॉस्फेटचे द्रवात रूपांतर करून पीकास उपलब्ध करून देतात.
रशियात अशा कृत्रिमरित्या संवर्धन केलेल्या जीवाणू फॉस्फोबॅक्टरीन असे नाव दिले.
भारतात ICAR (दिल्ली येथे) ने १९८३ पासून स्फुरद विरघळविणा-या जीवाणूंचे संशोधन सुरू केले व अशा जीवाणू खतास मायक्रोफॉस कल्चर असे नाव दिले.
स्फुरद विरघळविणारे जीवाणू – बॅसिलस, सुडोमानास, अक्रोमोबॅक्टर इ.
स्फुरद विरघळविणारे जीवाणू खते वापरल्यास उत्पन्नात होणारी वाढ – सोयाबीन व

भूईमुग – २०% , हरभरा – २३ ते ३३%, बटाटा – ६० ते ७०%

स्फुरद विरघळविणारी बुरशी – व्हिए मायकोरायझा

१) ऍस्परजीलस् २) पेनीसिलीअम ३) रायझोपस ४) स्ट्रेप्टोमायसिन

एकात्मिक तण व्यवस्थान –

तणांचा बंदोबस्त करण्यासाठी खुरपणी, कोळपणी व तणनाशकांचा वापर करतात.
द्विदल तणांसाठी तणनाशक – फेनॉक्जी (२-४-डी)
तणामुळे अन्नधान्य उत्पादनात होणारी घट – ३० ते ४०%
तण उगवण्यापुर्वीच त्याची वाढ होवू नये म्हणून प्रमाणित बी वापरणे,पीक पेरणीपुर्वीच तणांचा नायनाट करणे, पुर्ण कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत वापरणे याला म्हणतात – प्रतिबंधक उपाय
तण उगवल्यावर नायनाट करण्यासाठी यंत्राचा वापर करणे, योग्य पीक पध्दती अवलंबणे, तणनाशकाचा वापर करणे याला म्हणतात – निवारात्मक उपाय.
तणांचा बंदोबस्त करण्यासाठी एकच पध्दत न वापरता अनेक पध्दतीची सांगड घालणे – एकात्मिक तण व्यवस्थापन

कृषी संशोधन

इंडियन ऍग्रीकल्चरल इन्स्टिटयूटची स्थापना केव्हा झाली – १९०५ मध्ये पुसा येथे
१९६५ मध्ये ही संस्था दिल्लीला हलविण्यात आली व तिचे नाव भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR) असे ठेवण्यात आले.
देशात कृषी संसोधन व शिक्षण विभागाची स्थापना – १९७३
कृषी मशीन प्रशिक्षण व परिक्षण संस्था – बुदनी (म. प्रदेश), हिस्सार (हरियाणा), गारलाडिने (आंध्रप्रदेश), विश्वनाथ चरियाली (आसाम)
राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान योजना (NATP) सुरू – १९९८
केंद्रीय कृषी विद्यालय – इंफाळ
राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था – हैद्राबाद
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची स्थापना – पुणे (१९६३)
राज्यात कृषी संशोधन व कृषी शिक्षणाचे काम कृषी विद्यापीठांकडे सोपविले – १९६६
कृषी विस्ताराचे काम करण्यासाठी राज्याचा कृषी विभाग व जिल्हा परिषदांचा विकास केला – १९६६
कृषी विद्यापीठातील संशोधन प्रभावीपणे शेतक-यांपर्यत पोहचविण्यासाठी योजना – प्रशिक्षण व भेट योजना

भारतीय कृषी संशोधन संस्था – दिल्ली

भारतीय कृषी संशोधन संस्थेने सुरू केलेली वेगवेगळी संशोधन केंद्र व इतर संस्था

१) पीक प्रणाली संशोधन केंद्र मोदीपुर (मेरठ, उत्तरप्रदेश)

२) गहू संशोधन केंद्र कर्नाल हरियाणा

३) राष्ट्रीय मासेमारी अनुवांशिक संशोधन ब्युरो लखनौ

४) राष्ट्रीय पशु अनुवांशिक संशोधन ब्युरो कर्नाल

५) जैविक नियंत्रण प्रयोजना बंगलोर

६) जल प्रबंध अनुसंधान संस्था पटना

७) केंद्रीय कांदा व लसून संशोधन केद्र राजगुरू नगर(पुणे)

८) आवळा संशोधन केंद्र फैजाबाद (युपी)

९) नारळ संशोधन केद्र कासरगोड (केरळ)

१०) केंद्रीय केळी संशोधन केद्र कळांडूथोराई

११) डाळींब संशोधन केद्र सांगोला (सोलापुर)

१२) द्राक्ष संशोधन केंद्र पुणे

१३) दुध संशोधन संस्था कर्नाल

१४) बटाटा संशोधन केंद्र सिमला

१५) संत्री संशोधन केंद्र नागपुर

१६) मसाला पीके संशोधन केंद्र केरळ

१७) मेंढी व लोकर संशोधन केंद्र अंबिकानगर (गुजरात)

१८) उद्यानविद्या संशोधन केंद्र बंगलोर

१९) गवत व चारा संशोधन केंद्र झाशी

२०) लाख संशोधन केंद्र रांची (झारखंड)

२१) अखिल भारतीय उस तंत्रवैज्ञानिक संस्था कानपुर

२२) इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर

सेमी अऍरीड ट्रॉपिक्स (ICRISAT) हैद्राबाद

२३) फायबर रिसर्च स्टेशन कोईमतुर

२४) केंद्रीय मधुमाशी संशोधन केंद्र पुणे

२५) केंद्रीय अन्नधान्य तांत्रिक संशोधन संस्था नागपुर

२६) केंद्रीय उंट संशोधन केंद्र जोरबिट (बिकानेर जवळ)

२७) केंद्रीय फळ संशोधन केंद्र गणेशखिंड (पुणे)

२८) केंद्रीय अन्नधान्य महामंडळ मद्रास

२९) केंद्रीय मृदाक्षारता संशोधन केंद्र कर्नाल (हरियाणा)

३०) केंद्रीय मृदा तसेच पदार्थ संशोधन केंद्र दिल्ली

३१) केंद्रीय ताग संशोधन केंद्र बराकपुर (प. बंगाल)

३२) भारतीय मृदा विज्ञान संस्था भोपाळ

३३) भारतीय ज्वारी संशोधन केंद्र राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)

३४) भारतीय कापुस संशोधन केंद्र नागपुर

३५) तंबाखू संशोधन केंद्र राजमहेंद्री (आंध्र)

३६) सोयाबीन संशोधन केंद्र इंदोर (मध्यप्रदेश)

३७) अखिल भारतीय मका प्रकल्प विंटर नर्सरी अंबरपेठ (हैद्राबाद)

३८) समशीतोष्णीय फलोद्यान संचालनालय लखनौ

३९) मध्यवर्ती कंद पीके संशोधन संस्था (लागवड) थिरूअनंतपुरम्

४०) भारतीय फलोद्यान संस्थ हिस्सारगट्टा

४१) राष्ट्रीय काजू संशोधन केंद्र पुहूर

४२) राष्ट्रीय लिंबू वर्गीय फळे संशोधन केंद्र नागपुर

४३) राष्ट्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संशोधन केंद्र लखनौ

४४) राष्ट्रीय आळंबी (मशरूम) संशोधन केंद्र सोलन

४५) मध्येवर्ती अवर्षण विभाग संशोधन संस्था जोधपुर

४६) राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमीउपयोगिता मंडळ नागपूर

४७) राष्ट्रीय वनस्पती गुणसुञे मंडळ दिल्ली

४८) केंद्रीय उस संशोधन केंद्र लखनौ

राज्यस्तरीय संशोधन केंद्र

संशोधन केंद्र ठिकाण

१) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ पुणे

२) महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळ मुंबई

३) वॉटर अँन्ड लँड मॅनेजमेंट इन्स्टिटयूट (वॉल्मी) औरंगाबाद

४) कोरडवाहू जमिन संशोधन केंद्र सोलापुर

५) लिंबुवर्गीय फळे संशोधन केंद्र काटोल (नागपुर)

६) कांदा संशोधन केंद्र निफाड

७) गहू संशोधन केंद्र निफाड

८) गेरवा (तांबेरा) संशोधन केंद्र महाबळेश्वर

९) उस संशोधन केंद्र पाडेगाव (सातारा)

१०) प्रादेशिक उस व गुळ संशोधन केंद्र कोल्हापुर

११) सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन (रायगड)

१२) नारळ संशोधन केंद्र भाटये (रत्नागिरी)

१३) काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)

१४) आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)

१५) केळी संशोधन केंद्र यावला (सिंधुदुर्ग)

१६) तेलबिया व गळीत धान्य संशोधन केंद्र जळगाव

१७) सिताफळ संशोधन केंद्र आंबेजोगाई (बीड)

१८) मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर (अहमदनगर)

१९) पानवेल संशोधन केंद्र वडनेरभैरव (नाशिक)

डिग्रज (सांगली)

२०) भाजीपाला संशोधन केंद्र वाकवली

२१) तेडताड प्रकल्प कणकावली

२२) वनौषधी संशोधन केंद्र वडगणे – कोल्हापुर

२३) गळीत धान्य संशोधन केंद्र लातूर