Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

मंगळवार, १ मे, २०१२

वाणिज्य – अर्थव्यवस्था

वाणिज्य – अर्थव्यवस्था
भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक – आयसीआयसीआय.

भारतातील तिस-या क्रमांकाची खाजगी बँक – ऍक्सेस बँक.

इंटरनॅशनल फुड पॉलीशी रिसर्च इन्स्टिट्यूटने प्रकाशित केलेल्या जागतिक भूक निर्देशांकानुसार जगातील सर्वात जास्त कुपोषित बालके भारतात आहेत.

भारतामध्ये ४२ टक्के बालके कमी वजानाचे आहेत.

भारताच्या देशांतर्गत उत्पादनात सेवा उद्योगाचा वाटा सर्वाधिक आहे.

आशियाई विकास बँकेचे सल्लागार – अर्जून थमन.

भारताची पहिली पंचवार्षीक योजना ( १९५१ – ५२ ते १९५५ -५६ ) हि १९ अब्ज ४८कोटी रुपयांची होती. तर सध्याची ११ वी पंचवार्षिक योजना ( २००७ – २०१२ ) ही योजना सुमारे १४ लाख ४५ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आहे.

जगातील सर्वात मोठा सोने वापरणारा देश – भारत .

जगात पैशाप्रमाणे एटीएम मशीनद्वारे गोल्ड व्हेडींग मशीन जर्मनीच्या एक्स ओरिएण्ट लक्स एजी या कंपनीने विकसित केली आहे.

गोल्ड टू गो या नावाने एटीएम मशीनद्वारे सोने खरेदी जर्मनी , इटाली व स्पेन या देशात केली जाते.

भार्तात मुंबई येथे १९२० साली सोन्याचा वादये बाजार सुरु झाला.

जागातील सोन्याच्या किंमती लंडन वादये बाजारातून निश्चित केल्या जातात.

भारताचा परकीय चलन साठा मार्च २०१० साली – २८० अब्ज डॉलर एवढा होता.

कोल इंडिया लिमिटेड :

या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचे केंद्र सरकारने सुमारे १५ हजार कोटी रुपये खुल्या भांडवल विक्रीद्वारे उभारण्याचा निर्णय घेतला.

कोल इंडिया ही भारताची नवरत्न कंपनी आहे.

भारतातील सर्वात मोठा गुंतवणूकदार देश – अमेरिका.

जागातील अर्थव्यवस्थेमध्ये पहिला क्रंमाक अमेरिका , दुसरा चीम , तिसरा जपान आणि चौथा भारताचा लागतो.

भारताच्या दृष्टीने भारतातील पाचवा मोठा गुंतवणूकदार देश – जपान.

नाबार्ड बँकेच्या अहवालानुसार भारतातील सुमारे ९३ टक्के ग्रामीण जनता कर्जाच्या बोजा खाली जगते.

शांतता नोबेल पुरस्कार विजेते महंमद युनुस यांनी बांगलादेशामध्ये मायक्रो फायनानसिंग इन्स्टीट्यूशन्स ( स्वयंसेवी लघू व वित्त संस्था) च्या साह्याने बांगलादेशात ग्रामीण भागात पतपुरवठा करून महत्वपूर्ण बदल घडविले .

भारताच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नापैकी सुमारे ३७ टक्के बचत केली जाते.

भारताचा सर्वाधिक व्यापार अमेरिका सोबत होतो.

नोव्हेंबर २०१० मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेले आर्थिक धोरण

-नवीन रेपो दर – ६.२५ टक्के , रिझर्व्ह रेपो दर – ५.२५ टक्के , सीआरआर आणि बँक रेट ६ टक्के.

भारत – अमेरिका व्यापारी करार :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मुंबई येथे वीस व्यापारी करार करून सुमारे १० अब्ज अमेरिकन डॉलरचे करार केले.

त्यांनी मुंबई येथे हॉटेल ट्रायडंटमध्ये व्यापार परिषदेत संबोधित केले.

बोईंग सी – १७ ग्लोब मास्टर विमाने, स्पाइस जेट या हवाई वाहतूक कंपनी सोबत करार केले.

तेजस या विमानासाठी आणि सासण येथील ऊर्जा प्रकल्पासाठी अमेरिका मदत करेल.

महाराष्ट्राचा वाटा :

भारताच्या एकूण औद्योगिक उत्पादनात – २० टक्के वाटा आहे.

भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात १३ टक्के वाटा आहे.

महाराष्ट्राचे दरडोई राष्ट्रीय उत्पन्न – देशाच्या दरडोई राष्ट्रीय उत्पानापेक्षा ४४ टक्क्याने जास्त आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने डोअर स्टेप बँकिंग सर्व्हिस ही सेवा सुरु केली.

या सेवे अंतर्गत बँक ग्राहकांच्या घराजवळ जावून त्यांच्याकडील रोख रक्कम जमा करणे व पैशाचे वाटप करणे ही सुविधा देणार आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष – एस. श्रीधर.

भारतामध्ये होणारी थेट विदेशी गुंतवणूक

सन २००९ – १० साली भारतात सुमारे ४० टक्के थेट विदेशी गुंतवणूकीत वाढ झाली आहे.

भारतात टेली कम्युनिकेशन , बांधकाम , कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर आणि ऊर्जा या क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक झाली.

भारतात मॉरिशस , अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर , नेदरलँड व जपान या देशातून सर्वाधिक विदेशी गुंतवणूक होते.

चीनचा सप्टेंबर २०१० मध्ये आर्थिक विकास दर ९.६ टक्के होता.

देशातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक – सारस्वत बँक.

सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज , मुंबईचे अध्यक्ष – डॉ. विजय केळकर.

सिटी बँक घोटाळा :

या बँकेच्या गुडगांव ( हरियाणा) येथील शाखेत शिवराजपुरी याने सुमारे ३०० कोटीचा घोटाळा केला.

सिटी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी – भारतीय वंशीय – विक्रम पंडीत ( अमेरिका)

सिटी बँकेचे अध्यक्ष – विल्यम आर. –होडस .

सन २०१२ हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून भारत सरकारने जाहीर केले आहे.

भारतात सन २०१० मध्ये झालेल्या शेअर बाजारातील गुंतवणूकीत विदेशी वित्त संस्थांच्या गुंतवणूकीचा सर्वाधिक वाटा राहिला – ३७ अब्ज डॉलर .

ई.पी.एफ. म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड :

हा फंड नौकरदाराचा प्रत्येक महिन्याच्या पगारातून १२ टक्के रक्कम ई.पी.एफ. मध्ये जमा होते.

ई.पी.एफ. मध्ये जेवढी रक्कम नौकरदाराच्या पगारातून जमा होते तेवढीच रक्कम शासन / खाजगी संस्था जमा करतात.

या ई.पी.एफ. च्या रकमेवर ८.५ टक्के एवढे व्याज दिले जाते.

सन २०१०-११ च्या पहिल्या सहामाही मध्ये देशात होणा-या विदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर राहिले.

महाराष्ट्रात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक अमेरिकेने केलेली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे श्रीमती उषा थोरात यांच्यानंतर उपगर्व्हनर नोव्हेंबर २०१० पासून बनले – श्री. आनंद सिन्हा.

गुड्स ऍण्ड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) :

केंद्र सरकारकडून वस्तु व सेवाकरा बाबतच्या समितीचे अध्यक्ष – पश्चिम बंगालचे अर्थमंत्री डॉ. असीमदास गुप्ता.

सन २०११ -१२ च्या आर्थिक वर्षापासून म्हण्जेच १ एप्रिल २०११ पासून अंमलबजावणीत येणार आहे.

देशात सध्या असणारे व्हॅट, सेवाकर, अबकारी, कर, विक्रीवर या सर्व करांना एकत्रित करून जीएसटी कर प्रणाली अस्तित्वात येणार आहे.

हा कर सर्वसाधारण वस्तुवर २० टक्के तर जीवनावश्यक वस्तूंवर १२ टक्के आणि सेवा वरती १६ टक्के आकारला जाणार आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष – एम. व्ही. नायर

पंजाब नॅशनल बँकेचे अध्यक्ष – के.आर.कामत

भारताने सन १९९१ साली नवीन आर्थिक धोरण स्वीकारून जागतिकीकरण , उदारीकरण व खाजगीकरण स्वीकारले.

१९९१ साली भारताचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव हे होते तर अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग हे होते.

महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाने महाराष्ट्राची ११ वी पंचवार्षिक योजना २००७ -१२ दरम्यान राबविण्यास मंजूरी दिली.

सध्या महाराष्ट्र शासनावर १ लाख ८५ हजार कोटी एवढे कर्ज आहे.

इर्डाचे (IRDA)अध्यक्ष – जे. हरीनारायण

युनायटेड वेस्टर्न बँक सातारा येथे विमा महर्षी श्री. अप्पासाहेब चिरमुले यांनी स्थापन केली होती.

युनायटेड वेस्टर्न बँक आयडीबीआय बँकेमध्ये विलीन करण्यात आली.

सांगली बँक आयसीआयसीआय बँकेत विलीन करण्यात आली.

गणेश बँक फेडरल बँकेत विलीन करण्यात आली.

२०१० मध्ये युरोप खंडातील ग्रीक हा देश आर्थिक दिवाळखोरीमध्ये सापडला आहे.

एचडीएफसी बँकेचे नवे अध्यक्ष –सी.एम.वासुदेव.

अकराव्या पंचवार्षिक योजनेत म्हणजेच २००७ ते १२ या कालावधीत कृषी क्षेत्राचा आर्थिक विकासदर ४ टक्के गाठण्याचे उद्दिष्ट होते. सध्या तो २.८ टक्के आहे.

भारत सरकारने सन २००९ साली दहा रुपयाचे नाणे बाजारपेठेत टाकले आहे.

आशिया खंडातील चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था – दक्षिण कोरिया.

भारतीय रुपया या चलनाचे नवीन (र) हे चिन्ह मिळाले.

हे चिन्ह देवनागरी लिपितील ‘र’ आणि रोमन ‘आर’ यांचे मिश्रण आहे.

अमेरिकन डॉलर, ब्रिटीश पौंड व जपानी ‘येन’ प्रमाणे भारतीय रुपयालाही विशिष्ठ चिन्ह जुलै २०१० पासून देण्यात आले.

पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, व इंडोनेशिया या इत्यादी देशांचेही चलन रुपया हेच आहे, परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात विशिष्ठ चिन्ह नसल्याने गोंधळ होत होता.

या चिन्हाचे डिझाईन डी. उदयकुमार ( आयआयटी, पवई – मुंबई) या विद्यार्थ्यांने केले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियातील विलीनीकरण :

स्टेट बँक ऑफ सौराष्ट्राचे सन २००८ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियात विलिनिकरण झाले.

स्टेट बँक ऑफ इंदौरचे स्टेट बँक ऑफ इंडियात विलिनीकरण करण्यास जुलै २०१० मध्ये मान्यता केंद्र सरकारने दिली.

स्टेट बँक ऑफ इंडिया हा सात बँकांचा समूह होता परंतु इंदौर आणि सौराष्ट्र या बँकांचे विलीनीकरण झाल्याने आता पाच उपबँका शिल्लक आहेत.

शिल्लक पाच उपबँका स्टेट बँक ऑफ बिकानेर ऍण्ड जयपूर , स्टेट बँक ऑफ त्रावणकोर , स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ म्हैसूर आणि स्टेट बँक ऑफ हैद्राबाद.

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने एअरसेल टॉवर्स ही कंपनी ताब्यात घेतली.

महाराष्ट्रात ३५ जिल्ह्यात एकूण ४३,७२२ खेडी व गावे आहेत.

बचत गट या संकल्पनेचे जनक डॉ. महंमद युनुस ( बांगलादेश) यांना ओळखले जाते.

महाराष्ट्रात सध्या २ लाख १० हजार एवढे बचत गट आहेत.

भारताची आर्थिक व व्यापारी राजधानी – मुंबई.

मुंबई मधून भारताच्या तिजोरीत एकूण कस्टम ड्युटीपैकी ६० टक्के , ४० टक्के आयकर, २० टक्के केंद्रीय अबकारी कर जमा होतो.

भारतातील निर्यातदारांची शिखर संस्था – फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन .

महाराष्ट्राने वाढत्या लोकसंख्येवर उपाययोजना करता यावी म्हणून ९ मे २००० रोजी राज्य लोकसंख्या धोरण जाहिर केले.

देशात सर्वाधिक नागरी लोकसंख्या = तामिळनाडू ४४ टक्के , तर दुसरा क्रमांक महाराष्ट्र ४२.४ टक्के

देशात सर्वात कमी दरडोई उत्पन्न बिहारचे आहे.

देशात सर्वाधिक दारिद्रय ओरिसा राज्यात आहे.

सर्वाधिक मोठे राज्य : राजस्थान तर सर्वाधिक लहान राज्य गोवा आहे.

केंद्राकडून अनुदान :

केंद्राकडून सर्वाधिक अनुदान मिळणारे राज्य : उत्तर प्रदेश

सध्या जगात सर्वाधिक परकीय गंगाजळी = चीनकड आहे .

परकिय गंगाजळीत जगात दुसरा क्रमांक = जपान .

यूरोप खंडातील सर्वात मोठी/ प्रथम क्रमांकाची अर्थव्यवस्था = जर्मनी.

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे अध्यक्ष = टि. एस. विजयन

भारताचा अर्थसंकल्प २०१०-११

भारताचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत सादर केला.

नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर ऍण्ड रूरल डेव्हलपमेंट ( नाबार्ड ) चे अध्यक्ष – राकेश सिंग .

१२ वी पंचवार्षिक योजने सन २०१२ ते २०१७ दरम्यान राबविली जाणार आहे.

अमेरिकेत सोन्याचे भाव ठरविणारा बाजार – कॉमेक्स बाजार ( न्युयॉर्क )

भारतात सोन्याचे भाव ठरविणारा बाजार – बुलियन मार्केट (मुंबई)

अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड सन २००७ तो २०१२ हा असून या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट सर्व समावेशक विकास हे आहे

अमेरिकेतील सर्वात मोठी बँक = सिटी बँक

हाँककाँग अँड शांघाई बँकींग कॉर्पोरेशन (HSBC) या जगातील मोठ्या बँकेने रॉयल बँक ऑफ स्कॉटलँड (RBS) या बँकेच्या भारत , चीन व मलेशियातील शाखा ताब्यात घेतल्या

भारतातील सर्वात मोठी विदेशी बँक = सिटी बँक, दुसरा क्रमांक –स्टँडर्ड चार्टर्ड बँक

भारतात दारिद्रयरेषेखालील लोकसंख्या दिवसेंदिवस घटत आहे.

भारतातील सर्वात मोठा शेअर बाजार : नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुंबई. (NSE)

बँक ऑफ बडोदा ही देशातील तिस-या क्रमांकाची सर्वात मोठी बँक आहे.

बँक अध्यक्ष : एम.डी. मल्ल्या.

देशात सर्वात जास्त पॅनकार्ड भारकांची संख्या असणारे राज्य : महाराष्ट्र

नॅशनल पेमेंन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अध्यक्षपदी निवड : इन्फोसिस प्रमुख एम.आर. नारायण मुर्ती

भारत दरडोई राष्ट्रीय उत्पन्न : २५,७१६ रुपये

महाराष्ट्र दरडोई राष्ट्रीय उत्पन्न : ३७,०८१ रुपये

IDBI बँक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक : श्री . संजय शर्मा

UTI म्युच्युअल फंड अध्यक्ष : यू.के. सिन्हा.

६ वा वेतन आयोग महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचा-यांना लागू :

१ जानेवारी २००६ पासुन केंद्र सरकार प्रमाणेच लागू केला.

निर्देशांक :

जपानमधील टोकिओच्या शेअर बाराच्या निर्देशांकास निक्केई म्हणतात.

भारतातील मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकास सेन्सेक्स तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकास निफ्टी म्हणतात.

रेपो रेट म्हणजे काय : व्यापारी / वाणिज्य बँका त्यांना आवश्यक असलेले अल्पमुदतीचे कर्ज ज्या दराने रिझर्व्ह बँकेकडून मिळवितात त्याला रोपो रेट म्हणतात.

रिर्व्हस रेपो रेट म्हणजे काय : रिझर्व्ह बँक व्यापारी बँकाकडून ज्या दराने कर्जाची उचल करते त्याला ‘रिव्हर्स रेपो रेट’ असे म्हणतात.

सीआरआर : म्हणजे वाणिज्य बँकानी रिझर्व्ह बँकेकडे राखून ठेवायचा निधी.

केंद्र सरकारच्या मिशन क्लिन गंगा प्रकल्पास जागतिक बँक कर्ज देणार आहे.

सध्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा : शेती = १७%

उद्योग – २९% , सेवाक्षेत्र = ५५%

भारतात बेकारीचे प्रमाण – ७.५ %आहे.

१३ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. विजय केळकर यांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कडे ३० डिसेंबर २००९ रोजी अहवाल सादर केला.

देशात सर्वात जास्त कर्ज वाटप करणारी बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

अमेरिका पाकिस्तानला दरवर्षी किती आर्थिक मदत करते : १.५ अब्ज डॉलर.

देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक (ICICI) ही आहे.

देशात १ एप्रिल २०१० पासून पॅन कार्डचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

अर्थमंत्रालयचे मुख्य आर्थिक सल्लागार - कौशीक बसू हे आहेत.

ICICI बँक अध्यक्ष : श्रीमती चंदा कोचर

डॉ. डी. सुब्बाराव = सध्या RBI चे २२ वे गव्हर्नर आहेत.

श्रीमती उषा मेहता, श्री. के.सी. चक्रवर्ती , श्यामलाल गोपीनाथ , सुधीर

गोकर्ण = उपगर्व्हनर हे भार्तीय रिझर्व्ह बँक (R.B.I).

चलन :

भारत –रूपया , पाकिस्तान – रूपया ,

दक्षिण आफ्रिका – रँड , चीन – युवान ,

इंग्लंड = पौंड , जपान – येन ,

सौदी अरेबिया वकतार – रियाल , अमेरिका – डॉलर,

जागतिक बँक भारतातील प्रमुख = गुबर्ट नोव्हा जोसरॅड

भारतीय गुंतवणुक आयोग : सभापती = रतन टाटा

भारतीय निर्गुंतवणुक आयोग सभापती = सी.व्ही. रामकृष्ण.

११ वी पंचवार्षिक योजना ( २००७-२०१२) :

नियोजन आयोग मान्यता = १९ ऑक्टोबर २००६

अंमलबजावणी – १ एप्रिल २००७

उद्दिष्टे – कृषी , उर्जा व पायाभूत क्षेत्रांचा जलद विकास करणे.

कृषी क्षेत्राचा वार्षिक विकासदर ४ टक्के पर्यंत वाढविणे – उद्योग क्षेत्रात १२ टक्के वृध्दी करणे.

बालमृत्युदर २८ वर आणणे

महंमद युनुस = बांगला देशी ग्रामीण बँक संस्थापक

मुंबई शेअर बाजार जगातील ३ रा मोठा शेअर बाजार आहे.

भारतात ४७ विदेशी बँका व ७३१ गुंतवणूक संस्था चालू आहेत.

महाराष्ट्राचा आर्थिक विकास दर १० टक्के पेक्षा जास्त आहे. म्हणजेच भारताच्या आर्थिक विकास दर पेक्षा जास्त आहे.

भारत = २००१ जनगणना

हि १४ वी जनगणना होती.

जनगणना प्रती १० वर्षाला होते.

केंद्रीय जनगणना आयुक्त = जयंकर बांठीया होते.

ब्रीदवाक्य : पीपल आरिएंटल.

एकूण लोकसंख्या होती : १०२ कोटी ७० लाख.

भारत सर्वात जास्त लोकसंख्या राज्य : उत्तर प्रदेश ( १६.७० कोटी )

भारत सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम – ५.४० लाख

भारताची एकुण साक्षरता = ६५.३८ टक्के.

पुरुष साक्षरता = ७५.८५ टक्के.

स्त्री साक्षरता = ५४.३० टक्के.

स्त्री – पुरुष (लिंग गुणोत्तर) = १०००: ९३३

लोकसंख्या घनता – प्रति चौ.किमी. = ३२४ लोक

देशातील ग्रामीण लोकसंख्या = ७२.२० टक्के.

देशातील शहरी लोकसंख्या = २७.८० टक्के.

सर्वात जास्त लोकसंख्या घनता राज्य = पश्चिम बंगाल = प्रति चौ. कि.मी. ९०४ लोक

सर्वात कमी लोकसंख्या घनता राज्य = अरुणाचल प्रदेश = प्रति चौ.कि .मी. = १३ लोक

सर्वात जास्त लिंग गुणोत्तर = दर हजारी पुरुष – १००० : १०८९ = महिला = केरळ

भारतात सरासरी पुरुष आयुर्मान ६६.४ वर्ष व महिला आयुर्मान ६७.९ वर्ष आहे.

भारतात ज्येष्ठ नागरिक लोकसंख्या ९.२५ कोटी तर महाराष्ट्रात ८५ लाख आहे.

सर्वात कमी लिंग गुणोत्तर राज्य = दर हजारी पुरुष = १००० : ८६१ महिला

= हरियाणा

सर्वात जास्त लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश = दिल्ली

सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश = लक्षव्दिप

दशवार्षिक (१९९१-२००१) सर्वात जास्त लोकसंख्या वाढ = नागालँड

दशवार्षिक (१९९१-२००१ ) सर्वात कमी लोकसंख्या वाढ = केरळ

सर्वाधिक साक्षरता असणारे राज्य : केरळ

सर्वात कमी साक्षरता असणारे राज्य = बिहार

देशात सर्वात जास्त स्त्री साक्षरता ( ८७.८६ टक्के) असणारे राज्य = केरळ

देशात सर्वात कमी स्त्री साक्षरता (३३.५७ टक्के) असणारे राज्य = बिहार

देश साक्षरता राज्य क्रम : १. केरळ , २.मिझोरम , ३.गोवा , ४.महाराष्ट्र

देश साक्षरता केंद्रशासित प्रदेश क्रम : १.लक्षद्विप , २.दिल्ली, ३.चंदीगढ , ४.पद्दूचेरी

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे २८.५ कोटी म्हणजे २७.७८ टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते.

देशात १० लाखांपैकी जास्त लोकसंख्या असणारी शहरे = ३५.

महाराष्ट्र = जनगणना २००१ नुसार :

लोकसंख्या ९ कोटी ६८ लाख ७८ हजार ६२७

महाराष्ट्रात एकुण साक्षरता ७२.२७% टक्के

महाराष्ट्रात एकुण पुरुष साक्षरता ८६.२७ टक्के

महाराष्ट्र एकुण स्त्री साक्षरता – ६७.१५ टक्के

महाराष्ट्र लिंग गुणोत्तर – १०००:९२२

महाराष्ट्र लोकसंख्या घनता = ३१४ लोक प्रति चौ.कि.मी.

महाराष्ट्र साक्षरता देशात क्रमांक = ४ था

महाराष्ट्र लोकसंख्येत देशात क्रमांक = २ रा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा