Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

मंगळवार, १ मे, २०१२

फलोत्पादन


फलोत्पादन

उद्यान विद्या शास्त्र (Horticulture)

१) फळ लागवड शास्त्र (Pomology)

२) भाजीपाला शास्त्र (Olericulture)

३) फुलशेती शेती शास्त्र (Floriculture)

जगातील सर्वाधिक फलोत्पादन करणारा देश – १) चीन २) भारत
भारतातील प्रमुख फळपिकांखाली क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा वाटा – द्राक्ष ७४% संत्री ५६%, केळी १४%
देशातील फळ उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा – द्राक्षे – ६५%, केळी – ५०%,
महाराष्ट्रातील फळ पिकाखालील क्षेत्राचा उताराता क्रम आंबा – २५.१३%, संत्री १४.९७%, काजू – १२.४०%,चिकू -१२.४०% द्राक्षे – ११.९४%
महाराष्ट्रातील फलोत्पादनाचा उतारता क्रमः – १) केळी २) द्राक्ष ३) संत्री ४) चिकू ५) आंबा
देशातील एकूण फलाच्या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा – द्राक्ष – ९८%, आबा – ६५%, कांदा – ९०%, भाजीपाला – ६८%, (संदर्भ – महाराष्ट्राची आर्थिक पाहाणी – २००९-१०)
फळ पिकांच्या बाबतीत देशात आघाडीवर असणारे राज्य – महाराष्ट्र
देशातील एकूण पिकांखालील क्षेत्रापैकी फळ पिकांखालील ६.७% क्षेत्र असले तरी शेतीच्या उत्पन्नात त्याचा १८% वाटा व कृषी निर्यातीत ५२% वाटा आहे.
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ – गुरगाव (हरियाणा)
महाराष्ट्रात १९८१ मध्ये फलोत्पादन विभाग स्थापन झाले तर १९८२ मध्ये फलोत्पादन खात्याची स्थापना झाली.
१९९०-९१ पर्यत २.४२ लाख हेक्टर क्षेत्र फळ पिकांखाली होते. २१ जून १९९० पासून फलोत्पादन विकासाची रोजगार हमी योजनेशी सांगड घातली. सध्या एकूण १३.०५ लाख हेक्टर क्षेत्रफळ पिकांखाली आहे. या योजनेअंतर्गत १९ फळपिके व भाज्या आणि ४ मसाल्याची पिके येतात.
फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक लाभधारक शेतक-यांना ०.२० ते ४ हेक्टर, कोकण व प. घाटक्षेत्रासाठी ०.१० ते ४ हेक्टर, ग्रामपंचायत, विश्वस्त संस्था व सहकारी संस्था यांना जमिनीची कमाल मर्यादा १० हेक्टर आहे.
अनुसूचित जाती, जमाती व भटक्या जाती, अल्पभूधारक शेतक-यांना तसेच संस्थांना १००% अनुदान असून इतर शेतक-यांना मंजूरी खर्च १००% व साहित्य सामुग्रीवरील खर्चावर ७५% अनुदान मिळते.

अनुदानाचा उतरा क्रम – १) सिताफळ २) काजू ३) आंबा ४) मोसंबी

ताजी फळे , भाज्या व फुले निर्यातीत प्रथम क्रमांक – महाराष्ट्र
फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत शेतक-यांना चांगल्या प्रतिची रोपे मिळावी म्हणून स्थापन केलेली रोपवाटीका केंद्रे – १४०

फळ लगवडीच्या पध्दती

१) चौरस पध्दत – ही पध्दत सपाट जमिनीत बागेची आखणी, मशागत , औषध फवारणी, फळांची राखण, काढणी, झाडांची छाटणी यासाठी उपयुक्त आहे. उदा – आंबा, चिक्कू, डाळींब, पेरू इ. साठी.

२) आयताकृती – झाडांच्या रांगा एकमेकांना काटकोनात असतात. दोन ओळीतील अंतर दोन झाडातील अंतरापेक्षा जास्त असते. ही पध्दत द्राक्ष बागेसाठी उपयुक्त आहे.

३) त्रिकोणी किंवा क्विन्स पध्दत – चौरस पध्दती प्रमाणे आखणी करून चार झाडांच्या मध्ये एक झाड लावतात. यामुळे चौरस पध्दती पेक्षा दुप्पट झाडे बसतात. उदा – डाळींब, बोर, फालसा, आंबा, चिकू, नारळ इ. ची चौरस पध्दतीने लागवड करून मध्यभागी जलगतीने वाढणारे व लवकर येणारे केळी, पपई सारखे फळपिके लावतात.

४) षटकोनी पध्दत – त्रिकोणाच्या प्रत्येक टोकावर झाडे लावली जातात. चौरस पध्दतीपेक्षा १५% झाडे जास्त बसतात.

५) समपातळीतील पध्दत (कंटूर) – डोंगर उतार, लहानमोठया टेकड्या किंवा जास्त उताराच्या जमिनीच्या जमिनीच्या भागात ९०अंशाचा कोन करून फळ झाडांची लागवड करतात. यात दोन ओळीतील अंतर सारखे नसते. उदा – काजू, आंबा, चारोळी, फणस, जांभूळ इ.

फळ झाडांची अभिवृध्दी

फळ झाड

फळ झाड

अभिवृध्दी म्हणजे बियांपासून किंवा वनस्पतीच्या अवयवांपासून प्रजोत्पादन करणे होय.

१) बियांपासून अभिवृध्दी (Sexual Propogation) – पदार्थ, कागदी लिंबू, जांभूळ, आंबा इ.

२) शाखीय अभिवृध्दी – झाडाचे अवयव वापरू न अभिवृध्दी करतात. यामुळे फळझाडाचे मूळ गुणधर्म जसेच्या तसे नवीन तयार होणा-या झाडांत उतरतात.

छटे प्रकार – अ) खोड छाटे – केळी, ब) पान छाट क) मुळ छाटे

कलमाचे प्रकार – १) दाब कलम २) गुटी कलम ३) खुंटी कलम ४) भेट कलम

१) दाब कलम –

a) काब कलम – यात फांदी मातीत काबून त्यावर वजन ठेवतात. उदा – चिक्कू, डाळींब, पेरू इ.

b) शेंडे कलम – शेंडे कलमात मातृवृक्षाचा शेंडा जमिनीत दाबतात. त्यात मुळया फुटून नवीन वृक्ष तयार गोतो. उदा – ब्लॅक बेरी, गुजबेरी, रासबेरी इ.

c) सर्पाकृती कलम – यात मातृवृक्षाची फांदी २-३ ठिकाणी गाडतात.

२) गुटी कलम – मातृवृक्षाच्या फांदीची २.५ ते ३ सेमी साल काढून त्याभोवती ओलसर शेवाळ गूंडाळून वरून पॉलिथीन लपेटतात. उदा – डाळींब , पेरू,

३) भेट कलम – यात त्याच जातीच्या झाडाच्या खुंटावर पाहिजे त्या जातीचे कलम करतात.

याचे प्रकार – a) पाचर कलम – सफरचंद b) कोय कलम – आंबा c) खाच कलम – आंबा d) ब्रीज ग्राफ्टींग – आंबा, संत्री e) मुळ कलम – सफरचंद

४) माउंट दाब कलम – मातृवृक्ष जमिनीपासून थोड्या उंचीवर कापल्यामुळे मातृवृक्षाच्या खोडातून धुमारे बाहेर पडतात. धुमा-यांना मुळया फुटलेल्या असतात. यापासून नवीन रोप तयार होते. उदा – सफरचंद, पेरू इ.

डोळे भरून अभिवृध्दी – खुंटावर हव्या त्या जातीचे डोळे भरून अभिवृध्दी करतात.

१) शिल्ड किंवा T पध्दत – Tआकाराचा छेद घेवून डोळा भरतात उदा – संत्री, मोसंबी, बोर, गुलाब, सिताफळ

२) ठिगळ पध्दत – खुंटाची चौकोनी साल काढून तेथे त्याच आकाराचा डोळा भरतात.

३) रिंग पध्दत – खुंटावरील संपुर्ण साल रिंगसारखी काढून डोळा असणारी रिंग त्यात बसवावी व पॉलिथीनने घट्ट बांधावे. काही काळाने डोळ्यातून फांदी फुटते. उदा – बोर

४) फ्ल्यूट पध्दत – ठिगळ पध्दती प्रमाणेच करतात.

५) चीप पध्दत – जेथून डोळा काढता येत नाही अशा वेळी खुंटावर सालीखालून लाकडात छेद घेवून साल अलग करतात व त्याच पध्दतीने डोळा भरतात

६) फोरकट पध्दत –उदा.आंबा

संप्रेरके (Hormones)

संप्रेरके वनस्पतीतील विविध जीव रासायनिक क्रियांचे सुसुत्रण करतात. काही संप्रेरके वाढीस प्रोत्साहन देतात. तर काही वाढ रोखतात. या सर्व संप्रेरकास वृध्दी नियंत्रक म्हणतात.

प्रमुख संप्रेरके – १) ऑक्झिन्स २) जिबरेलिन्स ३) सायटोकायनिन्स ४) ऍबेसिन्स

१) ऑक्झिन्स – ही वनस्पतीचे खोड व मुळ यांच्या अग्रभागी तयार होतात. यांच्या फवारणीने पेशी लांबट होतात व झाडांची वाढ होते. उदा – इंडॉल ऍसेटीक ऍसिड (IAA) , इंडॉल ब्यूटीरीक ऍसिड (IBA), डायक्लोरोफि नॉक्सी ऍसेटीक ऍसिड (2-4-D), एनएनए, ४ सीपीए इ.

२) जिबरेलिन्स – हे वनस्पतीच्या अग्रभागी तयार होतात.तसेच जिबरेला फ्यूजिक्यूरॉय या बुरशीपासूनही तयार करतात. पेशीची लांबी बाढते. द्राक्षांच्या मण्यांचा आकार वाढतो. सिडलेस फळे तयार होतात . उदा – GA-1,3,7,22,49,59 इ.

३) सायटोकायनिन्स – यामुळे पेशी विभाजन घडून येते. उदा – कायनेटीन, प्यूनिन, ऍडेनाईन झियाटीन, पी. बी. ए

४) वृध्दी रोधके (इनहिबीटर्स) – यामुळे वनस्पतीच्या शरीरांतर्गत क्रिया कमी करणे किंवा पुर्ण थांबविल्या जातात. उदा – इथरेलमुळे फळांचा रंग वाढतो, फळे लवकर पिकतात. फळे पिकविण्यासाठी संजिवक – इथिलीन.

इतर वृध्दी रोधके – ABA, सायकोसिल, B-9, इथिलीन, BEH, फॉस्फॉन – डी इ.

बटाटयावर मॉरफॅक्टीन वृध्दीरोधक फवारल्यास रोपांची वाढ कमी होउन बटाटयाच्या कंदाचा आकार मोठा होतो.
फळझाडांमध्ये लवकर व एकाच वेळी मोहोर येण्यासाठी संजीवक फवारतात

– नॅप्थालिन ऍसिटीक ऍसिड (एनएए)

फळबाग व्यवस्थापन –

फळबाग व्यवस्थापन

फळबाग व्यवस्थापन

१)रिंगिंग, गर्डलिंग, नॉचिंग – यामध्ये झाडांची २.६ मिमि रूंद व १५ ते २० मिमि लांब साल काढून झाडाच्या खालील भागाकडे जाणा-या पिष्टमय (कार्बोहायड्रेट) पदार्थ व ऑक्सिन्सला अडथळा केला जातो.

अंजिराच्या डोळयाच्या भागाखाली नॉचिंग करतात. त्यानंतर डोळयाचे खालील भागात फांदी फुटते. त्या फांदीस फुले येतात आणि फळधारणा होते.
आंब्यास १ ते २ सेमी रूंदीची साल काढून रिंगिंग करतात. तर द्राक्षास गर्डलिंग करतात

२)बहार ट्रिटमेंट – यामध्ये बहार धरतांना फळझाडांना १ ते दिड महिना पाणीपुरवठा बंद करतात. त्यामुळे झाडांची शाखीय वाढ थांबते. वनस्पतीत कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढून डोळे फुटण्यास मदत होते. त्यानंतर बागेत खांदणी करून झाडाला मातीची भर देबून खते व पाणी देतात. उदा – संत्री, मोसंबी, लिबू,पेरू इ.

३) झाड अथवा फांद्या वाकवणे – या क्रियेमुळे शेंडयाला अन्न व ऑक्झिनचा अधिक पुरवठा होतो व सर्व फांदीस फुले येवून फळधारणा होते.

परिभाषिक शब्द –

१) प्रुनिंग – झाडाची छाटणी करणे .२) ट्रेनिंग – झाडाला वळण देणे

२) पिचिंग – शेंडा खुडणे .३) डिसबडींग – पानाच्या बगलेतील फुट काढणे

३) मिनिएचर – बुटकी झाडे यांना पाने, फुले कमी येतात व फुले झुपक्याने येतात.

आंबा (Mangifera. Indica)

आंबा

आंबा

आंब्याचे मुळस्थान मेघालयातील दामलगिरी टेकडया समजले जाते
भारत हा जगातील आंब्याचा सर्वात मोठा उत्पादक असून जागतिक आंब्याच्या उत्पादनपैकी ६६% उत्पादन भारतात होते.
ताज्या आंब्याच्या निर्यातीत भारताचा वाटा – १३%
आंबा संशोधन केंद्र- नुजिविड (विजयवाडा आंध्र प्रदेश) १९९४
आंब्याच्या एकूण निर्यातीत हापुस आंब्याचा वाटा – ८५%
व्हेनेझुएलाचा जागतिक आंबा उत्पादनात १% वाटा असून निर्यातीत ७०% वाटा आहे
भारतातील फळ पीकापैकी आंब्याखाली ३८% क्षेत्र असून फलोत्पादनात आंब्याचा २३% वाटा आहे.
भारतात आंब्याचे सर्वाधिक क्षेत्र असणारे राज्य – उत्तरप्रदेश.
भारतात आंब्याचे सर्वाधिक उत्पादन – आंध्रप्रदेश, गुजरात.
भारतीय आंब्याच्या क्षेत्रात महाराष्ट्राचा १० वा क्रमांक आहे तर उत्पादकतेत ८ वा क्रमांक आहे.
महाराष्ट्रातील आंबा उत्पादन – १) रत्नागिरी २) सिंधुदुर्ग ३) नांदेड ४) अहमदनगर ५) रायगड
हवामान – उष्ण हवामान, वार्षिक स्रासरी १२५ सेमी पर्जन्य आवश्यक असते. कडक हिवाळा व धुक्यामुळे उत्पादनावर प्रतिकुल परिणाम होतो.
जमिन – आम्लयुक्त, मध्यम व हलकी जमिन मानवते. कोकणातील जमिनीत लोहाचे प्रमाण अधिक असल्याने फळास रंग व चव चांगली येते
लागवड – ९ x९ मी. किंवा १० x १० मी. अंतरावर हेक्टरी १२१ व १०० झाडे लागतात.
मोहराच्या १% फळधारणा झाल्यास उत्पादन भरपुर होते. १% पेक्षा कमी झाल्यास आंब्याचे उत्पादन सरासरीपेक्षा कमी मिळते
अभिवृध्दी – १) कोय लावणे २) कलमे लावून – भेट कलम, कोय कलम, व्हिनिअर कलम इ.
इनसिटू पध्दत – आंब्याच्या लागवडीसाठी वापरतात. यामध्ये कायम जागी रोपे लावून त्यावर कलम करतात.
आंब्याच्या कोय कलमाची नवी पध्दत – स्टोन ग्राफ्टींग
जाती – आंब्याच्या भारतातील जाती – १०८
लंगडा, दशहरी (ज. प्रदेश) , तोतापुरी (कर्नाटक). केशर (गुजरात), निलम (द. भारत), करेल (लोणच्यासाठी प्रसिध्द – गोवा) इ.
रसासाठी आंब्याची सर्वश्रेष्ठ जात – पायरी, दुधपेठा इ.
वर्षातून २-३ वेळा मोहोत येणा-या जाती – रुमानी, निलम, अलीपसंत इ.
सर्वात मोठा परंतु अत्यंत दुर्मिळ आंबा – इनर्ना.

महाराष्ट्रासाठी शिफारस केलेल्या जाती –

१) कोकण - हापुस, पायरी, रत्ना, राजापुरी इ.

कोकणातल्या खा-या वा-यामुळे फळांचा टिकावूपणा वाढतो. जमिनीतील लोहामुळे लाल रंग येतो.

२) मराठवाडा – केशर , बैंगनपल्ली , निलम, तोतापुरी, निरंजन (मराठवाडा कृषी विद्यापीठाने शोधलेली बिनहंगामी फळे देणारी जात)

३) विदर्भ – केशर, बैंगनपल्ली, निलम, तोतापुरी, लंगडा, दशहरी, नागीन इ. विदर्भ मराठवाड्यातील फळांचा रस व लोणचे उत्तम दर्जाचे असते.

४) प. महाराष्ट्र – हापुस, पायरी, केशर, बैंगनपल्ली, निलम, तोतापुरी,वनराज, गोवा, मानकुर, बोरशा इ.

महाराष्ट्रात जास्त वापरली जाणारी स्थानिक जात – माहिम
कोकण कृषी विद्यापीठाने शोधलेल्या आंब्यांच्या नियमित फळे देणा-या जाती – देशर, रत्ना, सिंधू इ.
आंब्याच्या बिनकोयीच्या जाती – सिंधु, वेंगुर्ला इ.
कोरडवाहू भागासाठी कृषीखात्याने प्रसारीत केलेली आंब्याची जात – केशर

संकरीत जाती-

हापुस (मादी)+ निलम (नर) = रत्ना (१९८१) =- ही जात कोकण कृषी विद्यापीठाने शोधली असून यात साका तयार होत नाही. परंतु गोडी हापुस प्रमाणे नाही.
हापुस (नर)+रत्ना (मादी)= सिंधु ११७ (१९९२) – बिनकोयीची जात.
दशहरी (नर) + निलम (मादी) = आम्रपाली (बुटकी) – आसीएआरमध्ये डॉ. एम.एस.स्वामीनाथन यांनी शोधलेली जात.
आम्रपाली + जनार्दन प्रसाद = CISH-M-1
हापुस + निलम = अरका नीलकिरण
तोतापुरी+ केशर = साई सुगंध (म. फुले कृषी विद्या)
दशहरी (मादी) + निलम (नर) = मल्लीका (ICAR)
निर्यातक्षम आंबा – हिरवा, पोपटी, गुलाबी रंगाचा, गर घट्ट असणारा, किड रहित, ३००० ग्रॅम बजन असणारा, पक्वता७० ते ८०% असावी.
निर्यातक्षम जाती – हापुस, केशर, निलम इ.
हापुस – या आंब्याला फळांचा राजा म्हणतात. तर आंब्यामध्ये हापुस आंबा सर्वश्रेष्ठ ठरतो. हा रत्नागिरी (देवगड) जिल्हयात घेतला जातो. याची गोडी, स्वाद, सुगंध व टिकावूपणा आकार या सर्व बाबतीत हा आंबा अद्वितीय आहे. हापुसचा परदेशात अल्फान्सा असा अपभ्रंष झाला आहे.
हापुस आंब्याची इतर नावे – गुंडू (तामिळनाडू), पेटनाथ जाथी (तिरुनेवेल्ली), खादर (चेन्नई), कागदी हापुस (द. कॅनरा), बदामी (कर्नाटक) इ.
हापुस आंब्यात साका तयार होणे ही सर्वात मोठी विकृती आहे. तसेच ही झाडे वर्षाआड फळे देतात.
रोग व किड – भिरूड (अळी साल व खोड पोखरून आत जाते) भुरी करपा
आंब्यास बोरॉनच्या कमतरतेमुळे होणारा रोग – मालफार्मेशन
आंब्याची कायीक वाढ थांबवून मोहोर येण्यासाठी व दरवर्षी फळे घेण्यासाठी औषधे – कल्टार व पॉल्कोब्यूटाझाईम
महत्व – आंब्यात कॅरोटीन मुबलक असते. अ व क जीवनसत्व असते. कोवळया पानांचा रस जुन्या परमा रोगासाठी, कोयीचा रस मुळव्याध व कृमीसाठी तर सालीचा रस धुपणी व रक्ती मुळ व्याधीवर उपयुक्त असतो.

केळी (BN. Musa.Cavendish L.)

केळी

केळी

केळीचे मुळस्थान आसाम मानले जाते.
भारत हा जगात केळीचा सर्वात मोठा उत्पादक आहे. जगातील केळयाच्या उत्पादनात भारताचा ११% वाटा आहे.
भारतीय फळांच्या क्षेत्रात केळीचा २०% वाटा असून उत्पादनात सर्वाधिक म्हणजे ३२% वाठा आहे
भारतात केळीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य – महाराष्ट्र.
महाराष्ट्रात देशाच्या केळी क्षेत्रापैकी १४% क्षेत्र असून देशाच्या ५०% उत्पादन होते.
भारतात केळीचे सर्वाधिक दर हेक्टरी उत्पादन – १) महाराष्ट्र २) गुजरात ३) तामिळनाडू ४) आंध्रप्रदेश
महाराष्ट्रात सर्वाधिक केळीची लागवड असणारा जिल्हा – जळगाव (राज्याच्या ८०% क्षेत्र)
महाराष्ट्रातील वसई व भूसावळची केळी प्रसिध्द आहे
हवामान - हे विषुववृत्तीय झाड असल्यामुळे यास उष्ण व दमट हवामान मानवते. महाराष्ट्रात उष्ण व कोरडे हवामानातही पीक घेतात.
जमिन – हे पीक खादाड असते. त्यामुळे यास कसदार, १ मी खोलीपर्यतची सुपिक व उत्तम निच-याची जमिन लागते.
लागवड – हंगाम – १) मृग बाग – मे- जून – जास्त उत्पादन देते २) कांदे बाग – सप्टें – ऑक्टो – जास्त भाव मिळतो.
मृग बागेची लागवड १.५ ते १.५ मी अंतरावर तर कांदेबाग १.३५ ते १.३५ मी. अंतरावर करतात. यास ३ ते ४ महिने वयाचे १/२ किलो वजनाचे अनुक्रमे ४३२८ व ५४०० खुंट / मुनवे लागतात
१.५ १.५ मीटर अंतरावर हेक्टरी ४४४४ झाडांची लागवड करतात.
रोगमुक्त व मुबलक बेण्याचे उत्पादन घेण्यासाठी टिश्यु कल्चरचे तंत्र वापरतात.
आंतरपीक – केळीत पांढरा कांद घेणे उपयुक्त ठरते.

जाती –

१) बसराई (कॅव्हेंडीश) – हिला भुसावळ, खानदेशी, शेंदुर्णी नावानेही ओळखतात. ही बुटकी असल्याने देशावर उष्ण व कोरड्या वा-याला कमी प्रमाणात बळी पडते. देशातील केळी उत्पादनात हीचा ५०% पेक्षा जास्त वाटा आहे. तर महाराष्ट्रातील केळी खालील क्षेत्रापैकी ७५% पेक्षा जास्त क्षेत्र बसराई जाती खाली आहे. भरपुर गोड मोठया आकारामुळे यापासून सुकेळी बनवितात. ही जात मर (पनामा) रोगास बळी पडत नाही. परंतु पोसागड, पर्णगुच्छ या रोगांस बळी पडते तर सुत्र कृमीस कमी बळी पडते. ही जात निर्यातक्षम आहे.

२) हरिसाल (बॉम्बे ग्रीन) – ही ठेंगण्या बसराई जातीपासून निपजलेली आहे. उष्ण व दमट हवामानात ही उत्तम घड देते. त्यामुळे कोकणात उत्पादन घेतात. ही पनामा रोगास प्रतिकारक आहे. इतर नावे – बंगाली लोखंडी इ.

३) अर्धापुरी – मराठवाडयात घेतली जाते, बसराईपेक्षा सरस व उंच जात.

४) ग्रॅडनैन - उती संवर्धनासाठी उपयुक्त जात.

५) बनकेळी – स्टार्च सारखी चव, हिला वेस्ट इंडिजमध्ये आइस्क्रीम बनाना म्हणतात.

इतर जाती – सफेद वेलची, लाल केळी, राजेळी, मथेळी, राहुर्णी, पाडळसे, श्रीमंती, वहत्ता इ.

अधिक उत्पन्न देणारी परंतु सुत्रकृमी (निमॅटोडस) व इन्फोक्सियस बलोरोसिसला बळी पडणारी जात – रोबेस्टा
केळी शिजवून किंवा तळून खाण्यासाठी सुकेळी बनविण्यासठी प्रसिध्द जात – राजेळी.
चंपा, पवन, म्हैसूरी, आंबट वेलची नावाने ओळखली जाणारी जात – लाल वेलची.

रोग :–

१) शेंडा झुपका/ पर्णगुच्छ (बंची टॉप) – हा विषाणूमुळे होतो. याचा प्रसार रोगट कंद माव्यामुळे होतो. यात झाडे खुजी होतात व पाने तोकडी होतात. रोगग्रस्त झाड ऊपटून नष्ट करणे.

२) पनामा (मर) – कवकामुळे होतो.

३) पिवळा सिगाटोका (करपा) – बुरशीमुळे होतो. यासाठी कार्बेन्डॉझीम किंवा डायथेन एम – ४५ फवारणे

४) पोंगा सड (हॉर्ट रॉट)

५) काळी बोंडी (सिगार एन्ट रॉड) – कार्बेन्डॉझीम किंवा डायथेन एम- ४५ फवारणे.

६) ईर्वीनिया रॉड (हेड रॉड)

वा-यमुळे केळीची पाने फाटतात त्यामुळे बागेभोवती वारा प्रतिबंधक म्हणून शेवरी तसेच बाबू, सूरू व गिरी पुष्प या वृक्षाची लागवड करतात. तर बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेकोटी (स्मजिंग) करतात.
काढणी – केळीचा घड ८० ते १०० दिवसात काढणीस तयार होतो. फळांवरील धिरा दिशेनाशा झाल्यावर काढणी करावी. लांबच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी घड ७५% पक्व असावा. फळांच्या साठवणूकीसाठी १३ अंश सेल्सिअस तापमान योग्य आहे.
केळी पिकविणे – केळी ०.२% इथरेलच्या द्रावणात बुडवितात किंवा इथिलीन किंवा ऍसिटीलीन वायूच्या संपर्कात ठेवतात.
महत्व – केळी हे सर्वाधिक कॅलरी देणारे फळ आहे. केळीत २६.४% पिष्टमय पदार्थ असतात. केळीत ‘ब’ जीवनसत्व असते.
केळी पासून पावडर, सुकेळी, चिप्स, पल्प बनवितात. खोडापासून सुतळी कागद व स्टार्च बनवितात.

माड (नारळ) (Cocos.nucifera)

नारळ

नारळ

नारळ हया बगुवार्षिक पिकाचा प्रत्येक भाग उपयुक्त असल्याने नारळास कल्पवृक्ष म्हणतात.
जगात नारळाचे सर्वाधिक क्षेत्र असणारे देश – १) इंडोनेशिया (३२%) २) फिलिपाईन्स (२६%)
भारताचा जगाच्या नारळाच्या क्षेत्रात १५% वाटा असून उत्पादनात २६% वाटा आहे. नारळाच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो. तसेच भारत जगात नारळाच्या उपभोग व निर्यातीतही प्रथम आहे.
भारतात सर्वाधिक नारळ उत्पादन करणारे राज्य – १) केरळ (४४%) २) तामिळनाडू ३) कर्नाटक
महाराष्ट्राचा नारळाच्या लागवडीखालील क्षेत्रात ११ व क्रमांक असून उत्पादनात ७ वा क्रमांक लागतो.
नारळाची दरहेक्टरी सर्वाधिक उत्पादन क्षमता – आंध्रप्रदेश
नारळाचे प्रति हेक्टरी सर्वाधिक उत्पादन – मेक्सिको
महाराष्ट्रात नारळाचे १६००० हेक्टर क्षेत्र असून १२००० हेक्टर क्षेञ निव्वळ कोकणात आहे.
महाराष्ट्रात नारळाचे सर्वाधिक क्षेत्र असणारा जिल्हा – सिंधुदुर्ग (७८०० हेक्टर)
हवामान व जमिन – नारळास उष्ण व दमट हवामान मानवते. जमिन लाल हलकी, मुरमाड, सोडियमयुक्त
लागवड – १२ महिने वयाची , ५-६ पानांची रोपे ७.५ x ७.५ मी. अंतरावर लागवड करतात. हेक्टरी १७५ झाडे लागतात.

जाती –

१) बाणावली – या उंच जातीस भारतात प. किना-यावर वेस्ट कोस्टटॉल म्हणतात. तर कोकणात बाणावली म्हणतात. हीचे शहाळे भोपळया एवढे असते.

२) प्रताप – कोकण कृषी विद्यापेठाने भाटये नारळ संशोधन केंद्रावर (रत्नागिरी) शोधलेली जात.

३) T X D – ही जात बाणावली (उंच) व ऑरेंज डॉफ यांचा संकर आहे. ही भाटये येथील संशोधन केंद्राने महाराष्ट्रासाठी प्रमाणितकेली आहे.

४) चौघाट ऑरेंज डॉफ – ही ठेंगणी जात शहाळयासाठी सर्वोत्तम आहे.

शहाळयासाठी लवकर येणारी जात – काळी कोटी
इतर जाती –चॉथर, ठेंगणी. गंगा , बोडम, लक्षद्विप, ऑर्डिनरी (चंद्रकल्पा) इ.
नारळाच्या झाडाचे वय झाडांवरील फळांच्या संखेवरून ठरवितात. नारळाची फुले एकलिंगी असतात. नारळास वर्षातून १० वेळा बहर येतो. नारळाच्या झाडाचे आयुष्य १०० वर्ष असते.
रोग – कोंबकुज – बोर्डा मिश्रण मारणे, फळगळ, करपा, डिंक्या, मर इ.
किड – शेंडया भूंगा सोंडया भूंगा, पाने खाणारी अळी इ.
उपयुक्तता – नारळात ३५% खोबरे, २५% पाणी, २८% करवंटी व १२% सोडणे असते.
खोबरे – ताज्या खोब-यात ५० ते ५५% पाणी असते. तर वाळलेल्या खोब-यात ५ ते ६% पाणी असते. खोब-याचा उपयोग दुध, मलई मिळविण्यासाठी करतात. सुक्या खोब-यातून ६५ ते ७०% तेल मिळते. या तेलात इतर तेलापेक्षा सर्वाधिक कोलेस्ट्रॉल असते.
सोडण – काथ्या, काठ्याचा भूसा, दोरखंड, मॅट, गाद्या इ. तयार करतात.
करवंटी – कोळया तसेच वायूशोषक, पिण्याचे पाणी व वायू शुध्दीकरणासाठी विषारी वायुपासून संरक्षण मिळविण्यासाठी ऍक्टीव्हेटेड कार्बन बनवितात. करवंटीपासून आईस्क्रीम कप, बटने बनवितात.
नारळ विकास मंडळ – केरळ

कार्य – नारळाचे उत्पादन उत्पादकता वाढविणे , ज्या भागात नारळाचे उत्पादन घेतले जात नाही अशा जादा भागात

नारळाची लागवड करणे. हे मंडळ खाजगी,नोंदणीकृत नर्स-यांना अर्थसहाय्य करते.

जागतिक नारळ दिन या दिवशी साजरा करतात – २ सप्टेंबर

काजू

काजू

काजू

काजू हे मुळचे ब्राझिल मधील पीक आहे. हे पोर्तुगीजांनी भारतात आणले. काजूस फळांची राणी म्हणतात.
भारत हा जगातील सर्वात मोठा काजूचा उत्पादक असून जगातील ४०% उत्पादन भारतात होते. तर काजूच्या निर्यातीतभारताचा ५०% वाटा आहे. काजूच्या उपभोग प्रक्रियेत भारत जगात अग्रेसर आहे.
भारतात काजूचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य – महाराष्ट्र (दर हेक्टरी उत्पादन सर्वाधिक )
हवामान – उष्ण व समशीतोष्ण हवामान मानवते.
लागवड – ६ ते ८ आठवडयाचे रोपे ७ X ७ मी. अंतरावर लावतात.
जाती :– अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी सुधारीत जाती – वेंगुर्ला- १,२,३,४,५,
अणूसर – १ – या जातीपासून निवड पध्दतीने तयार केलेली जात – वेंगुर्ला- १
वेंगुर्ला – १ वेतोर – ५६ या जातीपासून संकर निर्माण केलेली जात – वेंगुर्ला- ३
मिदनापुर लाल व वेतोर – ५६ या जातीपासून संकर निर्माण केलेली जात – वेंगुर्ला – ४
अणूसर लवकर आणि म्हैसूर काटेकार यांचा संकर – वेंगुर्ला- ५
काजूची नविन जात – वेंगुर्ला- ८
किड – टी मॉक्लिटो (ढेंग्याना) ही सर्वात घातक किड आहे.
उपयुक्तता – काजूच दाण्यात प्रथिने, ब व क जीवनसत्वे मुबलक असतात. काजूपासून अल्कोहोल तयार करतात. काजूच्या कवचात.CNCL तेल असते. यास परदेशात मागणी असते. ते बोटीस लावण्यासाठी व कोळयांच्या जाळयास लावण्यासाठी वापरतात.
काजू ही डॉलर अर्निंग क्रॉप आहे.

पोफळी (सुपारी) (Areca.cafechy)

सुपारी

सुपारी

हे मुळ भारतीय झाड असून यास बीटलनट म्हणतात. सुपारीत अरेकोलीन अल्काईन असते.
महराष्ट्रात रायगड जिल्हयात श्रीवर्धन येथे सुपारी संशोधन केंद्र आहे.
भारतातील सुपारीचे ९०% क्षेत्र केरळ व आसाममध्ये आहे
सुपारीची लागवड उष्णकटिबंधीय हवामानात २.७ X २.७ मी अंतरावर करतात.
जाती – पांढरा रंग, मऊ व गोड असणारी सुपारीची जात – श्रीवर्धन रोठा
सुपारीची सर्वोत्तम जात - हासा
लाल सुपारीच्या जाती – राझी व गोटी
इतर जाती – मंगला, श्रीवर्धन, अंदमान १ व ४, बेट, चिकणी, व्हीटीएल – ३,११ व १७ इ.

चिकू (Achras.sapota)

चिकू

चिकू

चिकू हे मुळचे मेक्सिको देशातील फळझाड असून त्यास उष्ण व आर्द्र हवामान मानवते. हे किडमुक्त फलझड असून वर्षभर फळ देते.
चिकूची अभिवृध्दी गुटी, भेट आणि मृदुकाष्ठ कलमाने करतात.
भेट कलम खिरणी किंवा रायन खुंटावर करतात. दोन झाडांतील अंतर १०X१० मी असते.
अंडाकृती असणारी महाराष्ट्रातील प्रसिध्द चिकूची जात – कालीपत्ती
इतर जाती – छत्री, क्रिकेट बॉल, बंगलोर, Co-1,2 पिवळी पत्ती, पाला, वनतेन, बेला, दिवाणी, किर्ती भारती इ.
निर्यतक्षम फळ – वजन २०० ते ३०० ग्रॅम. रंग – तपकिरी, पक्वता – ७५ ते ८०%, TSS २०% हून जास्त असावे
महाराष्ट्रात ठाणे जिल्हयातील डहाणू व घोलवड लागवड व उत्पादनासाठी प्रसिध्द आहे.

पपई (Carican. Papaya)

पपई

पपई

पपई हे मुळचे अमेरिकन झाड असून १६ व्या शतकात मलाक्का देशातून भारतात आले.
भारतातील फळांच्या उत्पादनात पपईचा ५ वा क्रमांक लागतो.
भारतातील पपई खालील क्षेत्रापैकी ३% क्षेत्र व ५% उत्पादन महाराष्ट्रात होते. पपई उत्पादनात महाराष्ट्राचा ८ वा क्रमांक लागतो.
पपईची सर्वाधिक लागवड केली जाणारा जिल्हा :– वर्धा
जमिन व हवामान – पपईस उत्तम निच-याची व मध्यम खोलीची जमिन लागते पपईस उष्ण व दमट हवामान मानवते. कडाक्याची थंडी व धुके हानिकारक ठरते. जेवढे तापमान अधिक तेवढी फळांची गोडी वाढते.
लागवड – रोपे बियांपासून तयार करून १.८० मी. x१.८० मी. ते x २.४० मी. २.४० मी. अंतरावर करतात. नर व मादी झाडे लहानपणी ओळखता येत नसल्यामुळे तीन झाडे लावतात.
जाती – महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर लागवड केली जाणारी,नारंगी गराची व चांगल्या वासाची बुटकी जात – वॉशिंग्टन
तामिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारीत केलेल्या जाती – को – २,३,४,५,६,इ.
उभयलिंगी फुले असणा-या पपईच्या जाती – पुसा डिलीसिअस, पुसा मॅजेस्टी, को-३, सनराईज सोलो (डिस्को), सुपर डिस्को डिलीसिअस इ.
इतर जाती – को-६ (बुटकी), कुर्ग हनी, हनीडयू (बुटकी), तैवाण, मधूबिंदू, सिलेक्शन – ७, पुसा जायंट इ.
उभयलिंगी फुले नसणा-या बागेत १६% नर झाडे ठेवावी लागतात. पपईच्या बुंध्याजवळ बुरशीमुळे बुंधा सडतो.
महत्व – पपईच्या फळात विविध गुणधर्म असतात. बध्दकोष्ठता, अपचन, मुळव्याध, यकृत, प्लिहा, त्वचा व डोळयांच्या विकारावर पपई गुणकारी ठरते. पपईच्या फलापासून जाम. जेली, नेक्टर, कॉफी, तयार करतात.
पपईच्या ७० ते ७५ दिवसाच्या हिरव्या फळापासून पेपेन (चीक) काढतात. झाडापासून ८०० ग्रॅम चिक मिळतो. याचा उपयोग बेकरीत बिस्कीटे मउ करण्यासाठी, टुटी फ्रुटी तयार करण्यासाठी, बियरच्या कारखान्यात, कातडी कमाविण्यासाठी करतात
पेपेनसाठी चांगली जात – को – २

द्राक्षे (Vitis. Veniters)

द्राक्ष

द्राक्ष

द्राक्ष हे मुळचे अर्मेनियातील पीक आहे. भारताची द्राक्ष उत्पादकता जागतिक सरासरीहून अधिक आहे.
महाराष्ट्र हे द्राक्ष पिकविणा-या राज्यांत अग्रेसर असून भारतातील द्राक्ष लागवडीपैकी ७४% क्षेत्र व ६५% उत्पादन महाराष्ट्रात होते.
महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीसाठी प्रसिध्द जिल्हे – नाशिक (राज्याच्या ५०% क्षेत्र), तसगाव (सांगली), जुन्नर (पुणे), साक्री (धुळे)
द्राक्षे निर्यातीसाठी सहकारी क्षेत्रातील संस्था, जी शेतक-यांना शीत गोदामे उपलब्ध करून देते व युरोपियन बाजार द्राक्ष विक्रीसाठी पाठवते – महाग्रेप
हवामान – कोरडे व स्वच्छ हवामान, फळे तयार होतांना उष्ण व कोरडे हवामान व निरभ्र आकाश असावे.
जमिन – मध्यम व सुपीक, उत्तम निच-याची, कमी चुनखडी युक्त असावी, सामू ६.५ ते ८.५ च्या दरम्यान असावा
लागवड – हंगाम – १) जुन- जुलै २) डिसें. त जाने.

जाती – बेदाणा, मद्य व रस निर्मितीसाठी – थॉमसन सिडलेस, तास – ए- गणेश, सोनाका, शरद सिडलेस , माणिक चमन इ.

जागतिक बाजारपेठेत निर्यातीसाठी उत्तम जाती – थॉमसन सिडलेस , तास – ए – गणेश इ.
थॉमसन या जातीपासून तासगाव (सांगली) येथे निवड पध्दतीने शोधलेली जात – तास – ए- गणेश
द्राक्षाचे संकरीत वाण – अर्का कांचन,ब्लॅक चंदा, पांढरी साहेबी इ.
वर्षातून दोन बेळा उत्पन्न देणारी द्राक्षाची जात – अर्का शाम.
द्राक्षासाठी क्षार प्रतिबंधक खुंट – डॉगरीज, एस ओ – ४, १६१६ – सी, १६१३- सी इ.
पाण्याचा ताण सहन करणारे खुंट – एसओ – ४,९९ –आर, डाँगरीज, सेंटजॉर्ज, १६१३ – सी इ.
करपा रोगास प्रतिकारक्षम खुंट – बंगलोर ब्ल्यू, सेंट जॉर्ज इ.
लागवडी अंतर – थॉमसन सिडलेस, शरद सिडलेस, सोनाका, भोकरी गुलाबी, काळी साहेबी, चिमासाहेबी, तास – ए- गणेश इ. साठी ३ मी x १.५ मी. अंतर. हेक्टरी या अंतरावर २२२२ वेली लागतात.
वळण देणे – द्राक्षाचे झाड सव्वापाच फुट उंचीचे झाल्यावर शेंडा खूडतात. मांडव पध्दत, वाय पध्दत, टी पध्दत ,डब्ल्यू पध्दत, टेलिफोन पध्दत इ. पध्दतींनी वेलींना वळन देतात.
छाटणी – एप्रिलमध्ये खरड छाटणी करतात. तर ऑक्टोबर मध्ये गोडी छाटणी करतात.
खते – हेक्टरी NPK – 900 : 500 : 700 दोन छाटणीत विभागून द्यावे.
संजिवकाचा वापर – थॉमसन सिडलेसच्या मण्यांचा आकार वाढविण्यासाठी जिब्रॅलिक ऍसिडचा वापर करतात.
फूलो-यात असतांना – १० ते २० ppm, २५% टोप्या उडाल्यावर – २० ppm, ५० % टोप्या उडाल्यावर २० ppm, ७५% टोप्या उडाल्यावर – २० ppm, फळधारणा झाल्यावर – ४०% ppm चा फवारा द्यावा.

रोग व कीड
रोग / कीड उपाय
केवडा (डावनी मिल्डयू)

जिवाणी करपा

उडदया, भूंगेरे

फूलकिडे (थ्रिप्स्)

भूरी

पिठया ढेकून (मिलीबग)

फांदी मर, द्राक्ष कूज

कोळी (माईटस्)
बोर्डोमिश्रण / ताम्रयुक्त औषध

बोर्डोमिश्रण / ताम्रयुक्त औषध

मॅलेथिऑन, डायमेथीएट

मोनोक्रोटोफॉस

गंधक फवारणी

मॅलेथिऑन

डायफॉलेटॉन

डायमेथोएट

द्राक्षातील विकृती-

१) इममीफि केशन ही विकृती द्राक्षात आढळ्ते. यात घडाच्या शेंडयाकडील भागावर सुरकुतलेले आणि लांबट मणी तयार होतात २) बांझ फुटी ३) शॉट बेरीज – घडातील मणी लहानमोठे असणे ४) पिंक बेरीज – द्राक्षाचे मणी गुलाबी रंगाचे होतात.

हँड रिफ्रॅ क्टोमिटरच्या सहाय्याने द्राक्षातील घटक तपासून विद्राव्य घटक (TSS) १८ ते २२ च्या दरम्यान असल्यास काढणी करावी
निर्यातक्षम द्राक्षे – मण्यांची संख्या १२५ ते १५०.
मण्यांचा आकार - १६ ते २२ मि. मी.
घडाचे वजन – ४०० ते ६०० ग्रॅम,
विद्राव्य घटक -१८ ते २२ %
मण्यांचे वजन - ३ ते ४ ग्रॅम
रंग - हिरवट पोपटी

मण्यात औषधाचा अंश नसावा द्राक्षे डागरहीत, किड व रोग रहीत असावे.

ब्रिक्स निर्देशांक – १९ ते २८,

आवश्यक साखर - १५ ते १६%,

पॅकिंग – पँकिंगमध्ये ग्रेपकार्ड वापरतात. त्यावर सल्फरडाय ऑक्साईट हे बुरशीनाशक असते.
द्राक्षापासून मणूके तयार करण्यासाठी सोडीयम हायड्रॉक्साईड वापरतात. १ क्विंटल द्राक्षापासून २५ ते ३० किलो मनुके मिळतात. मनुक्यासाठी द्राक्षात २२ ते २४% साखर असावी
वाईन – द्राक्षरस आंबवून वाईन तयार करतात. वाईनमधील पॉलीफीनॉल या घटक द्रव्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते. यातील क्षार व जीवनसत्वामुळे शक्ती मिळते. अल्कोहोल मध्ये अन्नघटक जास्त विरघळतात व अन्नाची गोडी वाढते.
जगातील ९०% द्राक्ष वाईन निर्मितीसाठी वापरतात. यासाठी रसाचा ब्रिक्स निर्देशांक २३ व आम्लता ०.७% असावी. त्यात ०.०५% डायअमोनियम हायड्रोजन फॉस्फेट टाकतात. हे मिश्रण ७० अंश सेल्सिअस तापमानावर ३० मिनीटे ठेवतात. थंड झाल्यावर त्यात २% सॅक्रोमायसिन सिरिव्हीसी हे कल्चर घालून आंबविण्यास ठेवतात. ४ ते ५ दिवसात ९ ते १०% आल्कोल तयार होउन आंबविण्याची क्रिया पुर्ण होते.

अननस (Ananas. Comosus)

अननस

अननस

अननसाचे अगम स्थान मानले जाते – ब्राझील
अननस हे उष्णकटिबंधीय फळ असून त्यात अ, ब, क जीवनसत्वे तसेच लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस याचे प्रमाण भरपूर असते. अननसाच्या ताज्या रसात ब्रोनेग्री हा पदार्थ भरपूर असतो.
अननसाला ५.५ ते ६ PHअसणारी वालूकामय पोयटयाची जमीन मानवते.
जाती – गेटकी, राणी, रेड स्पॅनिश, सिंगापूर, जायंट,क्यू मॉरिशस, स्मूथ, अलेक्झांड्रा, जलधुप इ.

अंजीर (Ficus. Caeica)

अंजीर

अंजीर

हे मुळचे काबुलचे असून यास समशीतोष्ण हवामान मानवते. पुणे जिल्हयात पुरंदर येथील हवामानात मोठया प्रमाणावर घेतात. (राजेवाडी)
जाती – ऑस्ट्रेलिया किंवा कॉमन या प्रकारची उत्कृष्ट जात – पुना अंजीर
इतर जाती – मार्शेल, काबूल, बंगलोर, लखनौ, ब्राउन, तुर्की, दिनकर,दौलताबाद, स्मिरना इ.

स्ट्रॉबेरी

स्टॉबेरी

स्टॉबेरी

स्ट्रॉबेरीला हलकी मुरमाड जमीन , १६ ते २५ अंश सेल्शिअस पर्यत तापमान असावे
स्ट्रोबेरीची अभिवृध्दी धावत्या खोदापासून करतात. ३० x ६० सेमी अंतरावर १५ ऑगस्टच्या दरम्यान करतात.
जाती – चँडलर, सेल्वा, सीस्केप, ऑस्ट्रेलियन, मॅन्झीम, बंगलोर, स्थानिक इ.

पेरू

पेरु

पेरु

पेरू हे मुळचे अमेरिकेतील झाड आहे. भारतात उत्तर प्रदेशात पेरूचे सर्वाधिक उत्पादन होते. तर सरासरी उत्पादनात गुजरात व मध्यप्रदेश अग्रेसर आहे. भारतातील फळपिकांपैकी पेरूखाली असणारे क्षेत्र – ६ ते ७%
महाराष्ट्रात पेरूचे सर्वाधिक क्षेत्र असणारा जिल्हा – नाशिक.
हवामान – कोरडया व उष्ण हवामानाच्या प्रदेशात जेथे हिवाळयात थंडी जास्त असते तेथे उत्पादन व गुणवत्ता चांगली असते. सतत पाउस व दमट हवामानामुळे देवी रोग होतो.
जाती :–

१) सरदार (लखनौ – ४९) – ही अधिक उत्पन्न देणारी व चांगल्या प्रतीची असून महाराष्ट्रासाठी शिफारस केलेली जात आहे. हीची महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर लागवड होते. ही जात डॉ. जी. एस. चिमा यांनी १९२७ मध्ये प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथे अलाहाबाद सफेदा जातीपासून निवड पध्दतीने शोधली आहे. याची झाडे आडवी वाढतात. डॉ. चिमा यांच्या गौरवार्थ १९६९ मध्ये यांचे सरदार असे नामकरण केले.

२) नाशिक – ही जात उंच व सरळ वाढते. फळे बाटलीच्या आकाराची असतात.

इतर जाती- ढोलका (गुजरात) ऍपल कलर, बेहत कोकोनट, सिडलेस, दस्ती, नागपूर सिडलेस इ.

३) संकरीत जाती – सफेद जाम, कोहीर सफेद, मृदुला इ.

लागवड – कलमाद्वारे अभिवृध्दी करून ६ x६ मी. अंतरावर लागवड करतात.
बहार – झाडांना विश्रांती देण्यासाठी पाण्याचा देतात. मृग, हस्त व आंबे बहार हे तीन बहार घेतात.
उत्पादन – वयाच्या ८ व्या वर्षानंतर एका झाडांपासून वर्षाला १००० ते १५०० फळे मिळतात.
महत्व –पेरूला उष्णकटिबंधीय सफरचंद म्हणतात. पेरूत क जीवनसत्ब असते तसेच पेक्टीन भरपुर असते. त्यामुळे पेरूपासून जेली, पुडींग, आईस्क्रीम, सरबत तयार करतात.
फणसाच्या जाती – कापा, बारका, रूद्राक्षी, मुंगापोर इ.
लिचीच्या जाती – शाही, रोझा, सेटेंड, चायना, देशी, देहरा रोज, अर्ली सिडलेस, कसबा, मंदराजी इ.

लिंबूवर्गीय फळे

संत्री, मोसंबी, लिंबू, पपनस, ग्रेपफ्रुट इ.

संत्री (Catrus. reticulatat)

संत्री

संत्री

जगात संत्री उत्पादनात अग्रेसर देश – १) अमेरिका २) मेक्सिको
आशिया हे संत्रीचे मुळ स्थान आहे. नागपूरची संत्री जगात प्रसिध्द आहे. लिंबूवर्गीय फळ लागवडीत देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो.
भारतात सर्वाधिक संत्रीचे उत्पादन – १) महाराष्ट्रा २) कर्नाटक ३) पंजाब
संत्रीला चांगल्या निच-याची जमीन, कोरडी हवा मानवते.
लागवड – संत्री, मोसंबीसाठी रंगपुर लिंबू, मारमाडेल ऑरेंज, रफ लेमन, क्लिओपात्रा, मॅडरीन या खुंटावर डोळा भरलेली कलम वापरतात. लागवड ६ x ६ मी अंतरावर करतात.

जाती – नागपूर संत्रा, किन्नो संत्री, कुर्ग खासी, मुदखेड सिडलेस, किंग (जपान)

जागतिक पातळीवर मागणी असणारी संञ्यांची जात – सातमुसा, क्लेमेंटाईन
परागिभवनाशिवाय फळ मागणी असणारीसंत्र्यांची जात – सातमुसा, स्लेमेंटाईन
परागिभवनाशिवाय फळ धारणा होणारी संत्र्यांची जात – मुदखेड सिडलेस
बी नसलेली संत्र्यांची उत्तम जात – नागपूर – १८२
परसबागेसाठी संत्र्यांची उत्तम जात – हनी
बहार – १) आंबेबहार – जानेवारी – फेब्रुवारी २) मृगबहार – जुन – जुलै
बहार घेण्यासाठी संत्री, मोसंबी, डाळींब व पेरु यांना पाणी तोडून (बंद करुन) ताण दिला जातो. त्यास बहार ट्रिटमेंट म्हणतात.

रोग :–

१) डिंक्या (गमॉसिस) – हा लिंबूवर्गीय फळांवर पडणारा महत्वाचा बुरशीजन्य रोग असून खोडातून डिंकासारखा द्रव स्त्रवतो. हा रोग फांयटोप्थोरा बुरशीमुळे होतो. उपाय – बोर्डोपेस्ट चोळणे.

२) डायबॅक (आरोहन) – झाडे शेंडयापासून खाली सुकत जातात. उत्पादन कमी होते.

मुळकुज, शेंडेमर, डिंक्या, बुडकुज या बुरशीजन्य रोगावर रिडोमिल किंवा ऍलिट हे बुरशीजनक फवारावे.
आशिया खंडातील संत्र्याची मोठी बाजारपेठ – नरखेड (नागपुर)
महाराष्ट्रात काटोल (नागपूर) , वरूड (अमरावती) येथे संत्री प्रक्रिया उद्योग आहे. येथे संत्र्यांपासून जनावरांचे खाद्य बनवितात.

उपयुक्तता – संत्र्याच्या रसात मरगळ, आळस व प्रवासाचा थकवा घालविण्याची शक्ती आहे. संत्र्यात अ, ब, व क जीवनसत्व असते. संत्र्यापासून सरबत, रस व मार्मालेड बनवितात.

मोंसंबी

मोसंबी

मोसंबी

मुळस्थान – द. चीन
मोसंबी लागवडीच्या बाबतीत प्रथम क्रमांकाचे राज्य – महाराष्ट्र
मोसंबीचे सर्वाधिक क्षेत्र असणारा जिल्हा – १) जालना २) औरंगाबाद ३) नांदेड
रोजगार हमी योजनेअंतर्गत मोसंबीची सर्वाधिक लागवड – मराठवाडा

जाती :–

१) न्युसेलर – ही जात महाराष्ट्रात जास्त प्रचलित आहे. श्रीरामपूर येथील अखिल भारतीय फळ सुधार योजना (मोसंबी) येथे संशोधन केली आहे. जुन्या जातीपेक्षा दुप्पट उत्पादन मिळते.

२) वॉशिंग्टन नॉव्हेल – फळे मोठी परंतु एकसारखा आकार नसणे व उग्र वासामुळे मागणी कमी आहे.

इतर जाती – जाफा, सातगुडी, माल्टा, व्हॅलेन्शिया इ.
२००८ मध्ये म. फुले कृषी विद्यापीठाने गुले मोसंबी (सिलेक्शन – ४) ही ७२.९५ किलो प्रति झाड उत्पन्न देणारी किड व रोगाला कमी बळी पडणारी जात प्रसारीत केली.

प्रमुख रोग –

१) देवी किंवा खै-या (सिट्रस कँकर) – हा रोग झॅन्थोमोनस जीवाणूमुळे होतो. यामुळे पाने व फांदया कमजोर होतात.

२) मर (सिट्रस डायबॅक)

३) डिंक्या (सिट्रस गॅमॉसिस)

डाळींब (Punica.grahulum)

डाळिंब

डाळींब

मुळस्थान – इराण
डाळींब हे कणखर व काटक पीक असल्यामुळे त्याची महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण भागात मोठया प्रमाणावर लागवड केली जाते. डाळींबाच्या क्षेत्र व उत्पादनात भारतात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो.
महाराष्ट्रात डाळींबाचे सर्वाधिक क्षेत्र नाशिक, सोलापूर, अहमदनगर , सांगली जिल्हयात आहे.
हवामान – यास थंड व कोअरडे हवामान मानवते.
जमीन – निकस जमीनीपासून भारी व सुपीक जमीन चालते. अत्यंत हलक्या व मुरमाड जमीनीत फळांना रंग चांगला येतो.
लागवड – गुटी कलमाद्वारे झाडांची अभिवृध्दी करून हलक्या जमीनीत ४ x ४ मी. अंतरावर, मध्यम जमीनीत ५ x ५ मी. अंतरावर लागवड करतात.

जाती :–

१) गणेश (GBG 1) – ही जात येथील गणेशखिंड फळ संशोधन केंद्रात डॉ. जी. बी. चिमा यांनी स्थानिक आळंदी वावातून निवड पध्दतीने विकसित केली आहे. महाराष्ट्रात गणेशची सर्वाधिक लागवड करतात. ही उत्पादनक्षम जात असून फळे निर्यातीसाठी उपयुक्त आहेत. हयाचे खास वैशिष्टय म्हणजे दणे मउ, फिकट ते गडद गुलाबी, गोड व रूचकर असतात.

२) ज्योती – बंगलोर कृषी विद्यापीठाने निवड पध्दतीने विकसित केलेल जात.

३) G- १३७ – गणेशपासून निवड पध्दतीने, डॉ. आर. बी.सावंत यांनी विकसित केलेली जात

४) P - २३ व P – २६ – मस्कत जातीपासून निवड पध्दतीने विकसित केलेली जात.

५) मृदुला – म. फुले कृषी विद्यापीठाने गणेश व गुल-ए-शाह रोड यांचा संकर करून तयार केलेली जात.

६) मस्कत – अहमदनगर जिल्हयात कोलार भागात लागवड केली जाते.

७) इतर जाती – भगवा, फुले, अरक्ता

हंगाम –

१) मृग बहार – जुन – जुलै २) हस्त बहार – सप्टेंबर – ऑक्टोबर ३) आंबे बहार – जानेवारी – फेब्रुवारी

फळांची गुणवत्ता व उत्पादन या द्दष्टीने आंबेबहार उपयुक्त आहे.

विरळणी – मोठी व आकर्षक फळे येण्यासाठी फुले व फळांची विरळणी करतात. साधारण एका झाडावर ६० ते ७५ फळे पोसतात. झाडावर १०० ते १२५ फळांच्या गाठी धरल्यानंतर नविन येणारी फुले तोडतात.
कीड व रोग – फळकुज, पानावरील ठिपके, मावा,तुडतुडे, तेलकट डाग, मर इ.
झाडास बोरॉनची कमतरता पडल्यास फळ तडकते.
निर्यातक्षम फळ – वजन ३५० ते ४०० ग्रॅम, आकार गोलाकार, बाह्यरंग गडद गुलाबी अंतरंग गुलाबी असावा. विद्राव्य घटक १२ % असावे.
सोलापूर जिल्ह्यात सांगोला भागात गणेश व अरक्ता या निर्यातक्षम जातीची लागवड करतात. तसेच सांगली जिल्ह्यात आटपाडी येथूनही निर्यातक्षम जातींची लागवड करुन निर्यात केली जाते.
उपयुक्तता- डाळींबाच्या रसात १० ते १६ % साखर असते. डाळींबात बी जीवनसत्व असते.
डळींबाचा रस महारोगाव उपयुक्त आहे तसेच फळाची साल आमांश व अतिसार या रोगावर गुणकारी आहे.

लिंबू

लिंबू

लिंबू

हे मुळचे आशिया खंडातील पीक आहे.

लिंबू

लाईम (पातळ साल) लेमेन (जाड साल)

१) कागदी लिंबू १)सिडलेस लिंबू

२) मिठा लिंबू २) इटालियन लिंबू

३) पाट लिंबू ३) युरिका लिंबू

४) रंगपूर लिंबू ४) इडलिंबू

डॉ.विभीषन गर्जे यांनी अजित सिडलेस ही बी रहीत लिबांचा वाण निर्माण केला असून य वाणास मराठावाडा कृषी विद्यापेठाने सर्वोकृष्ट वाण म्हणून गौरविले आहे.

कागदी लिंबूच्या जाती – कागदी लिंबू, वेस्ट इंडियन, कीलाईन विक्रम, प्रमालिनी, मेक्सिकन, फुले सरबती, पीकेएम,- १, साई सरबती – याची साल पातळ, फळांचा आकार अंडाकृती किंवा गोल असतो.
लागवड – ५ x ५ मी. अंतरावर करतात.
बहार – १) मृग बहार (जून) २) हस्त बहार (ऑक्टो) ३) आंबे बहार (जाने)
रोग – डायबॅक, खैरा (झॅन्थोमोनॉस जीवाणूमुळे तयार होतो तर लिफ मायनरमुळे प्रसार होतो.) सिट्रस् कँकर (स्ट्रेप्टोसायक्लीन फवारणे)
लिंबूवर्गीय फळांच्या डायबॅक रोगं नियंत्रणासाठी झिंक सल्फेट वापरतात.
म.फुले कृषी विद्यापीठाने २००८ मध्ये कागदी लिंबाचे फुले सरस्वती हे वाण प्रसारीत केले. याचे उत्पादन हेक्टरी ५२.९१ टन आहे. या जातीत उन्हाळयात अधिक फळधारणा होते व ही जात कीड व रोगास कमी बळी पडते.

कोरडवाहू फळे

जांभूळ, करवंद, बोर, आवळा, सिताफळ , कवठ इ.

बोर

बोर

बोर

हे मुळचे जपानचे पीक असून भारतात व महाराष्ट्रात कोरडवाहू व अवर्षणप्रवण भागासाठी हे पीक वरदान ठरले आहे.
बोरांची सर्वाधिक लागवड सोलापूर जिल्हयात सांगोला येथे केली जाते. त्यानंतर अहमदनगर व धुळे जिल्ह्याचा क्रमांक लागतो. तसेच मेहरून (जळगाव), खामगाव (बुलढाणा), राहूरी (अहमदनगर) इ. ठिकाणे बोरांच्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहे.
हवामान व जमिन – उष्ण व कोरड्या हवामानात, हलक्या, मुरमाड, डोंगराळ तसेच मध्यम व भारी जमिनीत चांगले येते.
लागवड –बियांपासून अभिवृध्दी करुन त्यावर टी पध्दतीने डोळे भरतात. लागवड ५ x ५ मी. किंवा ६ x ६ मी.अंतरावर करतात.
बोरास जुलै-ऑगस्ट मध्ये फुलोरा येतो व नोव्हें-जाने मध्ये फळ काढणी करतात.
जाती – मेहरुन, उमरान गोला, कडाक, इलायची, सोनूर २ व ६,चोहारा,श्याम बोर, मुक्ता इ.
परसबागेसाठी बोराची चांगली जात- इलायची
मह्त्व- बोरात अ व क जीवनसत्व तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस सारखी खनिजद्रव्ये विपुल असतात. बोरापासून सुकामेवा, खजुर (कॅन्डी) , टुटी फ्रुटी, मुरंबा ,सरबत तयार करतात.

आवळा

आवळा

आवळा

आवळा हे अस्सल भारतीय फळ आहे. त्यापासून त्रिफळा चुर्ण च्यवणप्राश तयार करतात.यात मानवाला चिरतारुण्य देण्याची शक्ती आहे.
आवळ्याच्या १००ग्रॅम गरात ६९० मिली ग्रॅम क जीवनसत्व उपलब्ध असते. वाळलेल्या फळातही क जीवनसत्व असते. यापासून चटणी , लोणचे, मुरंबा, जेली मोरावळा, आवळा सुपारी, आवळा सुपारी , आवळा चहा, तेल तयार करतात.
जाती-बनारसी, चाखीया (उ.प्रदेश), फ्रॉन्सिस, नीलम ,कांचन, कृष्णा, लाला आवळा इ.
महाराष्ट्रातील स्थानिक जात- नाशिक ( राम आवळा), टरपर रेवडी इ.

सिताफळ

सिताफळ

सिताफळ

सिताफळ हे मुळचे पेरू देशातील फळ आहे. हे पोर्तुगीजांनी भारतात आणले. हे अत्यंत काटक व कीड आणि रोगांना प्रतिकारक असे फळझाड आहे.
सिताफळच्या पानांपासून किटकनाशक तयार करतात. बियांपासून तेल व पेंडीपासून खत व साबन तयार करतात.
सिताफळाचे सर्वाधिक क्षेत्र असणारे जिल्हे – पुणे, अहमदनगर, बीड इ.
प्रसिध्द ठिकाणे – दौलताबाद (औरंगाबाद) – आंबेजोगाई (बीड) इ.
जाती – बाळानगर, बॉशिंग्टन , बारबाडोस , मॅमॉथ, अरका सहान (संकरित जाती) इ.

चिंच

चिंच

चिंच

हिला हिंदुस्थानची खजूर म्हणतात. हिचे मुळस्थान ऍबिसिनिया हे आहे. चिंचेत ७ ते २०% पोटॅशियम बाय टार्टारेट, ९.०९% टारटारिक आम्ल असते.
मराठवाडा कृषी विद्यापीठाने चिंचेची प्रतिष्ठान ही जात शोधली आहे. चिंचेच्या इतर जाती नंबर २६३ अकोला स्मृती, अंजठा गोड चिंच
चिंचेच्या चोथ्यापासून पेक्टीन बनवितात.

बिबा

बिबा

बिबा

या फळाचा उपयोग औषधी तेल, रंगकाम, खुणा करण्यासाठी शाई, दंतमंजन जहाजे व बोटी बनविण्यासाठी करतात.

जांभूळ

जामून

जांभूळ

मुळस्थान – भारत
जांभूळाचा सरबर हगवणीवर उपयुक्त असून, जांभूळाचे फळ तसेच बियांची भूकटी मधुमेहावर उपयुक्त असून त्यामुळे रक्तातील व लघवीतील साखरेचे प्रमाण कमी होते.
जाती – हारूर, रायजांभूळ इ.

फळांचे गुणधर्म

फळांमध्ये जीवनसत्वे अमिनो ऍसिड व खनिजे मोठ्या प्रमाणात असतात अन्न पचण्यास मदत होते. काही फळे रक्तदाब कमी करतात. फळांच्या रससेवनाने शरीराला त्वरीत शक्ती मिळते. तहान शमते. हुशारी वाटते. फळामुळे रोगप्रतिबंधक शक्ती वाढते. फळे ही आरोग्याची कवचकुंडले आहेत. आहारशास्त्रज्ञांच्या मते आहारात दररोज ८५ ग्रॅ. फळेव ३०० ग्रॅम भाजीपाला आवश्यक आहे. परंतु भारतात फक्त ४५ ग्रॅम फळे व १०० ग्रॅम भाजीपाला उपलब्ध आहे.
कॅरोटीन सर्वप्रथम गाजरातून वेगळे केले गेले. कॅरोटीन मुळे वनस्पतीचे कडक उन्हापासून संरक्षण होते.
अ जीवनसत्व असणारी फळे – आंबा, पपई, गाजर इ.
ब जीवनसत्ब असणारी फळे – पपई, अननस, बदाम, जर्दाळू, केळी, सफरचंद इ.
बी१ – थायमिन – काजू, सफरचंद, केळी इ.
बी२ – रायबोक्लेविन – पपई, डाळींब इ.
क जीवनसत्ब (आर्सेनिक ऍसिड असणारी फळे) – पेरू, आवळा, लिंबूवर्गीय फळे इ.
ऑरगॅनिक ऍसिड (सायट्रीक) मुळे कच्च्या आंबट चव येते. लिंबूवर्गीय फळात सायट्रीक आम्ल असते.
पाण्याची गरज – सिताफळ, मोसंबी, पेरू, केळी, पाण्याची गरज चढताक्रम

भाजीपाला लागवड (Olericulture)

उत्पादनत भारताचा प्रथम क्रमांक – आंबा, केळी, वटाणा, फ्लावर, काजू
कोबी, कांदे, गहू, तांदूळ,साखर, रेशीम, टोमॉटो यांच्या उत्पादनात भारताचा द्वितीय क्रमांक लागतो.
फुलकोबीच्या बिजोत्पादनात अग्रेसर राज्य – हरियाणा
महाराष्ट्रात पिकविल्या जाणा-या भाजीपाल्याच्या पिकाखालील क्षेत्राचा उतरता क्रम – १) कांदे २) वांगी ३) टमाटे
महाराष्ट्रातील एकूण भाजीपाला क्षेत्र – ४.४ लाख हेक्टर, तर उत्पादन ५०.९६ लाख टन होते.
कॅल्शिअमचे सर्वाधिक प्रमाण असणारी भाजी – मेथी
लोहाचे प्रमाण सर्वाधिक असणारी भाजी – पालक

कांदा (Allium. cepa)

कांदा

कांदा

जगात कांदा उत्पादनात चीनचा प्रथम क्रमांक लागतो. तर भारताचा कांद्याच्या क्षेत्रात प्रथम (१८.८२%) व उत्पादनात द्वितीय क्रमांक लागतो.
जगाच्या २३ लक्ष हे. क्षेत्रापैकी भारतात कांदयाचे ४.१ लाख हे. क्षेत्र व उत्पादन ४४.३ लाख टन आहे.
कांद्याच्या निर्यातीत अनुक्रमे – १) नेदरलँड २) स्पेन ३) भारत असा क्रमांक लागतो.
भारतातील कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. देशाचे २०% क्षेत्र व २२.८४% उत्पादन एकटया महाराष्ट्रात होते.
राज्यात कांदयाचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा (देशाच्या १०% तर राज्याच्या ३७%) – नाशिक
कांदा उत्पादनात अग्रेसर ठिकाणे – निफाड व लासलगाव (नाशिक),जुन्नर व फुरसुंगी (पुणे)
भारतातील कांदा निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा – ९०%
कांदयामध्ये असणारे जीवनसत्व –ब व क
कांदयाला अलील प्रोपील डायसल्फाईडमुळे तिखट वास येतो.
हवामान – कांदयास १२.८ ते २३ अंश सेल्शिअस तापमान लागते.
हंगाम – कांदा हे मुख्यतः रब्बी हंगामातील पीक आहे. परंतु महाराष्ट्रात हे सर्वत हंगामात घेतात.
रोपे – हेक्टरी १० किलो बियाणे घेउन खरीप पिकासाठी गादीवाफयावर रोपे तयार करतात. तर रब्बी पिकातील सपाट वाफ्यात रोपे तयार करतात.

क्र. हंगामा बी पेरणी पुर्नलागवड काढणी
१)

२)

३)
खरीप (पोळकांदा)

रांगडा किंवा हळवा

रब्बी / उन्हाळी

किंवा गरम
मे- जून

ऑगस्ट – सप्टें

ऑक्टो – नोव्हें
जुलै – ऑगस्ट

ऑक्टो – नोव्हें

डिसें-जाने
ऑक्टो – डिसें

जाने – मार्च

एप्रिल – मे

जाती – १) खरीप –एन – ५३, बसवंत ७८०, ऍग्रीफाउंड डार्करेड फुले सफेद (पांढरा) फुले समर्थ इ.

२) रांगडा – पुसारेड, एन – २-४-१, ऍग्रीफाउंड डार्करेड, अर्का अनिकेत इ.

३) रब्बी – एन-२-४-१, एन – २५७-९-१, फुले सुवर्णा (पिवळा) इ.

पांढ-या कांद्यांच्या जाती – एन – २५७-९-१, फुले सफेदा,PKV लोकल इ.
महाराष्ट्रात लागवडीसाठी कांदयाची प्रसिध्द जात – एन – ५३
लागवड – सरीवरंबा किंवा वाफा प्ध्दतीने रोपे ६ ते ८ आठवड्याची झाल्यावर करतात.
खते – NPK १५० :५०: ५० कि. हेक्टरी
काढणी – कांदा काढणीपुर्वी २१ दिवस अगोदर मॉलिक हायड्रॉक्साईड – ४० हे संजिवक फवारल्यास कांदा साठवणीत चांगला टिकतो.
उत्पन्न – खरीप कांदयाचे हेक्टरी १५० ते २०० क्विंटल व रब्बी कांदयाचे हेक्टरी २५० ते ४०० क्विंटल उत्पादन किळते.
राज्यात कांदा मुख्यतः रब्बी हंगामात घेत असल्यामुळे मार्च ते मे महिन्यात कांद्याची आवक वाढते.
कांदा टिकवा यासाठी भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरने सुरू केलेला विकीरण प्रकल्प – लासलगाव (नाशिक)
भाजीपाला निर्यातीत कांदयाचा वाटा – ७०% (१९७५ पासून निर्यात – नाफेड)
कांद्यामध्ये अन्न साठवले जाते – कार्बोहाड्रेटस् स्वरूपात.

बटाटे

बटाटे

बटाटे

राष्ट्रीय स्तरावरील बटाटा संशोधन केंद्र – कुफरी (सिमला – हि. प्रदेश)
महाराष्ट्रात बटाटा रब्बी हंगामात घेतात.
जाती – कुफरी चंद्रमुखी, कुफरी ज्योती, कुफरी सिंदुरी, कुफरी बादशहा, दार्जिलिंग रोड, फुलवा, सफेत, जेएच – २२इ.
राज्यात उत्पादनात अग्रेसर ठिकाण – जुन्नर (पुणे)
उत्पादनात अग्रेसर राज्य – उत्तरप्रदेश (४३% देशाच्या उत्पादनात)

टोमॅटो

टोमॅटो

टोमॅटो

टमाटयास लायकोपीन मुळे लाल रंग येतो
जाती – वैशाली, रूपाली, पुसा रूबी, पुसा अर्ली, नामधारी – ८१५, रेशमा, पुसा १२० (सुत्र कृमीला प्रतिबंधक), कॅचपसाठी जात – पुसारुबी. पेस्ट साठी जात- रेशमा, भाग्यश्री, राजश्री, फुले राजा (संकरीत) इ.

वांगी

वांगी

वांगी

जाती – अरूणा, मांजरी, गोटा, वैशाली, पुसा पर्पल लाँग, शिरीष, कल्पतरू कृष्णा, फुले हरीत, भरीतासाठी
वांग्याची प्रगती ही जात वैशाली व मांजरी यांचा संकर आहे. कृष्णा ही संकरीत जात आहे.
मेथी – सुगंधी जाती – कसुरी, मारवारी व चंपा मेथी, नंबर ४७,१४,
वाटाणा – यात प्रथिने, खनिजे व जीवनसत्वे भरपुर असतात. आहारात दररोज २५ ग्रॅम वाटाणा आवश्यक आहे.

जाती – आर्केल, बोनेव्हिला (युएसए), कादंबरी इ.

पत्ताकोबी – गोल्डन एकर (सुधारीत वाण) प्राईट ऑफ इंडिया, भारती इ.
लसून – जात – श्वेता, गोदावरी, जामनगर लडुवा, मलेका, अग्नीफाउंड व्हाईट – ४-१४ फुले बसंवत, यमुना सफेद इ. लसणाचे सर्वाधिक क्षेत्र व उत्पादन – गुजरात
फुलकोबी – जात – पुसा दिपाली, नाशिक नं – ५ स्नो बॉल – १६ पुसा शुभ्रा, पावस, सेरॅनो, माधुरी, कातकी
भेंडी – अर्का अनामिका, परभणी क्रांती, पुसा सावनी, अर्का अभय ( विषाणू प्रतिकारक ),फुले किर्ती इ.
मुळा – जॅपनीज व्हाईट (जपान),पुसा देशी, पुसा रेशमी,गणेश सिंथेटीक (गणेशखिंड- पुणे) इ.
कारले – हिरकणी, कोकणतारा, फुले ग्रीन गोल्ड इ.
काकडी – हेमांगी पुणे खिरा, पुसा संयोग इ.
कलिंगड – असाही यामाटो (७ ते ८ किलो वजन – जपान), शुगरबेबी (युएसए), अर्का ज्योती, अर्का माणिक, दुर्गापुर मीठा, मधुमिलन, नाथ – १०१, अमृत इ.
खरबूज – हरामधूर, पुसा सरबती, पंजाबी सुनहरे इ.
ब्रोकोली – सुधारीत वाण, गणेश वाण
शेवगा - कोईमतुर १ व २ कोकण रूचीरा, पी.के.एम.– १-२
टॉपीओका (शाबू कंद) – यास साबू, सावरकंद, साबूदाणा कंद असेही म्हणतात. या कंदातील स्टार्च पासून साबूदाणाबनवतात. या कंदात हायड्रोसायनिक नावाचे विषारी आम्ल असते त्यामुळे उकडून खाणे आवश्यक असते.
प्रमुख उत्पादक राज्य – आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ

साबू कंदच्या जाती :एच – २२, एच १६५ श्रीप्रकाश, एस १३, श्री विजय, पेट्टीपुरम्, टी. सी. ५, सीआय ६४९

भाजीपाला व फळे प्रक्रिया

फळे व भाजीपाला प्रक्रिया उत्पादनासाठी फुड प्रोडक्ट ऑर्डर, १९५५ अन्वये अधिकृत परवाना आवश्यक असतो.
प्रक्रिया केलेल्या कृषी माल निर्यातीसाठी संस्था – ऍपेडा (ऍग्रिकल्चर ऍन्ड प्रोसेसड फुड प्रोडक्ट

डेव्हलपमेंट ऍथॉरिटी) दिल्ली.

भारतातील सर्वात मोठा फळ प्रक्रिया प्रकल्प – हिमाचल प्रदेश
महाराष्ट्रातील फळ प्रक्रिया शिकविण्याचे केंद्र – औरंगाबाद
महाराष्ट्रातील फळे हवाबंद डब्यात पॅक करण्याचे सर्वात जास्त उद्योग – नागपूर
फालसा फळापासून जाम बनविण्याचा पहिला कारखाना – महाबळेश्वर
रस टिकविण्यासाठी फळे – ८० अंश सेल्सिअसवर ३० मिनिटे उकळवितात. त्या पोटॅशिअम मेटा बाय सल्फाईड किंवा सोडीयम बेंझोएट प्रति किलोस ६१० ग्रॅम किंवा ७१० ग्रॅम ही रासायनिक संरक्षके वापरतात.
मिठाच्या १६ ते ४८% द्रावणात फळांच्या फोडी दिर्घकाळ टिकतात.
त्रिफळा चुर्ण बेहडा, हिरडा व आवळयापासून तयार करतात
जेली – फळांचा रस, साखर व सायट्रीक ऍसिड यांच्या मिश्रणास १०५ अंश सेल्सिअस वर उष्णता देतात. जेलीचा ब्रिक्स निर्देंशांक ७०% असतो. जेली पेरू व कवठ यापासूण तयार करतात.
मार्मालेड – फळांच्या तुकडयांसहित असलेली जेली.
जाम – फळांचा गर व साखर ५५ :४५ या प्रमाणात घेउन त्यात सायट्रिक ऍसिड टाकतात.या मिश्रणास १०० अंश सेल्सिअस पर्यत उष्णता देतात.
जाम व जेलीत विद्राव्य घटक अनुक्रमे ६८% व ६५% च्या वर, तर फळांचा गर ४५% असतो. जाम व जेलीसाठी फळे व साखर यांचे प्रमाण ५५ : ४५ असावे.
स्क्वॅश – यात २५% फळांचा रस, ४५ % साखर व १.५ ते २% सायट्रीक ऍसिड व पाणी असते. यात ७१० ग्रॅम सोडीयम बेंझोएट वापरतात.
टोमॅटो कॅचप – टमाटयाच्या गरात ऍसिटीक ऍसिड सव सोडीयम बेंझोएट टाकतात.
हवाबंद डब्यात फळे व भाजीपाला २ वर्षापेक्षा जास्त काळ टिकतो.
मुरांबे – यासाठी आवळा, बोर, सफरचंद, कैरी ही फळे वापरतात. ४५ किलो फळे व ५५ किलो साखर वापरतात ते ३० % साखरेच्या पाकात शिजवतात.
भारतात समाधानकारक उत्पादन असतांना सुध्दा भारतात १ ते २% फळे व भाजीपाला उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. याउलट ब्राझिल ७०% युएसए – ७०%, मलेशिया- ८३%, फिलीपाईन्स – ७८%, उत्पादनावर प्रक्रिया केली जाते.
भारतात फळ प्रक्रिया उद्योगांची फक्त ५०% च क्षमता वापरली जाते.
भारतातील प्रक्रियायुक्त पदार्थापैकी ४०% पदार्थाची निर्यात केली जाते.
डाळींबाच्या दाण्यापासून वाळवून, खारवून अनारदाणा प्रामुख्याने अंबट जातीपासून बनवितात.
काजूच्या बोंडापासून काजफेणी बनवितात.
मणूकेः पक्क द्राक्षाच्या घडाला इथाईल ओलियट व पोटॅशिअम कार्बोनेट याच्या मिश्रणात ठेवून ड्रायमध्ये वाळवतात किंवा सावळीत सुकवितात.
कँडीः पिकलेल्या आवळ्यापासून बनवतात.
टूटीफ्रुटीः कच्च्या पपईच्या फळापासून रंगीत मधूर व गोडी टुटीफ्रुटी बनवतात. तसेच बोरांपासून बनवतात. तिचा उपयोग केक , फ्रुट, ब्रेड, श्रीखंड, फ्रुट सॅलॅड आईस्क्रीम यामध्ये करतात.
वाईन – द्राक्ष, डाळिंब, बोर, पेरू, सिताफळ, जांभूळ, अननस, संत्री इ. फळांपासून बनवतात. त्या अकोलचे प्रमाण ९ ते १०% असते.
महाराष्ट्रात भारताच्या ६२ वायनरीपैकी ५८ वायनरी आहेत तर भारताच्या २२५ करोड लिटर वाईन उत्पन्नापैकी २.११ करोड (९७%) वाईन उत्पन्न एकटया महाराष्ट्रात होते.

फुल शेती

फुलांचे प्रमुख उत्पादक देश – अमेरिका, नेदरलंड, इटली इ.
काचेच्या घरात (ग्लास हाउस) नियंत्रित तापमानात फुल शेती केली जाते – युरोप
लोखंडी सांगाडयावर प्लॉस्टिक फिल्मचे आच्छादन टाकतात तापमान, आर्द्रता, नियंत्रीत करतात. किंवा खोलीला बसविलेल्या जाळयावर वेली वाढवून खोली आच्छादतात. यात ८० ते ९० आर्द्रता, मंद प्रकाश व जमिनीत सतत ओलावा असतो. – पॉली हाउस
महाराष्ट्रात १९९० मध्ये नाशिक येथील फिरोज मसानी यांनी पॉली हाउसमध्ये कार्नेशन व जरबेराची लागवड करून आधुनिक फुलशेती व फुलांच्या निर्यातीचा पाया घातला.
महाराष्ट्राचा फुलशेतीत देशात तिसरा क्रमांक आहे.
परदेशातून आयात केलेली फुलझाडे, याबरोबर येणा-या परदेशी रोग किटकांना प्रतिबंध करण्यासाठी तपासणी – क्वाटे टाईन
फुल शेतीबद्द्ल मार्गदर्शन – अखिल भारतीय समन्वीत पुष्प सुधार योजना (गणेशखिंड – पुणे) व कृषी पनन महामंडळ, गुलटेकडी- पुणे तसेच प्लास्टीकल्चर विकास केंद्र, राहूरी.

आदर्श पुष्पोत्पादन केंद्राची स्थापना – राजगुरूनगर

महाराष्ट्रात नाशिकजवळ केली जाणारी फुलशेती – कार्नेशन फुलशेती
कार्नेशनच्या जाती – सनराईज, कोब्रा, डोमिंगो, मास्टर.
पुण्याजवळ लोणावळा येथे केली जाणारी शेती – गुलाब शेती
कोणत्या फुलशेतीचा रंग रंगीत ब्लेकेड ब्लँकेट टाकल्याप्रमाणे दिसते – (मुळस्थान – अमेरिका) गॅलार्डिया (ब्लॅकेंट फ्लॉवर) गॅलार्डियाच्या जाती – इंडियन चीफ, डॅझलर, संगीनी इ.
ग्लॅडिओलची लागवड कोणत्या कंदापासून करतात- कॉमर्स (राज्यसेवा पूर्वपरीक्षाः ०७)

जरबेराच्या जाती-(मुळ्स्थान- द.आफ्रिका) क्रिम क्लेमेंटाईन, फ्लेमिंगो,उरनस,फ्रे डोरेलो इ.

ग्लॅडिओलच्या जाती- मयूर,मनोहर ,सपना, सुचित्रा, फुले गणेश, फुले प्रेरणा, फुले तजेस, फळे निलरेखा, संसरे, यलो स्टोन्स इ.
गुलाबा च्या जाती (फुलांचा राजा)-जवाहर , इंदिरा, ग्लॅडिएटर, सुपरस्टार,समर,सनराईज, पुसा, सोनिया इ. सुधारीत जाती ; फर्स्ट रेड नोबलिस, स्कॉय लाईन, टेम्पेटेशन, पॅशन पोलो, गोल्डन स्ट्राईक.
ऍस्टरच्या जाती – आळंदी मिक्स, क्विन ऑफ मार्केट इ.
शेवंती जाती – राजा पंढपुरी, रेवंडी, झीपरी, बिरबल ,सहणी, इंदिरा, तारा इ.
जरबेराच्या जाती-; ऑर्नला, सवाना, डायब्लो, रनोप्लक , ,थॅलेसा, दालमा, पिंकथेलिंग्स
झेंडू – यास गरीबाचे फुल म्हणतात. जाती- आफ्रिकन झेंडू, फ्रेंच झेंडू इ.
आर्कीड - सिक्किममध्ये या रानफुलास राज्यफुलाचा दर्जा आहे. हे फुल मातीशिवाय जगू शकते. महाराष्ट्रात सातपुडा व महाबळेश्वर जंगलात मोठ्या प्रमाणात सापडते.

वास्तव्यानुसार आर्कीडचे प्रकार-

१) इपिफायट्स – जिवंत वॄक्षांच्या साल व खोडावर वाढते.

२) लिथोफायटस – खड्कावर वाढते.

३) ऍक्विफायटस- पाण्यात वाढ्ते.

४) टेरिस्ट्रिअल – जमिनीत वाढणारे

५) सॅप्रोफायटस -वनस्पती व प्राणीजन्य मृत अवशेषांवर वाढणारे

६) अंडर ग्रांउडस – याची वाढ जमिनीत होते, फुलांचा दांडा जमिनीतच राहतो.

७) सबसरफेस – वाढ जमिनीत होउन, फुलाचा दांडा जमिनीवर येतो.

व्हॅनिला नावाच्या आर्कीड मधून व्हॅनिलीन अल्काईन विभक्त करुन व्हॅनिला आईस्क्रीम बनवितात.

आळंबी लागवडः-

ही बुरशीवर्गिय परजीवी वनस्पती असून यात ३४ ते ४० % प्रथिने , ब, क, ड हे जीवनसत्वे भरपुर असतात,तर पिष्ट्मय पदार्थ अल्प असल्याने आळंबी हे मधुमेहाच्या रोग्यास उपयुक्त अन्न आहे.
आळंबीच्या लागवडीस २० ते ३० अशं सेल्सिअस तापमान व ८५ ते ९० % आर्दता आवश्यक असते. खाण्यास योग्य जात
धिंगरी आळंबीः (ही भारतात सर्वाधिक प्रजलीत जात आहे ) इतर जाती बटन, दुधी इ.
निर्यातक्षम भाजीपाल्याची पक्वता ७० ते ७५ % पेक्षा जास्त नसावी.
भारतातील फळे व भाजीपाल्याचे उप्तादन – १३५ दशलक्ष टन

* संकीर्ण *

जगात लावले गेलेले पहिले फळझाड –खजूर
जगात सर्वाधिक उत्पादित होणारे फळ – द्राक्ष
वनस्पतीचे सर्वात मोठे फळ –फणस
वनस्पतीचे संयुक्त फळ – फणस व उंबर
झाडांचे जास्तीत जास्त रोग कशामुळे होतात – कवक
जागतिक फलोत्पादनचा उतरता क्रम – द्रा क्ष , केळी, सफरचंद
जगाचा प्रति हेक्टरी उत्पादन मुल्यानुसार फलोत्पादनाचा उतरता क्रम – द्राक्ष , आंबा, केळी, मोसंबी .
सिताफळ व लक्ष्मण फळाच्या संकरातून निर्माण केलेले फळ – हनुमान फळ

फलोत्पादनात अग्रेसर राज्य प्रसिध्द ठिकाणे महाराष्ट्रातील जिल्हे
फ ळ राज्य शहरे महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र
१ आंबा

२ केळी

३ नारळ

४ संत्री

५ द्राक्ष

६ काजू

७ मोसंबी

८ बोरे

९ चिकू

१० स्ट्रॉबेरी

११ डाळींब

१२ पेरु

१३ सिताफळ

१४ अंजीर

१५ लिंबू

१६ चिंच
आंध्रप्रदेश

महाराष्ट्र

केरळ

महाराष्ट्र

महाराष्ट्र

महाराष्ट्र

महाराष्ट्र

महाराष्ट्र

उत्तरप्रदेश
रत्नागिरी

वसई, जळगाव

नागपूर

नाशिक

मालवण

श्रीरामपूर

मेहरुन

डहाणू, घोलवड

महाबळेश्वर

सांगोला

नाशिक

दौलताबाद,

राजेवाडी
रत्नागिरी,सिंधुदुर्ग

जळगाव , नांदेड

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अमरावती, नागपूर,

नाशिक, सांगली,

सिंधुदुर्ग, रत्नागिरी,

जालना, औरंगाबाद, सोलापुर, अहमदनगर,

ठाणे, अहमदनगर,

महाबळेश्वर (सातारा) नाशिक सोलापुर

नाशिक, पुणे,

आंबेजोगाई, अहमदनगर,

पुणे , अहमदनगर,

सोलापूर,अहमदनगर,

उस्मानावाद, अहमदनगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा