Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

मंगळवार, १ मे, २०१२

मुलभूत संकल्पना – अन्न आहार व आरोग्य


मुलभूत संकल्पना – अन्न आहार व आरोग्य


अन्न, आहार व आरोग्य अन्नात मानवी शरीराच्या वाढीसाठी आवश्यक अशा रासायनिक घटकांना पोषणद्रव्ये (Nutrients) असे म्हणतात. अन्न म्हणजे शरीराची गरज भागवणा-या पोषकद्रव्यांचा स्त्रोत होय. संतुलित आहार (Balanced Diet)
संतुलित आहार

संतुलित आहार

ज्या आहारातुन व्यक्तीचे वय, लिंग व शारीरिक कार्याचे स्वरुप यानुसार आवश्यक असणारी सर्व पोषणद्रव्य सुयोग्य प्रमाणात उपलब्ध होतात, त्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. अन्नाच्या गरजेचे प्रमाण साधारणः ऊर्जेच्या स्वरुपात ठरविले जाते. या ऊर्जेचे एकक किलो कॅलरी आहे. १ शरीर क्रियात्मक कॅलरी (KCaL)= १००० कॅलरी १ Kg पाण्याचे तापमान १ अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजे १ शरीर क्रियात्मक कॅलरी होय मानवास प्रतिदिन आवश्यक कॅलरी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या शिफारशी नुसार भारतीयांची प्रतिदिन आवश्यक किलो कॅलरी कामाचे स्वरुप पुरुषांसाठी आवश्यक कॅलरी स्त्रीयांसाठी आवश्यक कॅलरी बैठे काम २४२५ १८७५ मध्यम काम २८७५ २२२५ कष्टाचे काम ३८०० २९२५ गर्भवती स्त्रीयां + ३००

निश्चल अवस्थेत व्यक्तीस वजनाच्या १ Kg मागे प्रत्येक तासाला १ कॅलरी ऊर्जा लागते. म्हणजेच २४ तासात ६० Kg वजनाच्या व्यक्तीस १२०० ते १४०० कॅलरी ऊर्जा खर्च होईल.

पोषणतत्वे
पोषण

पोषण

अन्नातील जे रासायनिक घटक योग्य प्रमाणात आहारात घेतले असता शरीरातील सर्व कार्ये सुरळीत पणे पार पडतात. त्यांना पोषणतत्वे म्हणतात. अन्नातील पोषणतत्वे पाच महत्वाचे अन्न घटक व त्याचा स्त्रोत
कार्यानुसार गट पोषणतत्वे स्त्रोत
१. शरीर बांधणी गट ( प्रथिन समृध्द पदार्थ) प्रथिने दूध, मांस, अंडी, मासे, चीज
२ ऊर्जा गट ( तृणधान्य ) कर्बोदके तृणधान्ये व त्यांचे पदार्थ उदा; तांदूळ, गहू, नाचणी, बाजरी, ज्वारी, मका, बटाटे
३ अतिसमृध्द ऊर्जा गट स्निग्ध लोणी, साखर, तुप, खाद्यतेल, गुळ, साजूक ( स्निग्ध पदार्थ, साखर) तूप इ.
४ संरक्षक गट अ जीवनसत्व पिवळ्या व नारंगी रंगाच्या भाज्या, गाजर, ( अ व क जीवनसत्व युक्त पदार्थ ) लाल भोपळा, पपई, आंबा, टमाटे, संत्री, पेरु, मोसंबी हिरव्या पालेभाज्या, पालक, शेवगा पाने, कोबी
५ दुय्यम संरक्षक गट ( जीवनसत्वे व खनिजे ) सर्वच जीवनसत्वे व खनिजे इतर फळे व भाज्या


कार्बनी पदार्थ ( Organic Compounds) १. जीवनतत्वे – या पोषण तत्वाचा शोध पोलिश रसायन शास्त्रज्ञ फुन्क याने लावला. नैसर्गिक अन्नात आढळणारे जे जीवनावश्यक कार्बनी पदार्थ वाढ व उत्तम आरोग्यासाठी अल्प प्रमाणात आवश्यक असतात. त्यांना जीवनसत्वे म्हणतात. जीवनतत्वाच्या रेणूमध्ये आढळणा-या ऍमिनोगट समूहामुळे इंग्रजीमध्ये जीवनतत्वासाठी व्हिटामीन शब्द प्रचलीत झाला. १) अ जीवनसत्त्व
वनस्पतीजन्य व प्राणीजन्य अन्न

वनस्पतीजन्य व प्राणीजन्य अन्न

हे जीवनतत्व वनस्पतीजन्य व प्राणिजन्य अन्न पदार्थात आढळते. वनस्पतीतील बीटा कॅरोटीन हा अ जीवनत्त्वाचा पूर्व घटक आहे. कार्ये- दृष्टी निर्दोष राखणे, हाडाच्या व उतींच्या वाढीसाठी आवश्यक आहे. त्वचा, डोळा,श्वसनमार्ग आणि पचनसंस्था यांचे अभिस्तर ओलसर व निरोगी राखते. या जीवनसत्वा अभावी रातांधळेपणा येतो. हे जीवनसत्व फार कमी झाल्यावर अंतःत्वचा अशक्त होते. तिची प्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे डोळे, तोंड, श्वसन मार्ग यांना सहजासहजी जंतूसंसर्ग होतो. त्यास झिरोथैल्मिया म्हणतात. याच्या कमतरतेमुळे लहान मुलांची वाढ खुंटते, हाडे व दात यांची वाढ कमी प्रमाणात होते. शरीरातील रोगप्रतिबंधक शक्ती टिकून राहण्याला या जीवनसत्वाचा फार उपयोग होतो. म्हणून त्यास रोग प्रतिबंधक जीवनसत्व म्हणतात.

दृष्टीपटलामधील दंडपेशी आणि शंकू पेशीमधील प्रकाश संवेदनशील अशा रॅडॉप्सीन रंगद्रव्याच्या रेटीनॉल हा महत्वाचा घटक आहे. रेटीनाल हे रेटीनॉल ( जीवनसत्व – अ) पासून तयार होते.

अधिक्य – आहारात प्रमाण जास्त झाल्यास मुलांमध्ये चिडचिडेपणा येतो. अर्भकावस्थेत जास्त झाल्यास त्वचा कोरडी पडते व खाज सुटते. वेदनादायक सूज येऊन हाडांची जाडी वाढते. आळस, निद्रानाश बध्दकोष्ठ असे दोष निर्माण होतात. स्त्रोत – वनस्पती-
फळे व भाज्या

फळे व भाज्या

१. पिवळ्या व नारंगी फळे व भाज्या, आंबा, पपई, संत्रे, पिकलेला टोमॅटो, गाजर, लाअल भोपळा (PSI पूर्व परिक्षा २००८) २. हिरव्या पालेभाज्या- पालक, कोथिंबीर, अळू, सोयाबिन
हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या

प्राणी- मासे, अंडी ( पिवळा बलक ), कॉडलिव्हर ऑईल, दूध व दूधाचे पदार्थ लोणी, तूप, यकृत.
दुधाचे पदार्थ

दुधाचे पदार्थ

अ व ब जीवनसत्वाचा शोध-मॅकुलन

२) ब जीवनसत्वे – या समुहात १२ जीवनसत्वांचा सामावेश होतो. याचा शोध हाप किन या शास्त्रज्ञाने लावला ब व क हे पाण्यात विरघळणारे असल्यामुळे हे अस्थिर आहे. प्रकाश, उष्णता, हवा यामुळे जीवनसत्वाची पोषणमुल्ये कमी होतात. भाजी चिरणे व त्यानंतर धुणे, अन्न शिजवतांना वापरलेले पाणी फेकून देणे, यामुळे ही जीवनसत्वे निघून जातात. शरीरात यांचे प्रमाण जास्त झाल्यास ती मुत्रावाटे बाहेर टाकली जातात. तांदूळ गिरणीत दळणे, पीठ चाळणे यामुळे B जीवनसत्व कमी होते. याउलट धान्याला मोड येणे व आंबविण्यामुळे ब आणि क जीवनसत्वे वाढतात. या गटातील काही महत्वाची जीवनसत्वे
जीवनसत्व कार्य, अभावी होणारा रोग व स्त्रोत
B१, थायमिन हे चयापचयात मदत करते. ग्लुकोजपासून ऊर्जा मिळविण्यासाठी ऑक्सिडिकरण प्रक्रियेमध्ये सहविकर म्हणून कार्य करते. याच्या अभावी बेरीबेरी हा रोग होतो. तृणधान्ये, दाळी, किण्व, मांस, अंडी आणि दूध व दूधाच्या पदार्थात मुबलक असतात.
B 2 रायबोफ्लेविन किंवा G जीवनसत्व कार्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थाच्या चयापचयात सविकर म्हणून कार्य करणे. याच्या कमतरेमुळे ग्लोसायटिस ( जीभेची सूज) किलोसिस ( ओठ फुटणे, सुजणे) त्वचा फाटणे इ रोग होतात. कडाधान्य, यीस्ट, मांस व अंडी यात मुबलक असतात.
B3 पॅन्टोथेनिक याच्या आभावी वाढ खुंटणे, केस पांढरे होणे, डोळे, नाक, तळवे यांची जळजळ होणे. यकृत, किडनी, मांस यात मुबलक असतात.
B5 नायसिन किंवा चयापचयात मदत करणे, नायसिनच्या अभावी पेलाग्रा हा रोग होतो. मकायुक्त आहार घेणा-यास निकोटिनिक आम्ल पेलाग्रा होतो.
B 6 पायरीडॉक्सिन या जीवनसत्वाच्या अभावी ऍनिमिया होतो. दूध, फळे, भाजीपाला, कडधान्ये यात मुबलक असतात.
B 7 बायोटिन -
B 8 पॅन्थोथोनिक – ऍसिड
B9 फॉलिक ऍसिड पेशी विभाजन, परिपक्वता तसेच हिमोग्लोबीन निर्मितीसाठी आवश्यक , यकृत, पालेभाज्यात मुबलक असतात.
आयनोसिटॉल डोळ्यांची शक्ती व केसांच्या वाढीवर परिणाम कोलीन अभावी यकृताला सिरोसीस होते, अंड्याच्या पांढ-या बलकात हे असते.
B12 कोबामाईन सायनोकोबॅलामिन पेशींची परिपक्वता, मध्यवर्ती चेतासंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यासाठी व लाल रक्त पेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. याच्या अभावी ऍनिमिया हा रोग होतो. मांस, दूध, दुधाचे पदार्थ, पावसाचे पाणी, पालेभाज्या यात मुबलक असते.

स्वयंपाकात सोडा वापरल्यास बी जीवनसत्वाचा नाश होतो.
पचनक्रिया, शरीराची वाढ व चेतासंस्थाच्या कार्यासाठी बी जीवनसत्व आवश्यक असते.

३) क जीवनसत्व (Ascorbic Acid) – हे सर्वात अस्थिर जीवनसत्व आहे. जास्त शिजविल्यास या जीवनसत्वाचा नाश होतो. क जीवनसत्व असणारी फळे किंवा भाज्या ताजे न चिरता व न शिजविता खावी. कार्य – १) जखमा व घाव भरून काढण्यासाठी कोलॅजन नावाचे प्रथिन तयार करण्यासाठी क जीवनसत्व आवश्यक असते. २)मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी क जीवनसत्व मदत करते. ३) क जीवनसत्वामुळे लोह व कॅल्शिअमचे अभिशोषण वाढते. क जीवनसत्वा अभावी होणारे रोग – क जीवनसत्वाअभावी स्कर्व्ही नावाचा रोग होतो. या रोगाचे सौम्य प्रमाण असतांना सांधे दुखणे, हिरड्यांतून रक्त येणे, थोडे लागले तरी रक्त साकळणे, रोग बळावल्यावर जिभेला सूज येते, ती दूखू लागते. दात पडतात, सांध्यांना सूज येते. स्त्रोत- हे जीवनसत्व प्राणीज अन्नात नसते. सिट्रस फळांमध्ये मुबलक असते. आवळा संत्री, लिंबू, मोसंबी, द्राक्षे, आंबा, राजगिरा, वाल, वाटाणा, टोमॅटो इ. ४). ड जीवनसत्व (Calciferol) – सकाळच्या कोवळ्या उन्हात अतिनिल प्रारणांमुळे त्वचेखाली स्टेरॉलचे रूपांतर ड जीवनसत्वात होते. कार्य – हाडांची वाढ व विकास करते. हे जीवनसत्व कॅल्शिअम व फॉसस्फरस यांचे अभिशोषण व संचयन करण्याचे कार्य करते. अभावी रोग – या जीवनसत्वाच्या अभावी मुडदूस (Rickets) हा रोग होतो. यात मुले अशक्त होतात. पायाच्या हाडांना बाक येतो. छाती कबुतराच्या छातीप्रमाणे पुढे येते. आधिक्य – सामान्यतः लहान मुलांत मळमळणे, उलट्या, थकवा, गुंगी येणे, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडात बिघाड, मोठी रक्तवाहिनी व उतींमध्ये कॅल्शिअम साचणे, चेह-याचा अर्धांगवायू इ. लक्षणे दिसतात. स्त्रोत- ड जीवनसत्व वनस्पतीत फारसे आढळत नाही. लोणी, अंडी, यकृत, माशांचे यकृत तेल यात मुबलक असते. १. इ जीवनसत्व (Tocopherol) – इ जीवनसत्व ऑक्सिडिकरण विरोधक म्हणून कार्य करते. शरीरातील व अन्नातील स्निग्धांम्ले तसेच अ व क जीवनसत्व यांच्या ऑक्सिडीकरणास इ जीवनसत्व प्रतिबंध करते. या जीवनसत्वामुळे वृध्दत्व क्रिया मंदावते. प्रजनन योग्य होते. डी. एन. ए. मधील दुरूस्ती किंवा शरीराच्या प्रतिक्षम संस्थेच्या कार्यातही जीवनसत्व इ चा वाटा असावा अशी धारणा आहे. अभाव – या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वांझपणा, गर्भाचा मृत्यू इ. परिणाम घडतात. स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, गव्हाचे अंकूर, हिरव्या पालेभाज्या, लोणी, अंड्याचा पिवळा बलक, यकृत, वनस्पती तेल. २. के जीवनसत्व (Phylloquinone) – लहान आतड्याच्या खालच्या भागात काही उपयुक्त जीवाणू के जीवनसत्व तयार करतात. के जीवनसत्व प्रोथ्रॉम्बिन हे प्रथिन तयार करण्यास मदत करते. हे प्रथिन रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत आवश्यक घटकांपैकी एक आहे. याच्या अभावी रक्तस्त्राव होतो, हिमोफोलीया होतो. के जीवनसत्व हिरव्या पालेभाज्या, दूध, अंड्याचा पिवळा बलक यकृत व मेंदू, अल्फाल्फा पालक, कोबी शतावरी यात असते.

हाडाच्या विकासात के जीवनसत्वाचा वाटा आहे. तसेच ग्लुकोजचे ग्लायकोजेन मध्ये रूपांतर करण्यामधेही जीवनसत्व के साह्य करते.

३. पी जीवनसत्व ( सिट्रिन, रॅटीन, हरप्यालीन) –

दुधाच्या पाश्चरीकरणामुळे ब व क जीवनसत्व नष्ट होते.
पॉलीश केलेले तांदूळ संपूर्ण आहार म्हणून वापरल्यास बेरीबेरी हा रोग होतो.

थोडक्यात महत्वाचे
जीवनसत्व कार्ये अभावी दुष्परिणाम स्त्रोत
अ त्वचा व डोळ्याचे आरोग्य त्वचा रोग, रातांधळेपणा टोमॅटो, यकृत, भाज्या,फळे,बिया, मांस,सोयाबिन,पिवळा बलक
ब (संयुक्त) शरीराची वाढ, चयापचय, रक्तवर्धक, चेतासंस्थेसाठी ऍनिमिया, पेलाग्रा, बेरीबेरी आरोग्यासाठी कडधान्ये इ. हिरव्या भाज्या, यकृत, दूध, अंडी, सोयाबिन, मोड आलेले कडधान्ये
क दात व हिरड्यांची वाढ व त्यांचे आरोग्य स्कर्व्ही लिंबू,संत्रे, आवळा इ.
ड दात व अस्थिंची वाढ त्वचेचे आरोग्य मूडदूस, दंतक्षय, त्वचारोग माशाच्या यकृताचे तेल, अंडी, यकृत, दूध, लोणी सूर्यकिरण, अंकुरित कडधान्ये,हिरव्या इ.
इ योग्य प्रजननासाठी वांझपणा माशाच्या यकृताचे तेल, अंडी, यकृत, दूध, लोणी सूर्यकिरण,अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या इ.
के प्रोथ्राम्बिन तयार करणे रक्त न गोठणे हिरव्या पालेभाज्या, दूध, अंडी

आत्तापर्यत २० प्रकारची जीवनसत्वे सापडली आहेत.

२.प्रथिने (Proteins) – प्रथिने ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनयुक्त कार्बनी संयुगांनी बनलेली आहेत. यात सल्फर आणि फॉस्फरस आसतो. प्रोटीनची कार्ये –

शरीराच्या वाढीस मदत करणे व झीज भरून काढणे.
शरीरातील सर्व रासायनिक क्रिया विकरे नियंत्रित करतात. रासायनिक दृष्ट्या विकर प्रथिने असतात. संप्रेरक वाढ व विकास नियंत्रित करतात. काही संप्रेरके प्रथिने असतात. संप्रेरक प्रथिनांची उदाहरणे – इन्शुलिन, ग्ल्युकेगॉन, सोमॅटोस्टॅटीन इ.
फुप्फुसातील ऑक्सिजन सर्व उतीपर्यंत वाहून नेणारी प्रथिने ही वाहक प्रथिने असतात.
संक्रामक रोगांविरूध्द लढण्यासाठी तयार झालेली प्रतिद्रव्ये (Antibodies) ही प्रथिनेच असतात.
एक ग्रॅम प्रथिनापासून ४.१ किलो. कॅलरी मिळते प्रथिने आहारात जास्त प्रमाणात आल्यास त्याचे रूपांतर मेदात होते. जेवणात १ किलोग्रॅम वजनामागे १ ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. प्रथिनांच्या पचनानंतर त्याचे रूपांतर अमिनोआम्लात होते. कुपोषित व्यक्तीत सर्वाधिक कमतरता प्रथिनांचीच असते.

स्त्रोत – कडधान्ये व डाळी – हरभरा, मूगडाळ, तूरडाळ, शेंगदाणे, आक्रोड, काजू, तीळ, बदाम, कारले, मांस, मासे, अंडी, दूध व दूधाचे पदार्थ (लोणी व तूपाव्यतिरिक्त)

डुक्कर या प्राण्याला प्रथिनांचा कारखाना म्हणतात.

अभावी होणारे रोग – केवळ प्रथिनांच्या अभावाने होणा-या रोगाला सुजवटी (Kwashiorkar) म्हणतात. यात चेहरा सुजून गोल गरगरीत वाटोळा होतो. याला चंद्रमुखी म्हणतात. ऊर्जा व प्रथिने तसेच इतर पोषणतत्वे यांच्या सतत अभावामुळे सुकटी ( Marasmus) हा रोग होतो. खूप प्रमाणात अतिसार व उलट्या होण्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन मूल सुकते. त्वचा व हाडांचा सापळाच शिल्ल्क राहतो. प्रथिनांची उदाहरणे – इन्शुलिन, केसिन, फायब्रिन, पेप्सिन, मायोसिन

स्नायुंच्या हालचालींसाठी महत्वाचे प्रथिन – मायोग्लोबीन

४) कर्बोदके (Corbohidrates) – कर्बोदके ही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून तयार झालेली असतात. यांनाच पिष्टमय पदार्थ असेही म्हणतात. ही सर्व सजिव सृष्टीमध्ये सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध असतात. आपल्या आहारात ६० ते ८०% प्रमाण कर्बोदकांचे असते. कर्बोदकांचे सोपे रूप म्हणजे ग्लुकोज होय. त्याचे सहजपणे अभिशोषण होते. ग्लुकोज त्वरीत ऊर्जा देतो म्हणून खेळाडू ग्लुकोजचा वापर करतात. पिष्टमय पदार्थात मुख्यतः तौकीर असते. तौकीर व शर्कराचे शेवटी शरीरात पचन होऊन त्यांचे ग्लुकोज नावाच्या शर्करेत रूपांतर होते ती रक्तात शोषली जाऊन सर्व शरीरात पुरविली जाते. शर्करेपासून उष्णता व शक्ती मिळते अतिरिक्त ग्लुकोज ग्लायकोजेनच्या स्वरूपात यकृतात साठविले जाते. पिष्टमय पदार्थ पचण्यास सुलभ असतात. कार्य – १. ऊर्जेचा पुरवठा करणे –
पिष्टमय पदार्थ

पिष्टमय पदार्थ

१ ग्रॅम पिष्टमय पदार्थापासून ४.५ किलो कॅलरी उष्णता मिळते. हा उर्जेचा सर्वात स्वस्त स्त्रोत आहे. २. प्रथिनांची बचत करणे व सेल्युलोज या तंतूमय कर्बोदकामुळे मलविसर्जनास मदत होते.
तृणधान्ये

तृणधान्ये

स्त्रोत – सर्व तृणधान्ये – तांदूळ, गहू, मका, बाजरी, नाचणी, बटाटे रताळी, अळवडी, बीट,केळी, चिकू, द्राक्षे, साखर, गूळ,मध, कडधान्ये व डाळी, दूध व दुधाचे पदार्थ

सर्वाधिक पिष्टमय पदार्थ बटाट्यात असतात.

पदार्थ आहारात प्रमाण १ ग्रॅमपासून मिळणारी उर्जा कार्य
कर्बोदके ६० ते ८० % ४.५ किलो कॅलरी इंधन म्हणून
प्रथिने १० ते १५ % ४.१ किलो कॅलरी शरीराची वाढ व झीज भरणे
स्निग्ध २० ते ३० % ९.३ किलो कॅलरी ऊर्जेचा राखीव साठा

४. स्निग्ध पदार्थ – स्निग्ध पदार्थ कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून बनलेले असतात. पिष्टमय पदार्थांच्या तुलनेने स्निग्ध पदार्थांत हायड्रोजनचे प्रमाण जास्त आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. मार्गारिन – हा लोण्यासारखा परंतु त्याचा स्वस्त पर्यायी पदार्थ आहे. वनस्पतीजन्य वा प्राणीजन्य स्निग्ध पदार्थ आणि पाणी यांच्या मिश्रणापासून हे तयार करतात. स्निग्ध (मेद) पदार्थ कार्ये – अत्यावश्यक स्निग्धाम्ले पुरवितात. जीवनसत्वे वाहक, त्वचेखालील थर उष्णता रोधक म्हणून कार्य करतो. त्यामुळे शरीराचे तापमान कायम राहते. यकृत किंवा मूत्रपिंड सारख्याअ इंद्रियाभोवती थर आघातापासून संरक्षण देतो. मेदाचे पचनानंतर मेदाम्ल व ग्लिसरॉल मधे रूपांतर होते. जास्तीचे मेद त्वचेखाली साठविले जातात. ऊर्जेचा राखीव साठा म्हणून मेदाचा उपयोग होतो. स्त्रोत – खाद्यतेल, तूप, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, चरबी, मासे व माशाच्या यकृताचे तेल. आधिक्य – लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, धमनी काठिण्य होते. धमनी काठिण्यात धमन्यांच्या आतून कोलेस्टेरॉल व टायग्लिसरॉईड यांचा थर साचतो. यामुळे अर्धांग वायू, गँगरीन किंवा हृदयरोग होतो.

२). अकार्बनी पदार्थ

१. खनिजे ( क्षार ) – यात कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, आयोडिन सोडियम, पोटॅशिअम, फ्लुओरिन आणि इतर खनिजांचा समावेश होतो.

१. कॅल्शिअम व फॉस्फरस
कॅल्शिअम

कॅल्शिअम

हाडे व दाताची वाढ करणे, कॅल्शिअममुळे स्नायूच्या आकुंचन आणि प्रसरणाचे नियंत्रण होते. रक्त गोठण्यास मदत होते. ATP निर्माण करण्यात फॉस्फरस आवश्यक असतो.

स्त्रोत – नाचणी, तीळ, मनुका, खारीक,दूध व दूधाचे पदार्थ, सागरी अन्न, अंडी, मेथी इ. २. लोह – हिमोग्लोबीन ऑक्सिजन वहन करतो. मायोग्लोबीन हे लोह प्रथिन स्नायूंच्या हालचालीसाठी आवश्यक असते. ऑक्सिडीकरण करणे. स्त्रोत – मूत्रपिंड,यकृत, तृणधान्ये व कडधान्ये, मनुका, खारीक, हिरव्या पालेभाज्या लोहाच्या अभावी रक्तक्षय ( Anaemia) होतो. ३. आयोडिन – थॉयरॉक्सिन संप्रेरकाचा घटक, आयोडिनच्या अभावी गॉयटर ( गलगंड) हा रोग होतो. पाण्यात व मिठात पोटॅशिअम आयोडेट घालणे. पर्वतीय भागात हा रोग आढळतो. उदा. हिमालय, सातपुडा

४. फ्लुओरिन – हाडे व दात निरोगी राहण्यासाठी फ्लुओरिन ०.८ p.p.m. घेणे. दंताक्षय टाळला जातो. फ्लोरिनच्या अधिक्यामुळे दातावरचे दंतिन इनॅमल फिक्कट होऊन दाताचा तसेच हाडांचा फ्लुरोसिस होतो. स्त्रोत – पिण्याचे पाणी २. पाणी – शरीरात सुमारे ६५% पाणी असते. लहान मुलांत ७५% पर्यंत पाणी असते. पाणी शरीरातील सर्वच पदार्थांमध्ये असते. पाण्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते. सांध्यातील वंगण म्हणूनही पाणी उपयोगी ठरते. कुपोषण – हे अन्नाचा अभाव किंवा अन्नाचे अधिक प्रमाणात सेवन ( अतिपोषण) यामुळे होते.

गिरणीतून तांदूळ काढताना २ ते १०% घट होते. केळी कमी तापमानावर साठविल्यास काळी पडतात.
ताक पिवळे भांड्यात ठेवल्यास खराब होते. तर दूध तांब्याच्या भांड्यात ठेवले तर हिरवट होते.
पुर्णपणे न वाळवलेल्या धान्यामध्ये विकरांची क्रिया चालूच राहते. व ते बिघडते. विकरामुळे फळे व भाज्याही खराब होतात.
दुधात सर्वाधिक असणारा घटक – कॅल्शिअम

पदार्थ शर्करा प्रकार पदार्थ शर्करा प्रकार
तृणधान्ये माल्टोज दूध लॅक्टोज
ऊस सुक्रोज द्राक्ष ग्लुकोज
आंबा फ्रुक्टोज ( सर्वात गोड) मध लेवलोज

मानवाचे स्वास्थ आणि रोग

आरोग्य म्हणजे शारिरीक, मानसिक व सामाजिक स्वास्थ होय. अशी आरोग्याची व्याख्या जागतीक आरोग्य संघटना (W. H. O. ) ने केली आहे.
प्राथमिकपणे आपले आरोग्य हे अनुवंशिक असते. दमा, मधुमेह, सांधिवात, मानसिक दौर्बल्य इ. गोष्टी अनुवंशिकतेने पुढील पिढीमध्ये संक्रमित होतात.

आपले स्वास्थ वातावरणाशी निगडीत असते. त्याचप्रमाणे जीवनपध्दती राहणीमान, अन्न ह्या सर्वांशी स्वास्थाचा संबंध असतो.

भारतीय औषध पध्दतीत आयुर्वेद, सिध्द, युनानी, आणि होमियोपॅथी तसेच योग व निसर्गोपचाराचाही समावेश होतो.

चिकित्सा पध्दती – १. आयुर्वेद – इ. स. पूर्व ५००० वर्षे पुर्वीची संपूर्ण भारतीय पध्दती आहे.

आयुर्वेदाचा शब्दशः अर्थ जीवनशास्त्र असा होतो. अथर्ववेदाचा एक भाग आहे
आयुर्वेद त्रिदोष पध्दतीवर अवलंबून आहे. १. कफ २. वात. ३. पित्त
दक्षिण भारतात आजही सिध्द पध्द्ती उपचारासाठी वापरली जाते.
शल्यचिकित्सक पध्दत सुश्रूत यांनी सुरू केली.
उपचार पध्दतीत चरक व वाग्भट हे उध्वर्यु मानले जातात.
आयुर्वेद पध्दती ही सर्वात जुनी उपचार पध्दती आहे.

२. चिनी पध्दत – ही पध्दत इ. स. पूर्व २५०० वर्षे काळातील आहे. स्त्रित्व आणि पुरूषोत्व अशा दोन संकल्पांवर आधारीत ही पध्दती आहे.

चिनी पध्दती प्रामुख्याने प्रतिबंधात्मक उपचारावर आधारित आहेत. चिनी पध्दतीतील ऍक्युपंक्चर थेरेपी ही शल्यचिकित्सेसाठी गुंगी आणण्यास वापरतात.
ऍक्युप्रेशर – ही जपानी पध्दती आहे.

३. होमियोपॅथी – ही पध्दती जर्मनीत निर्माण झाली. या पध्दतीचा शोध सॅम्युअल हायेनमान (Hahnemann) याने लावला. या पध्दतीत औषधाने रोगाची लक्षणे आधी उग्र करून मग त्याचे दमन केले जाते. ४. ग्रीक पध्दती / ऍलोपॅथी – ही ग्रीस देशातील उपचार पध्दती आहे. याचा जनक हिप्पोक्रेटस हा शास्त्रज्ञ होय. ह्यालाच पाश्चिमात्य वैदक शास्त्राचा जनक मानले जाते. त्याने प्रथमच निरनिराळ्या रोगांचे व त्याच्या लक्षणाचे वर्गीकरण केले

वैद्यकशास्त्रात नितीमत्तेची दिली जाणारी शपथ – हिप्पोक्रेटसची शपथ

साथीचा रोग झपाट्याने पसरतो याचा शोध हिप्पोक्रेटसनेच लावला. ५. युनानी – याचा शोध अरबांनी लावला . त्यांचा आधार ग्रंथ – अलहावी.

अरबांचे होवून गेलेले वैद्यक – अविझेन्ना व राईस.
इतर उपचार पध्दती – सिध्द,तिबेटी, निसर्गोपचार इ.
जन्मतः हृदयात दोष असलेले मुल – ब्ल्यू बेबी
मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा १९ व्या शतकात जर्मन शास्त्रज्ञ बिल हेल्म वुडंट याने लिपझींग, जर्मनी येथे सुरू केले.
Rh +Ve रक्तगटाच्या व्यक्तीने Rh – Ve रक्तगटाच्या व्यक्तीशी विवाह केल्यास रक्तगटाचे संतूलन होत नसल्याने होणारे मूल जगत नाही.

मानसिक आजार – १. मेदूंचे विकार
मेदूचे विकार

मेदूचे विकार

मेंदूला होणारी इजा, गाठ, गडू इ. प्रकारच्या गोष्टीतून विकार होतात. उदा. बुध्दीभ्रम, विस्मरण, भावनिक असमतोल.

२. परिस्थितीमूलक दोष – हे दोष परिस्थितीतून निर्माण होतात. आणि मानसिक ताण, भावनिक उद्रेक, वर्तन समस्या, गंभीर आजार, अतिव दुःख इ. मुळे मानसिक आजार होतात. ३. न्युरोसिस – विविध प्रकारच्या समायोजन समस्येतून हा रोग निर्माण होतो. न्युरोसिस झालेली व्यक्ती सतत चिडचिड करते, चिंता ग्रस्त असते, भयभीत व सांशक असते. त्याची प्रमुख लक्षणे म्हणजे सततची चिंता, भिती, थकवा, मानसिक थकवा, अशक्तपणा ही असतात. वरील मानसीक अवस्थेत हायपोकॉन्ड्रीसयाक (Hypochondric) असे म्हणतात.

४. सायकॉसिस ः- यालाच उन्माद असेही म्हणतात. यामध्ये शारीरिक उन्माद व क्रियाशील उन्माद असे दोन भाग पडतात. क्रियाशील उन्माद मानसीक कारणांनी तर शारिरीक उन्माद शारिरीक कारणाने होतात. उन्माद झालेली व्यक्ति वस्तुस्थितीपासून दूर गेलेली असतात. आपल्या लायकीपेक्षा नेहमी कमी मिळाले असे नेहमी वाटत असते. अशा रोग्यांना इस्पीतळात दाखल करुन इलाज करावा लागतो. सायकॉसिसचे उप प्रकार – १. शिझोफेनिया २. पॅरानोनिया.

५. व्यक्तीमत्व दोष (Personality Disorder ) :- या आजारात व्यक्ती असामाजीक वर्तन करते. विषमायोजना त्याचे मुख्य कारण असते. गुन्हेगारी प्रवृत्ती, फसवेगिरी, समाज विरोधी कृत्ये, अती मद्य सेवन, व्यसनधिनता, लैंगिक विकृत्ती वगैरे प्रकार या आजारात मोडतात. ६. मानसिक दौर्बल्य – या प्रकारात मानसीक पातळी कमी झालेली असते, मानसिक दौर्बल्य कारणे अनुवंशिक असतात. मानसिक आजारावर उपाय योजना – १. शॉक पध्दती – रोग्याची शारिरीक, मानसिक स्थिती व आजाराची तीव्रता याच्यानुसार शॉक दिले जातात व इन्शुलिन, मेट्रॉमॉल इ. चे औषध दिले जाते. २. औषधोपचार पद्धती – फिनोबार, बिरोन, ब्रीमाईड, डॉयामॅनटीन व मेसॅनटाईन वगैरे औषधांनी निद्रानाश, चिंता, फिट्स येणे इ. सारखे आजार दूर केले जातात. ३. मनसोपचार पध्दती – मनसोपचार पध्दती म्हणजे विविध प्रकारच्या मानसिक आजारावर मनोविश्लेषण, सुचना, पूर्वशिक्षण इ. पध्दतीचे उपचार केले जातात. हे उपचार प्रशिक्षीत व अनुभवी मानसोपचार तज्ञ अथवा मनोवैज्ञानिकाद्वारे केले जातात. ४. व्यावहारिक चिकीत्सा पध्दती – शारिरीक व प्रामुख्याने मानसिक रोग निदान व रोग निवारण करण्यासाठी रोग्यास मानसिक व शारिरीक व्यवसाय देणे म्हणजे व्यवसाय चिकित्सा पध्दती होय. या उपचार पध्दतीत रूग्णास नेहमी कोणत्यातरी कार्यात मग्न ठेवले जाते त्यामुळे मानसिक तणाव कमी होतो. लहान मूलांवर उपचार करतांना या पध्दतीत खेळ उपचार पध्दती म्हणतात. ५. समाज चिकित्सा उपचार पध्दती – मानवाच्या सामाजिक परिस्थितीत सुधारणा घडवून आणून त्याला जगण्यासाठी योग्य सामाजिक वातावरण निर्माण करणे हा या पध्द्तीचा मुळ उद्देश असतो. आधुनिक काळात आधुनिक उपचार तंत्र म्हणून रोग्याला नैसर्गिक वातावरणात ठेवले जाते.

सजिवांचा अभ्यास करण्यासाठी कमी तापमानयुक्त वातावरणाचा वापर – क्रायोबायोलॉजी

प्रतिरक्षण – लसिकरण (Immunisation) –

विज्ञानाच्या प्रगतीने शरिरात कृत्रिमरित्या रोग प्रतिकारक शक्तीचा विकास करण्याच्या शक्तीस किंवा पध्दतीत लसीकरण असे म्हणतात.
कृत्रीम लसीकरणाची सुरूवातः तुर्कस्थान
लसीकरणाचा जनक इंग्रज शास्त्रज्ञ – एडवर्ड जेन्नर ( १७४९ ते १८२३)

[(Cow – Pox) गोवर, (small – pox ) देवी, (Chicken – Pox ) कांजिण्या इ.] देवी व कांजण्यावर लस एडवर्ड जेन्नर याने शोधून काढली.

१९५३ मधे पोलिओ प्रतिबंधक लस तयार केली – डॉ साल्क
१९६७ साली हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली – डॉ. ख्रिश्चन बर्नाड ( दक्षिण आफ्रिका)
सल्फा निमाईड – सल्फा मालिकेतील १ ले औषध शोधले. – गेहार्ट डोमॅग ( १९३५ )
मानसचिकित्सा शास्त्राचा जनक मानला जातो. – सांतियागो रामन काजल ( १८५२ ते १९३४ )
सप्टेंबर १९७८ आल्मा – आटा मधील जाहिरनाम्यानुसार “सर्वासाठी आरोग्य” ह्या संकल्पने नुसार २००० पूर्वीच हे उदिष्ट गाठविण्याचे ठरले होते. या उदिष्ट पूर्ततेसाठी भारत सरकारने “ राष्ट्रीय आरोग्य धोरण २००२’’ (National Health Policy NHP) जाहीर केले असून ते २०१५ पर्यंत साध्य करण्याचे निश्चित केले आहे. त्याच प्रमाणे NHP नुसार पुढील आजारांचे उदिद्ष्टे –

१. लिम्फॅटिक फायनॅरिसीसी ( हत्तीरोग ) निर्मूलन उदिष्ट्य – २०१५ २. काला आजार नियंत्रणात आणला जाणार आहे – २०१० ३. एड्सची नव्याने होणारी लागण शुन्यावर आणण्याचे उदिष्ट– २००७ ४. पोलिओ संपुर्ण निर्मूलन करण्याचे उदिष्ट– २००५ ५. कुष्ठरोग निर्मूलन उदिष्ट – २००५

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (२००५ – १२)
दि १२ एप्रिल २००५ रोजी ग्रामीण पातळीवरील सर्व आरोग्य सेवांचे एकत्रित करुन प्रत्येक गावासाठी स्वतंत्र आरोग्य योजना याअंतर्गत राबविणे सुरु झाले. यात केंद्राचा ८०% व राज्याचा २०% खर्चाचा वाटा असणार आहे.
ही योजना जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी राबवितो.
आरोग्य सेवेवरील असणारा खर्च जेडीपीच्या ०.९७% तो २०१२ पर्यंत २ ते ३ ट्क्के पर्यंत मिळ्ण्याचा उद्दिष्ट आहे.
भारतात स्थुल राष्ट्रीय उत्पन्नाचा आरोग्य क्षेत्रावर केला जाणारा खर्च – ५.२ %
आंतरराष्ट्रीय निर्धारण आयोगाद्वारे भारत देवी मुक्त घोषित – २३ एप्रिल १९७७.
W.H.O ने भारत नारुमुक्त घोषीत केले – २०००.
भारत जागतीक आरोग्य संघटनेचा सदस्य झाला-१९४८
देशातील सर्वात गंभीर आरोग्य समस्येचा रोग – क्षयरोग (TB)
आधुनिक समाजात सर्वाधिक आढ्ळ्णारा रोग – मधुमेह (सर्वाधिक प्रमाण – पुरुषांत)
राष्ट्रीय आयुर्वेद संस्था- जयपूर (विद्यापीठ- दिल्ली)
राष्ट्रीय निर्सगोपचार संस्था – पूणे.
भारतात पोलिओ निर्मूलनाचा कार्यक्रम सुरु झाला- ९ डिसेंबर १९९५
पोलिओची तोंडाद्वारे दिली जाणारी लस – साल्क व्हॅक्सीन
प्लस पोलिओ

प्लस पोलिओ

भारतात सर्वाधिक पोलिओचे रूग्ण उत्तर प्रदेशात आहेत. १९९९ मध्ये टाईप – २ . या पोलिओ व्हायरसचे भारतातून पूर्ण निर्मूलन झाले आहे.
भारत पोलिओ लस कच्च्या स्वरूपात आयात करू न ती पुढील संस्थात शुध्द स्वरूपात तयार करतो.

१. हाफकिन बायाफार्मास्युटिकल – मुंबई

२. पॅनाशिया बायोटेक लिमिटेड – दिल्ली

३. भारत इम्युनोलॉजिकल बायोलॉजिकल कॉर्पोरेशन – बुलंदशहर ( उ. प्रदेश ) ४. बायोमेड प्रायव्हेट लिमिटेड – गाझियाबाद

भारतात बी. सी. जी. चे उत्पादन केले जाते – बी. सी. जी. व्हॅक्सिन लॅबोरेटरी, गिंडी ( चेन्नई )
भारतीय औषध उद्योग परराष्ट्रीय कंपन्याच्या ताब्यात – ७०%
नेहमीच्या वापरातील औषधे बनविणारी कंपनी – इंडियन फार्मास्युटिकल लिमिटेड
भारताला औषध उद्योगास सहकार्य करणारा देश – रशिया
भारतीय तसेच युनानी औषधे तयार करणारी कंपनी – भारतीय औषधी फॉर्मोस्युटिकल कार्पोरेशन, अल्मोडा ( उत्तरांचल )
सरकारी डिस्पेंसरीजला औषधी पुरवठा करणारी औषध कंपनी – भारतीय औषधी फॉर्मोस्युटिकल कार्पोरेशन, अल्मोडा.
हिंदुस्तान ऍन्टीबायोटिक्स – पिंपरी ( पुणे )
प्लेगचा रूग्ण प्रथम आशियामध्ये आढळला.
प्लेग

प्लेग
प्लेगचे आढळणारे प्रकार – १) ल्युबोनिक २) सेप्टीसेमिक ३)पल्मोनिक व न्युमोनिक
प्लेगचे रूग्ण १९९४ नंतर आढळलेली ठिकाणे – सुरत ( गुजरात ),दिल्ली, मामला (महराष्ट्रातील बीड जिल्हा )
राष्ट्रीय हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रम – १९५५ ( हा कार्यक्रम ५०% केंद्र पुरस्कृत आहे )
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम – १९५५, याच कार्यक्रमास अधिक प्राधान्य – १९८० – १९८३
कुष्ठरोग निवारणासाठी पुर्वी दिली जाणारी औषधे – डॅप्सोन किंवा सल्फोन
महाराष्ट्रात सोलापूर, उस्मानाबाद व लातूर या ठिकाणी कुष्ठरोग लसीकरणाची मोहिम टाटा रिसर्च सेंटरतर्फे राबविली जाते.
राष्ट्रीय हिवताप निर्मुलन योजना – १९५८
हिवताप निर्मूलनाचा सुधारीत कार्यक्रम – १ सप्टेंबर १९९७ पासून ( हा कार्यक्रम ५०% केंद्र पुरस्कृत आहे. )
संसर्गजन्य रोगावर चालविला जाणारा जगातील सर्वात मोठा आरोग्य कार्यक्रम – हिवताप निर्मूलन कार्यक्रम किंवा मलेरिया निर्मूलन कार्यक्रम
राष्ट्रीय अंधत्व निर्मुलन कार्यक्रम – १९७६ पासून ( हा कार्यक्रम १००% केंद्र पुरस्कृत आहे. )

अंधत्व

अंधत्व
१९८२ पासून राज्यात १० जून हा दिवस प्रसिध्द नेत्र शल्यक्रिया विशारद डॉ. आर. एल. भालचंद्र यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. – दृष्टीदान दिन
क्षयरोग नियंत्रणाचा सुधारित कार्यक्रम – २६ मार्च १९९७ पासून.
जगातील एकूण क्षयरोग्यापैकी भारतात आढळ्णारे क्षयरोगी – १/३
२००२ या राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार क्षयरोगामुळे होणारी मृत्यूसंख्या निम्म्यावर आणण्याचे उदिष्ट्य – २०१० पर्यंत
क्षयरोग नियंत्रणाचे कार्य करणारी संस्था – राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण संस्था, बंगळूर ( १९५९ )
हत्तीरोग संशोधन केंद्र महाराष्ट्रात वर्धा येथे आहे.
राष्ट्रीय आरोग्य धोरण २००२ नुसार जगातील ४.५ कोटी अंधत्व ग्रस्तापैकी भारतात आढळणारे रूग्ण – १० लक्ष
केंद्र सरकारच्या १००% अनुदान असलेल्या योजना – कर्करोग नियंत्रण, गलगंड, एड्स नियंत्रण, अंधत्व नियंत्रण, मलेरिया निर्मूलन
पहिली टेस्ट ट्युब बेबी – १९७८ – लूईस बाऊन – डॉ. रॉबर्ट एडवर्ड व स्टेपडो
राष्ट्रीय आरोग्य विमा योजना – ही योजना १ ऑक्टोबर २००७ मध्ये सुरू झाली. यावरील ७५% खर्च केंद्र सरकार करणार असून २५% खर्च राज्य सरकार करणार आहे ही योजना दारिद्र्य रेषेखालील असंघटीत कामगारांसाठी आहे.
आम आदमी योजना – ही योजना २ ऑक्टोबर २००७ रोजी – केंद्रशासन,राज्यशासन व एल. आय. सी. यांच्या साह्याने सुरू झाली. ही योजना १८ ते ५९ वयाचा कुटूंब प्रमुख दुर्घटनेमुळे विकलांग झाल्यास ३७०००/- रूपये मिळणारे, नैसर्गिक मृत्यूमध्ये ३० हजार रूपये मिळणार तर अपघाती मृत्यूमध्ये ७५,००० रूपये मिळणार आहे.
स्वाईन फ्ल्यू

स्वाईन फ्ल्यू

स्वाईन फ्ल्यू

हा फ्लूचा विषाणू डुकराच्या शरीरात आढळतो. हा इन्फ्ल्यूएंझा H1N1 या विषाणूमुळे होतो. याची सुरूवात २००९ मध्ये सर्वप्रथम मेस्कोमध्ये झाली. भारतात हैद्राबादमध्ये रिदाशेख ही पहिली रूग्ण आढळली . तर पुण्यामधे सर्वप्रथम या रोगाचा बळी गेला.
स्वाईन फ्ल्यू रोगावर औषध – टॅमी फ्ल्यू
बर्ड फ्ल्यू ( एव्हीएन इन्फ्ल्यूएंझा )
बर्ड फ्ल्यू

बर्ड फ्ल्यू

हा पक्ष्यांना होणारा रोग असून तो H5N1 या विषाणूमुळे होतो.

पोषण

मंद पोषण (Under Nutrition ) – अपूरे अन्न फार दिवस सेवन केल्याने निर्माण झालेली शरीराची अवस्था होय. मंद पोषणाने अतिथकवा येतो किंवा कार्यक्षमता मंदावते, मोठ्या प्रमाणावर बालमृत्यू होतात.
कुपोषण – अयोग्य अन्न फार दिवस सेवन केल्याने शरिराची बिघडलेली स्थिती होय. कुपोषणात प्रथिने, जीवनसत्वे इ. चा सतत अभाव असतो.
अतिसेवन – विनाकारण अतिअन्न सेवनाची सवयीमुळे शरिरातील फॅट सेल्सचा आकार वाढून शरीर स्थूल बनते.
स्थूल लोकांमधे प्रामुख्याने आढळणारे आजार. – हृदयविकार, मधुमेह, पचनसंस्थेचे विकार, मेंदूतील रक्तस्त्राव

सुपोषण कार्यक्रमः-

एकात्मिक बालविकास कार्यक्रम ( १९७५ – ७६ ) – या कार्यक्रमांतर्गत ६ वर्षे वयांपर्यतच्या मुलांचे पोषण व आरोग्य उंचाविणे, १५ ते ४४ वयोगटातील स्त्रियांना सकस आहार माता – बालसंगोपन विषयक शिक्षण दिले जाते.
शालेय सकस आहार कार्यक्रम (१९६८ – ६९ ) –या अंतर्गत ६ ते ११ वर्षे वयोगटातील शाळेतील मूलांचे आरोग्य संवर्धन करणे, मूलांना १५० मि.मी. दुध किंवा १००ग्रॅम पौष्टिक आहार पुरविला जातो.
विशेष आहार कार्यक्रम ( १९७० – ७१ ) – शहरी व ग्रामीण भागातील गर्भवती स्त्रिया, लेकुरवाळ्या माता, अर्भके, ६ वर्षा पर्यंतची बालके यांना योग्य पोषणासाठी आवश्यक आहार दिला जातो.

महाराष्ट्राच्या आरोग्यसंबधीत नवीन योजना –

राज्यातील रूग्णालयांचे आधुनिकीकरण, आधुनिक उपकरणे सेवांची गुणवत्ता वाढविणे यासाठी जागतिक बँकेच्या साह्याने ७५० कोटी रूपये खर्चाचा प्रकल्प – महाराष्ट्र आरोग्य सेवा विकास प्रकल्प
राज्यात २००३ मध्ये तीन नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली – १. कोल्हापूर २. लातूर ३. अकोला
हृदय शस्त्रक्रिया केंद्राची निर्मिती करतांना राज्य शासनाने गोरगरीब रूग्णांना उपचार सहजसुलभ व्हावा म्हणून सुरू केलेली योजना – जीवनदायी योजना
जीवनदायी योजनेमार्फत दारिद्र रेषेखाली रुग्णांस देण्यात येणारे अर्थसहाय्य –दीड लाख

कुटूंब कल्याण

कुटूंब नियोजन – कुटूंब नियोजन म्हणजे त्यात केवळ संतती नियमन नसून इअतर घटकांचाही समावेश होतो.
भारताच्या राष्ट्रपतींनी २८ मार्च १९७७ च्या अभिभाषणात सांगितले की, कुटूंबनियोजनाचा कार्यक्रम नव्या जोमाने हाती घेण्यात यीईल. हे कार्य संपूर्णपणे ऐच्छीक असेल. शिक्षण, आरोग्य, बाळंतपण, बाल कल्याण, कुटूंब कल्याण, आहार व स्त्रियांचे घटक इ. गोष्टींचा कुटूंब नियोजन हा एक अविभाज्य घटक असेल.
१९४९ साली दि फॅमिली प्लॅनिंग असो. ऑफ इंडिया ही संस्था स्थापन करण्यात आली.
शासकीय स्तरावर कुटूंब नियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी भारताने १९५२ पासून सुरु केली.
केंद्रीय स्तरावर स्वतंत्र कुटूंब नियोजन खात्याची स्थापना – १९६६
महाराष्ट्रात कुटूंब नियोजन कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे सुपूर्त करण्यात आला -१९६६
कुटूंब नियोजन ही संकल्पना स्त्रिया व बालके यांच्या जीवनाशी निगडीत असल्याने भारत सरकारने कुटूंब नियोजनाचे नामकरण २८ मार्च १९९७ ला असे केले – कुटूंब कल्याण
कुटूंब कल्याण कार्यक्रमाचे प्रमुख उद्दीष्टे – लोकसंख्या वाढीवर नियंत्रण
मातेचे स्वास्थ टिकविण्यासाठी व नको असलेली गर्भधारणा नष्ट करण्याचा अधिकार स्त्रियांना या कायद्याद्वारे देण्यात आला आहे – मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेगनन्सी ऍक्ट,१९७१
कुटूंब नियोजन संबधी संज्ञा- लॅप्रोस्क्रोपी
स्त्रीयांची कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया – ट्युबेक्टॉमी
पुरुषांची कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया – व्हॅसेक्टोमी
जन्माअगोदर गर्भ परिक्षा नियंत्रण कायदा (१९९४) नुसार लिंग परिक्षणावर बंदी – १ जाने. १९६६
लिंग परिक्षण पध्दती -अल्ट्रोसोनोग्राफी, एमनियो सौरसीस इ.
गर्भाशयाचा कर्करोग शोधण्यासाठी टेस्ट –एंडोस्कोपी
गर्भाशयात वाढलेल्या मुलाचे वाढीचे परिक्षण केले जाते – प्रतिध्वनी ( अल्ट्रासाउंड)
गर्भवती स्त्रीयांना टेड्रासायक्लीन देत नाही कारण –गर्भात व्यंगनिर्मीती होते.
गर्भजल परिक्षा कायदा महाराष्ट्रात अंमलात आणला गेला – १० मे १९८८
मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेगन्सी ऍक्ट, १९७१ नुसार २० व्या आठवड्यापर्यंत गर्भापात कायदेशीर आहे.
गर्भधारणा रोखण्यासाठी उपाय – डायक्रॉम व लिपीज लुप
गर्भनिरोधक गोळीवर विक्रीकरात दिल जाणारे अनुदान – ५५ ते ८० %
दोन मुलींच्या जन्मानंतर कुटूंब नियोजन करुन घेणा-या दारिद्र रेषेखालील पालकांच्या मुलींना जाहिर करण्यात आलेली योजना – सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना
भारताची लोकसंख्या २००१ नुसार – १०२ कोटी ७० लक्ष
१९९१ – २००१ या दशकात भारताच्या लोकसंख्येत २१.३४% इतकी वाढ झाली.(१८ कोटी ७ लाख)
महाराष्ट्राची २००१ नुसार लोकसंख्या ९ कोटी ६७ लाख ५२ हजार असून देशात उत्तरप्रदेशच्या नंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो.
दोन आपत्ये असणारे कुटूंब म्हणजे छोटे कुटूंब अशी कुटूंबाची व्याख्या स्वीकारुन ही संकल्पना सर्व शासकीय कर्मचा-यांना वैयक्तीक लाभासाठी बंधनकारक केली आहे.
राष्ट्रीय लोकसंख्याविषयक धोरण ( २०००) भारत सरकारने निश्चित केले असून लोकसंख्या पर्याप्त करण्याचे किंवा स्थिर करण्याचे उदिष्ट – २०४६
लोकसभेची सदस्यसंख्या १९७१ च्या जनगणनेनुसार २००१ पर्यंत निश्चित केली होती ती सदस्य संख्या २०००च्या लोकसंख्या धोरणानुसार कायम आहे- २०२६ पर्यंत
लोकसंख्या धोरण -२००० नुसार कुटूंबनियोजनाचा भार स्त्रियांवर टाकला असून पुरुषांच्या बाबतीत ते सौजन्यशील असल्याची टिका केली – डॉ. नीना पुरी ( अध्यक्ष FPAI)

व्यसनाधिनता ( Problem of Drug Addication) :- व्यसनाचे दुष्परिणामः-

मद्याचे परिणामः- मद्य हे शारिरीक व मानसिक दौर्बल्य निर्माण करणारे द्रव्य आहे. त्याचा परिणाम मेंदूची क्रियाशिलता शिथील व दुर्बल करण्यात होत असते. व्यक्ती स्वतः चे विचार, भावना तसेच इच्छा यांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्याचे मेंदूवर परिणाम झाल्याने शरिर समतोल राहत नाही.
अतिमद्यसेवनाने पोटदुखी, आम्ल पित्त, अल्सर, अंतर्गत रक्त स्त्राव, हृदय आणि यकृत इत्यादी दोष संभवतात.
हेरॉईन (Heroein)- हे एक तीव्र स्वरुपाचे मादक द्रव्य (Drug) आहे त्या पासून अनेक मादक द्रव्ये बनविली जातात. अफूवर रासायनिक प्रक्रिया करुन त्यापासून हेरॉईन बनवतात.
हेरॉईन तीन ते चार वेळेस घेतले तरी मनुष्य त्याचा गुलाम बनतो.
अफूची लागवड मध्यप्रदेश ( भारत ), चीन, नेपाळ, थायलंड, कोरिया, पाकिस्तान, अफगानिस्तान, मध्य पूर्व देशांमध्ये केली जाते.
अफूत गुंगी आणण्याचे सामर्थ प्रचंड स्वरुपात असते.
गर्द किंवा Brown Suger म्हणतात. ते हेरॉईन पासून तयार केले जाते. जास्तीत जास्त शुध्द गर्द मध्ये ३ ते १० % हेरॉईन असते.
अफूतील एक घटक म्हणजे मार्फिन होय. वैद्यक शास्त्रात मार्फिनचा उपयोग वेदनाशमनासाठी करतात.
मार्फिनचे इंजेक्शन कर्करोगावरील तीव्र वेदना कमी करण्यासाठी दिले जाते.
मार्फिन हे प्रभावी गुंगी आणणारे व झोप आणणारे द्रव्य आहे.

भांग, गांजा, चरसः-
गांजा

गांजा

भांग, गांजा, चरस हे हेम्प (Hemp) जातीच्या कॅनबिस (Cannbis) या वनस्पतीपासून मिळतात. या झाडाच्या पानांना भांग असे म्हणतात. त्याच्या बियांना गांजा असे म्हणतात. वनस्पतीपासून मिळणा-या चिकट पदार्थास चरस किंवा हशिश असे म्हणतात. हशिश हे चरस किंवा भांग पेक्षा अधिक तीव्र असते.या सर्वांना एक सामुहीक नांव आहे – मरिजुआना – हे एक प्रकारचे भ्रम व भास निर्माण करणारे द्रव्य आहे.

मादक द्रव्ये व व्यसनाची कारणे – कुतूहल, समवयस्क समुह, कौटुंबिक वातावरण, सामाजीक रचना, दुःख तणावापासून मुक्ती, व्यक्तीमत्व इ.

महाराष्ट्रात गुटखा बंदी सर्वप्रथम लागू केली. – १ ऑगस्ट २००२

पाण्यामुळे साथीचे रोग

पाण्यामुळे साथीचे रोग

साथींच्या रोगांचे प्रकार ;- १. ऍन्डेमिक (Endemic);- काही साथीचे रोग विशिष्ट प्रांतात किंवा भौगोलिक प्रदेशापुरतेच मर्यादीत राहतात. अशा जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने केलेल्या व्याख्येनुसार शारीरीक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य होय तर रोग म्हणजे सर्व सधारण स्वास्थ्यापासून वंचित होणे होय. सर्व साधारण रोगांचे वर्गीकरण दोन गटात केले जाते.

अ. संसर्गजन्य (Communicable) – संसर्गजन्य रोग पसरु शकतो. त्याचा प्रसार स्पर्श, अन्न, पाणी, हवा आणि काही प्राण्यामार्फत होतो. उदा. इन्फ्लुएंझा, क्षय, नायटा, अमांश यासारखे रोग विषाणू, जिवाणू, कवक आदिजीव यापासून होतात. अ) संसर्गजन्य रोग
रोग प्रसाराचे साधन पसरणारे रोग
१. पाण्याद्वारे पसरणारे रोग कॉलरा ( पटकी ), विषमज्वर, अतिसार, जंत, कावीळ,नारू, लेप्टोसायरॉसिस इ.
२. हवेतून पसरणारे रोग सर्दी, इन्फ्ल्युएंझा, घटसर्प, क्षय
३. थुंकी व श्वासावाटे होणारे रोग क्षयरोग, डांग्या खोकला, गोवर
४. किटकांमार्फत पसरणारे रोग ऍनाफेलीस डासाच्या मादीमुळे हिवताप, क्युलेस डासाच्या मादीमुळे, हत्तीरोग, घरमाशांमुळे अमांश, पटकी, अतिसार, पिसांमुळे प्लेग, उवा- टायफस, डास-पीतज्वर, उंदीर-प्लेग
५. जनन इंद्रियांद्वारे एड्स, गरमी, परमा

ब. असंसर्गजन्य रोग – असंसर्ग जन्य रोग रोगजंतूव्यतिरिक्त इतर कारणांमुळे संभवतात. या रोगांचा एका व्यक्ती कडून दुस-या व्यक्तीकडे प्रसार होत नाही. उदाः कर्करोग, मधुमेह विविध कारणांमुळे मानवास होणारे रोग
रोगाचे कारण होणारे रोग
विषाणू देवी, इन्फ्ल्युएंझा, पोलिओ, कांजण्या, मेंदूदाह,खूप-या, गोवर, रेबीज, डेंगू फिवर, हरप्लेक्स सिंप्लेक्स, एड्स, कावीळ, हगवण,स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू, चिकनगुनिया,नागिन,सार्स इ.
जीवाणू न्यूमोनिया, कॉलरा, कुष्ठरोग, क्षयरोग, धर्नुवात,घटसर्प, प्लेग, सिफीलीस, गनोरिया, बॅसिलरी, डिसेंटी मेनिजायटीस, विषमज्वर (टायफाईड) , लेप्टोप्लायरासिस, ऍन्थ्रॅक्स, इ.
कवक रिंगवर्म, मदुराफुट,धोबीइच, गजकर्ण, खरूज,चिखल्या, इथिलिट्स फूट इ.
आदिजीव मलेरिया,अमीबीक, डिसेंटी, व्हजायनिटिस, निद्रानाश, काळा आजार इ.
जंत / कृमी हत्तीरोग, नारू, टिनियासिन, अस्कारियासिस, अंकायलेस्टो, थामायसिन इ.

काही महत्वाचे रोग

१. हिवताप (Malaria )- हा संसर्गजन्य रोग असून प्लाझमोडियम व्हायव्हॅक्समुळे हिवताप होतो. ऍनाफिलीसडासाची मादी चावून हा आदिजीव मानवी शरीरात प्रवेश करतो. या परजीवास जगण्यासाठी व आपले जीवन चक्र पूर्ण करण्यासाठी माणूस व डास अशा दोन पोशिंद्यांची गरज असते. हा परजीव प्रथम यकृत व नंतर लोहीत रक्त कणिकांत शिरतात . रक्तकणिका फुटून जंतूविष तयार होते. हे जंतूविष रक्तात मिसळल्यास रोग्यास हुडहूडी भरते. हा आजार चालू राहिल्यास प्लिहा मोठी मोठी होते. पंडूरोग होतो आणि अतिशय अशक्तपणा येतो.

उपाय – डास नष्ट करण्यासाठी डी. डी. टी. व बी. एच. सी फवारणे, गटारात, तुंबलेल्या पाण्यात केरोसिन सोडणे डासांचे डिंभक नष्ट करण्यासाठी बदके, गप्पीमासे, Gambusia, Minnous trouts मॉक्सीटो फिश पाण्यात सोडणे.

उपचार – क्लोरोक्क्विन किंवा पॅलूड्रीन आठवड्यातून दोन वेळा ३०० ग्रॅम घेणे तसेच क्विनाईन ( सिंकोना झाडापासून ), प्रोग्वानिल, यांचाही उपयोग करतात. शोध – यास मलेरिया असे नाव दिले – Macculoch प्लाझमोडियम आदिजीवाचा शोध – Laveran ( १८८० ), रोनॉल्ड रॉस ने इ. स. १८८७ मध्ये मलेरिया डासामुळे प्रसार पावतो हा शोध लावला. त्यावर औषध शोधले याबद्द्ल त्यास नोबेल पारितोषिक देण्यात आले.

२. कुष्ठरोग – हा रोग मायकोबॅक्टेरिय लेप्री या दंडगोलाकार जीवाणूपासून होतो. १८७३ साली नॉर्वे चा शास्त्रज्ञ डॉ. ए. हॅन्सन यांनी या जीवाणूचा शोध लावला. कुष्ठरोगाचे चट्टे कधीही खाजत नाही. कुष्ठरोगावर D. D. S. ( Diamino Diphenyl Sulphona) हे परिणामकारक औषध आहे. याला डॅप्सोन म्हणतात. तसेच रिफीम्पसिन आणि क्लोफ झिमिन ही अत्यंत परिणामकारक औषधे आहेत. तसेच MDT (मल्टी ड्रग थेरपी) हा उपचार करतात. कुष्ठरोगाचे निर्मुलन ३० जानेवारी २००६ रोजी झाले

३. पटकी (Cholera ) – हा अतिशय संसर्गजन्य रोग आहे. हा रोग व्हिब्रिओ कॉलरी नावाच्या स्वल्पविरामकार जीवाणूपासून होतो. रोग्याचे मलमूत्र, घरमाशा यामुळे हा रोग पसरतो. त्याची साथ पसरण्याची खूप शक्यता असते. म्हणून आंतरराष्ट्रीय प्रवास तसेच यात्रेच्या वेळी यात्रेकरूंना इंजेक्शन देतात. रोग्याच्या जीवाणूंचा नाश पोटॅशिअम परमँगनेटमुळे होतो.

४. डायरिया – जीवाणू, आदिजीव व विषाणूमुळे होतो. उपाय – ORS ( Oral Rehydration Solution ) देणे.

५. एड्स
एड्स

एड्स

– एड्सचा शोध सर्वप्रथम जून १९८१ मध्ये अमेरिकेत लागला. शोध - १) डॉ. ल्यूक मॉटग्रीयर – फ्रान्स, २) रॉबर्ट गेलो – (USA ) AIDS चा अर्थ Acquired Immuno Deficiency Syndrome असे असून तो HIV (Human immune Deficiancy Virus) या विषाणूमुळे होतो. HIV विषाणू पांढ-या रक्तपेशी पैकी T – Lymphocytes प्रकारच्या रक्तपेशींवर हल्ला करत असतो.

लक्षणे – डायरीया, शरीराचे वजन कमी होणे, बारीक ताप येणे, कवकाचा प्रार्दुभाव व लिंफोमा ही आहेत. एड्स वर उपचार म्हणून Azide Thymine Dimine वापरतात. तसेच ATZ, DDC – Didoxycytidine याचाही उपयोग करतात. एड्सच्या चाचण्या वेस्टर्न ब्लॉट टेस्ट या निदानासाठी घेतात. ELISA – Enzyme Linked Immuno Sorbent Assay या अप्रत्यक्ष चाचण्या आहेत तर EIA Test ( Enzymo Immuno Assay ) ही प्रत्यक्ष चाचणी आहे

रोगाची लक्षणे – अचानक व कारणाशिवाय वेगाने वजन कमी होणे, ग्रंथींना सुज येणे, ताप व घाम येणे.
एड्सचे प्रमाण जास्त असणारी राज्ये – महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, मणिपूर, नागालँड.
रक्ततपासणी व निदान केंद्र – राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे, जे. जे. हॉस्पिटल मुंबई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
एड्स संदर्भात भौतिक स्वरूपाचे संशोधन करणारी संस्था – राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था,(NARI ) भोसरी (पुणे) सर्वाधिक प्रमाण – मणिपुर, महाराष्ट्र – सांगली
भारतात सर्वप्रथम एड्सचा रूग्ण आढळला – एप्रिल १९८६, मद्रास
महाराष्ट्रात एड्सचा पहिला रूग्ण आढळला – १९८६ मुंबई
राष्ट्रीय एड्स निवारण कार्यक्रम – १९८७
राष्ट्रीय एड्स निवारण समिती अध्यक्ष – स्वास्थ व परिवार कल्याण मंत्री
महाराष्ट्रातील एड्स नियंत्रण कार्यक्रम – Avert

६. ऍस्कारियासिस – याचा प्रसार दूषित पाणी व अन्नामुळे होतो. हा सामान्यतः लहान मुलांमध्ये ऍस्कॅरीस लुब्रीकॉयटीस या अंत्रकृमी परजीवीमुळे होतो. यामुळे यकृत फुप्फुसे यात अंतर्गत रक्तस्त्राव होतो. स्नायुंचे अचानक अंकुचन होऊन पंडूरोग होतो.

उपचार – सॅन्टोनिन, हेट्रझान, टेट्रॅमिसोन सारखी कृमीनाशक औषधे वापरतात.

७. हेपॅटीटीस ( Hepatitis ) - ही यकृताची रोगग्रस्थ स्थिती आहे. हा रोग १) हेपॅटीटीस- ए विषाणू (एच. ए. व्ही ), २) हेपॅटीटीस ( बी ) विषाणू ( एच. ए. बी.), ३) नॉन ए विषाणू आणि ४) नॉन बी विषाणू अशा चार प्रकारांच्या विषाणूंमुळे होतो. १. हेपॅटीटीस ए – एच. ए. व्ही. मुळे होणारा तीव्र स्वरूपाचा सांसर्गिक रोग आहे. ताप, थंडी, डोकेदुःखी, अशक्तपणा, थकवा, भूक मंदावणे, वांत्या, पिवळी लघवी, डोळे पिवळे होणे इ. लक्षणे दिसतात. याची तीव्रता वाढल्यावर हजार रोग्यांमधे एकाचा मृत्यू होऊ शकतो.

उपचार – यावर निश्चित असा उपाय नसून पूर्णपणे झोपून विश्रांतीची शिफारस केली जाते.
मानवी इम्युनोग्लोबीनच्या अंतःस्नायू इंजक्शनमुळे विषाणूला बळी पडण्यास प्रतिबंध होतो.

२. हेपॅटीटीस बी – एच. बी .व्ही. या व्हायरसमुळे होतो. यामुळे यकृताचा कर्करोग होऊ शकतो. यातील विषाणूंचे वहन रक्त देणे, अयोग्य निर्जंतुक सुया, दुस-याचे वापरलेले रेजर, दुस-याचा टुथब्रश, टॉवेल इ. वस्तू वापरणे तसेच लैंगिक संबंध ठेवणे व आईकडून जन्माच्या वेळेस तिच्या मुलाला अशा प्रकारे प्रसार होतो.

उपचार – १) वरीलप्रकारे संसर्ग होणार नाही दक्षता घेणे, २) हेपॅटीटीस बी ची लस घेणे
नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट (NARI ) भोसरी (पुणे)

विषाणूमुळे होणारे रोग व उपाय
रोगाचे नाव कारणीभूत विषाणू उपाय व वैशिष्ट्य
देवी (Small pox) Viruola Virus लस जन्मतः डाव्या दंडावर देतात १९७७ साली भारतातून निर्मुलन
रेबीज कुत्रा, माकड, उंदीर, मांजर चावल्याने- हायड्रोफोबिया, न्यूटॉपिक व्हायरस प्राण्याची भिती वाटते
इन्फ्ल्युएंझा / फ्ल्यु Myxovirus influenza लस घेणे
कांजण्या ( चिकन पॉक्स) व्हायरीसेला झोस्टर त्वचेवर कॅलामाईन मलम लावणे
गालफुगी (Mumps) पॅरामिक्सो व्हायरस कर्णपूर्व ग्रंथीला सूज येते
डेंग्यु फिवर अरबो व्हायरस इडिस इजिप्ती डासाद्वारे प्रसार
पोलिओ Entero Virus पोलिओ व्हॅक्सिन
कावीळ A ते E प्रकार ,अन्न व पाण्याद्बारे प्रसार गामा ग्लोब्युलिन, उसाचा रस, इंटरफेरॉनचे इंजेक्शन ,बी जीवनसत्व
गोवर (Measles ) Myxo virus गामा ग्लोबुलिनची लस घेणे
मेनिनजायटीस मेंदूस प्रभावित करतो.

इंद्रिय बिघाडामुळे होणारे रोग

परिहृदयरोग (Coronory Diseases ) – यात कोलेस्टेरॉलचा थर धमन्यांत जमल्यामुळे हृदयास कमी रक्त पुरवठा होतो. यास धमन्या काठिण्य म्हणतात.
युरेमिया – मूत्रपिंडरोपण हे त्यावरील उपचार आहेत.
कर्करोग – पेशींची अनियमित व अपसामान्य वाढ होते. धूम्रपान, डांबर साधिते ,रंजके, आण्विक स्फोट तसेच अल्ट्राव्हायलेट किरण, क्ष किरण उत्सर्जन यामुळे हा रोग होतो. केमोथेरपी, रेडिओथेरपी या उपचार पध्दती वापरतात. कर्करोगाची चाचणी बायांप्सी (Biopsy) द्वारे केले जाते.

चयापचयातील बिघाडामुळे होणारे रोग;-

१. मधुमेह
मधुमेह

मधुमेह

हा रोग अनुवंशिक असू शकतो. स्वादूपिंडातील आयलेट्स ऑफ लँगर हॅन्स मधील बीटा पेशी मधून इन्शुलिन स्त्रवते. त्या पेशींच्या कार्यात बिघाड झाल्यास यकृतातील उती ग्लुकोजचा वापर करु शकत नाही. परिणामी ग्लुकोज मूत्रातून बाहेर टाकले जाते. उपाय – इन्शुलिनचे इंजेक्शन गुरांच्या स्वादूपिंडापासून काढतात.

२. संप्रेरकांचे असंतुलन – अवटू(Thyroid), पीयुषीका(Pituitory), अधिवृक्क (Adrenal), अंडाशय(Ovary), आणि वृषण या अंतःस्त्रावी ग्रंथी विशिष्ट संप्रेरके स्त्रवतात. त्यात बिघाड झाल्यास रोग होतात.

अनुवांशिक दोष – एका पिढीकडून दुस-या पिढीकडे संक्रमित होणा-या दोषांना अनुवांशिक दोष म्हणतात. जनुकात झालेल्या उत्परिवर्तनामुळे किंवा गुणसुत्रात असाधारण बदल झाल्यास असे दोष निर्माण होतात.

१. वर्णकहीनता – ही माणसे मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य संश्लेषित करु शकत नाही. प्रखर सुर्यप्रकाशात त्यांच्या शरीरावर पुरळ येतात. डोळ्यांना तेज प्रकाश सहन होत नाही.

२. हिमोफिलीया- या व्यक्तीस जखमा झाल्यास रक्त न गोठल्यामुळे ती व्यक्ती अतिरक्त स्त्रावाने मृत्यू पावते. सामान्यतः पुरुषांमध्ये आढळतो. रक्ताच्या नात्यात विवाह करणा-यांना हा आजार होतो. ३.

रंगाधळेपणा – विशेषतः लाल व हिरव्या रंगातील फरक ओळखता येत नाही. रंगांधळेपणा तपासणीसाठी इसिहरा टेस्ट करतात.

४. मतिमंदता – मानवी गुणसूत्रांच्या २३ जोड्यांपैकी २१ व्या जोडीत एक गुणसूत्राची वाढ झाल्यास जन्माला येणारे मूल मतिमंद असते.

५. टर्नर सिंड्रोम – नपुंसक स्त्री

६. डाउन्स सिंड्रोम ( मंगोलिजम) – मंदबुध्दीत्व

७. क्लीनेफेल्टर सिंड्रोम – नंपुसक पुरुष, यात ४७ गुणसूत्रे आढळतात.

वरील रोगांशिवाय sickle cell Anaemic (Red Cell) हा रोग आफ्रिका खंडात आढळतो.

इतर रोग
रोग कारण उपाय व वैशिष्ट्ये
खरुज सारकॉप्टिस स्केबी या बाह्य परजीवीमुळे होतो. हा संधीपाद प्राणी आहे. बेंझिल बेंझोएट आणि गंधकाचे मलम
क्षयरोग (TB) Mycobactrium Tuberculosis जीवाणूमुळे होतो. लस – बॅसिलस ग्लायमेट गुएरीन (BCG) जन्माला आल्याबरोबर देतात
टायफाईड बॅसिलस टायफस सॅल्मोनेला टायफी जीवाणू TAB लसी करण, क्लोरोमायसिटिन
ऍन्थ्रॅक्स बॅसिलस ऍन्थ्रॅसिस जीवाणू जनावरे, शेळ्या, मेंढ्यापासून माणसाला होतो.
डिप्थेरिया (घटसर्प ) Corinebaclerium dipatheria (डिप्थेरिया ऍटीटॉक्सिन) D.P.T.लस देणे.
न्यूमोनिया डिप्लोकोकस न्यूमोनी जेटामायसिन
प्लेग पाश्चुरेला पेस्टीज जीवाणू पिसू,उंदीर वाहक असतात. प्रकार १. ब्युबोनिक २. न्यूमोनिक ३. सेप्टीसेमिक
धनुर्वात (Tetanus ) क्लोस्टिडिअम टिटनी जीवाणू मांसपेशी, खास करुन गळा व जबड्यात जोरदार आकस
डांग्या खोकला हिमोफीलस पर्टूसिस D.P.T.लस
बॅक्टेरिया शीगेला डिसेंट्री जीवाणू 777
डिसेंट्री
सुजाक निसेरिया गोनोराहा 77-
अमांश ऍन्टामिबा आदिजीव 77-
गरमी निसेरिया गोनोरोहा जीवाणू पेनिसिलीन, टेटासायक्लिन, स्पोक्टिनोमायसिन
सिफलिस ट्रैपोनेमा पेलिडिअम 77-
स्लिपिंका ट्रिपेनेसोमा आदिजीव
सिकनेस सी सी माशीमुळे प्रसार
पायरिया आदिजीव, हिरड्यातून येणे सी जीवनसत्व
काला आजार लिशमेनिया आदिजीव
दमा ( अस्थमा) कवक
रोगाचे नाव प्रभावित अवयव रोगाचे नाव प्रभावित अवयव
एक्झिमा त्वचा कावीळ, पित्त यकृत
गलगंड थायरॉईड ग्रंथी क्षयरोग फुफुसे
न्युमोनिया फुफुस ल्युकेमिया रक्त
प्ल्युरिसी छाती डिप्थेरिया गळा
मलेरिया प्लिहा (तांबड्या रक्त पेशी) टायफाईड मोठे आतडे
मोतीबिंदू डोळे पायरेलिया दात हिरड्या
मधुमेह स्वादूपिंड (पाणथरी) सुखा हाडे
मेनिंजायटिस मेंदू (मज्जारज्जू) रुमेरिज्म हाडांचा सांधा
कंजायटीव्हायटीस डोळे अमांश आतडे
घटसर्प घसा विषमज्वर मोठे आतडे
अर्धांगवायू चेतासंस्था सायनसायटिस हाडे
इसब त्वचा रेबीज चेतासंस्था
धनुर्वात चेतासंस्था कुष्ठरोग मज्जासंस्था
टॉन्सिलायटिस घशातील गाठ नेफ्रायटिस मुत्रपिंड
ग्लुकेमिया डोळा टिनियासिसे छोटे आतडे
सायनोसायटिस नाक अमिबीयासिस मोठे आतडे

संकीर्ण

इन्फ्लुएंझा हा सर्वात तीव्र संसर्गजन्य साथीचा रोग आहे.
शरीराचा भाग कायमचा सडून निकामी होतो –गँगरीन रोग
म. प्रदेश, राजस्थान राज्यात केसरी डाळीच्या सेवनाने होणारा रोग – लॅथिरिझम
इन्शुलिन हे रासायनिक दृष्ट्या पेप्टाईन ( प्रोटिन) आहे
धनुर्वात, डांग्या खोकला व घटसर्प लस – ट्रिपल व्हॅक्सिन (त्रिगुणी लस)
सर्वाधिक प्रमाणावर पसरलेला रोग – क्षयरोग
ऍनिमिया (रक्तक्षय) या रोगात शरीरातील हिमोग्लोबीन कमी होते, तर ल्युकेमिया या आजारात तांबड्या रक्त पेशींचा नाश होतो.
मानवी शरीरातील विषाणू प्रतिकारक प्रथिन – इंटरफेरॉन
कॅन्सर संबंधी रोगांचा आभ्यास करणारे शास्त्र – ऑकोलॉजी
चिकित्साशास्त्राचा जनक – हिप्पोक्रिटस
गोवर सोडून सर्व रोगांत शरीरजन्य प्रतिकार क्षमता निर्माण करता येते.
धनुर्वात व घटसर्प यांच्याविरुध्द शरीरजन्य व परोक्ष प्रतिकारक्षमता निर्माण करता येते.

शोध संशोधक
कुष्ठरोगावरील लस ऍरमन हॅन्सन
देवीची लस एडवर्ड जेन्नर
प्लास्मोडिअसम परजीवी लॅव्हेर्न
मलेरियाचे कारण रोनाल्ड रॉस
रेबीज लस संशोधन लुईस पाश्चर
रोग जंतूपासून होतात. पाश्चरायझेशन लुईस पाश्चर
सल्फा औषधे एग्मन
सुक्ष्म जीवाणू लिवेनहॉक
क्षयरोगाचे जंतू पटकीचे जंतू रॉबर्टहॉक
पटकी व प्लेग लस वाल्देमार मोर्डेकाय हाफ कीन
पोलिओ लस साल्क
कुष्ठरोगाचे जीवाणू डॉ. ए. हॅन्सन
पेनिसिलीन अलेक्झांडर फ्लेमिंग
बी.सी.जी लस कालमेट व गुएरिन
कांजण्या लस एडवर्ड जेन्नर
पीत ज्वर विषाणू डॉ. रीड
इन्फ्लुएंझा स्मिथ
विषाणूतील डीएनए बावडेन
गोवरचा विषाणू स्मिथ
घटसर्प जंतू फ्रेडीक लोहर
लसिकरणाचा जनक एडवर्ड जेन्नर
पोलिओ व्हायरस पापर
क्लोरोफार्म जेम्स सिम्पसन घटसर्प लस
धनुर्वात लस एमिल बेहरिंग
शुध्द पेनिसिलिन डॉ. फ्लोरो व डॉ. चेन
मेंढ्यांचा ऍन्थ्रॅक्स लुई पाश्चर
क्विनाईन रेबी इन्शुलिन एफ बेटिंग
होमिओपॅथी हाएनमन
रोग औषध रोग औषध
हिवताप क्विनाईन हत्तीरोग हेट्रेसन DEC गोळी
दमा सालब्यूटॉमॉल मधुमेह इन्शुलिन
न्यूमोनिया जेटामायसिन पोलिओ डीपीटी
कुष्ठरोग सल्फोन क्षयरोग स्ट्रेप्टोमायसिन, बीसीजी
विषमज्वर क्लोरोमायसिटीन कर्करोग केमोथेरपी, रेडिओथेरिपी
गेंगारिन पेनिसिलीन व सल्फाड्रग्ज क्षयरोग अय एन एच, रिफाम्सिन स्ट्रेप्टोमायसिन
कुष्ठरोग डॅप्सॉन, क्लोफोझॅमिन, रिफाम्सिन मलेरिया प्रोग्वाविल, क्लोरोक्विन, क्विनाईन, प्रोक्केन
विषमज्वर क्लोरोमायसेटीन, सेप्ट्रॉन, सिक्रॉम कॉलरा डुकारील

संकीर्ण

ताप उतरण्यासाठी उपयुक्त वनस्पती – गुळवेल
रक्तदाबावर उपयुक्त वनस्पती – सर्पगंधा ( सर्पसिल औषध)
मलेरियावरील क्विनीन (कोयनेल ) हे औषध सिंकोना झाडाच्या सालीपासून काढतात.
अफूच्या बोंडापासून काढलेले मार्फीन हे औषध वेदनाशामक आणि गुंगी आणणारे म्हणून प्रसिध्द आहे.त्याचा उपयोग झोपेच्या तक्रारीवरही होतो.
सदाफुलीपासून तयार केलेले रक्ताच्या कर्करोगावरील औषध – विलाकिस्टिन, तर नरक्या (अमृता ) वनस्पतीच्या खोडापासुन कॅन्सरवर उपयुक्त कॅफोथेसिन औषध काढतात.
कार्बोलिक ऍसिडद्वारे शस्त्रक्रिया करुन जंतू विरहित शस्त्रक्रियेचा शोध लावला –जोसेफ लिस्टर १८६५
खुप-या ( Cunjuctivitis) हा रोग विषाणूमुळे होतो ( डोळे येणे)
सापाच्या विषापासून मुंबईच्या हाफ किन इन्स्टिट्यूट मध्ये प्रतिविष तयार करतात.
मानवी शरीरातील Blood Bank म्हणून ओळखतात- प्लिहा
जीवाणूच्या शरीरातील विषाणूस बॅक्टेरियल फॅग म्हणतात.
कावीळ व टी.बी सारखे रोग दुधामार्फत पसरतात.
सायनाईडचा परिणाम तंतूकणिकेवर होऊन मृत्यु येतो.

1 टिप्पणी: