Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

गुरुवार, ३ मे, २०१२

संरक्षण सज्जता

संरक्षण सज्जता
भारतीय हवाईदल :

भारतीय हवाईदलाची स्थापना ८ ऑक्टोवर १९३२ साली करण्यात आली.

‘नभः स्पृर्श दीप्तम्’ ही घोषणा भारतीय हवाई दलाची आहे.

जगातील ४ क्रमांकाची वायुसेना भारताची आहे.

समुद्र प्रहारी ही भारतातील पहिली नौका हाताळण्यासाठी प्रदूषण नियंत्रक नौका पर्यावरण विषयक समस्या महाराष्ट्र शासनाने तटरक्षक दलाला उपलब्ध करून दिली.

जगातील सर्वात मोठी वैद्यकिय नौका : एम व्ही पीस आर्क ( चीन).

भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय – रक्षा भवन , दिल्ली येथे आहे.

आयएनएस दुनागिरी ही भारतीय नौदलातील नौका ऑक्टोबर २०१० मध्ये सेवेतून मुक्त करण्यात आली.

भारताची लढावू विमाने – सुखोई – ३० – एमकेआय , ऍवॅक्स, मिराज – २००० मिग – २७

आर्मामेन्ट रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट ऍण्ड एस्टॅब्लिशमेंट – एआरडीई – ही संस्था – पुणे येथे आहे.

अफगाणिस्तानमधून अमेरिका आपले सैन्य सन २०१४ पर्यंत मागे घेणार आहे.

भारतीय नौदलाच्या स्थापनेस २०१०-११ साली २५ वर्ष पूर्ण झाली म्हणजेच रौप्य महोत्सव वर्ष होते.

ब्राम्होस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी – २ डिसेंबर २०१० :

क्षेपनास्त्राची लांबी ८.४ मीटर , अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता ३०० किलो. हे क्षेपणास्त्र उंचीवरून जमीनीवरील एखाद्या लक्षाचा वेध घेवू शकते.

या क्षेपणास्त्राची मारक क्षमता – २९० कि.मी. हि चाचणी ओरीसा किनारपट्टीवरील बालासोर बेटावर चांदीपूर येथे घेण्यात आली.

जहाजावरून पाणबुडीचा वेद घेणारे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साह्याने बनविलेले पहिले पाणबुडी नाशक क्षेपणास्त्र – पुणे येथील संस्थेने विकसित केले.

स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन ट्रीटी अर्थात स्टार्ट करार :

हा करार अमेरिका आणि रशिया या दोन देशामध्ये झाला असून दोन्ही देशांनी त्यांच्याकडे असणारा अण्ववस्त्र साठा ६० टक्क्यांनी कमी करण्याच्या उद्देशाने केला.

या करारात अमेरिकेच्या सिनेटने डिसेंबर २०१० मध्ये मंजूरी दिली.

पवन हंस या कंपनीने जमिनीवर तसेच पाण्यावरून टेकऑफ व लँण्डींग करणारे विमान / सी प्लेन भारतात उपलब्ध करून दिले.

भारतातील अंदमान – निकोबार बेटावरील पर्यटनाला चालना देण्यासाठी ही प्लेन उपयोगी येईल.

अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स या गुप्तचर विभागाचे संचालक –डेनीस ब्लेअर यांनी मे २०१० मध्ये राजीनामा दिला.

नॅशनल इंटेलिजन्स ही १७ अमेरिकन गुप्तहर संस्थांची शिखर संस्था आहे.

ब्राह्योस क्षेपनास्त्र प्रकल्प प्रमुख ए. शिवथानू पिल्ले हे आहेत.

भारत व रशिया यांच्या संयुक्त प्रयत्नाने ब्राह्योस क्रुझ क्षेपणास्त्र बनविण्यात आले आहेत.

या क्षेपणास्त्राचा पल्ला २९० किलोमीटर आहे.

अफगाणिस्तानमध्ये अमेरिका व नाटो यांचे सुमारे १.२१ लाख सैन्य आहे.

बराक ओबामानी अजून तीस हजार सैन्य वाढविण्याची घोषणा केली.

भारतीय लष्करात महिलांना प्रवेश देण्यात आला :१९९२

लढाऊ विमाने चालविण्याचे काम महिलांकडे अजून दिलेले नाही .

संपूर्ण भारतीय बनावटीचे अणुभट्टी : ध्रुव

इंडियन मिलिटरी अकॅडमी : डेहराडून ( उत्तराखंड )

इन्टिग्रेटेड टेस्ट रेंज ( आयटीआर) –संचालक –एस.पी.दास

भारत रशियाकडून २०१२ पर्यंत आयएनएस गॉर्शकोव्ह ही विमान वाहू नौका विकत घेणार आहे.

देश गुप्तहेर संस्था

भारत - RAW, IB, NIA

पाकिस्तान - ISI

इस्त्राइल - मोसाद

अमेरिका - FBI, CIA

इंग्लंड - MI – 16

रशिया - KGB

चेतक हे भारतीय नौदल ताफायातील हेलीकॉप्टर आहे.

ईशान्य भारतात आसाममध्ये तेजपूर येथील हवाई तळावर सुखोई ही लढाऊ विमाने तर छाबुवा येथील हवाई तळावर मिग ही लढाऊ विमाने भारत सरकारने तैनात केली आहे.

अफगाणिस्तान व पाकिस्तानमधील अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी – फ्रँक रुगिएरो.

अफगाणिस्तानच्या संरक्षणासाठी अमेरिकन सैन्य तैनात केले आहे.

भारतातील सर्वात मोठे युध्दनौका निर्मितीचे केंद्र – माझगाव डॉक (मुंबई).

भारतातील सर्वात मोठे जहाज तोडणी केंद्र अलंग ( गुजरात) येथे आहे.

ब्राह्योस क्षेपनास्त्र कोणत्या लढाऊ विमानावर बसविले जाणार आहे : सुखोई – ३०

पाकिस्तानची क्षेपणास्त्रे : बाबर , रा – आद

अमेरिका CIA गुप्तचर एजन्सी प्रमुख : लिऑन पानेटा

शौर्य क्षेपणास्त्र :

हे भारताने विकसित केलेले आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे.

हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करते.

भारतीय हवाई दल जूलै २००९ मध्ये स्वतंत्र उपग्रह अवकाशात सोडणार आहे.

अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयास पेंन्टॅगॉन असे म्हटले जाते.

हे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे.

अर्जुन हा भारताचा रणगाडा आहे.

आकाश क्षेपणास्त्र हे भारताचे हवेतल्या हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.

तालिबान आंतकवाद्यांचे जन्मस्थळ – अफगाणिस्तान

देशातील महत्वाच्या संरक्षण शिक्षण संस्था

नॅशनल डिफेन्स कॉलेज – नवी दिल्ली

नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी ( एन. डी.ए.) – पुणे ( महाराष्ट्र )

कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट – सिकंदराबाद ( हैद्राबाद , आंध्र प्रदेश )

नॅशनल स्टाफ कॉलेज – वेलिंग्टन ( तामिळनाडू)

अग्नी ५ – क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाच्या संचालकपदी मिसाईल वुमन म्हणून ओळखल्या जाणा-या टेसी थॉमस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या क्षेपणास्त्रतील मारक क्षमता ५००० किलोमीटर असणार आहे.

अग्नि ३ या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५०० किलोमीटर आहे.

भारताने मे २०१० मध्ये पहिल्या लढाऊ स्वदेशी हेलिकॉप्टरची चाचणी घेतली. – ही चाचणी बंगळुरु येथे हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेडच्या कारखान्यात घेण्यात आली.

लष्करी प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे येथे आहे.

तेजस हे भारताचे स्वदेशी लढाऊ विमान आहे यांची चाचणी डिसेंबर २००९ मध्ये यशस्वी झाली.

केंद्रिय राखीव पोलीस दलाचे विशेष महासंचालक ( ऑपरेशन ग्रीनहंट प्रमुख ) =

विजय रमण

केंद्र सरकार माओवादी नक्षलवाद्यांच्या विरोधात मध्यप्रदेश, महाराष्ट्र , छत्तीसगढ , झारखंड या राज्यांत ऑपरेशन ग्रीन हंट ही मोहिम हाती घेत आहे. या मोहिमेचे ते प्रमुख आहेत.

नाग क्षेपणास्त्र : रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे.

टी -९० : टी -९० रणगाडे : भारत रशियाकडून विकत घेत आहे.

आकाश : जमिनीवरून आकाशात मारा करू शकते.

रणगाड्यावरून ही हवेत मारा करू शकते – आकाश हे पहिले विमानभेदी क्षेपणास्त्र आहे.

उच्च पदस्थ :

लष्कर प्रमुख – व्ही.के.सिंग (एप्रिल = २०१० पासुन )

नवे एअरचीफ मार्शल – प्रदीप नाईक

नौदल प्रमुख : ऍडमिरल निर्मल वर्मा

भारत जगातील सर्वाधिक सागरी किनारी पट्टी लाभलेला ५ वा देश आहे.

भारत फ्रान्स कडून विकत घेत असलेली पाणबुडी : स्कॉर्पेन.

भारत रशिया कडून विकत घेत असलेली विमानवाहू नौका : विक्रमादित्य.

कारगिल विजय स्मृती स्मारक = द्रास ( जम्मू काश्मिर)

एअर फोर्स अकॅडमी : दुंडिगल ( हैद्राबाद )

अफगाणिस्तान मध्ये अमेरिकेचे सुमारे ४७ हजार सैनिक आहेत

नौदलाचे तरंगते संग्रहालय – आयएनएस विक्रांत ( मुंबई)

ऍवॅक्स यंत्रणा ( एअरबोर्न वॉर्निंग ऍण्ड कंट्रोल सिस्टिम )

ही यंत्रणा इस्त्राइल कडून भारताने मिळविली

या यंत्रणे मुळे भारताच्या दिशेने येणारे क्षेपणास्त्रे व लढाऊ विमाने यांची अगोदरच माहिती सेना दलाला मिळेल

जगात अणुबाँम्ब असणारे देश : अमेरिका, रशिया, फ्रान्स, इंग्लंड , चीन, भारत उत्तर कोरिया, पाकिस्तान.

ड्रोन्स : अमेरिका वैमानिक रहित लढाऊ विमाने

ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडामी : (OTA) = चेन्नई ( तामिळनाडू)

माईक मुलेन : अमेरिका तिन्ही सेना दल प्रमुख ( जॉइंट चिफ ऑफ स्टाफ – अध्यक्ष )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा