Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

बुधवार, २ मे, २०१२

आरोग्य


आरोग्य


जागतिक आरोग्य संघटनेने २० ऑगस्ट २०१० रोजी स्वाईन फ्लू या रोगाची साथ आटोक्यात आल्याची घोषणा केली.

महाराष्ट्रात स्वाईन फ्ल्यू ने सर्वाधिक लोक पुणे शहरात दगावले गेले.

स्वाईन फ्लूची लस २००९ पासून इंजक्शनव्दारे व नाकाद्वारे उपलब्ध करू देण्यात आली होती.

हेरॉइन, चरस / हशीश , कोकेन हे अंमली पदार्थ आहे.

भारतातील पहिली स्वाईन फ्लूची लस – एचएनव्हीएसी

ही लस भारत बायोटेक या कंपनीने एच- १ एन -१ या स्वाईन फ्लूच्या विषाणूवर मात करणारी विकसित केली.

भारतातील पहिली ह्रदयरोपण शस्त्रक्रिया १९७४ साली डॉ. वेणुगोपाल यांनी दिल्ली येथे केली.

ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१० मध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीस या लागण झाली होती.

महाराष्ट्रात सर्वात जास्त एड्स रोगाचे रुग्ण मुंबईत आढळतात, तर दुसरा क्रमांक पुणे जिल्ह्याचा क्रमांक लागतो.

सिकलसेल ऍनिमिया आजार:

देशात सर्वात जास्त सिकलसेल ऍनिमिया आजाराचे रुग्ण छत्तीसगड राज्यात आढळतात.

हा आजार अनुवंशीक असून शरिरातील लाल पेशीमधील गिमोग्लोबिनच्या गुणसुत्रामध्ये विकृती आली तर होतो.

हा आजार आदिवासी बहुल भागातील लोकांना होण्याचे प्रमाण जास्त आहे.

या आजारावर अद्याप प्रभावशाली औषध तयार झालेले नाही.

एण्डोसल्फान या किटक नाशकावर केरळ सरकारने विक्रीस बंदी घातली .

या किटक नाशकामुळे मानसिक , लैंगिक व बौध्दीक विकृती बरोबरच अनेक प्रकारचे अपंगत्व येवून लोक मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण केरळमध्ये सर्वाधिक होते.

हे प्रभावशाली किटक नाशक कापूस,चहा व काजू यांच्या उत्पादनासाठी वापरले जाते.

भारताचा गर्भवती मातांच्या मृत्यूच्या प्रमाणात जगाच्या १३४ देशाच्या सर्वेक्षणामध्ये १२७ वा क्रमांक आहे.

सेव्ह द बेबी गर्ल हा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी राबविला जातो.

सेव्ह द बेबी गर्ल या उपक्रमाचे जनक – गिरिष लाड.

या उपक्रमा अंतर्गत सोनोग्राफी यंत्रणा सायलेंट ऑबझरवर लावले जाते.

परिणामी स्त्री भ्रुण निदान करण्याच्या नोंदी आपोआप होतात.

मलेरिया हा आजार प्लासमोडियम प्रजातीच्या परजीवीमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे.

मलेरिया हा आजार डासाद्वारे पसरतो हा शोध ब्रिटिश भारतीय शास्त्रज्ञ रोनाल्ड रॉस यांनी लावला.

मलेरियाचा प्रसार ऍनाफिलिस प्रजातीच्या डास चावल्यामुळे होतो.

मलेरियाचे अचुक निदान करण्यासाटी ऍन्टीजेण चाचणी करावी लागते.

१८ वी आंतराष्ट्रीय एड्स परिषद -२०१० – आयोजन – व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)

भारतात २७ लाख एचआयव्ही एड्स रुग्ण आहे.

अशुद्ध पाण्यामुळे होणारे रोग – हेपाटायटिस – बी, हेपाटायटिस – ई , गॅस्ट्रो , कॉलरा, टायफाईड, डायरिया.

मेडीकल कौन्सील ऑफ इंडियाचे अध्यक्ष केतन देसाई यांनी केलेला भ्रष्टाचार उघडकीस आला.

मेडीकल कौन्सील ऑफ इंडिया ही संस्था भारत सरकारने बरखास्त केली.

पुणे येथील सीरम इन्स्टीट्युटने नसोवॅक ही स्वाईन फ्लू विरोधी लस विकसित केली

ही लस रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी नाकाद्वारे देण्यात येते. सीरम इन्स्टीट्युटचे संचालक डॉ. सायरस पुनावाला हे आहेत.

कृषी व आरोग्य संघटनाच्या अहवालानुसार भारताची सध्या २२ टक्के लोकसंख्या उपोषण ग्रस्त आहे.

मध्यप्रदेश हे देशातील सर्वात उपोषीत राज्य आहे.

या राज्यातील सुमारे ३० टक्के लोकसंख्या उपोषणग्रस्त आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा