Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

बुधवार, २ मे, २०१२

कृषी


कृषी


सन २००९ -१० साली देशात सर्वाधिक आंबा उत्पादन उत्तर प्रदेशात झाले.

आंध्र प्रदेश दुस-या क्रमांकावर तर कर्नाटक तिस-या क्रमांकावर तर महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर राहिले.

केंद्र सरकारने सन २०१० -११ या सालासाठी जाहीर केलेल्या आधारभूत

किंमती :

गहू – प्रति क्विंटल – ११२० रूपये

मसूर दाळ – प्रति द्विंटल – २२५० रुपये

चनादाळ / हरबरादाळ – प्रति क्विंटल – २१०० रूपये

कापूस प्रति क्विंटल – ३००० रूपये

देशात सर्वाधिक टोमॅटो उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते.

मोसंबी पिकावर महाराष्ट्रात हायटोकथोरा हा रोग २०१० मध्ये पडला होता.

नारळ विकास बोर्ड – कोचीन ( केरळ ) येथे आहे.

कोकण कृषी विद्यापीठाने नारळ बागायत दारासाठी ट्रॅक्टर माउंटेड कोकोनट क्लाइंबरची निर्माती केली.

याच्या माध्यमातून झाडावरून नारळ काढणे सोयीचे होईल .

देशातील दुसरी सर्वात मोठी गुळाची बाजार पेठ– अंक पाले ( आंध्रप्रदेश ) येथे आहे.

महाराष्ट्र येथे देशातील सर्वात मोठी गुळाची बाजार पेठ आहे.

सन २००९ -१० साली देशात सर्वात जास्त उसाचे उत्पादन उत्तर प्रदेशात झाले. व दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा तर तिसरा क्रमांक तामिळनाडूचा लागतो.

सुवर्ण सब – १ ही भाताची संकरित जात महापुराच्या परिस्थितीतही टिकाव धरू शकते.

ही तांदूळाची नवीन जात भारतीय भात संशोधन संस्थेने विकसित केली आहे.

सन २००९ -१० यापूर्षी महाराष्ट्रात सरासरी साखर उतारा १०.५ टक्के मिळाला होता.

सन २००९-१० साली देशात सर्वाधिक गहु उत्पादन उत्तर प्रदेशात झाले. दुसरा क्रमांक पंजाबचा तर तिसरा हरियाणाचा व आठवा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो .

सन २०१० – ११ या साली महाराष्ट्र राज्य कापूस फणन आणि उत्पादक महासंघाच्या स्थापनेस २५ वर्ष ( रौप्य महोत्सवी वर्ष ) पुर्ण झाली.

महाराष्ट्र कापूस उत्पादन :

महाराष्ट्राच्या एकूण शेती क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र कापूस लागवडीखाली आहे.

देशाच्या एकूण कापूस उत्पादनापैकी २५ टक्के उत्पादन होते.

कापूस पिकाला योग्य भाव मिळावा म्हणून देशात सर्वप्रथम महाराष्ट्राने कापूस एकाधिकार योजना सुरू केली.

सन २००९ -१० साली देशात सर्वाधिक दुध उत्पादन उत्तर प्रदेशात झाले.

दुसरा क्रमांक आंध्र प्रदेशाचा तर महाराष्ट्राचा सातवा क्रमांक लागला.

सन २००९-१० साली देशात सर्वाधिक कांदा उत्पादन महाराष्ट्रात झाले.दुसरा क्रमांक कर्नाटक आणि तिसरा गुजरात लागतो.

पंजाब गहू उत्पादन :

देशातील एकूण गहू उत्पादनापैकी सुमारे २५ टक्के गहू उत्पादन या राज्यात घेतले जाते.

देशाच्या एकूण तांदूळ उत्पादनापैकी १५ टक्के तांदूळ उत्पादन या राज्यात घेतले जाते.

हेमांगी ही काकडाची तर प्राची ही घेवडा या भाजीपाला पिकाची संकरित जात आहे.

स्ट्रॉबेरी या पिकाला ब्रँड नेम मिळाले

महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी असे ब्रँड नेम देण्यात आले.

व्रँड नेम मिळालेली इतर उत्पादने – दार्जिलिंगचा चहा ( पश्चिम बंगाल),

येवला येथील पैठणी , जि. नाशिक ( महाराष्ट्र ), पुणेरी पगडा ( महाराष्ट्र)

अपेडा म्हणजे=

ऍग्रीकल्चरल अँण्ड प्रोसेस्ड फुड प्रॉडक्टस एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऍथॉरिटी

भरताचा जगात फळे, दुध, भाजीपाला उत्पादनात प्रथम क्रमांक आहे.

भारताचा जगात गहू उत्पादनात दुसरा तर चीनचा प्रथम क्रमांक लागतो .

चहा उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक आहे.

काजु उत्पादनात केरळचा प्रथम क्रमांक आहे.

काजू, चहा, – भारत प्रथम ( PSI पूर्व २२/०९/२००८)

कॉफी = प्रथम = ब्राझील , ६ वा = भारत

तांदूळ : पहिला = चीन , दुसरा = भारत

भारत उत्पादन राज्य :

१)गहू : उत्तरप्रदेश = प्रथम , दर हेक्टरी = पंजाब

२) तांदूळ = पश्चिमबंगाल = प्रथम, दरहेक्टरी = पंजाब

३) भुईमूग = गुजरात = प्रथम

कापूस = गुजरात

नारळ = प्रथम = भारत ( जगात)

द्राक्ष उत्पादन

महाराष्ट्रात सर्वात जास्त द्राक्ष उत्पादन नाशिक या जिल्ह्यात होते.

याशिवाय सांगली, सोलापूर ,पुणे , उस्मानाबाद, लातूर इत्यादी जिल्ह्यात द्राक्ष उत्पादन होते.

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी कोकणामध्ये विजय बंधारे बांधले आहेत.

विजय बंधारा हा दगडधोंडे आणि प्लॅस्टीकचे अवरण यापासून बांधला जातो.

कोकण कृषी विद्यापीठाच्या या विजय बंधा-याची संकल्पना केनिया देशाने स्वीकारलेली आहे.

कच्ची केळी, आंबे पिकविण्यासाठी कॅलशियम काबाईट या रासायनाचा वापर केला जातो.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी, जि. अहमदनगर यांनी हरभरा या पिकाच्या फुले जी- ५ , फुले जी- १२ विजय , विशाल, विराट, विहार, दिग्विजय या जाती विकसित केल्या.

भारतीय कृषी संशोधन संस्थेचे महासंचालक – डॉ. एस. अय्यपन हे आहेत.

फुले ०२६५ ही ऊसाची संकरीत जात आहे.

मिडो ऑर्चर्ड ही तंत्रज्ञान पध्दती पेरू झाडाच्या लागवडीसाठी वापरली जाते

पेरुच्या संकरित जाती – सरदार , ललित , अलाहाबाद, सफेदा इत्यादी.

केंद्रीय समशीतोषण कटिबंधीय फळ संशोधन संस्था – लखनौ ( उत्तर प्रदेश).

भारतातील सर्वात प्रमुख पीक – भात.

देशाच्या एकूण कृषी उत्पादनापैकी ६५ टक्के उत्पादन भारताचे होते.

भारतात ४५ दशलक्ष हेक्टरहून अधिक जमीन भात शेती खाली आहे.

शेतक-यांसाठी ग्रीन एफएग ९०.४ हे आकाशवाणी केंद्र सुरु करण्यात आले.

कापसावर मावा, तुडतुडे , पांढरी माशी , फुलकिडे,पिट्या ठेकून , हिरवी उंट आळी, पाने गुंडाळणारी आळी इत्यादी रोग पडतात.

कापूस , सोयाबीन , मुग , उडीद इत्यादी पिकांसाठी पिक विमा योजना लागू आहे.

पश्चिम बंगालमध्ये देशात सर्वात जास्त बटाटा उत्पादन घेतले जाते.

देशात सर्वात जास्त फळबागाखालील क्षेत्र महाराष्ट्रात आहे.

नाशिकचे द्राक्षे , नागपूरची संत्री, सांगोल्याचे डाळिंब प्रसिध्द आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त आंबा पीका खालील क्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यात आहे. तर दुसरा क्रमांक सिंधूदूर्गाचा लागतो.

महाराष्ट्रात काजू पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक सिंधूदुर्ग जिल्ह्यात आहे.

संत्री या फळपिकावर डिंक्या हा रोग पडतो.

गिरीराज व कलींगा ब्राऊन या कोंबड्यांच्या संकरित जाती आहेत.

देशातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ – सांगली.

मध्यवर्ती उस संशोधन केंद्र पाडेगांव यांनी को.एम. ०२६५ हि उसाची संकरीत जात निर्माण केली आहे.

कृषी पर्यटनाचे जनक पांडूरंग तावरे यांना म्हटले जाते.

भारतातील वाईन निर्मितीचे जनक शामराव चौगुले यांना म्हटले जाते.

भारतात सर्वाधिक पॉली हाऊस ( ग्रीन हाऊस ) चा वापर करणारे राज्य – महाराष्ट्र

ऑपरेशन फ्लड/ श्वेतक्रांती धवलक्रांती ही दुध उत्पादनाशी संबंधित आहे.

श्वेतक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरीयन हे आहेत.

भारत आंबा उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे.

रत्ना ही संकरित आंबा जात हापूस व निलम या दोन जातीच्या संकरातून तयार करण्यात आली.

नाफेड (NAFAD) : नॅशनल ऍग्रिकल्चरल को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. नाफेडचे अध्यक्ष : श्री. संजीव चोपडा .

देशातून कृषी मालाची निर्यात करण्याचे व्यवस्थापन पाहते.

भारतातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ : लासलगाव जि. नाशिक.

भारतातील उत्पादनानुसार पीक ,क्रमांक – तांदुळ , गहू, मका.

सेंट्रल इन्स्टिट्युट फॉर कॉटन रिसर्च – नागपूर

नॅशनल रिसर्च सेटर फॉर प्लान्ट बायोटेक्नॉलॉजी – नवी दिल्ली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा