Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

बुधवार, २ मे, २०१२

चलन



चलन

१ रुपयाच्या नोटा नाणे त्या पेक्षा कमी मुल्याची नाणे छापण्याचे व उत्तरदायित्व भारतीय अर्थ खात्याचे आहे.
१ रुपयाच्या नोटेवर अर्थ सचिव केंद्रीय अर्थ खाते यांची सही असते.
२ रुपये व त्यापेक्षा किंमतीच्या नोटा छापण्याचा अधिकार RBI चा आहे.
१ रुपयाच्या नाण्यासाठी शुध्द निकेल हा धातु वापरला जातो.
भारत सरकारच्या चार टाकसाळ आहेत. १) मुंबई (१८३०) २) कोलकाता (१९३०) ३) हैद्राबाद (१९५०) ४) नोएडा (१९८९)
टाकसाळ हे नाने निर्मिती व सोने- चांदीची पारख करण्याचे काम करतात.
RBI चे पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख हे होते.

छापकारखाने

१. करंन्सी नोट प्रेस, नाशिक – या प्रेस मध्ये ५, १०, ५०, १०० ,५०० व १००० च्या मूल्याच्या नोटा छापल्या जातात.

२. बँक नोट प्रेस, देवास ( म. प्रदेश) – या प्रेसमध्ये दोन विभाग आहेत. १) प्रिटिंग प्रेस २) शाई बनविण्याची फॅक्टरी

येथे २०, ५०, १००, ५०० च्या किंमतीच्या नोटा छापल्या जातात.
शाल्विनी (प. बंगाल) आणि म्हैसूर मध्ये RBI नोट मुद्रण ( प्रा. लि.) मध्ये RBI च्या नियंत्रणात करंन्सी नोटा छापल्या जातात.

१) इंडिया सिक्यूरिटी प्रेस, नाशिक – यामध्ये दोन विभाग आहेत १) स्टॅम्प प्रेस २) सेंट्रल स्टॅप डेपो. स्टॅप प्रेसमध्ये पोस्टाची सामुग्री, पोस्टाची व इतर तिकिटे, ज्युडिशिअल आणि नॉन ज्युडिशिअल स्टॅप RBI / SBI चे चेक, बाँन्ड, राष्ट्रीय बचत पत्र, इंदिरा विकास पत्र, किसन विकास पत्र, पोस्टल ऑर्डर, पासपोर्ट, प्रॉमिसरी नोट्स, केंद्र सरकार व राज्य सरकारांची प्रतिभूती छापले जाते.

२) सिक्यूरिटीज प्रिंटिंग प्रेस हैद्राबाद – दक्षिणात्य राज्यांसाठी पोस्ट कार्ड, आंतरदेशीय पत्र, लिफाफे, संपुर्ण देशासाठी केंद्रीय राजस्व स्टॅम्प छापले जातात.( केंद्रीय उत्पादन कराचे तिकीट)

नाशिकच्या प्रेसला मदत म्हणून नॉन ज्युडिशियल स्टॅप छापले जातात. ५) सिक्यूरीटीज पेपर मिल, हौशिंगाबाद ६) (म. प्रदेश) – येथे करंसी ( चलन ) आणि बँक नोटांचा कागद तसेच इतर सिक्यूरीटीजचा कागद बनविला जातो.
भारताची नवी आधुनिक टाकसाळ चेरापल्लीला आहे.
गांधीजींच्या चित्राच्या नोटा प्रसिध्द – १९६९,१९८७
नेहरुंचे चित्र चलनी नाण्यावर सर्वप्रथम – १९६४,१९८८
आंबेडकरांचे चित्र असणारे नाणे – १९९१
इंदिरा गांधींचे चित्र असणारे नाणे-१९९२
राजीव गांधीचे चित्र असणारे नाणे-१९९२

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सागर सम्राटच्या ( समुद्रात खनिज तेलासाठी विहीरी खोदणारे जहाज १९ फेब्रुवारी १९७४ कार्यास सुरुवात) अभूतपुर्व कामगिरीचा गौरव म्हणून १ रु. च्या व नवीन १००० रु. च्या नोटेवर सागर सम्राटाची प्रतिकृती छापली आहे.

१००० रु. च्या नोटा २२ वर्षानंतर चलनात आल्या. – ९ ऑक्टोबर २०००
पैसा म्हणजे कोणतीही वस्तु की जिच्याद्वारे सर्व व्यवहारांची पुर्तता करण्यासाठी देणे (ऋण देण्यासाठी) देण्याचे साधन म्हणून जी वस्तू स्विकारली जाते तिला पैसा म्हणतात. अनेक स्थळी अनेक वेळी वेगवेगळ्या वस्तू पैसा म्हणून वापरल्या गेल्या आहेत. उदा –धान्य, जनावरे, धातू, धातूचे नाणे, कागदी नोटा इ. वापरल्या गेल्या. भारतात सध्या पैशामध्ये नाणी, कागदी चलन व व्यापारी बँकांच्या चालू ठेवींचा समावेश होतो.

पैशाच्या पुरवठ्याचे मोजमाप –

१९६७-६८ पर्यंत पैशाच्या पुरवठ्याची एकच एक संकल्पना प्रसिध्दी केली. त्या संकल्पनेला M असे म्हटले गेले. या पैशाच्या पुरवठ्यात (M मध्ये ) लोकांच्या जवळील चलन आणि लोकांच्या व्यापारी बँकातील चालू ठेवी यांचा समावेश केला. या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेला संकुचित संकल्पना असे म्हटले गेले.
१९६७-६८ नंतर मात्र RBI ने पैशाच्या संकुचित संकल्पनेशिवाय पैशाच्या पुरवठ्याची व्यापक संकल्पना प्रसिध्द केली. त्या संकल्पनेला समग्र मौद्रीक संसाधने (M3) असे म्हटले जाते.
मौद्रीक संसाधनामध्ये संकुचित मोजलेला पैसा / संकुचित व्याख्या केलेला पैसा ( म्हणजे चलन आणि चालू ठेवी ) आणि लोकांच्या अधिक व्यापारी बँकांच्या मुदत ठेवी यांचा समावेश समग्र मौद्रीक संसाधने यांच्या मध्ये केला जातो. समग्र मौद्रीक संसाधनाला असे M3 म्हटले आहे.
एप्रिल १९७७ पासून RBI पैशाच्या चार पर्यायी संकल्पनेवर आकडेवारी प्रसिध्द करत आहे. ह्या नवीन संकल्पना M1, M2, M3 आणि M4 असे म्हणटले जाते.
M1 - लोकांकडे असलेले चलन म्हणजे नोटा आणि नाणी, बँकामधील मागणी ठेवी तसेच आरबीआय जवळील इतर ठेवी.
M2- M1 + लोकांनी पोस्टात ठेवलेल्या बचत ठेवी
M - M1 + बँकातील निव्वळ मुदत ठेवी
M4- M3 + लोकांच्या पोस्ट खात्यात ठेवलेल्या वेगवेगळ्या मुदतीच्या ( बचत ठेवी व्यतिरिक्त) ठेवी ( पोस्ट ऑफीस बचत संघटने जवळील बचत यात राष्ट्रीय बचत पत्राचा समावेश नाही.)
M1 ला संकुचित तर पैसा तर M3 ला व्यापक पैसा संकल्पना म्हणतात. तर M4 हे मुद्रा पुरवण्याचे सर्वात विस्तृत माप आहे. परंतु ते रद्द करण्यात आले आहे

चलन वाढ -

पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाली पण त्याच वेळी पैशाच्या मागणीत वाढ न झाल्यामुळे जर प्रचंड भाववाढ झाली तर त्याला चलन वाढ असे म्हणतात.
क्राउथर – ज्या स्थितीत पैशाचे मूल्य घटत जाते. किंमती वाढत असतात. ती स्थिती म्हणजे भाववाढ होय.पैशाचे मूल्य म्हणजे पैसा आपण दुस-याला दिला असता त्याच्या मोबदल्यात आपल्याला जेवढ्या वस्तू मिळतील तेवढ्या वस्तू म्हणजे त्या पैशाचे मूल्य होय. पैशाचे मूल्य म्हणजे पैशाची खरेदी शक्ती (Purchasing Power) होय.
चलन वाढीची कारणे ;-

१) कागदी चलन वाढ (M1 मध्ये वाढ) झाल्यामुळे जी चलनवाढ घडून येते तिला कागदी चलन वाढ असे म्हणतात.

२) पत निर्मितीमुळे जी चलन वाढ घडून येते तिला पत निर्मिती चनल वाढ म्हणतात.

३) तुटीचा अर्थ भरणा केल्यामुळे चलन वाढ होते.

४) परकीय कर्जाचा पुरवठा झाल्यामुळे चलन वाढ होते.

५) सरकारी खर्च तसेच सरकारच्या अनुत्पादक खर्चात वाढ झाल्यास चलन वाढ होते.

६) मागणी निर्मित चलन वाढ – ज्या वेळी वस्तूचा जेवढा पुरवठा करणे शक्य असते त्या पेक्षा अधिक वस्तूची मागणी निर्माण झाली तर जी भाववाढ म्हणजेच चलन वाढ होते त्यालाच मागणी निर्मित चलन वाढ असे म्हणतात.

चलन वाढीचे / भाववाढीचे परिणाम ः-

१) उत्पादनावर होणारे परिणाम – भाववाढीच्या सुरुवातीच्या काळात उद्योजक वस्तूचे उत्पादन वाढतात त्यामुळे बेकारी कमी होते परंतु, भाववाढ होतच राहिल्यास वस्तूच्या किंमती खुप वाढल्या तर वस्तुची मागणी घटते.त्यामुळे उत्पादन पडून राहते. उद्योजक वस्तू उत्पादन कमी करतात त्यामुळे बेकारीची अवस्था निर्माण होते. बेकारीमुळे वस्तूची मागणी कमी होऊन अर्थव्यवस्थेत मंदी येते.

२) विभाजनावर होणारे परिणाम – अ) श्रमिक – याघटकाचे वेतन कायम राहते किंमत वाढ झाली तर तो गरीब बनतो त्याचे राहणीमान खालावते.

ब) भूमी- या घटकाचा खंड अगोदरच ठरलेला असतो परंतु, किंमत वाढीमुळे वस्तूच्या किंमती वाढल्यामुळे त्याचे राहणीमान खालावते.

क) धनको / भांडवलदार / कर्जपुरवठा करणारा – पैशाचे मूल्य कमी झाल्याने धनकोंना तोटा होतो कारण, व्याज दर अगोदर ठरलेला असल्याने तो कमी असतो.

ड) संयोजक – चलन वाढीमुळे संयोजकाचा नफा वाढतो.

संकीर्ण

वस्तू व सेवा यांचा प्रवाह उद्योग संस्थांकडून कुटूंबाकडे वाहतो त्याच वेळी खर्चाचा (पैसा) प्रवाह कुटूंबाकडून उद्योग संस्थांकडे वाहतो.

उत्पादक घटकांची खरेदी विक्री जेथे चालते त्याला घटक बाजार असे म्हणतात.

मागणी व पुरवठा नेहमीच समान असतात असे से (जे. बी.से.) चा नियम सांगतो कारण, त्यांच्या मते प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेत एकूण मागणी व एकूण पुरवठा समान असतो.
पैशाचे मुल्य व किंमत या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
जेव्हा एखाद्या वस्तूचे मूल्य हे पैशात सांगितले जाते तेव्हा त्यांना त्या वस्तूची किंमत म्हणतात.
क्राऊथर यांच्या मते आवाजवी चलन विस्तार म्हणजे अशी व्यवस्था की ज्यामुळे पैशाचे मूल्य कमी होते म्हणेच वस्तूच्या किंमतीत वाढ होते.
वस्तूच्या किंमती घसरल्या असता वस्तूची मागणी वाढते,
मुद्रेची वस्तू व सेवा खरेदी करण्याची क्षमता म्हणजे क्रय शक्ती होय.
वस्तूच्या अंगी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे वस्तूची उपयोगिता होय.
अर्थशास्त्राच्या मते ग्राहकांचा वस्तू करण्यामागे गरज भागविणे, समाधान मिळाविणे, उपभोग घेणे हा आधार आहे.
सतत एकाच वस्तूच्या उपभोगापासून मिळणारी वस्तूची उपयोगीता घटत जाणे याला घटत्या उपयोगीतेचा सिध्दांत असे म्हणतात
अर्थशास्त्राच्या भाषेत उत्पादन म्हणजे उपयोगीतेची निर्मिती होय.
बाजारपेठेतील मक्तेदारी म्हणजे एका वस्तूचा एकच विक्रेता होय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा