Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१२

mpsc current 151 to 175

Friday 23 December 2011
प्रश्नमंजुषा -151

1. खडकवासला विधानसभा मतदार संघ हा कोणत्या लोकसभा मतदार संघाचा भाग आहे?

A. पुणे
B. बारामती
C. सातारा
D. मावळ

Click for answer
B. बारामती

2.खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त आढळते ?

A. सातारा
B. आंबोली
C. अलिबाग
D. नागपूर

Click for answer
D. नागपूर

3. गोपाळ हरी देशमुख हे कोणत्या टोपण नावाने प्रसिध्द होते ?

A. सुधारक
B. न्यायमूर्ती
C. लोकहितवादी
D. मवाळ नेते

Click for answer
C. लोकहितवादी
4. राष्ट्रीय चित्रफीत संग्रहालयाचे मुख्य केंद्र खालीलपैकी कोठे आहे ?

A. मुंबई
B. औरंगाबाद
C. कोल्हापूर
D. पुणे

Click for answer
D. पुणे

5. विश्वकोश या प्रसिध्द मराठी ज्ञानकोशाचे संपादन खालीलपैकी प्रामुख्याने कोणी केले ?

A. पां.वा.काणे
B. लक्ष्मणशास्त्री जोशी
C. भीमराव आंबेडकर
D. विजया वाड

Click for answer
B. लक्ष्मणशास्त्री जोशी
6. तिसरे इंग्रज-मराठा युद्धातला मराठ्यांचा सेनापती कोण होता ?

A. त्रिंबकजी डेंगळे
B. गंगाधर शास्त्री
C. बापू गोखले
D. यशवंतराव होळकर

Click for answer
C. बापू गोखले

7. महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ?

A. चार
B. पाच
C. सहा
D. सात

Click for answer
C. सहा

8. "औंढा नागनाथ" हे प्रसिध्द ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. बीड
B. परभणी
C. औरंगाबाद
D. हिंगोली

Click for answer
D. हिंगोली

9. इ.स.1857 चा उठाव नागपूर येथे अयशस्वी का झाला ? त्याचे महत्त्वाचे कारण कोणते ?

A. नागपूर येथे राष्ट्रवादी भावनेचा अभाव होता.
B. ब्रिटिशांकडे आधुनिक शस्त्रास्त्रे होती.
C. नागपूरकरांमध्ये एकवाक्यता नव्हती.
D. नागपूरची राणी बाकाबाई हि ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिली.

Click for answer
D. नागपूरची राणी बाकाबाई हि ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिली.
10. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?

A. 1 मे 1961
B. 1 मे 1960
C. 15 ऑगस्ट 1960
D. 26 जानेवारी 1961

Click for answer
B. 1 मे 1960
========================================================================
Saturday 24 December 2011
प्रश्नमंजुषा -152

1. रोजगार हमी योजनेंतर्गत खालीलपैकी कोणता प्रकल्प अंतर्भूत केलेला नाही ?

A. मृदुसंधारण
B. रस्ते विकास
C. विमानतळ विकास
D. जलसिंचन

Click for answer
C. विमानतळ विकास
2.खालीलपैकी कोणते तत्त्वज्ञान सत्यशोधक समाजाचे नाही ?

A. जगात ईश्वर एकच असून त्याचे स्वरूप सर्वव्यापी , निर्गुण व निराकारी आहे.
B. सर्व मानवप्राणी त्याची लेकरे आहेत.
C. भिन्न भिन्न धर्मामध्ये ईश्वरविषयक विविध कल्पना असल्या तरी ती सर्वशक्तिमान अशा एकाच परमेश्वराची स्वरूपे आहेत असे मानणे.
D. मनुष्य प्राणी हा गुणाने श्रेष्ठ ठरतो, जातीने नाही.

Click for answer
C. भिन्न भिन्न धर्मामध्ये ईश्वरविषयक विविध कल्पना असल्या तरी ती सर्वशक्तिमान अशा एकाच परमेश्वराची स्वरूपे आहेत असे मानणे.

3. खालीलपैकी महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते ?

A. नागपूर
B. पुणे
C. मुंबई
D. अमरावती

Click for answer
A. नागपूर

4. बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे?

A. पंजाब व हरियाणा
B. महाराष्ट्र व गोवा
C. आंध्रप्रदेश व तामिळनाडू
D. केरळ व कर्नाटक

Click for answer
C. आंध्रप्रदेश व तामिळनाडू
5. विष्णुशास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्रातून विधवांच्या दु:खांना वाचा फोडली?

A. संवाद कौमुदी
B. पुना ऑब्झर्व्हर
C. सुधारक
D. इंदुप्रकाश

Click for answer
D. इंदुप्रकाश

6. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?

A. महाबळेश्वर
B. कळसूबाई
C. अस्तंभा
D. साल्हेर

Click for answer
B. कळसूबाई

7. खालीलपैकी कोणती बँक व्यक्तिगत खाते उघडण्यास प्रतिबंध करते?

A. स्टेट बँक ऑफ इंडिया
B. रिझर्व्ह बँक
C. युनियन बँक
D. कॅनरा बँक

Click for answer
B. रिझर्व्ह बँक
8. महाराष्ट्रातील पहिल्या बंडखोर विचारवंत ज्यांनी 'स्त्री-पुरूष तुलना' नावाचा ग्रंथ लिहिला त्यांचे नाव काय?

A. रमाबाई रानडे
B. ताराबाई शिंदे
C. सावित्रीबाई फुले
D. पंडिता रमाबाई

Click for answer
B. ताराबाई शिंदे

9. महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती आहे?

A. नर्मदा
B. तापी
C. भीमा
D. गोदावरी

Click for answer
D. गोदावरी

10. महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. ठाणे
B. औरंगाबाद
C. रायगड
D. सिंधुदुर्ग

Click for answer
D. सिंधुदुर्ग
========================================================================
Sunday 25 December 2011
प्रश्नमंजुषा -153

1. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेले नव्हते ?

A. सुधारक
B. जनता
C. समता
D. प्रबुध्द भारत

Click for answer
A. सुधारक

2.डॉ.इंदिरा आहुजा या खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील तज्ञ समजल्या जातात?

A. स्त्री रोग
B. वारली चित्रकला
C. नृत्यक्षेत्र
D. समाजकार्य

Click for answer
A. स्त्री रोग
3. महाराष्ट्रातील हळद आणि आले यांचे उत्पादन करणारे जिल्हे कोणते ?

A. सातारा आणि सांगली
B. कोल्हापूर आणि पुणे
C. परभणी आणि नांदेड
D. कोल्हापूर आणि सोलापूर

Click for answer
A. सातारा आणि सांगली

4. महाराष्ट्रात 'मालवणी ' हि भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते ?

A. पश्चिम महाराष्ट्र
B. खानदेश
C. कोकण
D. पठार

Click for answer
C. कोकण

5. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे ?

A. अकोला
B. हिंगोली
C. वाशीम
D. मुंबई शहर

Click for answer
D. मुंबई शहर
6. ब्रिटीश सत्तेविरुध्द उठाव करणारे क्रांतिकारक उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांच्यासमोर कोणाचा आदर्श होता ?

A. न्या.म.गो.रानडे
B. छत्रपती शिवाजी महाराज
C. गणेश वासुदेव जोशी
D. स्वा.वि.दा.सावरकर

Click for answer
B. छत्रपती शिवाजी महाराज

7. मँगेनीजचे साठे महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?

A. नागपूर
B. वाशीम
C. चंद्रपूर
D. गडचिरोली

Click for answer
A. नागपूर

8. भारताने आजपर्यंत किती आण्विक चाचण्या केल्या ?

A. दोन
B. एक
C. पाच
D. सहा

Click for answer
D. सहा

9. राष्ट्रीय सभेची (काँग्रेस) स्थापना होण्यापूर्वी अखिल भारतीय चळवळीचे केंद्र बनावी यासाठी कोलकाता येथे कोणती राजकीय संघटना कार्यरत होती ?

A. सार्वजनिक सभा
B. महाजन सभा
C. प्रार्थना सभा
D. इंडीयन असोसिएशन

Click for answer
D. इंडीयन असोसिएशन

10. महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते ?

A. औष्णिक
B. जलविद्युत
C. पवनविद्युत
D. इंडीयन असोसिएशन

Click for answer
D. अणुउर्जा
========================================================================
Monday 26 December 2011
प्रश्नमंजुषा -154

1. 5 जून हा दिवस ____________ म्हणून साजरा केला जातो.

A. पर्यावरण दिन
B. शिक्षक दिन
C. साक्षरता दिन
D. महिला दिन

Click for answer
A. पर्यावरण दिन

2. 7 सप्टेंबर 2011 रोजी शक्तिशाली बॉम्बस्फोट झालेले भारतातील शहर कोणते ?

A. मुंबई
B. हैद्राबाद
C. दिल्ली
D. चंदीगड

Click for answer
C. दिल्ली
3. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते स्थळ 'युनेस्कोने' जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले नाही ?

A. अजंठा लेणी
B. एलिफंटा लेण्या
C. छत्रपती शिवाजी टर्मिनस
D. महाबळेश्वर

Click for answer
D. महाबळेश्वर

4. 'डाँग फेंग 21 डी' हे नाव कशाशी संबंधित आहे ?

A. उपग्रह
B. क्षेपणास्त्र
C. शस्त्रास्त्र
D. अण्वस्त्र

Click for answer
B. क्षेपणास्त्र
5. MKCL च्या __________शाखेमुळे महाराष्ट्रातील लोकांना संगणक शिक्षण घेण्याची सोय अधिक सुलभ झाली आहे.

A. DTH
B. ETH
C. STD
D. यापैकी नाही

Click for answer
B. ETH

6. 5 फेब्रुवारी 2011 रोजी अत्याधुनिक 'सी-130 हर्क़्युलिस' हे विमान भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केले ?

A. इंग्लंड
B. रशिया
C. यु.एस.ए.(अमेरिका)
D. चीन

Click for answer
C. यु.एस.ए.(अमेरिका)

7. इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे किमान वय किती असावे लागते ?

A. 60
B. 65
C. 58
D. 55

Click for answer
B. 65

8. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये किती ग्राम न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय राज्यशासनाने सप्टेंबर 2011 मध्ये जाहीर केला ?

A. 15
B. 30
C. 40
D. 45

Click for answer
B. 30

9. 2010 हे वर्ष युनोतर्फे __________ वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

A. महिला वर्ष
B. पर्यावरण रक्षण वर्ष
C. आंतरराष्ट्रीय जैवविविधता वर्ष
D. दहशतवाद विरोधी वर्ष

Click for answer
C. आंतरराष्ट्रीय जैवविविधता वर्ष

10. भारतीय संविधानाच्या 113 व्या घटनादुरुस्तीन्वये कोणत्या राज्याचे नाव बदलण्यात आले ?

A. बिहार
B. ओरिसा
C. मध्यप्रदेश
D. अरुणाचल प्रदेश

Click for answer
B. ओरिसा
========================================================================
Wednesday 28 December 2011
प्रश्नमंजुषा -155

1. ऑक्टोबर 2011 च्या विधानसभा पोटनिवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून आला?

A. काँग्रेस
B. राष्ट्रवादी काँग्रेस
C. भाजपा
D. महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Click for answer
C. भाजपा

2. विशेष पटपडताळणी कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची शाळांमधील हजेरी तपासण्याचे काम सुरु करण्यासाठी शासनाने परिपत्रक केव्हा काढले ?
A. जून 2010
B. जुलै 2010
C. ऑगस्ट 2011
D. सप्टेंबर 2011

Click for answer
D. सप्टेंबर 2011
3. छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती ?

A. रायपूर
B. बंकुरा
C. मालडा
D. नडिया

Click for answer
A. रायपूर

4. आंध्रप्रदेशात कोणत्या मागणीसाठी ऑक्टोबर 2011 मध्ये रेल-रोको आंदोलन केले गेले ?

A. वेगळे तेलंगणा राज्य
B. महागाईच्या विरोधात
C. विद्यार्थी फी वाढ
D. संपूर्ण विकासासाठी

Click for answer
A. वेगळे तेलंगणा राज्य

5. महिलांच्या 12 व्या मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक कोणाला मिळाले ?

A. पी.टी.उषा
B. मेरी कोम
C. सानिया मिर्झा
D. दीपिका

Click for answer
B. मेरी कोम
6. 1 जून 2011 ला कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली ?

A. आंध्रप्रदेश
B. तामिळनाडू
C. केरळ
D. झारखंड

Click for answer
D. झारखंड
7. कोणत्या देशात 42 वर्षाच्या हुकूमशाहीचा ऑक्टोबर 2011 मध्ये अंत झाला ?

A. लिबिया
B. इराण
C. इराक
D. जर्मनी

Click for answer
A. लिबिया

8. गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी पास झाला ?

A. 1992
B. 1993
C. 1994
D. 1995

Click for answer
C. 1994

9. कारगील प्रश्न कोणत्या दोन देशांचा होता ?

A. भारत-चीन
B. भारत-बांगलादेश
C. भारत-पाकिस्तान
D. भारत-नेपाळ

Click for answer
C. भारत-पाकिस्तान

10. शेतकर्‍यांनी पाण्याची बँक कोणत्या जिल्ह्यात ऑक्टोबर 2011 मध्ये सुरु केली ?

A. सातारा
B. पुणे
C. कोल्हापूर
D. नागपूर

Click for answer
A. सातारा
========================================================================
Wednesday 28 December 2011
प्रश्नमंजुषा -156

1. 'राईट टू रिकॉल ' ची मागणी भारतात कोण करत आहे ?

A. राहुल गांधी
B. राज ठाकरे
C. अण्णा हजारे
D. लालकृष्ण अडवाणी

Click for answer
C. अण्णा हजारे

2. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला केव्हा झाला ?

A. 11 सप्टेंबर 2011
B. 12 सप्टेंबर 2011
C. 25 सप्टेंबर 2011
D. 26 सप्टेंबर 2011

Click for answer
A. 11 सप्टेंबर 2011

3. भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी कोठे घेतली ?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. मध्यप्रदेश
D. राजस्थान

Click for answer
D. राजस्थान

4. संयुक्त राष्ट्रांचा जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे ?

A. 10 जून
B. 5 जून
C. 15 जून
D. 20 जून

Click for answer
B. 5 जून
5. 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली ?

A. ब्राझिल
B. जपान
C. न्यूझीलंड
D. चीन

Click for answer
A. ब्राझिल

6. भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारली गेली ?

A. 26 नोव्हेंबर 1949
B. 26 डिसेंबर 1949
C. 26 जानेवारी 1949
D. 26 जानेवारी 1950

Click for answer
A. 26 नोव्हेंबर 1949

7. 2010 मध्ये 'नर्मदा बचाव' आंदोलनाने किती वर्ष पूर्ण केली ?

A. 25
B. 15
C. 50
D. 30

Click for answer
A. 25
8. महाराष्ट्रातील विधानपरिषदेत किती सदस्य आहेत ?

A. 78
B. 77
C. 76
D. 79

Click for answer
A. 78

9. खालीलपैकी कोण तेराव्या वित्त(2010-2015) आयोगाचे अध्यक्ष आहेत ?

A. सी.रंगराजन
B. डॉ. विजय केळकर
C. डॉ. वाय.व्ही.रेड्डी
D. डॉ. एस.आचार्य

Click for answer
B. डॉ. विजय केळकर

10. बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

A. लालूप्रसाद यादव
B. शरद यादव
C. नितीश कुमार
D. रामविलास पासवान

Click for answer
C. नितीश कुमार
========================================================================
Thursday 29 December 2011
प्रश्नमंजुषा -157

1. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरणाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?

A. आ.ह.साळुंखे
B. हरी नरके
C. विनायक मेटे
D. हर्षवर्धन देशमुख

Click for answer
A. आ.ह.साळुंखे

2. 2010 चा 'मिस युनिव्हर्स 'किताब कोणी मिळवला ?

A. जीमेना नवारेत
B. युक्ता मुखी
C. निकोल फारिया
D. गिफ्टी ईमन्युअल

Click for answer
A. जीमेना नवारेत
3. _____________ हे महाराष्ट्रात पादत्राणे बनविण्यासाठी प्रसिध्द आहे.

A. सातारा
B. कोल्हापूर
C. पुणे
D. अमरावती

Click for answer
B. कोल्हापूर

4. _________ मध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते.

A. दुध
B. अंडी
C. हिरव्या पालेभाज्या
D. द्विदल धान्ये

Click for answer
C. हिरव्या पालेभाज्या

5. महाराष्ट्रात किती नगर परिषदा स्थापन करण्यात आल्या आहेत ?

A. 03
B. 05
C. 33
D. 221

Click for answer
B. 05
6. खालीलपैकी 'हिंदू ' ह्या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

A. आनंद यादव
B. नरेंद्र जाधव
C. मोहन धारिया
D. भालचंद्र नेमाडे

Click for answer
D. भालचंद्र नेमाडे

7. "आगाखान कप " ___________ खेळाशी संबंधित आहे.

A. हॉकी
B. फुटबॉल
C. क्रिकेट
D. गोल्फ

Click for answer
A. हॉकी

8. जुलै 2010 मध्ये महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश ह्या राज्यांमध्ये ____________ धरणामुळे पाणी वाटप प्रश्न निर्माण झाला.

A. टेंभली
B. बाभळी
C. पोचमपाड
D. श्रीरामसागर

Click for answer
B. बाभळी
मानसिक क्षमता चाचणी / अंकगणित

9. एका कुटुंबात चार सदस्य आहेत. त्यांच्या वयांची बेरीज 122 वर्षे आहे. वडील व मुलगा अनुक्रमे आई व मुलीपेक्षा
8 वर्षांनी मोठे आहेत. मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निमपट असेल तर मुलीचे वय किती असेल ?

A. 18 वर्षे
B. 15 वर्षे
C. 11 वर्षे
D. 23 वर्षे

Click for answer
B. 15 वर्षे
स्पष्टीकरण :
मुलाचे वय x वर्षे मानले तर वडिलांचे वय 2x असेल. म्हणजेच आईचे वय 2x-8 तर बहिणीचे वय x-8 वर्षे असेल.

एकत्रितपणे त्यांच्या वयांची बेरीज 122 वर्षे आहे.

म्हणून x+2x+(2x-8)+(x-8)=122

यावरून 6x-16=122

म्हणजेच 6x=122+16=138

x=138/6=23 वर्षे

मुलीचे वय x-8=23-8= 15 वर्षे असेल.
10. पाच निकालांची सरासरी 46 गुण आहे तर पहिल्या चार निकालांची सरासरी 45 गुण आहे. तर पाचव्या विषयात किती गुण मिळाले ?

A. 50
B. 1
C. 10
D. 12.5

Click for answer
A. 50
स्पष्टीकरण :
पाच गुणांची सरासरी 46 गुण असेल तर त्या विषयांत मिळालेल्या गुणांची एकूण बेरीज 46x5=230

पहिल्या चार निकालांची सरासरी 45 गुण म्हणजेच त्यातील एकूण गुण = 45x4=180

वरील दोन विधानांवरून पाचव्या विषयातील गुण = 230-180= 50 गुण
========================================================================
Saturday 31 December 2011
प्रश्नमंजुषा -158

1. माहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला?

A. द. आफ्रिका
B. ऑस्ट्रेलिया
C. यु.एस.ए.(अमेरिका)
D. स्विडन

Click for answer
D. स्विडन

2. माहितीचा अधिकार अधिनियम नुसार लोकसभेचे तत्संबंधित किंवा तदनुषंगिक बाबीं करिता 'सक्षम अधिकारी ' _____ असतील.
A. लोकसभेचे अध्यक्ष
B. लोकसभेचे उपाध्यक्ष
C. कायदा मंत्री
D. पंतप्रधान

Click for answer
A. लोकसभेचे अध्यक्ष
3. जर मागितलेली माहिती, एखाद्या व्यक्तीचे जीवित वा स्वातंत्र्य या संबंधातील असेल तर, विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून _______ च्या आत ती माहिती देण्यात येईल.

A. दोन दिवस
B. 48 तास
C. 24 तास
D. 6 तास

Click for answer
B. 48 तास

4. खालीलपैकी कोणती माहिती प्रकट करणे बंधनकारक नाही ?

A. विदेशी शासनाकडून विश्वास पूर्वक मिळालेली माहिती
B. जी प्रकट केल्याने संसदेच्या किंवा राज्य विधानमंडळाच्या विशेषाधिकारांचा भंग होईल अशी माहिती
C. जी प्रकट केल्याने न्यायालयाचा अवमान होईल अशी माहिती
D. वरीलपैकी सर्व

Click for answer
D. वरीलपैकी सर्व

5. प्रत्येक माहिती आयुक्त, पदधारणाच्या दिनांकापासून ________ वर्षाच्या कालावधीसाठी आपले पद धारण करेल.

A. 10
B. 2
C. 5
D. 7

Click for answer
C. 5

6. मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्तास, निलंबित करण्याआधी राष्ट्रपतींना __________ चा अभिप्राय घेवून त्यानुसार कारवाई करता येईल.

A. सर्वोच्च न्यायालय
B. विरोधी पक्ष नेता
C. पंतप्रधान
D. निवडणूक आयुक्त

Click for answer
A. सर्वोच्च न्यायालय

7. राज्य मुख्य माहिती आयुक्ताची व राज्य माहिती आयुक्ताची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या शिफारसी नुसार ______________ द्‍वारे केली जाते.

A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. विधानसभा

Click for answer
C. राज्यपाल

8. केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगास कोणत्याही बाबींची चौकशी करताना _________ चे अधिकार निहित करण्यात आले आहेत.

A. फौजदारी न्यायालय
B. चौकशी न्यायालय (ट्रायल कोर्ट)
C. सत्र न्यायालय
D. दिवाणी न्यायालय

Click for answer
D. दिवाणी न्यायालय
9. केंद्रीय जन माहिती अधिकारी किंवा राज्य जन माहिती अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात ________ दिवसांत अपील करता येते.

A. 20
B. 30
C. 40
D. 60

Click for answer
B. 30

10. अर्जदाराचे कोणतेही नुकसान अथवा अन्य हानीस जबाबदार सार्वजनिक प्राधिकरणाला भरपाई देण्याचे आदेश देण्याचे अधिकार _____________ ला आहे.

A. केंद्रीय माहिती आयोग / राज्य माहिती आयोग
B. केंद्रीय जन माहिती आयोग
C. राज्य जन माहिती आयोग
D. राज्यपाल

Click for answer
A. केंद्रीय माहिती आयोग / राज्य माहिती आयोग
========================================================================
Saturday 31 December 2011
प्रश्नमंजुषा -159

1. 'फेडरल कोर्ट ऑफ इंडिया' चे 'सर्वोच्च न्यायालयात ' रुपांतर कधी झाले ?

A. 26 नोव्हेंबर 1949
B. 26 जानेवारी 1950
C. 14 जानेवारी 1935
D. 9 डिसेंबर 1946

Click for answer
B. 26 जानेवारी 1950

2. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती _____________ कडून होते.

A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. अर्थमंत्री
D. सभापती

Click for answer
A. राष्ट्रपती
3. घटकराज्याचा 'संचित निधी ' सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे ?

A. मुख्यमंत्री
B. मंत्रीमंडळ
C. राज्यपाल
D. विधानसभा सभापती

Click for answer
C. राज्यपाल

4. घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली ?

A. आयर्लंड
B. यु.के.
C. यु.एस.ए.
D. ऑस्ट्रेलिया

Click for answer
C. यु.एस.ए.

5. राज्याच्या विधानपरिषदेत सदस्य संख्येपैकी किती सदस्यांची राज्यपालांकडून नियुक्ती केली जाते ?

A. 1/12
B. 1/3
C. 1/4
D. 1/6

Click for answer
D. 1/6

6. घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ आहे ?

A. विधानसभा
B. विधानपरिषद
C. राज्यसभा
D. लोकसभा

Click for answer
A. विधानसभा

7. विधानसभा सभागृहाची सदस्य संख्या मर्यादा __________ इतकी ठरविण्यात आली आहे.

A. 60 ते 500
B. 75 ते 300
C. 40 ते 450
D. यापैकी नाही

Click for answer
A. 60 ते 500

8. घटकराज्याचा राज्यपाल , विधानसभा ,विधानपरिषद मिळून घटकराज्याचे कायदेमंडळ तयार होईल असे घटनेच्या कोणत्या कलमात सांगितले आहे ?

A. कलम 168
B. कलम 171
C. कलम 169
D. कलम 75

Click for answer
A. कलम 168
9. भारतीय नागरिकांच्या ______ अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केल आहे.

A. समतेचा
B. स्वातंत्र्याचा
C. धर्माचा
D. संपत्तीचा

Click for answer
A. समतेचा

10. केंद्र व घटकराज्य यांच्यातील राजस्व विभाजन ___________ अधिनियमावर आधारित आहे.

A. अधिनियम 1920
B. अधिनियम 1967
C. अधिनियम 1935
D. अधिनियम 1974

Click for answer
C. अधिनियम 1935
========================================================================
Sunday 1 January 2012
प्रश्नमंजुषा -160

1. 'संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ' ही घोषणा कोणी केली ?

A. विनोबा भावे
B. महात्मा गांधी
C. लाल बहादुर शास्त्री
D. विनायक सावरकर

Click for answer
A. विनोबा भावे

2. इ.स.1854 मध्ये ________ यांनी मुंबई येथे कापडाची गिरणी सुरु केली.

A. कावसजी दावर
B. सर मंगलदास नथुभाऊ
C. मोरारजी गोकुळदास
D. दिनशा पेटीट

Click for answer
A. कावसजी दावर
3. मुळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्त्व कोणी केले ?

A. शंकरराव मोरे
B. केशवराव जेधे
C. सेनापती बापट
D. नारायण मेघाजी लोखंडे

Click for answer
C. सेनापती बापट

4. 'वेदांकडे वळा' असे कोणी म्हटले होते ?

A. रामकृष्ण परमहंस
B. राजा राम मोहन रॉय
C. स्वामी दयानंद सरस्वती
D. स्वामी विवेकानंद

Click for answer
C. स्वामी दयानंद सरस्वती
5. 25 डिसेंबर 1927 रोजी __________ यांनी मनुस्मृतीचे दहन केले.

A. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
B. गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे
C. एस.एम.जोशी
D. बी.के.गायकवाड

Click for answer
A. डॉ.बाबासाहेब आंबेडकर

6. सन 1940 मध्ये _____________ यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली.

A. श्री.एस.एम.जोशी
B. श्री.रामराव देशमुख
C. श्री.ज.स.करंदीकर
D. श्री.गं.त्र्य.माडखोलकर

Click for answer
B. श्री.रामराव देशमुख

7. कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरु झाली ?

A. 1892
B. 1909
C. 1919
D. 1935

Click for answer
C. 1919

8. परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना , परदेशी कापडाने भरलेल्या मोटारीपुढे तिरंग्यासह _______ यांनी बलिदान दिले.

A. श्रीकृष्ण सारडा
B. जगन्नाथ शिंदे
C. कुर्बान हुसेन
D. बाबू गेनू

Click for answer
D. बाबू गेनू

9. भारत-चीन युध्दानंतर कोणत्या पंतप्रधानांनी प्रथम चीनला भेट दिली ?

A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. इंदिरा गांधी
C. राजीव गांधी
D. पी.व्ही.नरसिंहराव

Click for answer
C. राजीव गांधी

10. ____________ ह्या चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली.

A. दामोदर आणि गोपाळ
B. बाळकृष्ण आणि वासुदेव
C. बाळकृष्ण आणि गोपाळ
D. दामोदर आणि बाळकृष्ण

Click for answer
D. दामोदर आणि बाळकृष्ण
========================================================================
Monday 2 January 2012
प्रश्नमंजुषा -161

1. वृध्द व आजारी स्त्रियांची व्यवस्था 'सायंघरकुला'मध्ये कोणी केली ?

A. पंडिता रमाबाई
B. सरस्वतीबाई जोशी
C. सावित्रीबाई फुले
D. रमाबाई रानडे

Click for answer

A. पंडिता रमाबाई

2. 25 जुलै 1917 मध्ये प्राथमिक शाळेत फी माफीची घोषणा _________ यांनी केली होती .

A. औंधचे पंतप्रतिनिधी
B. सयाजीराव गायकवाड
C. शाहू महाराज
D. महर्षी कर्वे

Click for answer
C. शाहू महाराज
3. 'एकत्र कुटुंबपद्धती ' ह्या निबंधासाठी डेक्कन कॉलेजचे बक्षीस इ.स.1876 मध्ये कोणत्या समाजसुधारकास मिळाले होते?

A. गोपाळ गणेश आगरकर
B. र.धों. कर्वे
C. महर्षी कर्वे
D. गो.कृ.गोखले

Click for answer
A. गोपाळ गणेश आगरकर

4. महात्मा फुले यांचे निधन कोणत्या वर्षी झाले ?

A. 1890
B. 1891
C. 1892
D. 1893

Click for answer
A. 1890
5. महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण ?

A. प्लेटो
B. जे.एस.मिल
C. व्हॉल्टेअर
D. थॉमस पेन

Click for answer
D. थॉमस पेन

6. 'समता संघ' खालीलपैकी संस्था कुणी स्थापन केली ?

A. महात्मा फुले
B. महर्षी कर्वे
C. वि.रा.शिंदे
D. डॉ.आंबेडकर

Click for answer
B. महर्षी कर्वे
7. छत्रपती शाहू महाराज ________ संस्थानाचे राजे होते.

A. सातारा
B. सोलापूर
C. कोल्हापूर
D. सांगली

Click for answer

8. खालीलपैकी कोणते खेडे समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांच्या जीवनाशी निगडीत आहे ?

A. महू
B. शेरवली
C. टेंभू
D. कोतलूक

Click for answer
C. टेंभू

9. गोपाळ गणेश आगरकरांचे पहिले पुस्तक कोणते ?

A. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल
B. राजकारणाचे अध्यात्म
C. स्त्रीदास्य विमोचन
D. डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे 101 दिवस

Click for answer
A. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल

10. 'केसरी' चे पहिले संपादक कोण होते ?

A. गो.ग.आगरकर
B. लोकमान्य टिळक
C. न्यायमूर्ती रानडे
D. गोपाळ कृष्ण गोखले

Click for answer
A. गो.ग.आगरकर
========================================================================
Monday 2 January 2012
प्रश्नमंजुषा -162

1. ताम्हाणी घाट प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. रत्‍नागिरी
B. रायगड
C. कोल्हापूर
D. बीड

Click for answer
B. रायगड

2. खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक प्रदेशास 'शीत वाळवंट'असे गणले जाते ?

A. सूचीपर्णी अरण्याचा प्रदेश
B. भूमध्यसागरी हवामानाचा प्रदेश
C. विषुववृत्तीय हवामान प्रदेश
D. टुंड्रा प्रदेश

Click for answer
D. टुंड्रा प्रदेश

3. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश कृषीऔद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जातो ?

A. भीमा-निरा खोरे
B. कृष्णा-पंचगंगा खोरे
C. गोदावरी खोरे
D. वर्धा खोरे

Click for answer
B. कृष्णा-पंचगंगा खोरे

4. खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेला सह्याद्री म्हणूनही ओळखतात?

A. सातपुडा
B. पूर्व घाट
C. पश्चिम घाट
D. विंध्य

Click for answer
C. पश्चिम घाट

5. खालीलपैकी कोणती जोडी (शहर -जिल्हा ) योग्य आहे ?

A. चिखलदरा -अकोला
B. महाबळेश्वर - सातारा
C. माथेरान - ठाणे
D. पांचगणी - रायगड

Click for answer
B. महाबळेश्वर - सातारा

6. ईशान्य भारतातील स्थलांतरित शेतीला कोणत्या नावाने संबोधतात ?

A. पोडू
B. स्विदेन
C. झूम
D. तराई

Click for answer
C. झूम

7. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधीक साखर कारखाने आहेत ?

A. सांगली
B. कोल्हापूर
C. सातारा
D. अहमदनगर

Click for answer
D. अहमदनगर

8. कर्कवृत्त भारतातील किती राज्यांमधून गेले आहे ?

A. 5
B. 6
C. 7
D. 8

Click for answer
D. 8
1.गुजरात 2. राजस्थान 3.मध्यप्रदेश 4.छत्तीसगड 5.झारखंड 6. पश्चिम बंगाल 7. त्रिपुरा 8.मिझोराम
मानसिक क्षमता चाचणी /अंकगणित
9. धनंजयच्या आईची नणंद रामची आई आहे, तर धनंजयची आई रामची कोण ?

A. मामी
B. मावशी
C. काकू
D. आत्या

Click for answer
A. मामी

10. एक शेतकरी एक जनावर असेल की, एका जोड खुंटीस बांधतो व जनावरे वाढली की 3 खुंट्यामध्ये 2 जनावरे बांधतो तर 4 जनावरे बांधायला त्यास किती खुंट्या लागतील ?

A. 8
B. 5
C. 4
D. 3

Click for answer
B. 5
========================================================================
Monday 2 January 2012
प्रश्नमंजुषा -163

1. आंतरराष्ट्रीय स्पोर्टस प्रेस असोसिएशन (एआयपीएस)निर्दोष खेळाचा(फेअर प्ले) पुरस्कार प्राप्त करणारा महेंद्रसिंग धोनी हा जगातला _________ क्रिकेटपटू आहे.

A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. दहावा

Click for answer
A. पहिला

2.आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानवतावादी सेवक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे स्मारक महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे ?

A. सातारा
B. सोलापूर
C. कोल्हापूर
D. पुणे

Click for answer
B. सोलापूर
3. 'विक्रमशिला गंगेटिक डॉल्फिन सँक्ट्यूअरी'हे डॉल्फिनस् साठी असलेले भारतातले एकमेव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?

A. बिहार
B. उत्तरप्रदेश
C. उत्तराखंड
D. पश्चिम बंगाल

Click for answer
A. बिहार

4. 'अग्नी-II प्राइम ' क्षेपणास्त्राचे अलीकडेच नामकरण _________ असे करण्यात आले.

A. अग्नी - III
B. अग्नी - IV
C. पृथ्वी प्लस
D. ब्राम्होस

Click for answer
B. अग्नी - IV
5. भारतातील किती राज्यांची सीमा भूतान देशाबरोबर आहे ?

A. एक
B. दोन
C. तीन
D. चार

Click for answer
D. चार

6. अंजेला मर्केल ह्यांना अलीकडेच 2009 च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्या कोणत्या देशाच्या प्रमुख आहेत ?

A. ऑस्ट्रेलिया
B. पोलंड
C. जर्मनी
D. जमैका

Click for answer
C. जर्मनी

7. 13 ते 22 जानेवारी 2012 ह्या कालखंडात पहिले हिवाळी युवा ऑलम्पिक कोठे होणे नियोजित आहे ?

A. सिंगापूर
B. मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
C. इन्सब्रुक, ऑस्ट्रिया
D. कोलकाता, भारत

Click for answer
C. इन्सब्रुक, ऑस्ट्रिया

8. 2012 चे नियोजित उन्हाळी ऑलम्पिक लंडन येथे कोणत्या महिन्यात होणार आहेत ?

A. फेब्रुवारी-मार्च
B. मे-जून
C. जुलै-ऑगस्ट
D. ऑक्टोबर-नोव्हेंबर

Click for answer
C. जुलै-ऑगस्ट
9. खालीलपैकी कोणते लीपवर्ष असेल ?

A. 2012
B. 2014
C. 2018
D. 2022

Click for answer
A. 2012

10. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 {Environment(Protection)Act 1986} नुसार कोणत्या राज्यात सर्वात जास्त पर्यावरणच्या दृष्टीने संवेदनशील विभाग केंद्र सरकारने निर्देशित केलेले आहेत ?

A. उत्तराखंड
B. महाराष्ट्र
C. केरळ
D. आसाम

Click for answer
B. महाराष्ट्र
========================================================================
Tuesday 3 January 2012
प्रश्नमंजुषा -164
पृथ्वी सूर्याला जवळ असताना उपभू स्थितीत तर दूर असताना अपभू स्थितीत असते. त्यामुळे या दोन्ही स्थितीमधील दिवसांना विशेष महत्व प्राप्त होते. ३ जानेवारी या दिवशी पृथ्वी सूर्यापासून सर्वाधिक जवळ असल्याने भ्रमणगतीत काहीसा बदल होतो.

४ जुलै पृथ्वी ही सूर्यापासून दूर असते. उपभूस्थितीचे दिवशी सूर्य-पृथ्वी अंतर केवळ १४ कोटी ७0 लाख किलोमीटर राहून हेच अंतर अपभूस्थितीला १५ कोटी २0 लाख किलोमीटर एवढे होत असते. ३ जानेवारीला पृथ्वी-सूर्य अंतर सर्वात कमी असल्याने सूर्योदय व सूर्यास्ताचे वेळी सूर्यदर्शन किंचित मोठय़ा आकाराचे घडून येते.
1. 13 मार्च 2012 ते 12 मार्च 2013 हे वर्ष महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्याचे जन्मशताब्दी वर्ष आहे?

A. यशवंतराव चव्हाण
B. वसंतदादा पाटील
C. वसंतराव नाईक
D. मारोतराव कन्नमवार

Click for answer
A. यशवंतराव चव्हाण

2. राज्यातील राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अंतर्गत शिकणाऱ्या नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमात कोणत्या विषयाचा अनिवार्य विषय म्हणून समावेश झाला आहे ?
A. पर्यावरण शिक्षण
B. सामाजिक नीतिमूल्ये
C. सामान्य ज्ञान
D. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (इन्फरमेशन अँण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी)

Click for answer
D. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (इन्फरमेशन अँण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी)

3. अलीकडेच भगवतगीतेसंबंधीचा वाद कोणत्या देशात झाला ?

A. रशिया
B. अमेरिका
C. इंग्लंड
D. सिरीया

Click for answer
A. रशिया

4. बजाजने 3 जानेवारी 2012 रोजी बाजारात आणलेल्या लहान आणि स्वस्त कारचे नाव काय ?

A. नॅनो
B. आर ई-60
C. एमआयईव्ही
D. रेवा

Click for answer
B. आर ई-60
याविषयी 30 डिसेंबर 2011 लाच सविस्तरपणे लिहिले होते खालील ठिकाणी:
http://gkgscurrent.blogspot.com/2011/12/india-ccaner-project-and-bajajs-re60.html


5. आजचा ( 3 जानेवारी 2012) विचार करता कोणत्या देशाचा समावेश संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीत स्थायी अथवा अस्थायी सदस्य देश म्हणून समावेश नाही ?

A. भारत
B. पाकिस्तान
C. चीन
D. बांगलादेश

Click for answer
D. बांगलादेश

ह्या विषयी सविस्तर माहिती खालील ठिकाणी वाचा.
http://gkgscurrent.blogspot.com/2012/01/international-important-events-update.html


6. 'मी सावित्री जोतिराव' ही महा-कादंबरी कोणी लिहिली ?

A. बाबासाहेब पुरंदरे
B. कविता महाजन
C. कविता मुरूमकर
D. यापैकी नाही

Click for answer
C. कविता मुरूमकर

7. बिल गेट्‌स आणि मेलिंडा फाऊंडेशनकडून दिला जाणारा गेट्‌स इनोव्हेशन (अभिनव: लसीकरण) पुरस्कार भारतातील कोणत्या मुख्यमंत्र्याला जाहीर झाला आहे ?

A. नितीश कुमार
B. मायावती
C. नरेंद्र मोदी
D. पृथ्वीराज चव्हाण

Click for answer
A. नितीश कुमार

8. केसरी-मराठा संस्थेतर्फे देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कार' ह्या वर्षी कोणाला जाहीर झाला आहे ?

A. दीपक टिळक , केसरी
B. एन.राम ,द हिंदू
C. उत्तम कांबळे , दैनिक सकाळ
D. श्रवण गर्ग , दैनिक भास्कर

Click for answer
D. श्रवण गर्ग , दैनिक भास्कर

9. 99 व्या सायन्स काँग्रेसचे आयोजन 3 जानेवारी 2012 पासून कोणत्या शहरात करण्यात आले आहे ?

A. चेन्नई
B. त्रिवेंद्रम
C. बेंगळुरू
D. भुवनेश्वर

Click for answer
D. भुवनेश्वर
ह्या संदर्भात सविस्तर लेख आम्ही 28 डिसेंबर 2011 लाच खालील ठिकाणी लिहिला होता. http://www.gkgscurrent.blogspot.com/2011/12/indian-science-congress-99-th-session.html
10. भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत व्हावी म्हणून सरकारने 'आकाश ' ह्या टॅबलेट ची निर्मिती कोणत्या कंपनीच्या सहकार्याने करण्यात आली आहे ?

A. डाटाविंड
B. इन्फोविंड
C. टेकविंड
D. अवकाश

Click for answer
A. डाटाविंड
ह्या विषयी सविस्तरपणे आम्ही काही दिवसांपूर्वी पुढील ठिकाणी लिहिले होते.
आशा आहे आपल्यालाही ही माहिती आवडेल. आपले अभिप्राय अवश्य द्या.
http://www.gkgscurrent.blogspot.com/2011/12/aakash-tablet.html
========================================================================
Thursday 5 January 2012
प्रश्नमंजुषा -165

1. भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना 1902 मध्ये कोठे सुरु झाला ?

A. कोईम्बतूर
B. कोलकाता
C. पुणे
D. मुंबई

Click for answer
A. कोईम्बतूर

2. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

A. शरद पवार
B. यशवंतराव चव्हाण
C. वसंतराव नाईक
D. वसंतदादा पाटील

Click for answer
B. यशवंतराव चव्हाण

3. 'मणिभवन ' हे नाव कोणत्या नावाशी निगडीत आहे ?

A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. महात्मा गांधी
C. सरदार पटेल
D. विनोबा भावे

Click for answer
B. महात्मा गांधी
4. भारताच्या सर न्यायाधीशांची नेमणूक __________ करतात.

A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. महान्यायवादी

Click for answer
B. राष्ट्रपती

5. 'पंजाब केसरी 'असे कोणाला म्हणत ?

A. लाला लजपतराय
B. भगतसिंग
C. राजगुरू
D. गुरु गोविंदसिंग

Click for answer
A. लाला लजपतराय
6. भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला ______________.

A. विजयालक्ष्मी पंडित
B. मिसेस ऍनी बेझंट
C. सरोजिनी नायडू
D. मॅडम कामा

Click for answer
B. मिसेस ऍनी बेझंट

7. 'जालियनवाला बाग ' हत्याकांड _________ शहरात झाले.

A. लखनौ
B. बराकपूर
C. दिल्ली
D. अमृतसर

Click for answer
D. अमृतसर

8. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

A. व्ही.व्ही.गिरी
B. एस.राधाकृष्णन
C. डॉ.झाकीर हुसेन
D. डॉ.राजेंद्रप्रसाद

Click for answer
D. डॉ.राजेंद्रप्रसाद
9. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पध्दती _______ साली सुरु करण्यात आली.

A. 1947
B. 1959
C. 1960
D. 1962

Click for answer
D. 1962

10. घटक राज्याचा घटनात्मक शासन प्रमुख ___________ हा असतो.

A. राष्ट्रपती
B. उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. राज्यपाल

Click for answer
D. राज्यपाल
========================================================================
Thursday 5 January 2012
प्रश्नमंजुषा -166

1. रिलायन्सचे KG-D6 नैसर्गिक वायूचे भांडार (बेसिन) कोणत्या राज्यात आहे ?

A. महाराष्ट्र
B. ओरिसा
C. आंध्रप्रदेश
D. केरळ

Click for answer
C. आंध्रप्रदेश

KG-D6 चा अर्थ आहे : कृष्णा -गोदावरी साईट ब्लॉक -6

2. भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (Competitive Commission of India) कोणत्या वर्षी स्थापन झाला ?

A. 2001
B. 2003
C. 2005
D. 2007

Click for answer
B. 2003

अर्थात हा आयोग व्यापारातील स्वातंत्र्य आणि ग्राहक हित हे लक्षात घेवून स्थापलेला आहे.

3. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान (National Park) कोणत्या राज्यात आहे ?

A. महाराष्ट्र
B. ओडिशा
C. गुजरात
D. उत्तराखंड

Click for answer
B. ओडिशा

4. एव्हीयन इन्फ्लूएन्झा (avian influenza) हा आजार कोणत्या नावाने विशेष प्रसिध्द आहे ?

A. काला आजार
B. स्वाईन फ्लू
C. बर्ड फ्लू
D. मलेरिया

Click for answer
C. बर्ड फ्लू

5. भारतात राज्यघटनेचा अंतिम संरक्षक आणि अर्थ लावणारी अंतिम संस्था कोणाला म्हणतात?

A. पंतप्रधान कार्यालय
B. राष्ट्रपती कार्यालय
C. महान्यायवादींचे कार्यालय
D. सर्वोच्च न्यायालय

Click for answer
D. सर्वोच्च न्यायालय

6. राज्यसभेतून दर 2 वर्षांनी एकूण सदस्य संख्येच्या किती हिस्सा सदस्य निवृत्त होतात ?

A. 1/3
B. 1/4
C. 1/6
D. 1/12

Click for answer
A. 1/3

7. अलीकडेच पंतप्रधानांनी स्वर्गीय पुरण चंद्र गुप्ता यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण केले. ते कोणत्या दैनिकाचे संस्थापक होते ?

A. अमर उजाला
B. महानगर
C. जनसत्ता
D. जागरण

Click for answer
D. जागरण

8. डॉ.रमण सिंग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ?

A. उत्तराखंड
B. हिमाचल प्रदेश
C. पंजाब
D. छत्तीसगड

Click for answer
D. छत्तीसगड

9. ओक्राम इबोबी सिंग हे सध्याचे __________ राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

A. पंजाब
B. मणिपूर
C. उत्तराखंड
D. मेघालय

Click for answer
B. मणिपूर

10. के.शंकरनारायणन हे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यापूर्वी कोणत्या राज्यात राज्यमंत्रिमंडळात मंत्रीपदी होते ?

A. तामिळनाडू
B. कर्नाटक
C. केरळ
D. आंध्रप्रदेश

Click for answer
C. केरळ
========================================================================
Sunday 8 January 2012
प्रश्नमंजुषा -167

1. 15 नोव्हेंबर 2011 रोजी भारताने कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ?

A. अग्नी -3
B. अग्नी -4
C. अग्नी -5
D. पृथ्वी

Click for answer
B. अग्नी -4

2. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ह्यांचा पक्ष कोणता आहे ?

A. डी.एम.के.
B. तृणमूल काँग्रेस
C. काँग्रेस
D. ब.स.प.

Click for answer
B. तृणमूल काँग्रेस

3. भारत आणि श्रीलंकन नौदलाचा सप्टेंबर 2011 मध्ये झालेला संयुक्त सराव कोणत्या नावाने ओळखला जातो ?

A. स्लायनेक्स-2
B. मिलन
C. मलबार
D. गरुड

Click for answer
A. स्लायनेक्स-2

4. सन 2010 च्या मानव विकास अहवालानुसार( Human Development Report ) 169 देशांच्या यादीतील भारतचे स्थान कितवे होते ?

A. 112
B. 11
C. 119
D. 160

Click for answer
C. 119
5. 2011 च्या ऑक्टोबर मध्ये भारतात पार पडलेल्या पहिल्या भारतीय ग्रांपी मध्ये फॉर्म्युला-1 चा कोणता चालक विजेता ठरला ?

A. सेबॅस्टियन व्हेटेल
B. मायकेल शूमाकर
C. नरेन कार्तिकेयन
D. आंद्रियन सुटील

Click for answer
A. सेबॅस्टियन व्हेटेल

6. अपर्णा पोपट ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

A. महिला हॉकी
B. बॅडमिन्टन
C. लॉन टेनिस
D. टेबल टेनिस

Click for answer
B. बॅडमिन्टन

7. एकदिवशीय क्रिकेटमध्ये डावात सर्वाधिक धावा कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहेत ?

A. सचिन तेंडुलकर
B. वीरेंद्र सेहवाग
C. अडम गीलख्रिस्ट
D. ब्रायन लारा

Click for answer
B. वीरेंद्र सेहवाग

8. राष्ट्रीय कृषी धोरण 2000 नुसार 'गोल क्रांती ' ही कशाशी संबंधित आहे ?

A. अंडी-उत्पादन
B. नद्या जोड प्रकल्प
C. बटाटा उत्पादन
D. सफरचंद उत्पादन

Click for answer
C. बटाटा उत्पादन

9. 2011 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारताने कोणत्या संघावर विजय मिळवत 1984 नंतर पहिल्यांदाच विश्वचषक प्राप्त केला ?

A. दक्षिण आफ्रिका
B. ऑस्ट्रेलिया
C. पाकिस्तान
D. श्रीलंका

Click for answer
D. श्रीलंका

10. 2010 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेनुसार भारतात सर्वाधिक वाघ कोणत्या राज्यात आढळतात ?

A. महाराष्ट्र
B. मध्यप्रदेश
C. कर्नाटक
D. पश्चिम बंगाल

Click for answer
C. कर्नाटक
========================================================================
Sunday 8 January 2012
प्रश्नमंजुषा -168

1. दोन सपाट आरशांमध्ये ठेवलेल्या पदार्थाच्या 11 प्रतिमा मिळण्यासाठी त्या दोन आरशांमधील कोण किती असावा ?

A. 300
B. 450
C. 600
D. 900

Click for answer
A. 300

प्रतिमांची संख्या = (360/दोन आरशांमधील कोन) - 1

2. सूर्यग्रहण होते जेव्हा __________________.

A. पृथ्वी ही सूर्य आणि चंद्र यांच्या दरम्यान येते.
B. चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान येतो .
C. सूर्य हा पृथ्वी आणि चंद्र यांच्या दरम्यान येतो .
D. वरीलपैकी कोणतेही कारण योग्य नाही.

Click for answer
B. चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान येतो .

3. पाण्याची सर्वाधिक घनता कोणत्या तापमानास आढळते ?

A. 00C
B. 40C
C. 1000C
D. घनता सर्व तापमानास सारखीच असते.

Click for answer
B. 40C

4. 'क' जीवनसत्त्वाच्या अभावी कोणता रोग होतो ?

A. बेरी-बेरी
B. रातांधळेपणा
C. स्कर्व्ही
D. पेलाग्रा

Click for answer
C. स्कर्व्ही
5. विमाने तयार करण्यासाठी कोणत्या संमिश्राचा वापर करतात ?

A. मॅग्नेलीअम
B. ड्यूरॅल्युमिन
C. अल्युमिनियम ब्रांझ
D. अल्निको संमिश्र

Click for answer
B. ड्यूरॅल्युमिन

6. खालीलपैकी कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे ?

A. CO2
B. H2S
C. SO2
D. NH3

Click for answer
D. NH3

7. वाढीचा कालखंड, गरोदरपण,स्तनदापण या कालावधीत अन्नातील __________पोषण तत्वाची गरज वाढलेली असते .

A. कर्बोदके
B. प्रथिने
C. जीवनसत्त्वे
D. स्निग्धपदार्थ

Click for answer
B. प्रथिने

8. जनावरांमध्ये लाळ्या खूरकत हो रोग कशामुळे होतो ?

A. व्हायरस
B. बक़्टेरिया
C. प्रोटोझुआ
D. सूक्ष्मकृमी

Click for answer
A. व्हायरस

9. SI पध्दतीत ज्युल हे कोणत्या राशीचे एकक आहे ?

A. बल
B. चाल
C. शक्ती
D. ऊर्जा

Click for answer
D. ऊर्जा

10. मुर्‍हा,सुरती,पंढरपुरी ह्या कोणत्या जनावरांच्या जाती आहेत ?

A. म्हैस
B. गाय
C. मेंढी
D. शेळी

Click for answer
A. म्हैस
========================================================================
Sunday 8 January 2012
प्रश्नमंजुषा -169

1. महाराष्ट्रात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?

A. नंदुरबार
B. अमरावती
C. पुणे
D. गडचिरोली

Click for answer
C. पुणे

2. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याचा मान मिळवणार्‍या ममता बॅनर्जी ह्या कितव्या महिल्या आहेत ?

A. पहिल्या
B. दुसर्‍या
C. तिसर्‍या
D. चौथ्या

Click for answer
A. पहिल्या

3. अलीकडे निधन झालेले किम जोंग इल हे कोणत्या देशाचे राजे होते ?

A. दक्षिण कोरिया
B. उत्तर कोरिया
C. जपान
D. चीन

Click for answer
B. उत्तर कोरिया
4. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे उपसभापती ______________ आहेत .

A. पांडुरंग फुंडकर
B. वसंत पुरके
C. शिवाजीराव देशमुख
D. वसंत डावखरे

Click for answer
D. वसंत डावखरे

5. महाराष्ट्राचे माहिती आयुक्त कोण आहेत ?

A. रवी कदम
B. विलास पाटील
C. जॉन जोसेफ
D. नीला सत्यनारायण

Click for answer
B. विलास पाटील

6. राष्ट्रीय कौशल्य आयोग (NSC) चे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत ?

A. सॅम पित्रोदा
B. डॉ.मनमोहन सिंग
C. नंदन निलेकणी
D. डी.पी.आगरवाल

Click for answer
B. डॉ.मनमोहन सिंग

7. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रीपदी सध्या कोण विराजमान आहे ?

A. प्रफुल्ल पटेल
B. अजित सिंग
C. ज्योतिरादित्य सिंदिया
D. कपिल सिब्बल

Click for answer
B. अजित सिंग

8. मिहान हा प्रकल्प कोणत्या शहरात आकार घेत आहे ?

A. मुंबई
B. नागपूर
C. पुणे
D. नाशिक

Click for answer
B. नागपूर

9. राजा रवी वर्मा हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

A. शास्त्रीय नृत्य
B. चित्रकला
C. शास्त्रीय गायन
D. चित्रपट दिग्दर्शन

Click for answer
B. चित्रकला

10. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे ?

A. नाशिक
B. मुंबई
C. चंद्रपूर
D. पुणे

Click for answer
D. पुणे
========================================================================
Tuesday 10 January 2012
प्रश्नमंजुषा -170

1. मळगंगा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. वर्धा
B. पुणे
C. यवतमाळ
D. बुलढाणा

Click for answer
D. बुलढाणा

2.उत्तर भारतात नव्याने तयार झालेल्या गाळाच्या मैदानांना __________ म्हणतात.

A. भाबर
B. खादर
C. तराई
D. भांगर

Click for answer
B. खादर

3. डॉ.अभय आणि राणी बंग या दांपत्याने बालमृत्यूसंदर्भात सादर केलेल्या संशोधनात्मक प्रबंधाचे शीर्षक काय होते ?

A. मेळघाट: समस्या आणि उपचार
B. बालमृत्यू : आधुनिक महाराष्ट्रावरचा डाग
C. कोवळी मने
D. कोवळी पानगळ

Click for answer
D. कोवळी पानगळ
4. स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण होते ?

A. सुभाषचंद्र बोस
B. जवाहरलाल नेहरू
C. मौलाना आझाद
D. महात्मा गांधी

Click for answer
C. मौलाना आझाद

5. __________ हा दिवस मुस्लीम लीगने प्रत्यक्ष कृतीदिन म्हणून पाळला.

A. 8 ऑगस्ट 1945
B. 16 ऑगस्ट 1946
C. 14 ऑगस्ट 1947
D. 15 ऑगस्ट 1944

Click for answer
B. 16 ऑगस्ट 1946

6. महाराष्ट्रातील नागपूरजवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे ?

A. निवळी
B. इंदापूर
C. बुटीबोरी
D. वाळूंज

Click for answer
C. बुटीबोरी

7. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म _________ जिल्ह्यातील शिराढोण या गावी झाला.

A. रत्‍नागिरी
B. रायगड
C. पुणे
D. बुलढाणा

Click for answer
B. रायगड

8. वास्को-द-गामा भारतात कोणत्या वर्षी आला ?

A. 1450
B. 1498
C. 1548
D. 1588

Click for answer
B. 1498

9. तंबाखूमध्ये _________ हे उत्तेजक द्रव्य आहे.

A. टॅनीन
B. निकोटीन
C. कॉफीन
D. एस.एल.डी.

Click for answer
B. निकोटीन

10. खालीलपैकी कोणती नदी विंध्य आणि सातपुडा यांच्या दरम्यान वाहते ?

A. तापी
B. नर्मदा
C. साबरमती
D. गोदावरी

Click for answer
B. नर्मदा
========================================================================
Tuesday 10 January 2012
प्रश्नमंजुषा -171

1. जागतिक लोकसंख्येत भारताच्या लोकसंख्येचे प्रमाण __________ इतके आहे.

A. 12.5%
B. 5.5%
C. 17.5%
D. 25.5%

Click for answer
C. 17.5%

2. 2011 च्या जनगणनेच्या हंगामी आकड्यांनुसार भारतात लोकसंख्येची सर्वाधिक घनता कोणत्या राज्यात आढळते ?

A. मध्यप्रदेश
B. पश्चिम बंगाल
C. बिहार
D. उत्तरप्रदेश

Click for answer
C. बिहार

3. फक़्त केंद्रशासित प्रदेशांचा विचार करता 2011 च्या जनगणनेच्या हंगामी आकड्यांनुसार सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण (Sex Ratio) कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आढळते ?

A. दादरा नगर हवेली
B. चंदिगड
C. दिल्ली
D. पद्दुच्चेरी

Click for answer
D. पद्दुच्चेरी

4. सध्या भारतात किती राष्ट्रीय पक्ष आहेत ?

A. सहा
B. सात
C. आठ
D. दोन

Click for answer
A. सहा
5. तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे होणे पार पडले ?

A. दुबई
B. मॉरिशस
C. सॅनफ्रॅन्सिस्को
D. सिंगापूर

Click for answer
D. सिंगापूर

6. भारतरत्‍न हा सन्मान प्राप्त करणारी पहिली महिला कोण ?

A. सरोजिनी नायडू
B. इंदिरा गांधी
C. प्रतिभाताई पाटील
D. एम.एस.सुब्बलक्ष्मी

Click for answer
B. इंदिरा गांधी

7. 11-12 नोव्हेंबर 2010 मध्ये झालेली G-20 राष्ट्रांची परिषद कोठे पार पडली ?

A. सेऊल (द. कोरिया )
B. पिट्सबर्ग (रशिया)
C. नवी दिल्ली (भारत)
D. लंडन (इंग्लंड)

Click for answer
A. सेऊल (द. कोरिया )

8. फेब्रुवारी 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरास 600 वर्षे पूर्ण झाली ?

A. जयपूर
B. अहमदाबाद
C. भोपाळ
D. नवी दिल्ली

Click for answer
B. अहमदाबाद

9. रत्‍नागिरी येथे जानेवारी 2011 मध्ये झालेल्या अखील भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?

A. राम जाधव
B. मंगेश पाडगावकर
C. उत्तम कांबळे
D. राजाभाऊ शिरगुप्पे

Click for answer
A. राम जाधव

10. गोबी वाळवंट पार करणारी पहिली महिला कोण ?

A. सुचेता कडेथंकर
B. कृष्णा पाटील
C. रीना कौशल
D. आरती शाह

Click for answer
A. सुचेता कडेथंकर
=======================================================================
Wednesday 11 January 2012
प्रश्नमंजुषा -172

1. चीनच्या ली ना हिने कोणत्या स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद प्राप्त करीत, ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकाविणारी पहिली आशियाई महिला होण्याचा बहुमान पटकावला ?

A. फ्रेंच ओपन
B. विम्बल्डन ओपन
C. ऑस्ट्रेलियन ओपन
D. अमेरिकन ओपन

Click for answer
A. फ्रेंच ओपन

2. भारताचे अमेरिकेतील राजदूत कोण आहेत ?

A. निरुपमा राव
B. राकेश सूद
C. सुजाता सिंग
D. ज्ञानेश्वर मुळे

Click for answer
A. निरुपमा राव

3. 'करिया मुंडा' कोण आहेत ?

A. लोकसभेचे विद्यमान उपसभापती
B. लोकसभेचे विद्यमान सभापती
C. राज्यसभेचे उपाध्यक्ष
D. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते

Click for answer
A. लोकसभेचे विद्यमान उपसभापती

4. सार्कची स्थापना कधी झाली ?

A. 8 डिसेंबर 1984
B. 8 डिसेंबर 1985
C. 1 जानेवारी 1995
D. 2 मार्च 1998

Click for answer
B. 8 डिसेंबर 1985

5. संयुक्त राष्ट्र संघटनेची सध्याची सदस्य संख्या किती आहे ?

A. 152
B. 191
C. 192
D. 193

Click for answer
D. 193

6. महाराष्ट्रातील महिलांसाठीचे पहिले खुले कारागृह कोठे आहे ?

A. आधारवाडी ,कल्याण
B. आर्थररोड, मुंबई
C. पैठण
D. येरवडा, पुणे

Click for answer
D. येरवडा, पुणे

7. 2010-11 ह्या वर्षात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला ?

A. परभणी
B. नांदेड
C. सातारा
D. सांगली

Click for answer
B. नांदेड

8.'धन्वंतरी पुरस्कार ' कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो ?

A. साहित्य
B. समाजसेवा
C. वैद्यकीय
D. पत्रकारिता

Click for answer
C. वैद्यकीय

9. 'गो इंडिया' हे स्मार्ट कार्ड कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत सुरु करण्यात आले आहे ?

A. रेल्वे
B. युवक-कल्याण
C. नागरी उड्डाण
D. पर्यटन

Click for answer
A. रेल्वे

10. भारतीय रेल्वेने 2011-12 हे वर्ष _____________म्हणून जाहीर केले आहे.

A. स्वच्छता वर्ष
B. हरित ऊर्जा वर्ष
C. सुरक्षितता वर्ष
D. कनेक्ट इंडिया वर्ष

Click for answer
B. हरित ऊर्जा वर्ष
========================================================================
Thursday 12 January 2012
प्रश्नमंजुषा -173

1. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत ?

A. शरद पवार
B. विलासराव देशमुख
C. शशांक मनोहर
D. एन.श्रीनिवासन

Click for answer
D. एन.श्रीनिवासन

2. 2010 चा 'दादासाहेब फाळके रत्‍न (अकादमी)' पुरस्कार कोणास बहाल करण्यात आला होता ?

A. देवआनंद
B. डी.रामानायडू
C. मनोजकुमार
D. धर्मेन्द्र

Click for answer
A. देवआनंद

स्पष्टीकरण : हा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कारापेक्षा वेगळा आहे.

ह्या पुरस्काराचे विजेते आणि वर्ष:

2009: मनोजकुमार

2010: देव आनंद

2011: धर्मेन्द्र


3. 2010 च्या 'दादासाहेब फाळके ' पुरस्काराने गौरविण्यात आले ?

A. के.बालचंदर
B. डी.रामानायडू
C. व्ही.के.मूर्ती
D. जब्बार पटेल

Click for answer
A. के.बालचंदर

4. 'चांद्रयान-1' प्रक्षेपित करण्यासाठी वापरलेल्या उपग्रह प्रक्षेपक यानाचे नाव काय ?

A. PSLV C-11
B. GSLV F-06
C. एरियन स्पेस -5
D. PSLV C-12

Click for answer
A. PSLV C-11

5. तेराव्या वित्त आयोगाचे सचिव कोण होते ?

A. डॉ.विजय केळकर
B. प्रा.अतुल वर्मा
C. सुमित बोस
D. डॉ.इंदिरा राजारामन

Click for answer
C. सुमित बोस

स्पष्टीकरण : डॉ.विजय केळकर हे ह्या आयोगाचे अध्यक्ष होते तर प्रा.अतुल वर्मा आणि डॉ.इंदिरा राजारामन हे ह्या आयोगाचे सदस्य होते.
6. सर्व शिक्षा अभियान योजना भारत सरकारने कोणत्या वर्षी सुरु केली ?

A. 1991-92
B. 2001-02
C. 2011-12
D. 2005-06

Click for answer
B. 2001-02

7. ___________ हा दिवस दरवर्षी भारतात बालदिन म्हणून साजरा होता.

A. 14 जानेवारी
B. 21 मार्च
C. 14 नोव्हेंबर
D. 25 डिसेंबर

Click for answer
C. 14 नोव्हेंबर

8. 'द थ्री मिस्टेक़्स ऑफ माय लाईफ ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

A. चेतन भगत
B. अरुंधती रॉय
C. विक्रम सेठ
D. खुशवंत सिंग

Click for answer
A. चेतन भगत

त्यांचे अलीकडील पुस्तक आहे: रिव्होल्युशन 2020 : लव्ह ,करप्शन ,अम्बिशन

त्यांच्याच 'फाइव्ह पॉईंट समवन ' ह्या पुस्तकावर 'थ्री इडियट्स' ह्या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. शिवाय त्यांच्या दुसऱ्या एका पुस्तकावर "वन नाईट ऍंट कॉल सेंटर " ह्या वरही एक चित्रपट तयार होत आहे.

9. कोणत्या देशाकडे 2010 मध्ये सार्क चे अध्यक्षपद होते ?

A. पाकिस्तान
B. भूतान
C. नेपाळ
D. भारत

Click for answer
B. भूतान

10. शिवराज पाटील हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत ?

A. पंजाब
B. राजस्थान
C. त्रिपुरा
D. (A) आणि (B)

Click for answer
D. (A) आणि (B)
========================================================================
Thursday 12 January 2012
प्रश्नमंजुषा -174

1. 'अभय योजना ' महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाकडून राबविण्यात आली ?

A. विक्रीकर विभाग
B. महसूल विभाग
C. गृह खाते
D. उद्योग,ऊर्जा आणि कामगार मंत्रालय

Click for answer
A. विक्रीकर विभाग

2. DRDO ने विकसित केलेले 'प्रहार ' हे ______________ प्रकाराचे लघुपल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे.

A. जमिनीवरून हवेत
B. जमिनीवरून जमिनीवर
C. सागरी
D. पाणबुडीवरील

Click for answer
B. जमिनीवरून जमिनीवर

3. 2011 च्या रेमन मॅगसेसे पुरस्काराने कोणत्या भारतीयांना सन्मानित करण्यात आले ?

A. दीप जोशी आणि नीलिमा मिश्रा
B. हरीश हांडे आणि दीप जोशी
C. हरीश हांडे आणि नीलिमा मिश्रा
D. अरविंद केजरीवाल आणि दीप जोशी

Click for answer
C. हरीश हांडे आणि नीलिमा मिश्रा

4. न्यायाधीश दिनाकरन यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्यावरील महाभियोगाची प्रक्रिया अर्धवट अवस्थेत सोडून दिली गेली. ते राजीनामा दिला तेव्हा कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते ?

A. सिक्किम
B. छत्तीसगड
C. गौहाटी
D. गुजरात

Click for answer
A. सिक्किम

5. कोणत्या पत मूल्यमापन कंपनीने अमेरिकेला 'AAA' ऐवजी 'AA+' दर्जा दिल्याने मोठी चर्चा झाली ?

A. मूडिज
B. स्टँडर्ड अन्ड पुअर्स
C. क्रिसिल
D. डन अन्ड ब्रॅडस्ट्रीट

Click for answer
B. स्टँडर्ड अन्ड पुअर्स
6. सध्याचे कॅबिनेट सचिव कोण आहेत ?

A. शशीकांत शर्मा
B. सुनील मित्रा
C. अजितकुमार सेठ
D. आर.एस.गुजराल

Click for answer
C. अजितकुमार सेठ

7. सन 2010 मध्ये 'मिनी भारतीय प्रवासी ' संमेलन कोठे पार पडले ?

A. मॉरिशस
B. द.आफ्रिका
C. फिजी
D. अमेरिका

Click for answer
B. द.आफ्रिका

8. भारताने ____________ या देशाबरोबर 90 कोटी युनिट्स उर्जेची आयात-निर्यातीसाठी करार केला.

A. द.कोरिया
B. भूतान
C. बांगलादेश
D. नेपाळ

Click for answer
C. बांगलादेश

9. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी ______________ हे आहेत.

A. अजित पारसनीस
B. डॉ.सत्यपाल सिंग
C. सदानंद दाते
D. के.सुब्रमण्यम

Click for answer
D. के.सुब्रमण्यम

10. राज्यातील स्थानिक आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत ?

A. 30%
B. 33%
C. 50%
D. 49%

Click for answer
C. 50%
========================================================================
Friday 13 January 2012
प्रश्नमंजुषा -175

1. कोणता दिवस 'राष्ट्रीय पर्यटन दिन 'म्हणून साजरा केला जातो ?

A. 25 जानेवारी
B. 8 जानेवारी
C. 31 जानेवारी
D. 12 जानेवारी

Click for answer
A. 25 जानेवारी

2. टाटा कंपनीचा नॅनो कार प्रकल्प गुजरातमध्ये कोठे आहे ?

A. आणंद
B. सानंद
C. बडोदा
D. राजकोट

Click for answer
B. सानंद

3. टाटा कंपनीचा नॅनो कार प्रकल्प पूर्वी सिंगूर येथे नियोजित होता . हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

A. ओडिशा
B. पश्चिम बंगाल
C. कर्नाटक
D. हरियाणा

Click for answer
B. पश्चिम बंगाल

4. नोव्हेंबर 2011 मध्ये 'सार्क 'ची 17 वी परिषद कोठे पार पडली ?

A. अद्दू आटोल ( Addu Atoll),मालदीव
B. थिंपू, भूतान
C. ढाका , बांगलादेश
D. काठमांडू, नेपाळ

Click for answer
A. अद्दू आटोल ( Addu Atoll),मालदीव

5. 'सार्क ' चे/च्या विद्यमान 'सेक्रेटरी जनरल ' कोण आहेत ?

A. शिलकांत शर्मा
B. फातिमथ धियाना सईद
C. नईम हसन
D. किशोरकांत भार्गव

Click for answer
B. फातिमथ धियाना सईद (Fathimath Dhiyana Saeed) हे पद भूषविणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत.
6. अमेरिकेचे विद्यमान संरक्षण मंत्री (सेक्रेटरी ऑफ डिफेन्स) कोण आहेत ?

A. लिऑन पेनेटा
B. रॉबर्ट गेट्स
C. डोनाल्ड रम्सफेल्ड
D. हिलरी क्लिंटन

Click for answer
A. लिऑन पेनेटा

7. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आता ______ पर्यंत वाढविले आहे.

A. सन 2050
B. सन 2055
C. सन 2060
D. सन 2070

Click for answer
D. सन 2070

8. राज्यातील सर्व लोकांना आरोग्य विमा देणारी 'सुवर्णजयंती आरोग्य विमा योजना ' कोणत्या राज्याने सुरु केली आहे ?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. गोवा
D. तामिळनाडू

Click for answer
C. गोवा

9. सागरी मासेमारीत भारतात ____________ हे राज्य अग्रेसर आहे .

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. पश्चिम बंगाल
D. ओडिशा

Click for answer
B. गुजरात

10. उत्पादनानुसार विचार करता महाराष्ट्रातील सर्वाधिक गळीतधान्य ____________ हे आहे .

A. सोयाबीन
B. भुईमूग
C. सूर्यफुल
D. करडई

Click for answer
A. सोयाबीन

२ टिप्पण्या: