Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१२

कुलस्वामिनी 20 मराठी

मराठी वर्णमाला
वर्ण : आपण तोंडा वाटे जो मूलध्वनी काढतो त्याला वर्ण असे म्हणतात.

√ मराठीमधे एकू ४८ वर्ण आहेत.

वर्णाचे एकूण ३ प्रकार आहेत. १) स्वर २) स्वरादी ३) व्यंजन


१) स्वर (vowel)
१) ज्या वर्णाचा उच्चार करण्यास सुरवात केल्या पासून ते शेवट पर्यंत जर एक सारखाच ध्वनी निर्माण होत असेल तर त्या वर्णाला स्वर असे म्हणतात.

२) ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसर्या वर्णाच्या वाचून करता येतो त्याला स्वर असे म्हणतात.

3) मराठीत एकूण १२ स्वर आहेत.

अ आ इ ई उ ऊ
ऋ ऌ ए ऐ ओ औ


२) स्वरादी
१) ज्या वर्णाचा उच्चार करण्यास 'अ' ने सुरवात करून अनुनासिक किंवा विसार्गाने समाप्ती होते त्या वर्णाना स्वरादी असे म्हणतात.

२) मराठीत एकूण २ स्वरादी आहेत

अं अः


३) व्यंजन (consonant)
१) ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यास शेवटी स्वराचे साहाय्य घ्यावे लागते त्या वर्णाला व्यंजन असे म्हणतात.

२) मराठीत एकूण ३४ व्यंजन आहेत.

क ख ग घ ङ
च छ ज झ ञं
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व श
ष स ह ळ
========================================================================
मराठी बाराखडी

बाराखडी : मराठी भाषेत व्यंजनाला स्वर किंवा स्वरादी जोडल्यावर संयुक्त वर्णांची जी मालिका तयार होते त्याला बाराखडी असे म्हणतात.

कंठ्य व्यंजन

स्वर स्वरादी
अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः
◌ ा ि ी ु ू ृ ॄ े ै ो ौ ं ः
क का कि की कु कू कृ कॄ के कै को कौ कं कः
ख खा खि खी खु खू खृ खॄ खे खै खो खौ खं खः
ग गा गि गी गु गू गृ गॄ गे गै गो गौ गं गः
घ घा घि घी घु घू घृ घॄ घे घै घो घौ घं घःतालव्य व्यंजन

स्वर स्वरादी
अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः
◌ ा ि ी ु ू ृ ॄ े ै ो ौ ं ः
च चा चि ची चु चू चृ चॄ चे चै चो चौ चं चः
छ छा छि छी छु छू छृ छॄ छे छै छो छौ छं छः
ज जा जि जी जु जू जृ जॄ जे जै जो जौ जं जः
झ झा झि झी झु झू झृ झॄ झे झै झो झौ झं झःमूर्धन्य व्यंजन (consonant)स्वर स्वरादी
अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः
◌ ा ि ी ु ू ृ ॄ े ै ो ौ ं ः
ट टा टि टी टु टू टृ टॄ टे टै टो टौ टं टः
ठ ठा ठि ठी ठु ठू ठृ ठॄ ठे ठै ठो ठौ ठं ठः
ड डा डि डी डु डू डृ डॄ डे डै डो डौ डं डः
ढ ढा ढि ढी ढु ढू ढृ ढॄ ढे ढै ढो ढौ ढं ढः
ण णा णि णी णु णू णृ णॄ णे णै णो णौ णं णः

दंत्य व्यंजन (consonant)स्वर स्वरादी
अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः
◌ ा ि ी ु ू ृ ॄ े ै ो ौ ं ः
त ता ति ती तु तू तृ तॄ ते तै तो तौ तं तः
थ था थि थी थु थू थृ थॄ थे थै थो थौ थं थः
द दा दि दी दु दू दृ दॄ दे दै दो दौ दं दः
ध धा धि धी धु धू धृ धॄ धे धै धो धौ धं धः
न ना नि नी नु नू नृ नॄ ने नै नो नौ नं नः

ओष्ठ्य व्यंजन (consonant)स्वर स्वरादी
अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः
◌ ा ि ी ु ू ृ ॄ े ै ो ौ ं ः
प पा पि पी पु पू पृ पॄ पे पै पो पौ पं पः
फ फा फि फी फु फू फृ फॄ फे फै फो फौ फं फः
ब बा बि बी बु बू बृ बॄ बे बै बो बौ बं बः
भ भा भि भी भु भू भृ भॄ भे भै भो भौ भं भः
म मा मि मी मु मू मृ मॄ मे मै मो मौ मं मः

अन्त्यःस्थ व्यंजन (consonant)स्वर स्वरादी
अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः
◌ ा ि ी ु ू ृ ॄ े ै ो ौ ं ः
य या यि यी यु यू यृ यॄ ये यै यो यौ यं यः
र रा रि री रु रू रृ रॄ रे रै रो रौ रं रः
ल ला लि ली लु लू लृ लॄ ले लै लो लौ लं लः
व वा वि वी वु वू वृ वॄ वे वै वो वौ वं वः
श शा शि शी शु शू शृ शॄ शे शै शो शौ शं शः

व्यंजन (consonant)स्वर स्वरादी
अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः
◌ ा ि ी ु ू ृ ॄ े ै ो ौ ं ः
ष षा षि षी षु षू षृ षॄ षे षै षो षौ षं षः
स सा सि सी सु सू सृ सॄ से सै सो सौ सं सः
ह हा हि ही हु हू हृ हॄ हे है हो हौ हं हः
ळ ळा ळि ळी ळु ळू ळृ ळॄ ळे ळै ळो ळौ ळं ळः
========================================================================
मराठी शब्दाच्या जाती

नाम - जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.
उदाहरण - घर, आकाश, गोड

सर्वनाम - जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.
उदाहरण - मी, तू, आम्ही

विशेषण - जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.
उदाहरण - गोड, उंच

क्रियापद - जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.
उदाहरण - बसणे, पळणे

क्रियाविशेषण - जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.
उदाहरण - इथे, उद्या

शब्दयोगी अव्यय - जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी

उभयान्वयी अव्यय - जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - व, आणि, किंवा

केवलप्रयोगी अव्यय - जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - अरेरे, अबब

शब्द विकाराचे प्रकार

काही शब्द जेंव्हा वाक्यात वापरले जातात तेंव्हा मूळ शब्दास प्रत्यय लागून त्यात बदल होतो किंवा शब्द जसाच्या तसा वापरला जातो. ज्या विविध कारणामुळे मुळ शब्दात बदल घडतो ती कारणे पाच विभागात मोडतात.

१) वचन २) लिंग ३) पुरुष ४) विभक्ती ५) काळ
वचन

एखाद्या नामावरून ती वस्तू एक आहे का अनेक आहेत हे कळते त्याला वाचन असे म्हणतात. वाचनाचे एकूण २ प्रकार आहेत.
एकवचन : ज्या नामावरून त्या वस्तूची संख्या एक आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे वचन एकवचन मानले जाते.
उदाहरण - अंबा, घोडा, पेढा
अनेकवचन : ज्या नामावरून त्या वस्तूची संख्या एकपेक्षा जास्त आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे वचन अनेकवचन मानले जाते.
उदाहरण - अंबे, घोडे, पेढे
लिंग

एखाद्या नामावरून ती वस्तू पुरुषजातीची, स्त्रीजातीची किंवा भिन्न जातीची आहे हे कळते त्याला त्या नामाचे लिंग असे म्हणतात. लिंगाचे एकूण ३ प्रकार आहेत.
पुल्लिंग : ज्या नामावरून ती वस्तू पुरुषजातीची आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे लिंग पुल्लिंग समजावे.
उदाहरण - मुलगा, घोडा, कुत्रा
स्त्रीलिंग : ज्या नामावरून ती वस्तू स्त्रीजातीची आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे लिंग स्त्रीलिंग समजावे.
उदाहरण - मुलगी, घोडी, कुत्री
नपुंसकलिंग : ज्या नामावरून ती वस्तू पुरुषजातीची किंवा स्त्रीजातीची आहे हे समजत नाही, तेंव्हा त्या नामाचे लिंग नपुसंकलिंग समजावे.
उदाहरण - मुल, पिल्लू, पाखरू
पुरुष

एखाद्या नामावरून बोलणारा , ज्याच्याशी बोलायचे तो व ज्याविषयी बोलयचे त्या सर्व नामाला पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. पुरुषवाचक सर्वनामाचे ३ प्रकार आहेत.
प्रथम पुरुषवाचक : बोलणारा किंवा लिहिणारा स्वतःचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वानामाचा उपयोग करतो त्या सर्वनामाला प्रथम पुरुषवाचक सर्वानाम म्हणतात.
द्वितीय पुरुषवाचक: : ज्याच्याशी बोलायाचे त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वानामाचा उपयोग करतात त्या सर्वनामाला द्वितीय पुरुषवाचक सर्वानाम म्हणतात.
तृतीय पुरुषवाचक : ज्याच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वानामाचा उपयोग करतात त्या सर्वनामाला तृतीय पुरुषवाचक सर्वानाम म्हणतात.
विभक्ती

वाक्यात येणार्‍या नामांचा व सर्वनामांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबध असतो व हा संबंध दाखवण्या साठी जो नामात किंवा सर्वानामात बदल करतात त्याला विभक्ती असे म्हणतात. विभक्तीचे एकूण ८ प्रकार आहेत.
काळ

क्रियापदावरून ती घटना कधी घडली हे समजते त्याला काळ असे म्हणमा तात. काळाचे एकूण ३ प्रकार आहेत.
वर्तमानकाळ : ज्या क्रियापदावरूनती घटना आत्ता घडत आहे असे समजते, तेंव्हा त्या क्रियापदाचा काळ वर्तमानकाळ मानला जातो.
भूतकाळ : ज्या क्रियापदावरूनती घटना आधी घडली आहे असे समजते, तेंव्हा त्या क्रियापदाचा काळ भूतकाळ मानला जातो.
भविष्यकाळ : ज्या क्रियापदावरूनती घटना पुढे घडणार आहे असे समजते, तेंव्हा त्या क्रियापदाचा काळ भविष्यकाळ मानला जातो.

तक्ता - शब्द जाती व शब्द विकाराचे प्रकार
जात व प्रकार वचन लिंग पुरुष विभक्ती काळ
नाम हो हो नाही हो नाही
सर्वनाम हो हो हो हो नाही
विशेषण हो हो नाही नाही नाही
क्रियापद हो हो हो नाही हो
क्रियाविशेषण हो हो नाही नाही नाही
शब्दयोगी अव्यय नाही नाही नाही नाही नाही
उभयान्वयी अव्यय नाही नाही नाही नाही नाही
केवलप्रयोगी अव्यय नाही नाही नाही नाही नाही

=============================================================
नाम

जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.
उदाहरण - घर, आकाश, गोड

नामांचे मुख्य प्रकार तीन आहेत -

१) सामान्यनाम
२) विशेषनाम
३) भाववाचकनाम

सामान्यनाम प्राणीवाचक पदार्थवाचक किंवा समूहवाचक असतात.
नामाचे लिंग

मराठी भाषेत शब्दाचे लिंग ठरवण्याचे निश्चित असे काही नियम नाहीत पण खालील सामान्य नियम वापरता येतील.

जर प्राणीवाचक नावावरून तो प्राणी नर किंवा मादी आहे हे समजते त्या प्रमाणे त्या नामाचे लिंग ठरवायचे.
पुल्लिंग - घोडा बकरा कुत्रा
स्त्रील्लिंग - घोडी, बकरी, कुत्री

जर एखाद्या नामावरून मोठा आकार, शक्ती, कठोरपणा याचा बोध होत असेल तर ते नाम पुल्लिंगी असते.
पुल्लिंग - सूर्य, सागर, लोट, गोळा

जर एखाद्या नामावरून लहान आकार, नाजुकपणा, सुंदरता याचा बोध होत असेल तर ते नाम स्त्रील्लिंगी असते.
स्त्रील्लिंग - झुळूक, वनश्री, लोटी, गोळी

भाववाचक नामे जर पणा किंवा वा या प्रत्ययाने पूर्ण होत असतील तर ती नामे पुल्लिंगी असतात.
पुल्लिंग - देवपणा, चांगुलपणा, गारवा, हिरवा

भाववाचक नामे जर ई, की, ता, किंवा गिरी या प्रत्ययाने पूर्ण होत असतील तर ती नामे स्त्रीलिंगी असतात.
स्त्रीलिंग - गरिबी, लांबी, माणुसकी, मानवता, कारागिरी

भाववाचक नामे जर पण, त्व, य, किंवा व या प्रत्ययाने पूर्ण होत असतील तर ती नामे नपुंसकलिंगी असतात.
नपुंसकलिंग - देवपण, मातृत्व, शूरत्व, शौर्य, पेय, गौरव

नामाचे लिंग

मराठी भाषेत शब्दाचे लिंग बदलण्याचे काही नियम खालील प्रमाणे आहेत.

प्राणीवाचक 'आ' कारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप 'ई' कारांत व नपुंसकलिंगी रूप 'ए' कारांत होते.

पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग
मुलगा मुलगी मुलगे
घोडा घोडी घोडे
कुत्रा कुत्री कुत्रे
बकरा बकरी बकरे

काही प्राणीवाचक पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप 'ईण' हा प्रत्यय लागून होते.

पुल्लिंग स्त्रीलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग
वाघ वाघीण सिंह सिंहीण
सुतार सुतारीण कुंभार कुंभारीण

काही 'अ' कारांत प्राणीवाचक पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप 'ई' हा प्रत्यय लागून होते.

पुल्लिंग स्त्रीलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग
दास दासी गोप गोपी
वानर वानरी बेडूक बेडकी

काही 'आ' कारांत पदार्थवाचक पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप 'ई' हा प्रत्यय लागून होते.

पुल्लिंग स्त्रीलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग
लोटा लोटी भाकरा भाकरी
गोळा गोळी गाडा गाडी
नामाचे वचन

नामांचे वचनांचे नियम खालील प्रमाणे आहेत.

विशेषनामांचे व भाववाचकनामांचे अनेकवचन होत नाही.

सामान्यनामांचे वचनांचे नियम खालील प्रमाणे आहेत.

एकवचन अंत्यस्वर पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग
एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन
उदाहरण अंत्यस्वर उदाहरण उदाहरण अंत्यस्वर उदाहरण उदाहरण अंत्यस्वर उदाहरण
अ देव अ देव गार, भिंत आ, ई गारा, भिंती घर, पान ए घरे, पाने
आ आंबा ए आंबे माता, शाळा आ माता, शाळा - -
इ इ ई इ
ई तेली ई तेली स्त्री, बी आ स्त्रिया, बिया ए
उ उ धनु उ धनु उं
ऊ लाडू ऊ लाडू आ ए
ॠ - - - - - -
ए - - आ तळे, मडके ई तळी, मडकी
ऐ - - आ - -
ओ ओ बायको आ बायका - -
औ औ - - - -
नामाचे विभक्ती

नामांचे विभक्तीचे प्रत्यय खालील प्रमाणे आहेत.
विभक्ती एकवचन अनेकवचन
प्रत्यय उदाहरण प्रत्यय उदाहरण
प्रथमा -- फूल -- फुले
द्वितीया स, ला, ते फुलास, फुलाला स, ला, ना, ते फुलांस, फुलांना
तृतीया ने, ए, शी फुलाने, फुलाशी नी, शी, ई, ही फुलांनी, फुलांशी
चथुर्ती स, ला, ते फुलास, फुलाला स, ला, ना, ते फुलांस, फुलांना
पंचमी ऊन, हून फुलाहून ऊन, हून फुलांहून
षष्ठी चा, ची, चे फुलाचा, फुलाची, फुलाचे चा, ची, चे फुलांचा, फुलांची, फुलांचे
सप्तमी त, ई, आ फुलात त, ई, आ फुलांत
संबोधन -- फुला नो फुलांनो
===========================================================
सर्वनाम

जो शब्द नामाची पुनरूक्ती टाळण्यासाठी नामाच्या जागी वापरला जातो त्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.

सर्वनामातसुद्धा वचन, लिंग, पुरुष, व विभक्ती प्रमाणे बदल होतात.

सर्वनामाचे एकूण ६ प्रकार आहेत.
पुरुषवाचक सर्वनामे

ज्या पुरुषवाचक नामांच्या ऐवजी जे शब्द वपरले जातात त्यांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात.

पुरुष एकवचन अनेकवचन
प्रथम मी आम्ही
द्वितीय तू तुम्ही
तृतीय तो, ती, ते ते, त्या, ते
दर्शक सर्वनामे

जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्या साठी ज्या सर्वनामांचा उपयोग करतात त्यांना दर्शक सर्वनामे म्हणतात.

उदाहरण - हा, ही, हे, तो, ती, ते
संबंधी सर्वनामे

जे सर्वनाम वाक्यातील दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवण्यासाठी वापरले जाते त्यांना संबंधी सर्वनामे म्हणतात.

उदाहरण - जो, जी, जे
प्रश्नार्थक सर्वनामे

ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात.

उदाहरण - कोण, काय.
अनिश्चित , सामान्य सर्वनामे

ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात कुठल्या नामासाठी आला आहे या बद्दल अनिश्चीतीतता असते अशा सर्वनामांना अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे म्हणतात.

उदाहरण - कोण, काय.
आत्मवाचक सर्वनामे

ज्या सर्वनामांचा अर्थ "स्वतः" असा होतो त्यांना आत्मवाचक सर्वनामे म्हणतात.

उदाहरण - स्वतः, आपण.
========================================================================
शब्दयोगी अव्यये

काही शब्द नामांना किंवा सर्वनामाना जोडून येतात व त्या वाक्यातील दुस‌या एखाद्या शब्दाशी संबंध दाखवतात अशा शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.

शब्दयोगी अव्यये प्रत्ययांसारखी शब्दाच्या मागे जोडली जातात पण त्यांना स्वतंत्र अर्थ असतो.

हे शब्द जर स्वतंत्रपणे वापरले तर ते क्रियाविशेषणाचे काम करतात.

शब्दयोगी अव्ययांचे प्रकार

कालवाचक शब्दयोगी अव्यये
पूर्वी आधी आत पुढे नंतर पर्यंत पावेतो

गतीवाचक शब्दयोगी अव्यये
आतून खालून मधून पर्यंत पासून

स्थलवाचक शब्दयोगी अव्यये
आत बाहेर मागे पुढे मध्ये अलीकडे समोर जवळ ठायी पाशी नजीक समीप समक्ष

करणवाचक शब्दयोगी अव्यये
मुळे योगे करून कडून द्वारा करवी हाती

हेतुवाचक शब्दयोगी अव्यये
साठी कारणे करिता अर्थी प्रीत्यर्थ निमित्त स्तव

व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यये
शिवाय
खेरीज विना वाचून व्यतिरिक्त परता

तुलनावाचक शब्दयोगी अव्यये
पेक्षा तर तम मध्ये परीस

योग्यतावाचक शब्दयोगी अव्यये
योग्य सारखा जोगा सम समान प्रमाणे बरहुकूम

कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यये
च मात्र ना पण फक्त केवळ

संग्रहवाचक शब्दयोगी अव्यये
सुद्धा देखील ही पण बरीक केवळ फक्त

संबंधवाचक शब्दयोगी अव्यये
विशी विषयी संबंधी

साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यये
बरोबर सह संगे सकट सहित सवे निशी समवेत

भागवाचक शब्दयोगी अव्यये
पैकी पोटी आतून

विनिमयवाचक शब्दयोगी अव्यये
बद्दल ऐवजी जागी बदली

दिकवाचक शब्दयोगी अव्यये
प्रत प्रति कडे लागी

विरोधवाचक शब्दयोगी अव्यये
विरुद्ध वीण उलटे उलट

परिमाणवाचक शब्दयोगी अव्यये
भर
==============================================================
मराठी अंक

१ ११ २१ ३१ ४१ ५१ ६१ १ १ ९१
२ १२ २२ ३२ ४२ ५२ ६२ ७२ ८२ ९२
३ १३ २३ ३३ ४३ ५३ ६३ ७३ ८३ ९३
४ १४ २४ ३४ ४४ ५४ ६४ ७४ ८४ ९४
५ १५ २५ ३५ ४५ ५५ ६५ ७५ ८५ ९५
६ १६ २६ ३६ ४६ ५६ ६६ ७६ ८६ ९६
७ १७ २७ ३७ ४७ ५७ ६७ ७७ ८७ ९७
८ १८ २८ ३८ ४८ ५८ ६८ ७८ ८८ ९८
९ १९ २९ ३९ ४९ ५९ ६९ ७९ ८९ ९९
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००

मराठी अंक

एक अकरा एकवीस एकतीस एकेचाळीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर एक्याऐंशी एक्याण्णव
दोन बारा बावीस बत्तीस बेचाळीस बावन्न बासष्ट बहात्तर ब्याऐंशी ब्याण्णव
तीन तेरा तेवीस तेहत्तीस त्रेचाळीस त्रेपन्न त्रेसष्ट त्र्याहत्तर त्र्याऐंशी त्र्याण्णव
चार चौदा चोवीस चौतीस चव्वेचाळीस चोपन्न चौसष्ट चौर्‍याहत्तर चौर्‍याऐंशी चौर्‍याण्णव
पाच पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव
सहा सोळा सव्वीस छत्तीस सेहेचाळीस छपन्न सहासष्ट शहात्तर शहाऐंशी शहाण्णव
सात सतरा सत्तावीस सदोतीस सत्तेचाळीस सत्तावन सदुसष्ट सत्त्यात्तर सत्त्याऐंशी सत्त्याण्णव
आठ अठरा अठ्ठावीस अडोतीस अठ्ठेचाळीस अठ्ठावन अडुसष्ट अठ्ठ्यात्तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव
नऊ एकोणीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणनव्वद नव्याण्णव
दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर
===================================================================
नातेवाईक (naatevaeeka) Relatives
मराठी शब्द इंग्रजी भाषांतर इंग्रजीत अर्थ
Marathi Word English Transliteration Meaning
आई Aaai Mother
वडील Vadeela Father
भाऊ Bhaau Brother
बहीण Baheena Sister
मामा Maamaa Mother's brother
मामी Maamee Mother's brother's wife, Mama's wife.
काका Kaakaa Uncle
काकी Kaakee Uncle's wife
काकू Kaakoo Uncle's wife
आजी Aaji Grand mother
आजोबा Aajobaa Grand father
मावशी Maavashi Mother's sister
आत्या Atyaa Father's sister
पणजी Panajee Great grand mother
पणजोबा Panajobaa Great grand father
खापर पणजोबा Khaapara panjobaa Great great grand father
खापर पणजी Khaapara panajee Great great grand mother
नातू Naatoo Grand son
नात Naata Grand daughter
पणतू Panatoo Great grand son
पणती Panati Great grand daughter
खापर पणतू Khaapar panatoo Great great grand son
खापर पणती Khaapar panatee Great great grand daughter
=====================================================
भाज्या (bhaajyaa) - Vegetables
मराठी शब्द इंग्रजी भाषांतर इंग्रजीत अर्थ
Marathi Word English Transliteration Meaning
गाजर gaajara Carrot
पालक paalaka Spinach
बटाटा bataataa Potato
कांदा kaa-ndaa Onion
वाटाणा vaataanaa Pea
मटार mataara Green Pea
कोबी kobee Cabbage
कॉली फ्लॉवर cauliflower Cauliflower
कोथिंबीर kothi-mbeera Cilantro
भोपळा bhopalaa Pumpkin
काकडी kaakadi Cucumber
मका makaa Corn
मीरची meerachee Pepper
ढोबळी मीरची dhobalee meerachee Bell Pepper
मुळा mulaa Radish
टोमॅटो tomato Tomato
भेंडी bhendi Okra
आल aala Ginger
लसूण lasoon Garlic
कोशिंबीर koshi-mbeer Salad with yogurt
========================================================================
फळ (phala) - Fruits
मराठी शब्द इंग्रजी भाषांतर इंग्रजीत अर्थ
Marathi Word English Transliteration Meaning
आंबा aa-mbaa Mango
केळ kela Banana
द्राक्ष draa-ksha Grapes
संत्र sa-ntra Orange
पेअर pear Pear
पेरू peroo Guava
अननस ananasa Pineapple
सफरचंद sapharcha-nda Apple
कलिंगड kali-ngada Watermelon
खरबुज kharbuja Cantalope
अंजीर aa-njir Fig
डाळींब daali-mba Pomegranate
नारळ Naarala Coconut
=================================================================
प्राणी (praanee) – Animals
मराठी शब्द इंग्रजी भाषांतर इंग्रजीत अर्थ
Marathi Word English Transliteration Meaning
कासव kaasava Turtle
कोंबडी ko-mbadee Chicken
बकरा bakaraa Goat
बकरी bakrree Lamb
हती hatti Elephant
कुत्रा kutraa Dog
मांजर maa-njara Cat
सिंह si-nha Lion
वाघ waagha Tiger
गाय gaaya Cow
म्हैस mhaisa Water buffalo
माकड maakada Monkey
गाढव gaadhava Donkey
अस्वल aswala Bear
ऊंट uanta Camel
जिराफ girrafe Girrafe
झेब्रा zebraa Zebraa
साप saapa Snake
उंदीर undeera Rat
घोडा ghodaa Horse
मगर Magara Alligator
ससा sasaa Rabbit
बेडुक beduka Frog
कोल्हा kolhaa Fox
लांडगा laa-ndagaa Wolf
=================================================================
रंग (ra-nga) - Colors
मराठी शब्द इंग्रजी भाषांतर इंग्रजीत अर्थ
Marathi Word English Transliteration Meaning
काळा Kaala Black
पांढरा Paa-ndharaa White
लाल laala Red
हिरवा hiravaa Green
निळा nilaa Blue
पिवळा pivalaa Yellow
तपकीरी tapakeeree Brown
खाकी khaakee Brown
गुलाबी gulaabee Pink
केशरी kesharee Orange
भगवा bhagavaa Orange
नारींगी naaree-ngee Purple
पोपटी popatee Light green
राखाडी raakhaadee Gray
सोनेरी soneree Golden
चंदेरी cha-nderi Silver
रूपेरी rooperee Silver
=====================================================================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा