Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

गुरुवार, २६ एप्रिल, २०१२

mpsc current 101 to125

Sunday 28 August 2011
प्रश्नमंजुषा -101
सहाय्यक पूर्व परीक्षा - २८ ऑगस्ट २०११

आभार: उमेश नगराळे ह्या मित्राने ही प्रश्नपत्रिका परीक्षा झाल्यानंतर काही तासातच स्कॅन करून पाठवली.
भविष्यात इतर मित्रांनीही विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अश्याच स्वरुपात पाठवल्यास येथे त्यांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न होईल.

1. प्रकाशवाटा हे आत्मचरित्र__________ या प्रसिध्द व्यक्तीचे आहे.

A. डॉ.प्रकाश आमटे
B. डॉ.अनिल अवचट
C. डॉ. रघुनाथ माशेलकर
D. माधव कानिटकर

Click for answer
A. डॉ.प्रकाश आमटे
2. 2010 मध्ये भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक कोण होते?

A. फ्लोरीसन फुक्स
B. जोश ब्रासा
C. लोंबी
D. बेंजामिन बेस

Click for answer
B. जोश ब्रासा

3. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 2010 मध्ये कोणत्या चित्रपटास ऑस्कर अवार्ड मिळाला?

A. द हार्ट लॉकर
B. एन एज्युकेशन
C. इनग्लोरीयस बास्टर्ड
D. द सिक्रेट इन देअर आईज

Click for answer
A. द हार्ट लॉकर

4. स्वातंत्र्यसेनानी अहिल्याबाई रांगणेकर यांनी कोणत्या पक्षात काम केले ?

A. मार्क्सवादी कम्युनिस्ट
B. समाजवादी पक्ष
C. काँग्रेस
D. जनता पक्ष

Click for answer
A. मार्क्सवादी कम्युनिस्ट
अधिक माहिती येथे उपलब्ध आहे:
http://www.timescontent.com/tss/showcase/preview-buy/95927/News/A-B-Bardhan-Ahilyabai-Rangnekar.html

5. सौम्या स्वामीनाथन ह्या कशाशी संबंधित आहेत ?

A. टेनिस
B. चेस ( बुद्धिबळ )
C. गिर्यारोहण
D. मॅरेथान

Click for answer
B. चेस ( बुद्धिबळ )
6. फेब्रुवारी 2011 पासून कोणती योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याने घेतला आहे ?

A. निर्मल स्व-राज्य मोहीम
B. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना
C. यशवंत ग्राम समृध्दी योजना
D. म.गांधी रोजगार योजना

Click for answer
A. निर्मल स्व-राज्य मोहीम

7. जैतापूर जवळ माडबन येथे कोणता ऊर्जा प्रकल्प उभा राहतो आहे ?

A. समुद्र लाटावर आधारित
B. अणु ऊर्जा
C. जल-विदयुत
D. पवन ऊर्जा

Click for answer
B. अणु ऊर्जा
8. महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या __________ आहे.

A. 350
B. 355
C. 351
D. 357

Click for answer
B. 355
संदर्भ: महाराष्ट्राची आर्थीक पाहणी पान क्रमांक -3

9. भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे ?

A. 14
B. 18
C. 20
D. 22

Click for answer
D. 22

10. विधानपरिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदार संघातून निवडले जातात?

A. 1/2
B. 1/4
C. 1/12
D. 1/3

Click for answer
C. 1/12
========================================================================
Sunday 28 August 2011
प्रश्नमंजुषा -102
सहाय्यक पूर्व परीक्षा - २८ ऑगस्ट २०११

आभार: उमेश नगराळे ह्या मित्राने ही प्रश्नपत्रिका परीक्षा झाल्यानंतर काही तासातच स्कॅन करून पाठवली.
भविष्यात इतर मित्रांनीही विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अश्याच स्वरुपात पाठवल्यास येथे त्यांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न होईल.
1. ___________ हे भारताचे 25 वे राज्य बनले.

A. गोवा
B. मिझोराम
C. सिक्किम
D. झारखंड

Click for answer
A. गोवा
http://www.goa.gov.in/home.html

2. राज्यपाल कोणास जबाबदार असतो ?

A. मुख्यमंत्री
B. गृहमंत्री
C. पंतप्रधान
D. भारताचे राष्ट्रपती

Click for answer
D. भारताचे राष्ट्रपती
3. __________ हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात.

A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. राज्यपाल
D. सरन्यायाधीश

Click for answer
C. राज्यपाल
4. जास्तीतजास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकते ?

A. 7
B. 15
C. 16
D. 14

Click for answer
D. 14

5. भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीसह किती न्यायमूर्ती आहेत ?

A. 25
B. 26
C. 27
D. 17

Click for answer
C. 27

6. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ?

A. 8 डिसेंबर 1946
B. 9 डिसेंबर 1946
C. 15 डिसेंबर 1946
D. 15 ऑगस्ट 1947

Click for answer
B. 9 डिसेंबर 1946

7. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते ?

A. के.संथानम
B. अब्दुल कलाम आझाद
C. जॉन मथाई
D. फ्रँक अन्थोनी

Click for answer
D. फ्रँक अन्थोनी

8. भारतातील कोणत्या घटकराज्याची स्वत:ची स्वतंत्र राज्य घटना आहे ?

A. जम्मू आणि काश्मीर
B. महाराष्ट्र
C. बिहार
D. आंध्रप्रदेश

Click for answer
A. जम्मू आणि काश्मीर
9. ______________ हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते ?

A. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
B. वल्लभभाई पटेल
C. डॉ.राजेंद्रप्रसाद
D. पं. नेहरू

Click for answer
C. डॉ.राजेंद्रप्रसाद

10. महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे _________ किमी आहे.

A. 600 किमी
B. 700 किमी
C. 720 किमी
D. 800 किमी

Click for answer
D. 800 किमी
========================================================================
Sunday 28 August 2011
प्रश्नमंजुषा -103
सहाय्यक पूर्व परीक्षा - २८ ऑगस्ट २०११

आभार: उमेश नगराळे ह्या मित्राने ही प्रश्नपत्रिका परीक्षा झाल्यानंतर काही तासातच स्कॅन करून पाठवली.
भविष्यात इतर मित्रांनीही विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अश्याच स्वरुपात पाठवल्यास येथे त्यांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न होईल.

1. +4m आणि -2m नाभीय अंतरे असलेले दोन पातळ भिंग एकमेकांना स्पर्श करून ठेवली, तर त्यांच्या संयोगी भिंगाचे नाभीय अंतर किती ?

A. -4 m
B. +2 m
C. +4 m
D. -2 m

Click for answer
A. -4 m
संदर्भ:
विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता दहावी भाग 1 - पान क्रमांक 186 जुने पाठ्यपुस्तक-2007 ते 2009 मधील आवृत्ती

2. एखाद्या द्रावणाचा pH जर 7 असल्यास , ते द्रावण __________ असते.

A. आम्लधर्मी
B. आम्लारीधर्मी
C. अल्कालाइन
D. उदासीन

Click for answer
D. उदासीन
3. वातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून खालीलपैकी काय वापरतात ?

A. कार्बन टेट्राक्लोराईड
B. मिथेन
C. क्लोरोफॉर्म
D. फ्रेऑन

Click for answer
D. फ्रेऑन
4. एका किरणोत्सारी पदार्थाचा अर्धाआयुष्य काल 4 तास आहे , तर 3 अर्धआयुष्य कालावधीनंतर त्याच्या कितव्या हिस्स्याचा ह्रास होईल ?

A. 1/8
B. 7/8
C. 1/4
D. 3/4

Click for answer
B. 7/8
5. वाहकातील दोन बिंदुमधील विदयुत विभवांतर (V) __________ या द्वारे व्यक्त करतात.

A. V= कार्य(W)/प्रभार(Q)
B. V= कार्य(W)/काळ (t)
C. V= प्रभार(Q)/काळ (t)
D. V= प्रभार(Q)/कार्य(W)

Click for answer
A. V= कार्य(W)/प्रभार(Q)

6. अल्फा, बीटा , गॅमा या किरणांच्या धातूच्या पत्र्यातून आरपार जाण्याच्या क्षमतेनुसार क्रमसंबंध ओळखा.

A. गॅमा > बीटा > अल्फा
B. अल्फा > बीटा > गॅमा
C. बीटा > अल्फा > गॅमा
D. अल्फा > गॅमा > बीटा

Click for answer
A. गॅमा > बीटा > अल्फा
7. मध्यम तापमानावर खालीलपैकी कोणते संयुग तापविले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो ?

A. क्युप्रिक ऑक्साईड
B. मर्क्युरिक ऑक्साईड
C. झिंक ऑक्साईड
D. अल्युमिनियम ऑक्साईड

Click for answer
D. अल्युमिनियम ऑक्साईड

8. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मीती होते ?

A. गव्हाचे शेत
B. भाताचे शेत
C. कापसाचे शेत
D. भुईमुगाचे शेत

Click for answer
B. भाताचे शेत

9. सध्या इन्शुलिन हे औषध कमी किमतीत मिळते आहे . त्याचे कारण म्हणजे

A. जनुकीय परावर्तीत जीवाणू ते तयार करतात.
B. येथे जीवाणूंना दिले जाणारे अन्न अतिशय स्वस्त आहे.
C. किण्वनाची प्रक्रिया अतिशय वेग्वाग्न असते.
D. किण्वन करण्याची जी संयंत्रे वापरली जातात ती वर्षानुवर्षे टिकतात.

Click for answer
A. जनुकीय परावर्तीत जीवाणू ते तयार करतात.

10. मानवी गलगंड ____________ याच्याशी संबंधित आहे.

A. अन्नातील आयोडिनची कमतरता
B. अवटू ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे
C. रक्तातील आयोडीनचे (I2) अति वेगाने शोषण होणे .
D. वरील सर्व

Click for answer
D. वरील सर्व
================================================================
Monday 29 August 2011
प्रश्नमंजुषा -104
Question Bank-1 Current -India Personalities

1. इ.स्. 1857 च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते?

A. इंग्रजांना समूळ नष्ट करणे.
B. इंग्रजांना सहकार्य करणे.
C. इंग्रजांना विरोध करणे.
D. वरीलपैकी कोणतेही नाही
Click for answer
A. इंग्रजांना समूळ नष्ट करणे.

2. भिल्लाचा उठाव _________ येथे झाला.

A. पुणे
B. खानदेश
C. मुंबई
D. कोकण

Click for answer
B. खानदेश

3. इ.स्. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली ?

A. लॉर्ड रिपन
B. लॉर्ड विल्यम बेंटींक
C. लॉर्ड कॉर्नवालीस
D. लॉर्ड डलहौसी

Click for answer
D. लॉर्ड डलहौसी

4. जालियनवाला बागेतील निरपराध निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले ?

A. जनरल डायर
B. ओ'डवायर
C. चेम्सफोर्ड
D. कर्झन

Click for answer
A. जनरल डायर
5. इ.स. 1932 मध्ये डॉ.आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला करार

A. जातीय निवाडा
B. पुणे करार
C. अस्पृश्योद्धारा संबंधीची रूपरेषा
D. वरीलपैकी कोणतेही नाही

Click for answer
B. पुणे करार
6. होमरुल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरु झाली होती ?

A. दक्षिण आफ्रिका
B. आयर्लंड
C. नेदरलँड
D. भारत

Click for answer
B. आयर्लंड
7. कोणत्या कायद्याने मुस्लीमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले ?

A. 1813
B. 1909
C. 1919
D. 1935

Click for answer
B. 1909

8. सप्टेंबर 1916 मध्ये 'होमरुल लीग ' ची स्थापना _____________ यांनी केली.

A. इंदुलाल याज्ञिक
B. जॉर्ज अरुंडेल
C. ऍनी बेझंट
D. गोपाळ कृष्ण गोखले

Click for answer
C. ऍनी बेझंट

9. 'भारत सेवक समाज ' या संस्थेचे संस्थापक कोण ?

A. दादाभाई नौरोजी
B. गोपाळ कृष्ण गोखले
C. महात्मा गांधी
D. बिपिन चंद्र पाल

Click for answer
B. गोपाळ कृष्ण गोखले
10. महाराष्ट्रात ____________ साली शेतकर्‍यांनी जमीनदार आणि सावकार यांच्याविरूध्द उठाव केला ?

A. 1860
B. 1873
C. 1875
D. 1905

Click for answer
C. 1875
सदर उठावाला महात्मा फुले यांनी प्रेरणा दिली होती.
===============================================================
Thursday 1 September 2011
प्रश्नमंजुषा -105

1. जमशेदपूर हे औद्योगिक शहर_____________ या नदीवर वसले आहे.

A. महानदी
B. सोन
C. सुवर्णरेखा
D. गंगा

Click for answer
C. सुवर्णरेखा

2. भारतात चहा उत्पादनात ____________ राज्याचा प्रथम क्रमांक आहे.

A. आसाम
B. बिहार
C. महाराष्ट्र
D. ओरिसा

Click for answer
A. आसाम
3. महाराष्ट्राची पठारी विभागामध्ये _________ मृदा मोठया प्रमाणात विखुरलेली आढळते.

A. काळी
B. तांबडी
C. गाळाची
D. जांभी

Click for answer
A. काळी
4. _____________ ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे.

A. पेनगंगा
B. भीमा
C. येरळा
D. पंचगंगा

Click for answer
A. पेनगंगा
5. ___________ या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे.

A. चिलका
B. लोणार
C. सांभार
D. पुलीकेत

Click for answer
B. लोणार

6. _____________ हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे.

A. अरावली
B. सह्याद्री
C. विंध्य
D. निलगिरी

Click for answer
A. अरावली
7. माथेरान हे _____________ वस्तीचे उदाहरण आहे.

A. रेषीय
B. जुळी
C. गोलाकार
D. डोंगरमाथा

Click for answer
D. डोंगरमाथा

8. खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही ?

A. उरण
B. खापरखेडा
C. अंबरनाथ
D. परळी

Click for answer
C. अंबरनाथ

9. आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो, त्यांचा क्रम खालीलपैकी कोणता ?

A. भीमा , वैनगंगा , सीना , सावित्री
B. वैनगंगा , सीना , भीमा , सावित्री
C. सावित्री, भीमा , सीना , वैनगंगा
D. वैनगंगा, भीमा , सीना , सावित्री

Click for answer
C. सावित्री, भीमा , सीना , वैनगंगा

10. रंगराजन कमिटी ही __________________शी संबंधित आहे.

A. राष्ट्रीय बचत आणि गुंतवणूकीशी
B. गुजरात दंगलीशी
C. मुंबई हल्ल्याशी
D. राजीव गांधी हत्येशी

Click for answer
A. राष्ट्रीय बचत आणि गुंतवणूकीशी
=================================================================
Thursday 1 September 2011
प्रश्नमंजुषा -106
मराठी आणि इंग्रजी


1. "The Philosopher's Stone " ह्या शब्दाचा अर्थ सांगा.

A. A Gem
B. A Stone
C. A Stone which turns iron into Gold.
D. Gold

Click for answer
C. A Stone which turns iron into Gold.

2. Flag या शब्दासाठी मराठी अर्थाचा नपुसकलिंगी शब्द ओळखा.

A. ध्वज
B. निशाण
C. पताका
D. दर्शकपट्टी

Click for answer
B. निशाण
3. निर्णय घेणे या क्रियापदापासून खालील इंग्रजी नाम तयार होते.

A. decided
B. decidedness
C. decision
D. deciding

Click for answer
C. decision
4. "ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू " मराठी भाषेतील उत्प्रेक्षा अलंकाराच्या या विधानाशी साधर्म्य दर्शविणारे इंग्रजी वाक्य कोणते ते लिहा.

A. The rosy morning is like love of God.
B. The rosy dawn is as if love of God.
C. The pink morning is like love of God.
D. The fresh morning is as if love of God.

Click for answer
B. The rosy dawn is as if love of God.

5. "नाममुद्रित पत्र " या शब्दासाठी खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?

A. Letter Head
B. Letter of Authority
C. Letter of Advice
D. Letter of Introduction

Click for answer
A. Letter Head

6. " लक्ष्मी चंचल असते " या मराठी वाक्यबंधासाठी खालील इंग्रजीतील कोणते योग्य भाषांतर निवडाल.

A. Laxmi is movable.
B. God is everywhere.
C. Rich person is very great.
D. Wealth has wings.

Click for answer
D. Wealth has wings.

7. "Mandar could not go to learn English." या इंग्रजी नकारार्थी वाक्याचे मराठीतील होकारार्थी वाक्य कोणते ?

A. मंदार इंग्रजी शिकायला गेलेला नव्हता.
B. मंदार इंग्रजी शिकायला जाऊ शकला.
C. मंदार इंग्रजी शिकायला जाऊ शकतो.
D. मंदार इंग्रजी शिकायला गेला असेल.

Click for answer
B. मंदार इंग्रजी शिकायला जाऊ शकला.

8. "The one who is associated one another in the same employment." या इंग्रजी वाक्यबंधासाठी खालीलपैकी मराठीतील कोणता योग्य पर्याय निवडाल.



A. सभासद
B. सहकारी
C. सहोदर
D. समवयस्क

Click for answer
B. सहकारी

9. "The watchman will be sitting at main gate " हे विधान कोणत्या काळातील आहे ?

A. वर्तमानकाळ
B. चालू भूतकाळ
C. चालू वर्तमानकाळ
D. चालू भविष्यकाळ

Click for answer
D. चालू भविष्यकाळ

10. " Wife " या शब्दाला मराठीमध्ये असणारा अनेकवचनी शब्द कोणता ?

A. बायको
B. सख्या
C. लग्नाच्या बायका
D. बाया

Click for answer
C. लग्नाच्या बायका
===============================================================
Wednesday 7 September 2011
प्रश्नमंजुषा -107

1. महाराष्ट्रात पिण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मागणी आधारित कोणती योजना राबविली गेली ?

A. पाणी पुरवठा प्रकल्प
B. जल स्वराज्य प्रकल्प
C. आपले पाणी प्रकल्प
D. राष्ट्रीय ग्रामीण पेय जल प्रकल्प

Click for answer
B. जल स्वराज्य प्रकल्प
2. राज्यातील बालकुपोषण, बालमृत्यू या गंभीर समस्यांना आळा घालण्यासाठी व माता-बालकांच्या आरोग्याची काळजी कोणत्या मिशनची स्थापना करण्यात आली आहे ?

A. इंदिरा गांधी माता-बाल आरोग्य पोषण मिशन
B. सावित्रीबाई फुले माता-बाल संगोपन पोषण मिशन
C. राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य पोषण मिशन
D. माता-बाल आरोग्य पोषण मिशन

Click for answer
C. राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य पोषण मिशन
3. राज्यपाल ___________यांना संबोधून आपल्या अधिकारपदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देवू शकतो.

A. राष्ट्रपतीला
B. मुख्यमंत्र्याला
C. पंतप्रधानाला
D. यापैकी नाही

Click for answer
A. राष्ट्रपतीला

4. विधीमंडळाच्या दोन अधिवेशनात जास्तीत जास्त किती कालावधी पेक्षा जास्त अंतर असू नये अशी तरतूद आहे ?

A. 3 महिने
B. 6 महिने
C. 9 महिने
D. 12 महिने

Click for answer
B. 6 महिने
5. भारताने संयुक्त राष्ट्र संघटना (UNO) मध्ये कोणत्या वर्षी प्रवेश घेतला?

A. 1947
B. 1950
C. 1951
D. 1945

Click for answer
D. 1945

6. खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या विधानसभेची सदस्य संख्या 60 पेक्षा कमी आहे ?
अ. महाराष्ट्र
ब. गोवा
क. अरुणाचल प्रदेश
ड . मिझोराम

A. अ,ब,क
B. ब,क,ड
C. अ,क,ड
D. वरील सर्व

Click for answer
B. ब,क,ड

7. भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या रकमेच्या नोटा प्लास्टिकच्या नोटांच्या स्वरूपात चलनात आणण्याचे ठरवले आहे ?

A. रु. 10
B. रु. 20
C. रु. 50
D. रु. 100

Click for answer
A. रु. 10
8. महानगर पालिकेच्या अध्यक्षास महापौर हा शब्द कोणी सुचविला ?

A. लोकमान्य टिळक
B. स्वातंत्र्यवीर सावरकर
C. जयंतराव टिळक
D. आचार्य अत्रे

Click for answer
B. स्वातंत्र्यवीर सावरकर

9. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील _____________ हा कालावधी मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो.

A. इ.स. 1885 ते 1905
B. इ.स. 1885 ते 1920
C. इ.स. 1905 ते 1920
D. इ.स. 1920 ते 1948

Click for answer
A. इ.स. 1885 ते 1905

10. 'ओरायन 'हा ग्रंथ _____________ ह्या महान नेत्याच्या विद्वत्तेचे दर्शन घडवितो.

A. स्वातंत्र्यवीर सावरकर
B. महात्मा गांधी
C. लोकमान्य टिळक
D. सुभाषचंद्र बोस

Click for answer
C. लोकमान्य टिळक
============================================================================
Thursday 3 November 2011
प्रश्नमंजुषा -109
प्रश्नमंजुषा -109

1. 1938 च्या हरिपुरा येथील काँग्रेस अधिवेशना दरम्यान जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली " राष्ट्रीय नियोजन समिती " स्थापन करण्यात आली होती. या अधिवेशनाचे अध्यक्षपद खालीलपैकी यांनी भूषविले?

A. जवाहरलाल नेहरू
B. सुभाषचंद्र बोस
C. मोतीलाल नेहरू
D. पट्टाभी सीतारामय्या

Click for answer
B. सुभाषचंद्र बोस

2. हरिपुरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

A. उत्तरप्रदेश
B. पश्चिम बंगाल
C. गुजरात
D. आताच्या बांगलादेशात

Click for answer
C. गुजरात

3. संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा धाडसी निर्णय इंदिरा गांधींनी ___________ या वर्षी घेतला.

A. इ.स. 1971
B. इ.स. 1969
C. इ.स. 1977
D. इ.स. 1975

Click for answer
A. इ.स. 1971

4. इ.स.1916 मध्ये झालेला 'लखनौ करार ' हा ____________ ह्यांच्यात झाला.

A. इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लीम लीग
B. इंडियन नॅशनल काँग्रेस मधील जहाल आणि मवाळ गट
C. इंडियन नॅशनल काँग्रेस आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर
D. इंडियन नॅशनल काँग्रेस आणि खिलापत चळवळीतील नेते

Click for answer
A. इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लीम लीग

5. _________ च्या कायद्याने ब्रिटीश भारताचा गव्हर्नर जनरल हा 'व्हाईसरॉय 'या नावाने ओळखला जावू लागला.

A. 1773 चा रेग्युलेटिंग कायदा
B. 1858 चा कायदा
C. 1909 च्या सुधारणा
D. 1935 चा कायदा

Click for answer
B. 1858 चा कायदा

6. भारताच्या स्वातंत्र्य-संग्रामातील इ.स. 1885 ते 1905 हा कालावधी ____________ म्हणून ओळखला जातो.

A. गांधीवादी कालखंड
B. जहालमतवादी कालखंड
C. उदारमतवादी कालखंड
D. सोनेरी पान

Click for answer
C. उदारमतवादी कालखंड

7. स्वामी विवेकानंदांनी 'रामकृष्ण मिशन 'ची स्थापना __________ येथे केली होती .

A. कन्याकुमारी
B. मुंबई
C. म्हैसूर
D. कोलकाता

Click for answer
D. कोलकाता

8. भारताने पोखरण-2 अणुचाचण्या ________मध्ये घेतल्या.

A. जानेवारी 1974
B. जानेवारी 1997
C. मे 1974
D. मे 1998

Click for answer
D. मे 1998

9. _______ गोलमेज परिषदेच्या अपयशानंतर ब्रिटिशांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी बोलणी चालू केली ज्याची परिणीती गांधी -आर्यवीन करारात झाली.

A. दुसऱ्या
B. पहिल्या
C. तिसऱ्या
D. पहिल्या परिषदेच्या आधीच अशी बोलणी झाली होती.

Click for answer
B. पहिल्या

10. _______ मध्ये मुस्लीम लीग ची स्थापना झाली.

A. डिसेंबर 1906
B. जानेवारी 1915
C. मे 1907
D. ऑगस्ट 1901

Click for answer
A. डिसेंबर 1906
==============================================================
Wednesday 16 November 2011
प्रश्नमंजुषा -110
माहितीचा अधिकार कायदा

1. महाराष्ट्राच्या मुख्य माहिती आयुक्तपदी सध्या ____________ कार्यरत आहेत.

A.श्री.भास्कर पाटील
B.श्री.विजय कुवळेकर
C.श्री.विलास पाटील
D.श्री.नवीन कुमार

Click for answer
C.श्री.विलास पाटील

2. खालीलपैकी कोणत्या राज्या/राज्यांसाठी केंद्राचा माहिती अधिकार कायदा लागू नाही?

A. मणिपूर
B. सिक्किम
C. जम्मू आणि काश्मीर
D. वरील सर्व

Click for answer
C. जम्मू आणि काश्मीर

3. RTI ACT मधून एकूण किती संस्थांना वगळण्यात आले आहे?

A. 11
B. 22
C. 30
D. एकही नाही

Click for answer
B. 22





4. माहिती अधिकाराच्या संदर्भात खालीलपैकी कोणत्या निवाड्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जातो?

A. राज नारायण विरुद्ध स्टेट ऑफ यु.पी.
B. गोलकनाथ विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब
C. केशवानंद भारती विरुद्ध स्टेट ऑफ केरळ
D. मिनर्वा मिल्स केस

Click for answer
A. राज नारायण विरुद्ध स्टेट ऑफ यु.पी.

5. महाराष्ट्रात माहितीचा अधिकार कायदा सर्वप्रथम कोणत्या वर्षी लागू करण्यात आल होता?

A. 2000
B. 2002
C. 2001
D. 2005

Click for answer
B. 2002

6. भारतात केंद्राचा माहितीचा अधिकार कायदा __________ या वर्षी करण्यात आला.

A. 2001
B. 2002
C. 2005
D. 2011

Click for answer
C. 2005

7. सर्वसामान्य परिस्थितीत RTI Act 2005 नुसार किती कालावधीत माहिती देणे बंधनकारक आहे ?

A. 24 तास
B. 48 तास
C. 15 दिवस
D. 30 दिवस

Click for answer
D. 30 दिवस

8. RTI Act 2005 नुसार अतिशय तातडीच्या (जीवन किंवा मृत्यूच्या ) परिस्थितीत किती कालावधीत माहिती देणे बंधनकारक आहे ?

A. 24 तास
B. 48 तास
C. 30 दिवस
D. अशी वेगळी तरतूद केलेली नाही

Click for answer
B. 48 तास

9. RTI Act 2005 नुसार खालीलपैकी कोण माहितीची मागणी करू शकते?

A. कोणतीही व्यक्ती
B. सेवाभावी संस्था
C. खाजगी संस्था
D. निमसरकारी संस्था

Click for answer
A. कोणतीही व्यक्ती

10. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम अप्रत्यक्षपणे भारतीय नागरिकाला माहितीचा अधिकार बहाल करते?

A. कलम 14
B. कलम 19
C. कलम 32
D. कलम 356

Click for answer
B. कलम 19
=============================================================
Thursday 17 November 2011
प्रश्नमंजुषा -111



1. खाशाबा जाधव ह्या महान खेळाडूने 1952 साली हेलसिंकी येथील ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले वैयक्तिक पदक _______________ ह्या खेळात जिंकले होते.

A. नेमबाजी
B. बॉक्सिंग
C. वेटलिफ्टिंग
D. कुस्ती

Click for answer
D. कुस्ती

2. 'बखर भारतीय प्रशासनाची ' हे पुस्तक ____________ यांनी लिहिले आहे.

A. टी.एन.शेषन
B. लक्ष्मीकांत देशमुख
C. किरण बेदी
D. सी.दि.देशमुख

Click for answer
B. लक्ष्मीकांत देशमुख

3. 'पहावा विठ्ठल'आणि 'महाराष्ट्र देशा ' ह्या हवाई छायाचित्र भरपूर असलेल्या पुस्तकांचे लेखक ________________ आहेत.

A. राज ठाकरे
B. आर.आर.पाटील
C. बाळासाहेब ठाकरे
D. उध्दव ठाकरे

Click for answer
D. उध्दव ठाकरे

4. फुकुशिमा ह्या अणुभट्टीला अलिकडच्या काळात किरणोत्सर्गाचा धोका संभवला आहे. हि अणुभट्टी __________ देशात आहे.

A. थायलंड
B. चीन
C. जपान
D. उ.कोरिया

Click for answer
C. जपान
5. फळे पिकविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो?

A. मिथेन
B. इथेन
C. इथिलीन
D. ब्यूटेन

Click for answer
C. इथिलीन

6. भारतीय लोकसभेची सदस्यसंख्या जास्तीत जास्त _______ इतकी असू शकते.

A. 545
B. 552
C. 500
D. 352

Click for answer
B. 552

7. खालीलपैकी कोणत्या देशाचे संसदगृह 'डायट' ह्या नावाने ओळखले जाते ?

A. चीन
B. जपान
C. भारत
D. रशिया

Click for answer
B. जपान

8. महाराष्ट्राची __________ प्रशासकीय विभागात विभागणी केलेली आहे.

A. नऊ
B. सहा
C. सात
D. दोन

Click for answer
B. सहा
9. _____________ हि महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील सीमेवरील नदी आहे.

A. वैनगंगा
B. तापी
C. दमणगंगा
D. इरावती

Click for answer
D. इरावती

10. 2001 च्या जनगणनेनुसार _____________ हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता.

A. ठाणे
B. मुंबई उपनगर
C. मुंबई शहर
D. पुणे

Click for answer
B. मुंबई उपनगर
=============================================================
Sunday 20 November 2011
प्रश्नमंजुषा -112
सामान्य ज्ञान

1. सुरेंद्र चव्हाण हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

A. तिरंदाजी
B. गिर्यारोहण
C. गोल्फ
D. नेमबाजी

Click for answer
B. गिर्यारोहण

2. ' मानवी अधिकार दिन ' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
A. 10 डिसेंबर
B. 1 डिसेंबर
C. 31 ऑक्टोबर
D. 1 मे

Click for answer
A. 10 डिसेंबर

3. 'मी का नाही ?' ह्या तृतीयपंथीयांच्या जीवनावरील कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

A. पारू नाईक
B. लक्ष्मीनारायण त्रिपाठी
C. राजन गवस
D. द.भि.कुलकर्णी

Click for answer
A. पारू नाईक

4. T-20 हे औषध कोणत्या आजाराशी संदर्भित आहे ?

A. टी.बी.
B. मधुमेह
C. कुष्ठरोग
D. एड्स

Click for answer
D. एड्स

5. _____________ हे भारताचे राष्ट्रीय फूल मानले जाते.

A. गुलाब
B. कमळ
C. मोगरा
D. पांढरी लिली

Click for answer
B. कमळ

6. ____________ हि जगातील सर्वात लांब नदी आहे.

A. अमेझॉन
B. नाईल
C. सिंधू
D. ब्रम्हपुत्रा

Click for answer
B. नाईल

7. भारतातील सर्वाधिक पाऊसाचे मावसिनराम हे ठिकाण _________ ह्या राज्यात आहे.

A. मेघालय
B. सिक्किम
C. मणिपूर
D. अरुणाचल प्रदेश

Click for answer
A. मेघालय
8. आगाखान कप _______ ह्या खेळाशी संबंधित आहे.

A. हॉकी
B. फुटबॉल
C. क्रिकेट
D. लॉन टेनिस

Click for answer
A. हॉकी

9. ___________ येथील विमानतळास स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आले आहे

A. नाशिक
B. रत्नागिरी
C. औरंगाबाद
D. पोर्ट ब्लेअर

Click for answer
D. पोर्ट ब्लेअर

10. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष _________ हे होते.

A. मनमोहन सिंग
B. मोरारजी देसाई
C. वीरप्पा मोईली
D. आर.के.लक्ष्मणन

Click for answer
C. वीरप्पा मोईली
=============================================================
Monday 21 November 2011
प्रश्नमंजुषा -113

1. खालीलपैकी कोणती पर्वत रांग दक्षिणोत्तर दिशेने जाते ?

A. लुशाई
B. गोरो
C. खासी
D. जैतीया

Click for answer
A. लुशाई

2. तामिळनाडू राज्यात ____________ महिन्यात पाऊस पडतो.

A. जून
B. ऑगस्ट
C. ऑक्टोबर
D. डिसेंबर

Click for answer
D. डिसेंबर





3. डोंगराळ प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वस्त्या आढळतात ?

A. केंद्रीय
B. विखुरलेल्या
C. त्रिकोणी
D. चौकोनी

Click for answer
B. विखुरलेल्या

4. चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरूत्वाकर्षणाच्या ______________ पट आहे.

A. 1/4
B. 1/2
C. 1/6
D. 1/12

Click for answer
C. 1/6

5. _________ हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे.

A. शुक्र
B. बुध
C. मंगळ
D. सूर्य

Click for answer
A. शुक्र

6. मँगेनीज उत्पादनात भारताचा जगात ____________क्रमांक लागतो.

A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. पाचवा

Click for answer
B. दुसरा
7. ________ हे शहर भारतातील 'मँचेस्टर' होय.

A. दिल्ली
B. कोलकाता
C. बेंगळुरू
D. मुंबई

Click for answer
D. मुंबई

8. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबी असलेली नदी कोणती ?

A. गोदावरी
B. कृष्णा
C. तापी
D. नर्मदा

Click for answer
A. गोदावरी

9. भारतातील कोणत्या दोन राज्यांत 'भीमा पाणी तंटा ' चालू आहे ?

A. महाराष्ट्र -गोवा
B. महाराष्ट्र- कर्नाटक
C. महाराष्ट्र- आंध्रप्रदेश
D. कर्नाटक- आंध्रप्रदेश

Click for answer
B. महाराष्ट्र- कर्नाटक

10. भारतीय संघराज्यात सध्या किती घटक राज्ये आहेत?

A. पंचवीस
B. सत्तावीस
C. अठ्ठावीस
D. तीस

Click for answer
C. अठ्ठावीस
============================================================
Monday 21 November 2011
प्रश्नमंजुषा -114


1. अलीकडेच निधन पावलेले 'स्टीव्ह जॉब्स' हे कोणत्या कंपनीशी संबंधित होते?

A. मायक्रोसॉफ्ट
B. ऍपल
C. नोकिया
D. फेसबुक

Click for answer
B. ऍपल

2.जगातला पहिला संगणक कोणत्या कंपनीने बाजारात आणला होता ?
A. लोटस
B. आय.बी.एम.
C. मायक्रोसॉफ्ट
D. ऍपल

Click for answer
D. ऍपल

3. लॅनच्या तुलनेत वॅन चे भौगोलिक क्षेत्र ______________ असते.

A. कमी
B. जास्त
C. सारखेच
D. तुलना शक्य नाही.

Click for answer
B. जास्त

4. प्रस्तावित 'ई-भारत ' प्रकल्प केंद्राच्या कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे ?

A. माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
B. गृह मंत्रालय
C. ग्रामीण विकास मंत्रालय
D. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

Click for answer
A. माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
5. भारतातील इंटरनेट क्षेत्रातील पहिली कंपनी कोणती ?

A. बी.एस.एन.एल.
B. व्ही.एस.एन.एल.
C. एम.टी.एन.एल.
D. रिलायन्स कम्युनिकेशन्स

Click for answer
B. व्ही.एस.एन.एल.

6. दूरसंचार क्षेत्राशी संबंधित कोणत्या सेवेला 'भारतातील चौथी क्रांती ' असे संबोधतात ?

A. वाय- फाय सुविधा
B. मोबाईल सेवा
C. वाय-मॅक्स सुविधा
D. डायरेक्ट -टू -होम सुविधा

Click for answer
D. डायरेक्ट -टू -होम सुविधा

7. महाराष्ट्र शासनाचा ________ प्रकल्प 'गाव तेथे संगणक ' व 'गाव तेथे इंटरनेट' या उदिष्टासाठी सुरु करण्यात आला आहे.

A. विचारगंगा
B. ज्ञानगंगा
C. संगणकगंगा
D. ई-क्रांती

Click for answer
A. विचारगंगा

8. प्रोग्राम आणि डाटा तात्पुरता साठविण्यासाठी ___________ चा उपयोग होतो.

A. CD
B. DVD
C. RAM
D. ROM

Click for answer
C. RAM





9. इंटरनेटवरील माहिती शोधण्याच्या प्रक्रियेला ______________ असे नाव आहे.

A. सर्च इंजिन
B. डिरेक्टरी
C. वेब डिरेक्टरी
D. डिक्शनरी

Click for answer
A. सर्च इंजिन

10. स्मार्ट (SMART) प्रशासनाची संकल्पना राबविणारे राज्य कोणते?

A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. मध्यप्रदेश
D. केरळ

Click for answer
B. महाराष्ट्र
=============================================================
Tuesday 22 November 2011
प्रश्नमंजुषा -115
http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.

1. राष्ट्र्पतींवरील महाभियोग मंजूर होण्यासाठी लागणारे प्रत्येक सभागृहातील किमान बहुमत किती असावे लागते ?

A. 1/2
B. 2/3
C. 3/4
D. 3/5

Click for answer
B. 2/3

2.राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
A. लोकसभा अध्यक्ष
B. पंतप्रधान
C. उपराष्ट्रपती
D. विरोधी पक्षनेते

Click for answer
C. उपराष्ट्रपती

3. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य यांची नियुक्ती कोण करते ?

A. राज्यपाल
B. राष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. लोकसभा

Click for answer
B. राष्ट्रपती
4. भारतीय राज्यघटनेचा सरनामा (उद्देशपत्रिका ) कोणी तयार केली ?

A. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
B. महात्मा गांधी
C. पंडित जवाहरलाल नेहरू
D. डॉ. राजेंद्रप्रसाद

Click for answer
C. पंडित जवाहरलाल नेहरू

5. भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर बेतलेली आहे ?

A. अमेरिका
B. ब्रिटन
C. आयर्लंड
D. कोठल्याही नाही ,ही कल्पना पुर्णपणे भारतीय नेत्याची होती.

Click for answer
C. आयर्लंड

6. भारतीय राज्यघटनेत ___________ कलमात मार्गदर्शक तत्त्वांतर्गत समान नागरी कायद्याची तरतूद केली आहे.

A. कलम 14
B. कलम 44
C. कलम 84
D. कलम 124

Click for answer
B. कलम 44
7. भारतीय राज्यघटनेत घटनात्मक उपाययोजनेचे ________ अधिकार उपलब्ध आहेत.

A. पाच
B. सहा
C. सात
D. दहा

Click for answer
A. पाच

8. संसदेचे अधिवेशन कोण बोलावते ?

A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. लोकसभा अध्यक्ष
D. लोकसभेचा सचिव

Click for answer
B. राष्ट्रपती

9. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे _________________आहेत.

A. न्यायचौकशी योग्य
B. न्यायालयीन कक्षेबाहेरची
C. बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार न्यायचौकशी योग्य बनली आहेत.
D. चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार न्यायचौकशी योग्य बनली आहेत.

Click for answer
B. न्यायालयीन कक्षेबाहेरची

10. बालमजूर प्रतिबंधक कायद्यात 14 वर्षांखालील मुलांना जोखमीच्या अनुक्रमे किती 'व्यवसाय ' व 'प्रक्रिया ' पासून दूर ठेवण्याचा समावेश केला आहे ?

A. 14-60
B. 13-57
C. 20-59
D. 16-38

Click for answer
B. 13-57
=============================================================
Tuesday 22 November 2011
प्रश्नमंजुषा -116
http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.

1. महाराष्ट्रासंदर्भात मंत्रीपरीषदेतील मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांची एकूण संख्या कमीत कमी किती असणे आवश्यक आहे ?

A. बारा
B. चौदा
C. बावीस
D. चोवीस

Click for answer
D. चोवीस

2.धनविधेयकाबाबतची विशेष कार्यपद्धती संविधानाच्या ___________ अनुच्छेदात नमूद करण्यात आली आहे.
A. कलम 196
B. कलम 197
C. कलम 198
D. कलम 199

Click for answer
C. कलम 198

3. राज्याची मंत्रीपरिषद सामूहिकपणे कोणास जबाबदार असते ?

A. राज्यपाल
B. मुख्यमंत्री
C. विधानपरिषद
D. विधानसभा

Click for answer
D. विधानसभा
4. कोणतीही व्यक्ती ती भारतीय नागरिक आणि _________ वर्षे पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल पदावरील नियुक्तीस पात्र असणार नाही.

A. 25
B. 30
C. 35
D. यापैकी नाही.

Click for answer
C. 35
5. __________ हे भारतीय सेनादलाचे सर्वोच्च प्रमुख असतात.

A. स्थलसेना प्रमुख
B. पंतप्रधान
C. संरक्षण मंत्री
D. राष्ट्रपती

Click for answer
D. राष्ट्रपती

6. खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ अस्तित्वात नाही ?

A. पंजाब
B. महाराष्ट्र
C. उत्तरप्रदेश
D. कर्नाटक

Click for answer
A. पंजाब

7. भारतीय संविधानाने देशाची अंतिम सत्ता कोणाच्या हातात दिली आहे ?

A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. लोकसभा
D. भारतीय जनता

Click for answer
D. भारतीय जनता

8. एकूण सात संघराज्य प्रदेशांपैकी (Union Territories ) केवळ ________ प्रदेश राष्ट्रपतींच्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेवू शकतात.

A. एकही नाही
B. एक
C. दोन
D. तीन

Click for answer
C. दोन

9. विधानसभा बरखास्त करण्याचा स्वेच्छाधीन अधिकार भारतीय राज्यघटनेने __________ यांना दिलेला आहे.

A. मुख्यमंत्री
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. संसद

Click for answer
C. राज्यपाल

10. महाराष्ट्र विधानपरिषदेतील एकूण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात ?

A. एक -बारांश
B. एक -षष्ठांश
C. एक -तृतीयांश
D. यापैकी नाही.

Click for answer
A. एक -बारांश
=============================================================
Wednesday 23 November 2011
प्रश्नमंजुषा -117
STI Mains-2011 Special part 1
1. भारतात योजना सुट्टीचा कालावधी ___________ हा होता.

A. 1965-68
B. 1964-67
C. 1966-69
D. 1967-70

Click for answer
C. 1966-69





2.भारतात कोणत्या वर्षी सेवाकर आकारण्यात आला ?
A. 1994-95
B. 1997-98
C. 2001-02
D. 1985-86

Click for answer
A. 1994-95

3. _________ यांना 'करांचा उद्‌गाता ' म्हणतात.

A. ऍडम स्मिथ
B. कार्ल मार्क्स
C. गिफेन
D. रिकार्डो

Click for answer
A. ऍडम स्मिथ

4. चौथी पंचवार्षिक योजना केव्हा सुरु झाली ?

A. 1970
B. 1969
C. 1968
D. 1967

Click for answer
B. 1969

5. 'सामाजिक न्यायासह आर्थिक विकास ' चा पुकारा __________ योजनेच्या काळात केला गेला.

A. सातव्या
B. तिसर्‌या
C. पाचव्या
D. नवव्या

Click for answer
C. पाचव्या
6. WPI चे पायाभूत वर्ष ______ आहे.

A. 1994-95
B. 1998-99
C. 2004-05
D. 2008-09

Click for answer
C. 2004-05

7. नवव्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान ____________ हे होते.

A. गांधीवादी
B. राव मनमोहनसिंग
C. महालनोबीस
D. वकील-ब्रम्हानंद

Click for answer
A. गांधीवादी

8. ___________नुसार आर.बी.आयची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली.

A. RBI Act- 1933
B. RBI Act- 1934
C. RBI Act- 1935
D. RBI Act- 1947

Click for answer
B. RBI Act- 1934

9. ________ हि बँक भारतात 'निरसन गृह ' चालवते.

A. स्टेट बँक ऑफ इंडिया
B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
C. बँक ऑफ इंडिया
D. बँक ऑफ बडोदा

Click for answer
B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

10. 15 एप्रिल 1980 रोजी झालेल्या बँकांच्या राष्ट्रीयीकरणात खालीलपैकी कोणत्या बँकेचा समावेश नव्हता ?

A. आंध्र बँक
B. पंजाब अन्ड सिंध बँक
C. ओरियन्टल बँक ऑफ कॉमर्स
D. सिंडीकेट बँक

Click for answer
D. सिंडीकेट बँक
==============================================================
Wednesday 23 November 2011
प्रश्नमंजुषा -118
http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.

1. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण ?

A. डॉ. झाकीर हुसेन
B. डॉ. राजेंद्रप्रसाद
C. डॉ. एस.राधाकृष्णन
D. व्ही.व्ही.गिरी

Click for answer
C. डॉ. एस.राधाकृष्णन

2. महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन कोठे भरते ?
A. मुंबई
B. पुणे
C. नागपूर
D. नाशिक

Click for answer
A. मुंबई
3. लोकसभेत 'शून्य प्रहर ' केव्हा सुरु होतो ?

A. सकाळी 11 वाजता
B. दुपारी 12 वाजता
C. निश्चित अशी वेळ नसते
D. दिवसभराचे कामकाज सुरु होताना पहिला तास

Click for answer
B. दुपारी 12 वाजता

4. राज्यसभेचा सदस्य खालीलपैकी कोणते पद भूषवू शकणार नाही ?

A. संरक्षण मंत्री
B. गृह मंत्री
C. पंतप्रधान
D. वरील पदे ती/तो भूषवू शकते/शकतो.

Click for answer
D. वरील पदे ती/तो भूषवू शकते/शकतो.

5. संसदेत खालीलपैकी कोणत्या गटाचा समावेश होतो ?

A. राष्ट्रपती , लोकसभा , विधानसभा
B. राष्ट्रपती , लोकसभा , राज्यसभा
C. लोकसभा , राज्यसभा
D. फक्त लोकसभा

Click for answer
B. राष्ट्रपती , लोकसभा , राज्यसभा

6. राज्यसभेत महाराष्ट्रातून ________ सदस्य पाठवले जातात.

A. 17
B. 19
C. 21
D. 23

Click for answer
B. 19

7. 44 वी घटनादुरुस्ती ___________ साली करण्यात आली.

A. 1976
B. 1978
C. 1980
D. 1984

Click for answer
B. 1978

8. महाराष्ट्रात विधानसभेतून विधानपरिषदेवर किती सदस्य निवडून दिले जातात ?

A. विधानपरिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/3
B. विधानपरिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/6
C. विधानपरिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/12
D. एकही नाही.

Click for answer
A. विधानपरिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/3
9. ________ या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे.

A. औरंगाबाद
B. नागपूर
C. पणजी
D. वरील सर्व

Click for answer
D. वरील सर्व

10. पंजाब आणि हरियाणा या राज्यांचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

A. दिल्ली
B. सिमला
C. चंदीगड
D. नैनिताल

Click for answer
C. चंदीगड
================================================================.
Wednesday 23 November 2011
प्रश्नमंजुषा -119
http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.

1. दोन संख्यांचा ल.सा.वि.36 आहे तर म.सा.वि. 6 आहे. या दोनपैकी एक संख्या 12 आहे तर दुसरी संख्या कोणती ?

A. 3
B. 6
C. 18
D. 24

Click for answer
C. 18
दोन संख्यांचा गुणाकार = त्यांच्या ल.सा.वि.आणि म.सा.वि.यांचा गुणाकार

2.सुवर्णा पूर्वेकडे तोंड करून उभी होती. ती दोनदा काटकोनात डावीकडे वळाली, तर तिची पाठ कोणत्या दिशेला असेल ?

A. पूर्व
B. पश्चिम
C. दक्षिण
D. उत्तर

Click for answer
A. पूर्व
3. धनंजयच्या आईची नणंद रामची आई आहे तर धनंजयची आई रामची कोण ?

A. मामी
B. आत्या
C. काकू
D. मावशी

Click for answer
A. मामी

4. जर संगणकास बायनरी मध्ये खालीलप्रमाणे कोडिंग केलेले असेल
A= ००० B=१११ C=००१ D=०११
तर ABC चे कोडिंग खालील पर्यायातून निवडा.

A. ०००१११०११
B. ०००१११००१
C. ०००००११११
D. १११००१११०

Click for answer
B. ०००१११००१

5. काल सुरेश माझ्याकडे आला. तो मला म्हणाला, परवा गुरुवारी माझे काका आमच्या घरी आले होते तर आज कोणता वार आहे ?

A. गुरुवार
B. शुक्रवार
C. शनिवार
D. रविवार

Click for answer
D. रविवार
6. 36 किलोमीटर/ताशी या वेगाने धावणारी रेल्वे 400 मीटर लांबीचा बोगदा 1 मिनिटात पार करते तर रेल्वेची लांबी किती ?

A. 150 मीटर
B. 200 मीटर
C. 300 मीटर
D. 250 मीटर

Click for answer
B. 200 मीटर
400 मीटर लांबीच्या बोगद्याला पार करताना रेल्वेला बोगद्याची लांबी + रेल्वेची स्वत:ची लांबी इतके अंतर पार करावे लागेल. रेल्वेची लांबी 'क्ष ' मानू
म्हणजेच दिलेल्या गणितानुसार 400 मीटर अधिक क्ष इतके अंतर ती एका मिनिटात पार करते.---(1)
रेल्वेचा दिलेला वेग = 36 किलोमीटर/ताशी=36x1000 मीटर /60 मिनिटे = 600 मीटर /मिनिट
याचाच अर्थ ती रेल्वे एका मिनिटात 600 मीटर अंतर पार करते.
विधान(1) वरून
400+क्ष =600
उत्तर: क्ष = 200 मीटर

7. शिपाई = बंदूक तर शिक्षक = ?

A. खडू
B. युनिफॉर्म
C. मुख्याध्यापक
D. विद्यार्थी

Click for answer
A. खडू

8. लोकर कापसापेक्षा महाग आहे पण रेशमाइतकी नाही, तर सर्वात महाग काय ?

A. लोकर
B. कापूस
C. रेशीम
D. अनिश्चित

Click for answer
C. रेशीम
9. आईचे वय तिच्या मुलाच्या तीनपट आहे.दहा वर्षानंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल, तर आज तिचे वय किती ?

A. 40
B. 30
C. 10
D. 20

Click for answer
B. 30
मुलाचे वय 'म' वर्षे मानू आणि आईचे वय 'अ 'मानू
जर आईचे वय तिच्या मुलाच्या तीनपट असेल
तर अ =3xम -----------(1)
दहा वर्षानंतर आईचे वन मुलाच्या दुप्पट होईल, म्हणजेच
अ+10=2x(म+10)
यावरून अ=2xम+10
समीकरण (1) चा वापर करून
3xम=2xम+10
म्हणजेच म=10 ,समीकरण (1) च्या आधारे अ = 3x म =3x10=30वर्षे
म्हणजेच आईचे वय ३० वर्षे .

10. एका ग्रंथालयात 84 विद्यार्थी बसले आहेत. त्यांना 6 गटात असे विभागा कि , जेणेकरून प्रत्येक गटात 7 पेक्षा कमी आणि 18 पेक्षा जास्त विद्यार्थी नसतील, तर किती जणांचा गट असेल ?

A. 20
B. 14
C. 11
D. 8

Click for answer
B. 14
================================================================
Thursday 24 November 2011
प्रश्नमंजुषा -120
http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.

1. कोणत्या पंचवार्षिक योजनेत सर्वप्रथम अवजड उद्योगांवर भर देण्यात आला ?

A. पहिली
B. दुसरी
C. चौथी
D. आठवी

Click for answer
B. दुसरी

2. 1944 मध्ये मुंबईच्या उद्योगपतींनी एक विकास योजना सदर केली होती. तिला कोणत्या नावाने संबोधले जाते ?
A. जनता योजना
B. श्रीमंत योजना
C. मुंबई योजना
D. महाराष्ट्र योजना

Click for answer
C. मुंबई योजना

3. दहाव्या पंचवार्षिक योजनेला ________ हे पंतप्रधान पदावर असलेल्या सरकारने मान्यता दिली होती.

A. मनमोहनसिंग
B. राजीव गांधी
C. पी.व्ही.नरसिंहराव
D. अटलबिहारी वाजपेयी

Click for answer
D. अटलबिहारी वाजपेयी
4. चौदा बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाले ?

A. तिसर्‌या
B. चौथ्या
C. पाचव्या
D. सहाव्या

Click for answer
B. चौथ्या

5. पहिल्या योजना काळात नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष ___________ होते.

A. जी.नंदा
B. पी.सी.महालनोबीस
C. व्ही.टी.कृष्णम्माचारी
D. पंडित नेहरू

Click for answer
A. जी.नंदा

6. ________नंतर महाराष्ट्र शासनाने नियोजनाचे एकक म्हणून जिल्ह्याला मान्यता दिली.

A. 1965
B. 1970
C. 1972
D. 1980

Click for answer
C. 1972

7. 'महालनोबीस प्रतिमान ' हे कोणत्या देशाच्या विकासाच्या योजनांमधील यशावर बेतलेले होते ?

A. अनेरिका
B. रशिया
C. चीन
D. ब्रिटन

Click for answer
B. रशिया

8. किमान गरजा कार्यक्रम ________ योजना काळात सुरु झाला.

A. चौथ्या
B. पाचव्या
C. सहाव्या
D. सातव्या

Click for answer
A. चौथ्या
9. खालीलपैकी कोणी वित्त आयोगाचे अध्यक्षपद भूषविलेले नाही ?

A. यशवंतराव चव्हाण
B. विजय केळकर
C. एक.के.पी.साळवे
D. सी.डी.देशमुख

Click for answer
D. सी.डी.देशमुख

10. भारतातील राष्ट्रीयीकृत बँकेचे एकत्रीकरण करून बँकांची पुनर्रचना करण्या संदर्भात कोणती समिती स्थापन केली गेली होती ?

A. गंगाधरण
B. टंडन
C. मुदलीयार
D. रेखी

Click for answer
A. गंगाधरण
===============================================================
Thursday 24 November 2011
प्रश्नमंजुषा -121
http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.

1. आपल्या सूर्यमालेतील कोणत्या ग्रहास सर्वाधिक उपग्रह आहेत ?

A. बुध
B. शनी
C. गुरु
D. युरेनस

Click for answer
C. गुरु
2.भारतीय प्राणी सर्वेक्षण विभाग (Indian Zoological Survey Department)चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
A. मुंबई
B. दिल्ली
C. कोलकाता
D. चेन्नई

Click for answer
C. कोलकाता

3. आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध असलेले गीर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?

A. उत्तरप्रदेश
B. गुजरात
C. राजस्थान
D. मध्यप्रदेश

Click for answer
B. गुजरात

4. 'मलयगिरी ' हे शिखर ________ राज्यात आहे.

A. छत्तीसगड
B. मध्यप्रदेश
C. ओरिसा
D. महाराष्ट्र

Click for answer
C. ओरिसा

5. भिरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. रायगड
B. ठाणे
C. रत्नागिरी
D. कोल्हापूर

Click for answer
A. रायगड

6. खालीलपैकी कोणते जिल्हे 'हळद उत्पादक' म्हणून ओळखले जातात ?

A. धुळे-जळगाव
B. अकोला-अमरावती
C. सांगली-सातारा
D. कोल्हापूर-सोलापूर

Click for answer
C. सांगली-सातारा

7. महाराष्ट्रात उसाचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. अहमदनगर
B. सोलापूर
C. कोल्हापूर
D. नाशिक

Click for answer
C. कोल्हापूर

8. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात _____ मृदा आढळते ?

A. रेगूर
B. जांभी
C. गाळाची
D. काळी

Click for answer
B. जांभी

9. भोर-महाड रस्त्यावर प्रवास करताना ______ घाट लागतो.

A. वरंधा
B. थळ
C. बोर
D. कुंभार्ली

Click for answer
A. वरंधा

10. भारतची 'सिलिकॉन व्हॅली ' म्हणून ओळखले जाणारे शहर कोणत्या राज्यात आहे ?

A. कर्नाटक
B. केरळ
C. महाराष्ट्र
D. आंध्रप्रदेश

Click for answer
A. कर्नाटक
================================================================
Friday 25 November 2011
प्रश्नमंजुषा -122
http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.


1. केळीच्या पनामा रोगास प्रतिकारक अशी ____________ हि जात आहे.

A. हरिसाल
B. सफेद वेलची
C. बसराई
D. सोनकेळे

Click for answer
A. हरिसाल
2. दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ________ विळ्याने (sickle) जमिनीलगत भात कापणी सोयीस्कर झाली आहे.
A. नूतन
B. वैभव
C. अतुल
D. पंकज

Click for answer
B. वैभव

3. गोड्या पाण्यातील संवर्धनासाठी पुढील पैकी कोणती जात उत्तम गणली जाते ?

A. हाईद
B. बांगडा
C. जिताडा
D. कटला

Click for answer
D. कटला

4. अमोनियम सल्फेट मध्ये ___________ इतके नत्र असते.

A. 12.0%
B. 15.2%
C. 18.5%
D. 20.5%

Click for answer
D. 20.5%

5. महाराष्ट्रातील क्षेत्रानुसार फळपिकांचा योग्य उतरता क्रम खालीलपैकी कोणता आहे?

A. आंबा-संत्री-काजू-चिकू-द्राक्षे
B. आंबा-चिकू-द्राक्षे-संत्री-काजू
C. द्राक्षे-संत्री-आंबा-चिकू-काजू
D. आंबा-संत्री-द्राक्षे-चिकू-काजू

Click for answer
A. आंबा-संत्री-काजू-चिकू-द्राक्षे
6. जगात दुग्धउत्पादनात भारताचा _________ क्रमांक आहे.

A. दुसरा
B. पहिला
C. चौथा
D. तिसरा

Click for answer
B. पहिला

7. भारतात एकूण मत्स्योत्पादनात _____________ चा पहिला क्रमांक लागतो.

A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. प.बंगाल
D. आंध्रप्रदेश

Click for answer
C. प.बंगाल
8. राष्ट्रीय कृषी धोरण-2000 नुसार 'अमृत क्रांती ' हि संज्ञा _______________ शी संबंधित आहे.

A. बटाटा उत्पादन
B. तेलबिया उत्पादन
C. दुग्ध उत्पादन
D. नद्या जोड प्रकल्प

Click for answer
D. नद्या जोड प्रकल्प

9. 'इको मार्क ' योजना कोणत्या मंत्रालयाकडून राबवली जाते.

A. गृह मंत्रालय
B. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
C. वन व पर्यावरण मंत्रालय
D. कृषी मंत्रालय

Click for answer
C. वन व पर्यावरण मंत्रालय

10. मत्स्यव्यवसायासाठी महाराष्ट्रात सुमारे _________ लांबीचा किनारा उपलब्ध आहे.

A. 600 कि.मी.
B. 700 कि.मी.
C. 800 कि.मी.
D. 1000 कि.मी.

Click for answer
B. 700 कि.मी.
================================================================
Tuesday 29 November 2011
प्रश्नमंजुषा -123

1. खालीलपैकी कोणती संस्था 2011 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय वन वर्ष ' म्हणून साजरे करत आहे ?

A. सार्क
B. युनो
C. युनेस्को
D. आसियान

Click for answer
B. युनो

2. 2011 ह्या आंतरराष्ट्रीय वन वर्षाला साजरे करताना " पहिले भारतीय वन संमेलन " 22 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत कोठे संपन्न झाले ?
A. डेहराडून
B. भोपाळ
C. चंद्रपूर
D. नवी दिल्ली

Click for answer
D. नवी दिल्ली

3. 'पहिल्या भारतीय वन संमेलनाचा ' मध्यवर्ती विषय खालीलपैकी कोणता होता ?

A. बदलत्या जगातील वने
B. 21 वे शतक आणि वने
C. वैश्विक वातावरण बदलाचा वनांवर परिणाम
D. वने - वैदिक ते अर्वाचीन

Click for answer
A. बदलत्या जगातील वने

4. 'कुदुम्बाश्री ' ही दारिद्रय निर्मुलनाची योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात यशस्वीपणे राबविली गेली.

A. महाराष्ट्र
B. ओरिसा
C. केरळ
D. तामिळनाडू

Click for answer
C. केरळ

5. इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे किमान वय किती असावे लागते ?

A. 55 वर्षे
B. 60 वर्षे
C. 65 वर्षे
D. 70 वर्षे

Click for answer
C. 65 वर्षे
6. महाराष्ट्र शासनाने गर्भधारणेपूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध कायदा)__________पासून अंमलात आणला आहे.

A. 17 जानेवारी 2003
B. 8 मार्च 2008
C. 2 ऑक्टोबर 2010
D. 1 एप्रिल 2003

Click for answer
A. 17 जानेवारी 2003

7. 2009 मध्ये भारतातील कोणत्या अणुविद्युतप्रकल्पात झालेल्या जड पाण्याच्या गळतीमुळे सुरक्षेचा मुद्दा चर्चेला आला होता ?

A. तारापूर
B. काक्रापार
C. जैतापूर
D. कैगा

Click for answer
D. कैगा

8. भारताची 4096 किलोमीटर लांबीची सर्वाधिक मोठी सीमारेषा कोणत्या देशाबरोबर आहे ?

A. पाकिस्तान
B. बांगलादेश
C. चीन
D. नेपाळ

Click for answer
B. बांगलादेश
9. स्थापनेच्या तारखेनुसार खालील आर्थिक संस्थांचा सर्वात जुनी ते सर्वात नवीन असा कोणता क्रम योग्य आहे ?

A. नाबार्ड - ICICI- IFCI- IDBI
B. IFCI- ICICI- IDBI- नाबार्ड
C. ICICI- IDBI- IFCI - नाबार्ड
D. IDBI- ICICI- नाबार्ड -IFCI

Click for answer
B. IFCI- ICICI- IDBI- नाबार्ड

10. राष्ट्रकुल संघटनेतून निलंबित करण्यात आलेला देश कोणता ?

A. पाकिस्तान
B. श्रीलंका
C. व्हिएतनाम
D. फिजी

Click for answer
D. फिजी
=================================================================
Tuesday 29 November 2011
प्रश्नमंजुषा -124

1. आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?

A. 2 ऑक्टोबर
B. 15 डिसेंबर
C. 18 जुलै
D. 11 जुलै

Click for answer
C. 18 जुलै

2. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत ?
A. रत्नाकर महाजन
B. रत्नाकर गायकवाड
C. जे.पी.डांगे
D. स्वधीन क्षत्रिय

Click for answer
B. रत्नाकर गायकवाड

3. खालीलपैकी कशात फक्त एकच मूलद्रव्य आहे ?

A. हिरा
B. मीठ
C. मोरचूद
D. खाण्याचा सोडा

Click for answer
A. हिरा

4. क्षेत्रफळानुसार भारत जगातील ______ क्रमांकाचे राष्ट्र ठरते.

A. दुसरे
B. चौथे
C. सातवे
D. अकरावे

Click for answer
C. सातवे

5. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र (Central Cotton Research Institute) कोठे आहे ?

A. पुणे
B. भोपाळ
C. डेहराडून
D. नागपूर

Click for answer
D. नागपूर

6. ________ हे भारतातील सर्वात मोठे सरोवर होय.
A. सांबर सरोवर (राजस्थान)
B. वूलर सरोवर (जम्मू आणि काश्मीर)
C. चिल्का सरोवर (ओरिसा)
D. लोणार सरोवर (महाराष्ट्र)

Click for answer
B. वूलर सरोवर (जम्मू आणि काश्मीर)

7. 'पितळखोरा ' ह्या गुंफालेण्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

A. जालना
B. औरंगाबाद
C. नाशिक
D. पुणे

Click for answer
B. औरंगाबाद
8. __________ हे भूपृष्ठाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.

A. जिओलॉजी
B. सिस्मालॉजी
C. मिनरॉलॉजी
D. टॉपोग्राफी

Click for answer
D. टॉपोग्राफी

9. महाराष्ट्रात _____ आंतरराष्ट्रीय बंदर/बंदरे आहे/आहेत.

A. एक
B. दोन
C. तीन
D. चार

Click for answer
B. दोन

10. भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृहाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण ?

A. मीराकुमार
B. नजमा हेपतुल्ला
C. ज्ञानसुधा मिश्रा
D. अद्याप कोणीही नाही.

Click for answer
D. अद्याप कोणीही नाही.
लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. उपराष्ट्रपती हे संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे म्हणजे राज्यसभेचे पदसिध्द अध्यक्षपद भूषवतात. परंतु अद्यापतरी कोणाही महिलेला उपराष्ट्रपती पदावर विराजमान कोण्याची संधी प्राप्त झालेली नाही.
================================================================
Wednesday 30 November 2011
प्रश्नमंजुषा -125
http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.

1. जिल्हापरिषदेच्या सर्वसाधारण सभेसंबंधी किती दिवसांची नोटीस असते ?

A. 8 दिवस
B. 15 दिवस
C. 21 दिवस
D. 30 दिवस

Click for answer
B. 15 दिवस

2. जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे गोपनीय अहवाल लिहिण्याचा अधिकार कोणाला आहे ?
A. जिल्हाधिकारी
B. विभागीय आयुक्त
C. पालकमंत्री
D. जिल्हा परिषद अध्यक्ष

Click for answer
D. जिल्हा परिषद अध्यक्ष

3. महाराष्ट्रात राज्य सरकार जिल्हा परिषडेला जिल्ह्याच्या विकास कार्यासाठी किती टक्के अनुदान देते ?

A. 25%
B. 50%
C. 75%
D. 100%

Click for answer
C. 75%

4. महाराष्ट्रात _________ पासून जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती अस्तित्वात आली.

A. 1962
B. 1975
C. 1992
D. 2001

Click for answer
C. 1992





5. खालीलपैकी कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वत:चा उत्पन्नाचा स्त्रोत्र नाही ?

A. ग्रामपंचायत
B. पंचायत समिती
C. जिल्हा परिषद
D. यापैकी नाही

Click for answer
B. पंचायत समिती

6. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?

A. सुकुमार सेन
B. टी.एन.शेषन
C. नवीन चावडा
D. कुलदीपसिंग

Click for answer
A. सुकुमार सेन


7. एखादे विधेयक वित्त विधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे ?

A. राष्ट्रपती
B. उपराष्ट्रपती
C. अर्थमंत्री
D. लोकसभा अध्यक्ष

Click for answer
D. लोकसभा अध्यक्ष

8. भारतीय नागरिकांच्या अधिकारांवर समुचित बंधने कोण घालू शकते ?

A. संसद
B. लोकसभा
C. राष्ट्रपती
D. पंतप्रधान

Click for answer
A. संसद
9. खालीलपैकी कोणती व्यक्ती उपराष्ट्रपती पदावर लागोपाठ दोनदा विराजमान झालेली एकमेव व्यक्ती आहे?

A. डॉ. राजेंद्र प्रसाद
B. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
C. डॉ. झाकीर हुसेन
D. डॉ. शंकर दयाळ शर्मा

Click for answer
B. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

10. खालीलपैकी कोणी राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती ह्या दोनही महत्त्वपूर्ण पदांवर काम पाहिले आहे ?

A. प्रतिभाताई पाटील
B. ए.पी.जे.अब्दुल कलाम
C. डॉ.राजेंद्र प्रसाद
D. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

Click for answer
D. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा