Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

गुरुवार, १० मे, २०१२

प्रमुख पीकांची माहितीप्रमुख पीकांची माहिती


भात

भात

प्रमु्ख पिकांची माहिती

१) भात/धान/तांदूळ (Oryza.Sativa)

मुळस्थान – द. भारत, हंगाम – खरीप व रब्बी
भारतात जगातील सर्वाधिक म्हणजे २९% क्षेत्र भात या पीकाखाली आहे. (राज्यसेवा पूर्व परीक्षा – २००७) जागतिक भात उत्पादनात भारताचा २१% वाटा आहे. भात उत्पादनात जगात भारताचा व्दितीय क्रमांक लागतो.
भात भारतात मुख्यतःखरीप हंगामात घेतात. भात हे भारतातील ६०% लोकांचे मुख्य अन्न आहे.देशातील लावगवडीखालील क्षेत्रापैकी २२% क्षेत्र व उत्पादन भाताचे आहे. अशा प्रकारे भारतात सर्वाधिक शेतजमिन भात या पिकाखाली आहे. देशातील अन्नधान्याच्या उत्पादनात भाताचा ४१% वाटा आहे.
भारतातील सर्वाधिक भात उत्पादन करणारे राज्य – १) प. बंगाल २) आ. प्रदेश ३) पंजाब
देशातील दर हेक्टरी सर्वाधिक भात उत्पादन करणारे राज्य – पंजाब
महाराष्ट्रात भाताखाली १५.७५ लाख हेक्टर क्षेञ व २९.९६ लाख टन उत्पादन (भारतीय उत्पादनाच्या ३.४९%) आहे.
सर्वाधिक भात उत्पादन करणारा विभाग – कोकण
महाराष्ट्रात सर्वाधिक भात क्षेत्र व उत्पादन करणारा जिल्हा – ठाणे
महाराष्ट्रात सर्वाधिक दर हेक्टरी तांदूळ उत्पादन असणारा जिल्हा – कोल्हापुर
जागतिक तांदूळ संशोधन केंद्र – मनिला (फिलीपाईन्स) (राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९)
राष्ट्रीय भात संशोधन संखया(CRRI) चे मुखयालय – कटक
गोल्डन राईसचा (यात बीटा कॅरोटोन असते) संशोधक – डॉ. इंगो पोट्रीक्स.
नैसर्गिक शेतीची संकल्पना मांडून भात पिकासाठी यशस्वीपणे अंमलात आणणारा शास्ञज्ञ- फुफुओका
तांदळाच्या उपयुक्त जाती शोधणारा भारतीय शास्ञज्ञ- भटनागर.
हवामान – भातास उष्ण व दमट हवामान मानवते. पिकाच्या वाढीच्या काळात सरासरी तापमान २३.९ ते ३२.२ अंश सेल्सिअस लागते. पाउस १०० सेमी पेक्षा जास्त असावा लागतो. व ६५ ते ७०% आर्दता पोषक असते.
मृदा – जांभ्या खडकापासून तयार झालेली मध्यम जमिन, काळी, खा-या, अल्कलीयुक्त व पानथळी जमिनीतही हे पीक येते.
बियाणे – बारीक दाण्याचे २५ ते ३० किलो, व रोपवाटीकेत रोपे तयार करण्यासाठी ३७.५ किलो बियाणे लागते.

बीजप्रक्रिया – ३% मीठाच्या द्रावणात टाकून तरंगणारे बियाणे बाहेर काढून ४८ तास वाळवावे तसेच १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम ऍझॅटोबॅक्टर चोळावे.

जाती – हरितक्रांतीत वाटा असणारी जात – जया (खोड क्डि, करपा यांना बळी पडते)
अधिक उत्पन्न देणा-या जाती – आय आर ८, जया, तायुचुंग नेटीव्ह – १

१) हळव्या जाती – (८५ ते ११५ दिवसात येणा-या) रत्नागिरी – २४,७३,१,७११, कर्जत-१, ३५-३,१८४, राधानगरी – १८५-२, रत्ना, राधा, पराग, अंबिका, तेरणा

२) निमगरव्या (१२० ते १३५ दिवसात येणा-या) – जया, पालघर – १, विक्रम, फाल्गुन, आर पी – ४-१४, दारणा, फुले मावळ,

३) गरव्या – (१३५ ते १५० दिवस) – बासमती – ३७०, आंबेमोहोर- १५७, रत्नागिरी – २,६८-१, कर्जत -१४-७

भात पेरणीसाठी योग्य जात – प्रभावती, एस सी के – ५, मसूरी, सुवर्ण, दारणा
खा-या जमिनीसाठी – पनवेल – १,२, एमके – ४७-२२, दामोदर, एआरई – ९
सुगंधी जाती – बासमती, पुसा-३३, बासमती – ३७०, टी-३, आंबेमोहोर, सुगंध, कमोद, कण्णसाळ, पवना, इंद्रायणी, पुसा, बासमती, भोगावती, फुले, समुध्दी, प्रभावती, अविष्कार.
बासमतीच्या जाती – पुसा बासमती, हरियाणा, कस्तुरी, पुसा सुगंध – २,३, आरएच-१०
चुरमुरे व पोहयांसाठी उपयुक्त जात – राधानगरी १८५-२
इतर जाती – सहयाद्री, फुलेमावळ, पवना, आदित्य, प्रसन्न, तुलसी, रासी, कृष्णहंस, विकास, अभय, सुरक्षा, फाल्गुन, नागार्जुन, सुवर्णधन, प्रणव, प्रभावती, शालीवाहन, सुवर्णा, मसुरी, साकोली – ६, कुंडलिका, तेरणा, सिंदेवाही-१, ७५, आय पी-४-१४, आयईटी-२८१२, HMT

रोप तयार करण्याची पध्दत –

राहू पध्दत – खार जमिनीत रोप तयार करण्याच्या क्षेत्रात चिखलणी करुन मोड आलेले बियाणे फेकतात यासाठी हेक्टरी ६१ ते ७५ किलो बियाणे लागते.
डेपॉग पध्दत (दापोग)– ही फि लीपाईन्स या देशातील पध्दत आहे. यात रोपे लागवडीसाठी लवकर उपलब्ध होतात. यासाठी १.५ सेमी रूंद व ८ते १० मी उंच वाफा तयार करतात. प्लास्टीक कागद वापरतात.
टोकण पध्दत – या पध्दतीने पेरणी केल्यास २५ते ३० किलो बारीक व ३० ते४० किलो जाड बियाणे लागते. गरव्या व निमगरव्या जातीचे रोपे १५x २० सेमी अंतरावर लावतात. तर हळव्या जातीचे रोपे १५x२० सेमी अंतरावर लावतात. तर हळव्या जातीची रोपे १५x१५ सेमी अंतरावर लावतात.
लागवड – रोपे ६ ते ८ आठवडयाची झाल्यावर पुनर्लागण करतात. यासाठी भाताच्या खाचरात चिखलणी करूर २२ सेमी पर्यत पाणी साठवून ठेवतात. त्यात ग्लिरीसिडीयाची पाने व निळे हिरवे शैवाल, ओझोला टाकतात.
खते – ४०+४०+२० कि लो नञ, ५० किलो स्फुरद देणे.
भाताला नत्र नेहमी अमोनिया व्दारे देतात.
जोड ओळ पध्दतीने लागवड केलेली असल्यास दोन ओळीतील चार रोपांमध्ये ब्रिकर्स (युरीया+सिंगल सुपर्स फॉस्फेट+डायअमोनिया गिरणीत दळून गोळया करणे) घालणे. यामुळे ५०% नत्राची बचत होते. हे प्रमाण युटीचा DPA 60:40 असावे. विकी लाभ हेक्टरी १७० केजी वापरावे. युरियाद्वारे नत्र द्यावयाचे असल्यास १:६ प्रमाणात निंबोळी पेंड व युरिया मिसळल्यास नत्र वाया जात नाही.

कीड नियंत्रण –

१) लष्करी अळी – २५% सायपरमेंथ्रिन १२० ml = 600 Lt. पाण्यात किंवा २% पॅराथिऑन २० किलो हेक्टरी धुराळणे.

२) खोड कीडा – खोडास छिद्र पाडून अळया गाभा खातात. एन्डोसल्फान, पेंरीमिथिऑन, फॉस्फॉमिडॉन फवारणे.

खोडकीडयास बळी न पडणा-या रत्ना, आरपी ४-१४, आयईटी-२८१२, २८१५,२८४५,३०९३ जाती लावाव्या.
इतर रोग – खैरा, बंट, उदबत्त्या, करपा, तुडतुडे इ.
ग्रासि स्टॅट व्हायरसला प्रतिबंधक जात – आयआर – ३६
तांदळाची पहिली संकरीत जात तयार केली – कर्जत कृषी संशोधन केंद्र – कर्जत राईस हायब्रीड – १ इ.
भातासाठी वापरले जाणारे तणनाशक – ब्युटाक्लोर
कापणी – ९०% पीक तयार झाल्यावर किंवा ८०%साळ करडया रंगाच्या झाल्यावर वैभव विळयाव्दारे कापणी करतात. राज्यात ओलाव्याचे प्रमाण १२ते१४% असे प-यत वाळवावा.
अन्नधान्यात तेलाचे सर्वाधिक प्रमाण

१) भाताचे तुस – १८% २) मका

गिरणीत तांदुळ काढतांना होणारी घट – २ ते १०%

राज्यातील विभागीय भात संशोधन केंद्र –

१) उत्तर कोकण – कर्जत, खोपोली (रायगड), पालघर (ठाणे)

२) दक्षिण कोकण – रत्नागिरी, फोंडाघाट

३) खार जमिनीसाठी – पनवेल (रायगड)

४) मावळ – इगतपुरी, वडगाव (मावळ – पुणे), राधानगरी

५) विदर्भ – साकोली (भंडारा)

६) मराठवाडा – पेरभाताचा प्रदेश – तुळजापुर (उस्मानाबाद)

वर्षातुन दोनवेळा तांदळाचे पीक घेणारे राज्य – आंध्रप्रदेश
वर्षातुन तीन वेळा तांदळाचे पीक घेणारे राज्य – तामिळनाडू

ज्वारी

ज्वारी

२) ज्वारी (Sorghum.bicolor.mo.nech)

मुळस्थान – आफ्रिका, हंगाम – खरीप व रब्बी
ज्वारीच्या क्षेत्राबाबत भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. तर उत्पादनात व्दितीय क्रमांकावर आहे.
भारतात पीकांखालील क्षेत्रापैकी ज्वारीखाली क्षेत्र – ११%
भारतात एकूण ज्वारी क्षेत्रापैकी ६५% क्षेत्र खरीप व ३५% रब्बी हंगामी आहे. यात खरीप ज्वारीचे उत्पादन जास्त आहे, कारण खरीपाच्या ७९% क्षेञावर संकरीत व सुधारीत वाणांची लागवड होते.
भारतात ज्वारीखालील क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. भारताच्या ज्वारीच्या क्षेत्रापैकी ४०% क्षेञ व ५७% उत्पादन एकटया महाराष्ट्रात आहे. २) कर्नाटक ३) आंध्र ४) तामिळनाडू
महाराष्ट्रात खरीप व रब्बी मिळून ५५ लाख हेक्टर क्षेत्र ज्वारी पिकाखाली आहे. यापैकी २२ लाख हेक्टर खरीप, ३२ लाख हेक्टर रब्बी पिकाखाली आहे. परंतु खरीपातील ८५% क्षेत्रावर संकरीत व सुधारीत वाणांची लागवड केली जात असल्याने खरीपाचे उत्पादन जास्त आहे. एकूण उत्पादन ४०.३ लाख टन आहे.
महाराष्ट्राच्या एकूण अन्नधान्य उत्पादनात ज्वारीचा वाटा ५३% आहे. तर पिकाखालील क्षेत्रात ज्वारीचा वाटा ४३% आहे.
ज्वारीच्या दर हेक्टरी उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. महाराष्ट्राचे दर हेक्टरी उत्पादन ९६५ किलो, ज्वारी सर्वात कमी दर हेक्टरी उत्पादन सोलापूर आहे.
महाराष्ट्रात ज्वारीचे सर्वाधिक क्षेञ सोलापूर जिल्हयात आहे; त्यानंतर अहमदनगर व पुण्याचा क्रमांक आहे.
महाराष्ट्रात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन करणारे जिल्हे-

१) जळगाव २) सोलापूर ३) बुलढाणा.

ज्वारी सर्वाधिक दरडोई उत्पादन असणारा जिल्हा-बुलढाणा.
महाराष्ट्रात खरीप ज्वारीचे सर्वाधिक क्षेञ – नांदेड, लातूर इ.
खरीप ज्वारीचे एकूण व दरहेक्टरी सर्वाधिक उत्पादन करणारे जिल्हे – बुलढाणा, जळगाव इ.
महाराष्ट्रात रब्बी ज्वारीचे सर्वाधिक क्षेञ व उत्पादन असणारे जिल्हे – सोलापूर, अहमदनगर पुणे इ.
ज्वारीचे दर हेक्टरी सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्हे – १) बुलढाणा २) अकोला
ज्वारीमध्ये असणारे प्रथिनांचे प्रमाण – १० ते १२%
शाळूसाठी प्रसिध्द असणारे महाराष्ट्रातील ठिकाण – बार्शी (सोलापूर)
सर्वाधिक ज्वारी पिकविणारा विभाग – औरंगाबाद
ज्वारी अजिबात न पिकविणारा विभाग – कोकण
ज्वारीच्या फे रपालटासाठी योग्य पीक – कापूस
हवामान – हे उष्ण व समशीतोष्ण हवामानातील पीक आहे. यास उष्ण हवामान मानवते. २७ते३२ अंश सेल्सिअस तापमानास पिकाची वाढ चांगली होते. उबदार व कोरडे हवामान जास्त अनुकुल ठरते.
पर्जन्य – ५० ते १०० सेमी
जमिन – मध्यम प्रतीची, काळी, चांगला निचरा होणारी, चिकन पोयटयाची काळी व तांबडी जमिनही चालते. कमी पावसाच्या कोरडवाहू प्रदेशासाठी हे योग्य पीक आहे.
पेरणी – १) खरीप पेरणी – जुन ते जुलैचा दुसरा आठवडा, पेरणीचे अंतर – ४५ x१५ सेमी हेक्टरी बियाणे ७.५ ते १० किलो
जाती-संकरीत – सीएसएच – १,५,९,१४,६,१३,१७,१८,२१,२३, एसपीएच – ३८८, १५ ,६७ इ.

सुधारीत – एसपीव्ही – ४६२,४७५,९४६,३५१ – मध्यम उंचीच्या, सीएकव्ही- १३,१५,१७,२३, पीसेव्ही-८०.

कडब्यासाठी उत्तम जात – एसपीव्ही – ९४६

विदर्भासाठी – एसपीएच – ३८८ ही संकरीत जात उत्तम आहे.

२) रब्बी पेरणी – ५ सप्टें ते १५ ऑक्टो पर्यत, पेरणी अंतर ४५x२० सेमी, हेक्टरी बियाणे – १० ते १२ कि लो

जाती – संकरीत – सीएसएच – ८,१३,१५, सुधारीत – स्वाती (एसपीव्ही- ५०४), एसपीव्ही- ८३,८३९, मालदांडी- ३५-१, एसपीव्ही ८६८, सीएसव्ही – ८ इ.
हलक्या जमिनीसाठी योग्य जात – सिलेक्शन ३, फुले माऊली, फुले अनुराधा (आर एस यू – ४५८)
कृषी संशोधन केंद्र , मोहोळ, जि. सोलापूर ने शोधलेली रब्बी ज्वारीची जात- मालदांडी (एम – ३५-१)
अवर्षण प्रतिबंधक जाती – फुले यशोदा, माऊली इ.
ज्वारीच्या संकरीत वाणांचा कालावधी ११० ते १२० दिवसांचा असतो.
खते – NPK – १२०:६०:६० या माञेत देणे.
वाढीच्या अवस्था – १) २५ ते ३० दिवस – ७ ते १० पाने येणे

२) ५५ ते ६० दिवस – पीक पोटरीत येणे

३) ७० ते ७५ दिवस – दाणे चिकात येतात

४) ८० ते ८५ दिवस – दाणे भरून कठीण होतात

५) ९५ ते १०० दिवस – दाणे पक्व होतात. या प्रत्येक अवस्थेत पीकास पाणी द्यावे.

पीक ४५ दिवसाचे (८आठवडे प-यत) असतांना ज्वारीच्या ताटात जनावरांना हानीकारक हायड्रोसायनिक ऍसिड असते.
ज्वारीचे हेक्टरी १.८ ते २.२५ लाख रोपे असतात.
रोग – १) काणी – १ किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधकाची भूकटी लावावी

३) अरगट – बियाणे ३०% मिठाच्या द्रावणातून काढून वाळवणे.

कीड- खोडमाशी, खोडकीडा, लष्करी अळी, मीजमाशी, कणसातील अळया इ. पेरणी नंतर ५० दिवसांत, तूर, तण, यांचे अच्छादन टाकल्यास उत्पादनात १४% वाढ होते.

कापणी – पीक वाळल्यावर दाण्यात २० ते २५ आर्द्रता असतांना कापणी करावी.
साठवण – दाण्यात १० ते ११ % आर्द्रता ठेवणे.
आंतरपीक-पट्टा पध्दतीने तुर पीक २:१ या प्रमाणात घेतात.
ज्वारीसाठी ऍट्रॅझिन हे तणनाशक वापरतात.
उत्पादन – खरीपः धान्य – ३० ते ३५ क्विंटल हेक्टरी, चारा – ४० ते ५० क्विंटल हेक्टरी.
रब्बीः धान्य – २० ते २५ क्विंटल हेक्टरी, चारा – ५० ते ६० क्विंटल हेक्टरी.
औद्योगिक उपयोग – डॉ. सोमाणी यांनी ज्वारीपासून मद्य/बियर, पांढरा स्टार्च, ग्लूटेलीन, भूकटी, तेल असे २४ पदार्थ तयार केले आहे.
प्रादेशिक ज्वारी संशोधन केंद्र – मोहोळ (सोलापूर)

गहू

गहू

गहू (Triticum.aestivum, Triticum duram)

मुळस्थान – भारत, अफ गाणिस्तान, रशिया हंगाम – रब्बी.
जगात गव्हाखालील सर्वाधिक उत्पादन असणारा देश – चीन.
जगात सर्वाधिक गव्हाचे क्षेत्र असणारा देश – भारत.
जगातिल गहू उत्पादनात भारताचा क्रमांक – व्दितीय.
जगातिल गहू उत्पादनात भारताचा वाटा – ३.५%
जगाचे गव्हाचे कोठार – युक्रेन.

१) उत्तर प्रदेश . २) पंजाब

३) हरियाणा ४)राजस्थान

देशात सर्वाधिक दर हेक्टरी गव्हाचे उत्पादन असणारे, देशाचे गव्हाचे कोठार म्हणून ओळखले जाणारे राज्य – पंजाब.
देशात पिकांखालील क्षेत्रापैकी गव्हाखालील क्षेञ – १३%
भारताच्या एकूण अन्नधान्य उत्पादनात गव्हाचा वाटा – २५ %
भारताच्य गहू क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा – ३.१%, उत्पादन – १.७%
राज्यात गव्हाखाली सर्वाधिक क्षेत्र व उत्पादन असणारे जिल्हे – अहमदनगर, नाशिक, पुणे इ.
राज्यात गव्हाचे सर्वाधिक दर हेक्टरी उत्पादन असणारा जिल्हा – कोल्हापूर.
हवामान – या पीकास थंड व कोरडे हवामान मानवते. आर्द्र हवामानात गहू कठिण व प्रथिनेयुक्त असतो. या पीकास सकाळी दव असल्यास पीक चांगले येते.
तापमान – हिवाळ्यात १० ते १५ अंश सेल्सिअस व कापणीच्या वेळी २१ ते २६ अंश सेल्सिअस तापमान असावे. तापमान जास्त असल्यास गव्हात दाणे लवकर तयार होतात तसेच रोगही पडतात.
पर्जन्य – जिरायती गव्हासाठी ५० सेमी पर्यत पर्जन्य आवश्यक असते.
जमिन – गाळ व चिकणमातीयुक्त लोम प्रकारची वाळू मिश्रीत जमिन, काळी किंवा तपकीरीही चालते. त्यासाठी निचरा चांगला होणे आवश्यक असते. जिरायत गव्हासाठी जास्त काळ ओलावा धरून ठेवणारी जमिन निवडावी.
पेरणी – १) वेळेवर – १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर

२) उशिरा – १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर

बियाणे – वेळेवर पेरणी केल्यास १०० ते१२५ किलो, तर जिरायती जमिनीत ७५ ते १०० किलो बियाणे लागते. गव्हाच्या दोन ओळीत २२.५ सेमी अंतर सोडतात.
गव्हाच्या रोपांची संख्या हेक्टरी २० ते २२ लाख ठेवल्यास हेक्टरी उत्पादन चांगले येते.
बीज प्रक्रिया – ३ ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. तसेच १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम ऍझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धक चोळावे.
गव्हाच्या जाती – १) बागायत गहू - HD- २१८९ (सरबती) – दाणे काजळी रोगमुक्त, मोठे, पिवळसर व तेजदार, HD- २२७८, २३८०,NI- ९९४७,४३९,HD-४५०२,MACS- २४९६, (सरबती),AKW-३८१, राज – १५५५,DWR, ३९,१६२(सरबती),MACS- २८४६ (बक्षी वाण) NIAW – ३०१ (त्रंबक) (सरबती)- चपातीसाठी उत्तम.
नवीन जाती –WH ५४२, युपी -२३३८, PDW ३४२, श्रेष्ठा, युपी-२४२५ हरित क्रांतीत महत्वाचा वाटा असणा-या बुटक्या मेक्सिकन जाती – कल्याणसोना, सोनालिका इ.
उशिरा पेरणीसाठी – HD- २५०१, २१८९, HI- ९७७, सोनालिका, PBN- १४२ (कैलास), NIAWHD- २५०१, DWR- १९५ NIAW -३४ (सरबती वाण) – चपातीस योग्य

१) जिरायती जाती – एन – ८२२३ (विनीता), एन -५९३९, एनआय ५४३९ MACS १९६७, कल्याणसोना, अजिंठा, MACS-९ अजिंठा, NIDW – १५ (पंचवटी) बंसी वाण – शेवया व कुरडयांसाठी उत्तम

उशिरा व वेळेत अशा दोन्ही पेरणीसाठी योग्य जात – HD २१८९,
अखिल भारतीय गहू संशोधन समन्वय प्रकल्पाने महाराष्ट्रासाठी शिफारस केलेल्या गव्हाच्या निर्यातक्षम जाती – HD- ४५०२ (मालविका), MABS २८४६, PBN (परभणी) १६२५
बक्षी वाण (डयूरम गहू) – हा वाण गहू, शेवया, पास्ता सारख्या इटालियन खाद्य पदार्थाच्या निर्मितीसाठी वापरतात. या वाणाच्या निर्यातीस मोठा वाव आहे.
फास्टफुडसाठी डयूरम गव्हाच्या जाती – राज – १५५५, एचआय-८३८१, मालव, शक्ती, PWD 215, 233, WH- 896
खत मात्रा NPK- बागायत – १२०:६०:४०, जिरायत – ४०:२०:००
पाणीपुरवठा – १) २१ दिवसांनी मुकुटमुळे (आधारमुळे) फुटण्याचे वेळी पाणी व्यवस्थापनासाठी ही अतिसंवेदशिल अवस्था मानली जात २) ४२ दिवसांनी कांडी धरण्याचे वेळी ३) ६३ दिवसांनी पीक ओंबीत येण्याच्या वेळी ४) ८४ दिवसांनी ओंबीत दाणे भरण्याचे वेळी ५) १०५ दिवसांनी शेवटचे पाणी द्यावे.
रोग – १) तांबेरा (गेरवा) – गव्हावर काळा व नारंगी तांबेरा पडतो. यासाठी डायथेन एम – ४५ किंवा मॅन्कोझेब ७५ % हे बुरशीनाशक फ वारावे.
इतर रोग – मावा, तुडतुडे, कुज, स्मट, रस्ट इ.
गव्हावर २-४ डी हे व्दिबीजपत्री तणनाशक फ वारतात.
गव्हाच्या पीकाचा सर्वसाधारण कालावधी १२० ते १२५ दिवस असतो.
पीक परिपक्व झाल्यावर कापणी करणे. सुधारीत वाणांपासून गव्हाचे ३५ ते ४० क्विंटल उत्पन्न मिळू शकते.
गहू व भाताच्या भूसात ऑक्झिलीक ऍसिड असते.

बाजरी

बाजरी

बाजरी (Prnnisetum.ameicanum)

मुळ स्थान – आफ्रिका
बाजरीच्या उत्पादनात अग्रेसर राज्य –

१) राजस्थान (२५%) २) उत्तरप्रदेश ३) महाराष्ट्र

भारताच्या बाजरीच्या ९० लाख हेक्टर क्षेञापैकी महाराष्ट्रात १२.८३ लाख हेक्टर क्षेत्र येते तर ७९ लाख टन उत्पादनापैकी ११.२७ लाख टन उत्पादन होते. तर हेक्टरी उत्पादन ८७८ केजी आहे.
महाराष्ट्रात विभागानुसार बाजरीचे सर्वाधिक क्षेत्र असणारा विभाग – नाशिक.
बाजरीचे सर्वाधिक क्षेत्र व उत्पादन करणारा जिल्हा – नाशिक (राज्याच्या २३%)
बाजरीचे सर्वाधिक दर हेक्टरी उत्पादन असणारा जिल्हा – जालना
हंगाम – बाजरी हे खरीप हंगामातील पीक आहे. हे राज्यातील अवर्षणग्रस्त भागात घेतले जाते. कारण बाजरी कमी पर्जन्याच्या भागातही तग धरून राहू शकते.
हवामान – उष्ण व कोरडे, ५० सेमी पर्यत पर्जन्य आवश्यक
जमिन – कमी खोलीची किंवा मध्यम खोलीची
पेरणी – १५ जुन ते १५ जुलै या काळात ४५x१५ सेमी अंतरावर करतात. बाजरीचे हेक्टरी १.६० ते १.८० लाख रोपे ठेवावीत.
जाती – संकरीत वाण –एमएच-१७९, एमएच-२०८ (एचएचबी ५०), एमएच १६९,१४३, शांती श्रध्दा (आरएचआरबीएच ८६०९), सबुरी (आरएचआरबीएच ८९१४) श्रध्दा वाणाच्या भाकरी चवदार असतात. तर सबुरी वाणाचा रंग पांढरा असतो व उत्पादन श्रध्दा पेक्षा १० ते १५ % जास्त मिळते. सुधारीत वाण – आयसीटीपी – ८२०३, आयसीएमपू – १५५
संकरीत बियाणे हेक्टरी – २.५ ते ३ किलो वापरतात.
खते – अवर्षणप्रवण भाग – नत्र – २५ ते ५० किलो व स्फुरद २५ किलो मध्यम जमिन व बरा पाउस – ६० किलो नत्र व ३० किलो स्फुरद द्यावे.
तृणधान्यत बाजरी पीकास पालाशची कमीत कमी गरज असते.
पाणी – १) फुटवे फुटण्याच्या वेळी पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी २) ३५ ते ४५ दिवसांनी पीक पोटरीत असतांना

३) ५५ ते ६० दिवसांनी कणसात दाणे भरतांना

आंतरपीक – बाजरीत तुर हे पीक २: १ या प्रमाणात घेतात.
सुधारीत लागवड – उन्हाळयात सरी वरंबा करून टोकण पध्दतीने पेरणी केल्यास जास्त उत्पादन मिळते.वरील पध्दतीने लागवड केल्यास २७% जास्त उत्पादन मिळते. चारा उत्पादनातही २१% वाढ होते व पिक १० ते १५ दिवस आगोदर पक्व होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने राहूरी बाजरी सरी व पेरणी यंत्र शोधले आहे. यामुळे सरी पाडणे व पेरणी करणे ही कामे एकाच वेळी होतात.

रोग

१) केवडा (गोसावी किंवा बुवा) – सतत पाउस व ढगाळ वातावरणामुळे हा बुरशी जन्य रोग होतो. श्रध्दा हे वाण गोसावी रोगास प्रतिकारक्षम आहे. श्रध्दा व सबुरी केवडा रोगास प्रतिकारक जाती आहेत. यावर उपाय म्हणून पेरणी पूर्वी ६ ग्रॅम मेटॅलॅक्झील (ऍप्रॉन) प्रति किलो बियाण्यास चोळणे

२) अरगट (चिकटा) – हा बुरशीजन्य रोग आहे. यात कणसातून चिकट द्रव स्त्रवतो. उपाय – पेरणीपुर्वी बियाणे २०% मिठाच्या द्रावणात टाकावे. २-३ वेळा धुवून सावलीत वाळवावे.

३) भूंगे (बाळी)

४) सोसे (हिंग) – सकाळी, मिथाईल पॅराथिऑनची २% भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणात फवारावी

पीक ८५ ते ९० दिवसांत तयार होते. दाणे कठिण बनतात. पाने वाळतात.
उत्पन्न – श्रध्दा वाणाचे उत्पादन हेक्टरी २६.५ क्विंटल मिळते व सरमाड ५३ क्विंटल मिळते. इतर वाणांचे हेक्टरी २० ते २५ क्विंटल उत्पादन मिळते.
बाजरीत असणारे विषारी अल्काईन – आरगोटॉक्सिन.

मका

मका

मका (Zea Mays)

मुळ स्थान – अमेरिका
जगातील पहिले संकरीत पीकाचे वाण – मका
भारतीय वनस्पती जनुक शास्त्रज्ञ डॉ. सुरिंदर वसल व मेक्सिको येथील शास्त्रज्ञ डॉ. विलीगास यांनी प्रथिन समृध्द अशी मक्याची जात तयार केल्यामुळे त्यांना २००० चे सहस्त्रक जागतिक अन्न पारितोषिक मिळाले.
मक्याचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश – अमेरिका.
भारतात मक्याचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य –

१) कर्नाटक २) उत्तरप्रदेश ३) बिहार

मका हे पीक तिनही हंगामात घेतात. मका पाण्यास संवेदनक्षम आहे तर तापमानास संवेदनक्षम नाही.
मक्याची प्रकाश संश्लेषण क्षमता सर्व तृणधान्यात उच्च आहे. तसेच या पीकात निरनिराळया हवामानाशी समरस होण्याची क्षमता आहे.
मक्यापासून तेल काढतात तसेच कॉर्न फ्लोक्स तयार करतात.
हवामान – उष्ण व कोरडे हवामान मानवते. पर्जन्य ७५ ते ११० सेमी असावे.
जमिन – मध्यम ते खोल निच-याची, सुपीक गाळाची सपाट व खोल जमिन मानवते.
पेरणी – खरीपः जुन- जुलै, रब्बीः ऑक्टो – नोव्हें., उन्हाळीः जाने-फेब्रु. पेरणीची पध्दतः टोकण

धान्यासाठी पेरणीचे अंतर ७५.३० सेमी ठेवतात तर चा-यासाठी ३०.१५ सेमी ठेवतात.

बियाणे – धान्यासाठी १५ ते २० किलो, चा-यासाठी ७५ ते १२० किलो.
जाती – १) संकरीत – डेक्कन डबल हायब्रीड, डेक्कन १०१,१०३,१०५ गंगा सफेद २,५, पारस, अरूण, किरण, सु्र्या, पुसा, हायब्रीड १,२, प्रकाश, एफ एच ३०४७ इ.

मका संकरीत जाती – जे. के- २४९२, प्रो ३१०,३११,३१२

बायो ९६८१, ९६३७ सिडटेक २३२४ के. एच – ९४५१, एचपीएच-५, सरताज, गंगा-११, त्रिशुलता.

हायस्टार्च या जातीत सर्वाधिक ७५% पिष्टमय पदार्थ असतात.
स्विट कॉर्न – काही वाणांच्या कच्च्या दाण्यात साखरेचे प्रमाण १८ ते २०% असल्यास त्यास मधूमका म्हणतात. यापासून पौष्टीक आहार, खीर, पुरी, सूप, पिझा तयार करतात.
जाती – स्विट कॉर्न (१ ताटाला दोन कणसे येतात), हवाई सुपर स्विट, हाय शुगरी कॉर्न.
बेबी कॉर्न (बालमका) – कणसातून स्त्रीकेसर बाहेर येतात काढलेले कणीस याचा उपयोग पंचतारांकित हॉटेलमध्ये सॅलॅड, सूप, लोणची , भाजी, वडे द, पदार्थ तयार करण्यासाठी करतात

जाती – माधुरी, मांजरी, संमिश्र व व्ही एल – ४२ इ.

२) संयुक्त वाण – मांजरी, हयुनिस, आफ्रिकन टॉल, पंचगंगा

आफ्रि कन टॉल ही चार्‍यासाठी प्रसिध्द जात आहे.
भाकरीसाठी व भाजून खाण्यासाठी जात – पंचगंगा
मोठया आकाराच्या व चांगल्या प्रतीच्या लाहयांसाठी जात – अंबर पॉपकॉर्न.
लहान मुलांना पोषक आहार व कोंबडयांचे खाद्य यासाठी जात –शक्ती १
उत्पादन – हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल धान्य व ६० ते ६५ टन चारा मिळतो.

आंतरपीके खरीप – मका+उडीद/मूग/चवळी/सोयाबीन/भुईमूग/तूर

रब्बी – मका + करडई/कोथींबिर/मेथी

बार्ली (Horderum.vulgare)

या पिकास १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान, पर्जन्य ५० ते ७० सेमी व कमी सुपीक मृदा लागते.
बार्लीचे उत्पादन १००० मी. पेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशात होते.
बार्लीचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य – उत्तरप्रदेश
हे पीक मुख्यतःभारतातच घेतात. भारतात या पीकासाठी ३० लाख हेक्टर क्षेत्र असून याचे उत्पादन ३५ लक्ष टन आहे.
जाती – रत्ना, ज्योती, कैलास, देलमा, हिमाणी, करण – ३,४,१६ इ.
उपयोग – बियर, व्हिस्की, व्हिनेगर, औषधे इ.

नागली

नागली

नागली (नाचणी)

उपयोग – नाचणीपासून भाकरी, माल्ट, नुडल्स, पापड, आंबील, इडली बनवीतात.
हे पीक राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील हलक्या व वरकस जमिनीत घेतात.
नागली हे दुर्गम भागातील लोकांचे प्रमुख अन्नधान्य आहे. यात ६ ते ११% प्रथिने, कॅल्शिअम, लोह,स्फुरद पुरेशा प्रमाणात असतात .मधुमेह , अशक्त व आजारी माणसांना नाचणीचा आहार उपयुक्त व गुणकारी मानला जातो.
या दुर्लक्षित पिकावर राष्ट्रीय संशोधन प्रकल्प, शेंडा पार्क, कोल्हापुर येथे करण्यात आले आहे. यामुळे रक्तातील कोलेस्टेटरॉल कमी होते. यांच्या सेवनाने ह्रद्योग आल्यातील पूण, मधूमेहाचे प्रमाण कमी होते.
नाचणीची खरीप हंगामात २२.५ सेमी अंतरावर पेरणी किंवा रोप लागण करतात.

जाती – गोदावरी, बी – ११, पीईएस-११० इंडाफ ८, दापोली – १, व्ही एल – १४९, जीपीयू – २६, २८, पी आर – २०२

हेक्टरी बियाणे ३ ते ४ किलो पेरणीपूर्व ३ ते ४ ग्रॅम थॉरम प्रति किलो बीजप्रक्रिया करतात.

तेलबिया/ गळीताची बिये

उपयोग – नाचणीपासून भाकरी, माल्ट,नुडल्स, पापड, आंबील, इडली बनवितात.
भारताचा गळीताच्या क्षेत्रात जगात दुसरा व उत्पादनात जगात पाचवा क्रमांक लागतो.
तीळ उत्पादनात भारताचा जगात व्दितीय क्रमांक लागतो तर जवस उत्पादनात रशिया, कॅनडा नंतर तृतीय क्रमांक लागतो.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या कमी वापरामुळे एकू्ण पिकाखालील क्षेत्रापैकी तेलबियाखाली ११% क्षेञ असेल तरी उत्पादनात ९% चा वाटा आहे.
जगातील उत्पादनापैकी भारतात तेलबिया उत्पादन – भूईमूग – १/३, तीळ – १/४, एरंडी – १/५, सरसो – १/६.
गंधकामुळे तेलबीयांत तेलाचे प्रमाण वाढते.
राज्यात तेलबीयांखाली सर्वाधिक क्षेत्र असणारा जिल्हा – नागपूर
राज्यात तेलबियांचे एकूंण व दर हेक्टरी सर्वाधिक उत्पादन असणारा जिल्हा – कोल्हापूर
तेलबियांचे सर्वात कमी क्षेत्र व उत्पादन असणारा जिल्हा – रायगड

भुईमूग

भुईमूग

भुईमूग(Arachis.hy.pogaea)

भूईमूग हे मुळचे दक्षिण अमेरीकेतील ब्राझिल या देशातील पीक आहे. १८०० मध्ये पोर्तूगीजांनी ते भारतात आणले.
सध्या भूईमुगाच्या उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर (जागतिक उत्पादनाच्या ३२% उत्पादन) आहे.
भूईमुग पीकाखाली एकूण तेलबियापैकी ४५% क्षेत्र आहे तर तेलबियांच्या उत्पादनात भूईमुगाचा वाटा ५५% आहे.

त्यामुळे भूईमुगास तेलबियांचा राजा म्हणतात. याच्या स्वस्त भावामुळे भूईमुगास गरीबाचा बदाम म्हणतात.

भारतात भूईमुगाचे सर्वाधिक उत्पादन गुजरातमध्ये होते.
भूईमुग उत्पादनात गुजरात, आंध्रप्रदेश व तामिळनाडू नंतर महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो.
केंद्रीय भूईमुग संशोधन केंद्र – जुनागढ (गुजरात)
महाराष्ट्राचे राज्यस्तरीय तेलबिया संशोधन केंद्र – जळगाव
महाराष्ट्रात सर्वाधिक भूईमुग उत्पादन करणारे जिल्हे –

१) अमरावती २) धुळे

३) सातारा ४) उस्मानाबाद

देशाच्या एकूण भूईमुगाखालील क्षेत्रापैकी महाराष्ट्राचा वाटा ७.२% आहे.
हवामान – उष्ण व कोरडे हवामान, ५० ते १०० सेमी पर्यंत पर्जन्य, काळोख्या रात्रीस हे पीक संवेदनशील आहे.
जमिन – मध्यम , चांगल्या निच-याची भूसभूशीत व सेंद्रिय पदार्थ असणारी जमिन मानवते.
पेरणी – खरीप – १५ जुन ते ७ जूलै उन्हाळी २० जाने. ते फेब्रु. अखेरपर्यत. पेरणीचे वेळी तापमान १८ से. पेक्षा जास्त असावे.
पेरणी अंतर – उपटया भूईमुग – ३०x१० सेमी. निमपस-या व पस-या भूईमुग – ३०x१५सेमी व ४५x१५ सेमी
बियाणे हेक्टरी – छोटे दाणे १०० किलो, मोठे दाणे १२५ किलो
जाती – १) उपटया -SB- ११ फु्ले प्रगती (JL-24) फु्ले व्यास(JL 220) टॅंग – २४, कोपरगाव एक फुले उत्तप (एसएल – २८६) टीजी – २६, TMV १० उपटया जाती ९० ते ११० दिवसात तयार होतात.

२) निमपसरी – UF – ७०-१०३, ICGC – ११, TMV – १० या जाती १३५ दिवसात तयार होतात.

३)पसरी – M – १३, कराड ४-११, कोयना, या जाती १५० दिवसात तयार होतात.

उन्हाळी वाण – निमपसरी – ICGC – ११, व उपटया SB -११
कोकण कृषी विद्यापीठाने प्रसारीत केलेल्या जाती – ट्रॉम्बे कोकण, कोकण गौरव
आंतरपीके – भूईमुगातः -३:१ या प्रमाणात तुर, मुग उडीद व सुर्यफुल ही पीके घेतात.
खते – नत्र –हेक्टरी २५ ते ३० किलो, स्फुरद ५० ते ६० किलो
सुक्ष्म अन्नद्रव्ये -हेक्टरी ०.५ कि. मॉलिब्डेनम, १० कि. झिंक, २ कि. बोरॉन ४०० कि. जिप्सम टाकावे.
भूईमुग लागवडीची इक्रीसॅट पध्दत – या पध्दतीत रूंद वरंबे आणि सरी रयार करतात. १२० सेमी अंतरावर ३० सेमी रूंदीचे पाट पाडून रूंद वरंबे आणि सरी करता येते. गादीवाफ्याप्रमाणे असणा-या वरंब्यावर लागवड करुन सरीद्वारे पाणी देतात. या वरंब्यावर ४ ओळींची लागवड करतात गादीवाफ्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होतो. हवा खेळती राहते. त्यामुळे उत्पादन अधिक येते. (राज्यसेवा पूर्व परीक्षा २००३)
पाणी पुरवठा – भूईमुगास ५० हेक्टर सेमी पाण्याची आवश्यकता असते.

१) पेरणी नंतर ४० दिवसांनी पीक फुलो-यात आल्यावर, २) ६५ दिवसांनी आ-या सुटण्याचे वेळी ३) ८० दिवसांनी शेंगा भरतेवेळी .

भुईमुगाचे पीक ५० दिवसाचे होताच त्यावरून मोकळा ड्रम फिरविल्यास आ-या जमिनीत घुसण्यास मदत होते व उत्पादनात वाढ होते.
कीड – भूईमुगावर पाने गुंडाळणारी व पाने खाणारी अळींचा प्रादुर्भाव झाल्यास मोनोक्रोटोफॉस फवारावे.
रोग – तांबेरा – या रोगावर डायथेन एच – ४५, हुमणी रोगावर कार्बारिल फवारतात तर टिक्का रोगावर गंधकाची भूकटी धुराळतात.
उत्पादन – खरीपात हेक्टरी १५ ते २० क्विंटल वाळलेल्या शेंगा मिळतात. तर उन्हाळे भुईमूंगाचे २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळु शकते.
भुईमुगाच्या पेंडीत असणारे नत्राचे प्रमान – ७%

सोयाबीन

सोयाबीन

सोयाबीन (Glycine.max.l.merrill)

मुळस्थान – चीन
सोयाबीन हे कडधान्ये व तेलबिया अशा दोन्ही वर्गात येते. यात १८% तेल व ४० ते ४२ % प्रथिने असतात. जगातील ४८% तेल व ५०% प्रथिनांची गरज सोयाबीन भागविते. सोयाबीन पासून तेल, दाळ व सोयादुध तयार करतात.
सोयाबीनमध्ये पिष्ठमय पदार्थ कमी असल्यामुळे सोयाबीनचा आहार ह्रदयरोग, यकृत, मुञपिंडाच्या रूग्नांना योग्य ठरतो. सोयाबीनच्या या गुणधर्मामुळे त्या चमत्कारीक पीक म्हणतात.
सोयाबीनला पाश्चात्य देशात कामधेनू तर चीनमध्ये मातीतील सोने संबोधतात.
सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश – चीन
भारतात १९६८ मध्ये सर्वप्रथम सोयाबीनची लागवड केली गेली.
भारतीय तेलबियांत भूईमुग मोहरीनंतर सोयाबीनचा क्रमांक लागतो.
सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र व उत्पादन असणारे राज्य – १) म. प्रदेश (५६.५८%) २) महाराष्ट्र ३) राजस्थान
केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र – इंदुर (म. प्रदेश)
महाराष्ट्रात सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र विदर्भात आहे. जिल्हयाचा विचार केल्यास नागपूर जिल्हयात सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र आहे.
राज्याच्या तेलबियाच्या क्षेत्रात सोयाबिनचा हिस्सा ६५.४% असून उत्पन्नात ७८.८४% वाटा आहे.
सोयाबीनच्या क्षेत्रात व उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक – व्दितीय
पिवळे सोयाबीनचे उत्पादन करणारे जिल्हे – सातारा, सांगली, कोल्हापुर इ.
सोयाबीन तेलातील घटक – लिनोलिका आम्ल – ५६%, ओलेईक – २०% लिनोलेनिक आम्ल – ९%, असंपृप्त स्निग्धाम्ले – ८५% (ASFA)
हवामान – ७० ते १०० सेमी पाउस पडणा-या भागात हे पीक चांगले येते. सोयाबीनचे पीक उष्ण तापमानाला व मोठया काळोख्या रात्रीस फारच संवेदनशील आहे. या पीकास १३ ते ३० अंश सेल्शिअम तापमान मानवते.
पेरणी – खरीप – जुन-जुलै, उन्हाळी – फेब्रुवारी.
पेरणी ३० सेमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी ७५ किलो बियाणे लागते. बियाण्यावर -हायझोबियम जीवाणू संवर्धनाची क्रिया केल्यास उगवण चांगली होउन उत्पादन वाढते. रोपांची हेल्टरी संख्या ४.४ लाख असावी.
सुधारीत जाती –MACS-१३, MACS-५७(उन्हाळी हंगाम) MACS-५८, १२४, PK -४७२, JS -८० PKV – १, JS-३३५, मोनिटा, पी के १०२९, फुले कल्याणी (डी५.२२८)

आंतर पीक – सोयाबीन, तूर, ३:२ या प्रमाणात घ्यावे

खते – हेक्टरी ५० किलो नत्र व ७० किलो स्फुरद पेरणीबरोबर द्यावे.
कीड – पाने खाणारी अळी, तुडतुडे व पांढरे सोंडे यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी एंडोसल्फान किंवा न्युऑक्रॉन फवारणे.
उत्पादन – १०० ते ११० दिवसात पीक तयार झाल्यावर काढणी करणे.हेक्टरी १५ ते २० क्विं. उत्पादन मिळते. तसेच शेतात हे. ९.५ क्विं. पानगळ होउन जमिनीचा मगदूर सुधारतो.

सूर्यफुल

सूर्यफुल

सु्र्यफु्ल (Helinthus. annus)

मुळस्थान – अमेरिका
सुर्यफुलास पिवळे सोने म्हणून ओळखतात. जागतिक तेल बियांच्या उत्पादनात सुर्यफुलाचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात अग्रेसर-

१) कर्नाटक २) महाराष्ट्र ३) आंध्र प्रदेश

सुर्यफुलाच्या बियांत तेलाचे प्रमाण ३८ ते ४५ % असते. या तेलात ७०% लिनोलिक आम्ल असल्याने हे तेल ह्रद्य विकार असणा-या व्यक्तीसाठी उपयुक्त आहे.
सुर्यफुलापासून पेंड , खते, रसायने, इंधन,कागद, साबण बनवितात. तसेच टरफलापासून पेक्टीन बनविण्याचा कारखाना जळगाव येथे आहे.
भारतात १९६९ पासून सुर्यफुलाची लागवड सु्रू झाली. देशातील तेलबियांपैकी २८% क्षेत्र व १० % उत्पादन सुर्यफुलापासून मिळते.
देशातील एकूण सुर्यफुल उत्पादना पैकी ५०% उत्पादन महाराष्ट्रात होते.
महाराष्ट्रातील ३/४ क्षेञ मराठवाडयात आहे. तर जिल्हयाचा विचार करता सर्वाधिक क्षेञ उस्मानाबाद, जिल्हयात आहे. त्या खालोखाल लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेडचा क्रमांक लागते
हंगाम – सुर्यफुलाचे पिक ८० ते ९० दिवसात तयार होते. त्यामुळे हे पीक बहुविध पीक पध्दतीत तसेच खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिनही हंगामात घेतात. हे पीक उष्णता अगर थंडीस संवेदनक्षम नाही.
जमिन – या पीकास मध्यम ते भारी, उत्तम निच-याची पोयटयाची जमिन मानवते. सुर्यफुलाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्याने पाण्याचा ताण सहन करू शकतात तसेच रासायनिक खते व पाण्यास हे पीक उत्तम प्रतिसाद देते.
पेरणी – टोकण पध्दतीने गरव्या जातीसाठी व संकरीत वाणासाठी ६०x३० सेमी अंतरावर तर कमी कालावधीच्या सुधारीत वाणांसाठी ४५ x२२ सेमी अंतरावर करतात.
खते – NPK- ६०+३०+३० हेक्टरी
हेक्टरी रोपांची संख्या ५५००० ठेवणे आवश्यक आहे.
सुधारीत वाण – मॉर्डेन ही बुटकी जात तीनही हंगामास योग्य आहे. एसएस-५६, इसी ६८४१४ या जाती खरीप व रब्बी हंगामासाठी योग्य आहेत. इतर जाती – भानू
इतर जाती – सुर्या
संकरीत जाती – LDMRSH-1,(पक्षांपासून त्रास नाही) व ३) MSFH-1,8,17 (केवडा व तांबेरा प्रतिबंधक) LSH-1,3, KBSH-1,44 APSH- 11, PKVSH-27

महात्मा फुले कृषी विंद्यापीठाने २००८ मध्ये फुले रविराज सी. आर. एस. व्ही. – ४३७ हे वाण प्रसारित केला.

वैशिष्टे – उत्पादन १७.९५ क्विंटल/ हेक्टरी नर व मादी वाणात एकाच वेळी फुले येतात

उत्कृष्ट पिजोत्पादन, तेत्याचे प्रमाण ३४.%
बड निकोसिस व अल्टरनेरीया रोगास पृतिकारकण
प. महाराष्ट्र उडिसा, यरोप, मंमससागे योग्यण
सुर्यफुलाचे परागीभवन होण्यासाठी व उत्पादन वाढविण्यासाठी हस्तपरागिकरण करतात.
पीक संरक्षण – सुर्यफुलावर घाटे अळी (हेलीऍथिस),केसाळ अळी, तुडतुडे, पांढरी माशी या कीडींचा प्रादुर्भाव येतो.
अल्टरनेरीया – या रोगामुळे पानांवर तांबेरा व ठिपके दिसतात.ह्यावर उपाय म्हणून डायथेन एम -४५ फवारणे.पाने खाणारी अळी, केसाळ अळी ,घाटे अळी यांच्या नियंत्रणासाठी एच एन पी सी या विषाणूची फवारणी करावा हा रोग खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर येतो
उत्पादन – हेक्टरी १२ ते १५ क्वि. उत्पादन मिळते.

करडई

करडई

करडई

मुळस्थान – अफगाणिस्तान
करडईमध्ये लिनोलिक स्निग्धाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील कोलेरोस्टेरॉलच्या प्रमाणावर नियंत्रण राहते.त्यामुळे हद्यरोगासाठी उपयुक्त सफोला तेल करडईपासून काढतात. करडईच्या पाकळ्या रक्ताभिसरणाच्या कार्यक्षमतेवर इष्ट परीणाम करुन रक्त वाहिन्यात ऑक्सिजन वाढुन गुडळ्या कमी होतात.
करडईत ३८ ते ४० % पर्यत तेलाचे प्रमाण असते.

मक्यांचे विकार, मानदुखी,पाठदुखी इ. वर आर्युवेदिक उपचारात करडईच्या पाकच्या वापरतात.

करडईच्या टरफलापासून सेल्यूलोज इन्शुलेशन प्लॅस्टिक तयार करतात.]
भारतात करडई पीकाखाली ६.१६ लाख हे. क्षेत्र आहे.
करडईच्या लागवडीत महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो. देशाच्या करडई क्षेत्रापैकी राज्यात ७४% क्षेञ व ६९%उत्पादन आहे.
महाराष्ट्रात रब्बी हंगामात देशाच्या ७७% उत्पादन होते
महाराष्ट्रात तेलबियांत भूईमुगानंतर करडईचा क्रमांक लागतो.
हवामान – समशीतोष्ण तसेच उष्ण व कोरडे,

जमिन – रब्बी हंगामात १५ सप्टें. ते १५ ऑक्टो. या काळात ४५x२० सेमी अंतरावर पेरणी करतात. रात हेक्टरी १० ते १२ किले बियाणे लागते.

करडईच्या जाती – एन ६२-८, गिरणा, तारा, भिमा, शारदा, नागपुर – ७, फुले कुसूमा, नारी- ६, नारी एन एच-१, डीएसएच – १२९.
तारा ही जात कमी कालावधीत येत असल्याने उशिरा पेरणीसाठी वापरतात
भिमा ही जात कोरडवाहू क्षेत्रासाठी उत्तम व तारापेक्षा जास्त २५ ते ३० % उत्पादन देते. हे पीक रोग व किडीला बळी पडत नाही.
पाणी – हे अवर्षण प्रवण भागातील प्रमुख तेलबियांचे पीक आहे. बागायती करडईस ३ ते ४ पाण्याच्या पाळ्या देतात.
उत्पादन –बागायती करडईचे हेक्टरी १८ ते २० क्वि.तर कोरडवाहूचे १० ते १२ क्वि. उत्पादन मिळते.

तीळ (Sesamam)

तिळात ४८ ते ५५ % तेल( राज्यसेवा पूर्व परीक्षा २००७) व २५ ते २८ % प्रथिने असतात.
तीळाच्या लागवडीत भारताचा चीन नंतर द्वितीय क्रमांक लागतो.
राज्यात जळगाव जिल्हयात तीळ पिकाखाली सर्वात जास्त क्षेञ आहे.
तीळ पिकाची लागवड खरीप हंगामात करतात. तीळाची पेरणी ४५ x १० सेमी वर करतात .तिळाचे हे. २.५ ते ३ किलो बियाणे लागते. बी बारीक असल्याने शेणखत मिसळून पेरतात.
जाती –N- 8 (चांदा ८), फुले तीळ – १, तापी (JLT-7), टी.सी – २५, गौरी, तिलोत्तमा, (पदमा), पंजाब-१
उत्पादन – हेक्टरी ६ ते ८ क्वि. उत्पादन मिळते.

मोहरी

मोहरी

६) मोहरी

जगात मोहरी उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. जगाच्या ८० % मोहरी उत्पादन भारतात होते.
भारतात राजस्थान हे सर्वाधिक मोहरी उत्पादन करणारे राज्य आहे.२)उत्तरप्रदेश
मोहरीची पेरणी रब्बी हंगामात ४५X१५ सेमी अंतरावर करतात.
जाती – वरूणा, सिता,पुसा बोल्ड, TM -४,२, क्रांती, पुसा जयकिसान, ACN -9 इ.

७)एरंडी

एरंडाचे मुळस्थान भारत असून जागतिक उत्पादनाच्या सर्वाधिक म्हणजे २.७% उत्पादन भारतात होते.
भारतीय एरंडी उत्पादनात गुजरातचा २/३ व आंध्रप्रदेशचा १/६ वाटा आहे.
एरंडी तेलाचा उपयोग विमानात वंगण म्हणून करतात तसेच त्याचा उपयोग

हायड्रोलिक ब्रेक फ्लयुड म्हणून करतात.

तेल काढल्यानंतर पेंडीचा खत म्हणून उपयोग करतात. यात २० ते ४० % नत्र असते.
जाती - TMV – 1, कस्टर – २०, गिरीजा, I – 9 इ.
भारत एरंडीची निर्यात करतो – इंग्लंड, बेल्जीयम, अमेरिका, फ्रान्स इ.

जवस

जवस

८)जवस

हे रब्बी हंगामातील कोरडवाहू पीक आहे. यात ४१ ते ४४ % तेलाचे प्रमाण असते.
जवसाच्या तेलाचा वापर, खाद्यतेल, रंग, साबण व छपाईची शाई तयार करण्यासाठी करतात.
राज्यात बुलढाण्यात जवसाचे सर्वाधिक उत्पादन होते.
जाती – किरण (RLC-6), R – 552, C- 429 इ.

९)कारळा (खुरसणी)

याला रामतीळ, काळे तीळ असे म्हणतात. याचे मुळ स्थान आफ्रिका असून सर्वाधिक उत्पादन भारतात होते. पेरणी रब्बी हंगामात करतात.
जाती – सीता, वरूणा इ. हेक्टरी बियाणे ४ ते ६ किलो लागते.

२००८ मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले कारळा (आय झे जी पी एन २००४- डी आय) ही ४.८५ क्विंटल हेक्टरी उत्पादन देणारी जात प्रसारित केली ही पानावरील ठिपक्या रोगास प्रतिकारक्षम आहे.

संकिर्ण माहिती

दरडोई तेलाचा दररोज ३० ग्रॅम वापर आवश्यक आहे. ही पानावरील ठिपक्या रोगास प्रतिकारक आहे.
तेल व तंतूच्या उत्पादनात अग्रेसर देश – रशिया, कॅनडा, भारत इ.

तेलबियांतील तेलाचे सरासरी प्रमाण
तेल बी तेलाचे प्रमाण तेल बी तेलाचे प्रमाण
तीळ

भूईमुग

सुर्यफुल

सोयाबीन
५२%

४२ ते ४८%

४४%

१८ ते २०%
एरंडी

मोहरी

करडई

खुरासणी
५०%

३० ते ४८ %

३८ ते ४० %

३० ते ५० %

कडधान्ये

कडधान्य उत्पादनात प्रथम क्रमांकावर असणारा देश – भारत
भारतात एकूण अन्नधान्याच्या क्षेत्रापैकी कडधान्याच्या पिकाखालील क्षेञ – १८.७%
दाळवर्गीय पिकांचे सर्वाधिक उत्पादन १) मध्यप्रदेश २) उत्तरप्रदेश ३) राजस्थान
कडधान्याच्या पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र असणारे राज्य म.प्रदेश
कडधान्याच्या दर हेक्टरी व एकूण उत्पादनात अग्रेसर राज्य – उ. प्रदेश
भारताच्या कडधान्य क्षेत्रापैकी १५ % क्षेत्र व १३% उत्पादन महाराष्ट्रात होते.
कडधान्याच्या क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक – चौथा
कडधान्याचे सर्वाधिक क्षेत्र व उत्पादन असणारा विभाग – अमरावती
कडधान्याचे सर्वाधिक क्षेत्र व उत्पादनात असणारा महाराष्ट्रातील जिल्हा – बुलढाणा, यवतमाळ, लातूर , अमरावती
तृणधान्यापेक्षा कडधान्यात प्रथिने अधिक असतात.

कडधान्य प्रथिने (%) अन्नघटक प्रथिने (%)
सोयाबीन

तुरदाळ

मुग

उडीद/कुळीद

मसूर

मटकी

चवळी

हरभरा

वाटाणा

वाल
४३.२०

२१.१०

२४

२४

२५.१०

२३.६०

२४.६०

१९.६०

२२.९०

२३.४०
मांस

अंडी

गहू

ज्वारी

पॉलिश तांदूळ

गाईचे दूध
२४

१४.८०

११.८०

९.७०

६.९०

३.३०

कडधान्ये हे प्रथिनेयुक्त असतात. ही पीके जमिनीस नत्र देतात. त्यामुळे यांना खताची मात्रा देतांना स्फुरद नञाच्या दुप्पट देतात.
कडधान्यास १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम –हायझोबियस चोळल्यास मुळांच्या गाठीवर ते नत्र स्थिर करतात.

१)तुर (Cajanus.cajan)

महाराष्ट्र हे भारतातील तुर पिकविणारे प्रमुख राज्य आहे. राज्याचा देशातील तुरीच्या क्षेत्रात २९% वाटा असून उत्पादनात २६% वाटा आहे. प्रमुख तूर उत्पादक राज्य १) महाराष्ट्र २) उत्तर प्रदेश ३) कर्नाटक
तुरीचे ४०% उत्पादन अमरावती विभागात होते तर ३७% औरंगाबादमध्ये होते.
राज्यातील दाळ वर्गीय पिकांत तुरीचा प्रथम क्रमांक लागतो.
राज्यात तुरीचे सर्वाधिक उत्पादन यवतमाळ जिल्हयात होते.
भारताच्या ३५ लाख हे. क्षेत्रापैकी ११.८१ लाख हे. क्षेत्र महाराष्ट्रात आहे तर २७ लाख टन उत्पादनापैकी ११.०६लाख टन उत्पादन महाराष्ट्रात होते. त्या हेक्टरी उत्पादकता ९३७ केजी आहे.
तुर हे खरीप हंगामातील पीक आहे. याची लागवड ज्वारी, बाजरी व कापुस या पिकांबरोबर आंतरपीक, मिश्रपीक म्हणून करतात.
हवामान – उष्ण व थंड हवामान, हवेत भरपूर बाष्प असावे. पर्जन्य – ७० ते १०० सेमी पर्जन्याच्या भागात हे पीक उत्तम येते.
पेरणी – जुन ते जुलैचा पहिला आठवडा या काळात मध्यम ते भारी जमिनीत बियाण्यास –हायझोबियम जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करून पेरणी करावी. तुरीचे हे. २५ किलो बियाणे लागते.
गरव्या जातींची पेरणी ६०-७५x२५ सेमी अंतरावर करतात. यास तयार होण्यास १५० दिवस लागतात. तर निमगरव्या जातीची पेरणी ४५x२० सेमी अंतरावर करतात. त्यास १३० दिवस लागतात .हळवे वाण ११० दिवसात तयार होते. त्याची पेरीण ४५x१० सेमी अंतरावर करतात.
जाती – BDN – 1 (तांबडा रंग) २(पांढरा रंग)- दोन्ही मर रोगास प्रतिकारक्षम, टी विशाखा- १ (भाभा अणूसंशोधन केंद्राने तयार केली आहे), ICPL-87 (इक्र सॅट (आंध्रप्रदेश) – सर्व दाण्यात लवकर तयार होणारा वाण), TAT-10, BDN

-7, N- 148, बदनापुर-१,२, ए. के.टी -८८११, बी.एस.एम.आर. – ८५३,७३६.

बीडीएन म्हणजे बदनापुर (मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत संशोधन केंद्र)
पंजाबराव कृषी विद्यापीठ तुरीचे पहिले संकरीत वाण प्रसारीत करणार आहे.
मर (विल्ट) रोगावर आळा घालण्यासाठी व वाझंपणा टाळण्यासाठी तुरीची जात – बीडीएन – २
तुरीचे अधिक उत्पन्न देणारी व खरीप व रब्बी हंगामात घेणारी जात – बीएम
उशिरा व रब्बी पेरणीसाठी तुरीची योग्य जात – सी ११.
खते – N:P – २५:५०
रोग – शेंगा पोखरणा-या अळीच्या नियंत्रणासाठी न्युक्लिअर पॉली हैड्रॉसिस (NPV)

विषाणूने ग्रस्त अळ्यांचे द्रावण फवारणे.

कोळी किडीमुळे तुरीवर मोझॅइक रोगाचा प्रसार होतो.
मर या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी बियाण्यास बाविस्टीन पावडर चोळावी.

२)हरभरा (Cisar.aretinum)

मुळस्थान – आशिया
डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनात हरभ-याचा भारतात प्रथम क्रमांक लागतो.
हरभ-याचे सर्वाधिक क्षेत्र – उ. प्रदेश, म. प्रदेह्स व राजस्थान
उत्पादन -१) मध्यप्रदेश २) उत्तरप्रदेश ३) राजस्थान
क्षेत्रापैकी महाराष्ट्रात १३.२५ लाख हे. क्षेत्र तर उत्पादन १२.१४ लाख टन देशाच्या उत्पादनात राज्याचा वाण २१% आहे.
महाराष्ट्रात हरभ-याचे ८०% क्षेत्र प. महाराष्ट्र व मराठवाडयात आहे.
जिल्हयाचा विचार करता हरभ-याचे सर्वाधिक क्षेत्र नाशिक जिल्हयात आहे.
हंगाम – हरभरा हे रब्बी हंगामातील पीक असून ८०% हरभरा जिरायती तर २०% बागायती क्षेत्रात घेतात.
हवामान – हरभ-यास थंड व कोरडे हवामान मानवते फुले येण्याच्या काळात ढगाळ हवामान अनिष्ट ठरते.
जमिन – ७० ते १०० सेमी पाउस पडणा-या प्रदेशातील मध्यम ते भारी जमिन.
पेरणी – जिरायती – सप्टेंबर. ते ऑक्टोबर, बागायती – २० ऑक्टोबर ते नोव्हेंबर
हरभ-याची पेरणी – ३०X२० सेमी अंतराव करतात. हरभ-याचे हेक्टरी २५ कि.ग्रॅ. बियाणे लागते.
हेक्टरी रोपांची संख्या ३३३३३३ ठेवावी.
काबूली व देशी असे हरभ-याचे दोन प्रकार पडतात.
सुधारीत जाती – विकास, फुलेजी १२, विजय, BDN-9-3 , फुले जी – ५ (विश्वास – राष्ट्रीय वाण, खतास प्रतिसाद देणारे), विशाल. श्वेता, ICCV-2,32, भारती, निफाड – ५९, वरंगळ, काबूली हरभयात सुधारीत वाण – विराट (राज्यासेवा पूर्व – २००६)
मर रोगास प्रतिकारक्षम, जीरायत, बागायत व उशीरा पेरणीसाठी योग्य देशी वाण – विजय, विशाअल, दिग्विजय
हरभ-याची सर्वाधिक उत्पादनक्षम, मर रोगास प्रतिकारक्षम असणारी, अवर्षण प्रवण भागात योग्य असणारी व उशिरा पेरणीस योग्य असलेली जात -विजय
हरभरे मोठे असणारी काबुली चण्याची प्रसिध्द जात– श्वेता इतर काबुली जाती – विराट, विहार पी. के. व्ही – २
महाराष्ट्रासाठी विशेष शिफारस केलेला. खतास प्रतिसाद देणारा राष्ट्रीय वाण – विश्वास
बियाण्यावर –हायझोबियम जीवाणूची प्रक्रिया केल्यास उत्पादनात १० ते १५ % वाढ होते.
पीक संरक्षण – घाटेअळीच्या बंदोबस्तासाठी न्यूक्लिअर पॉली हेड्रॉसिस या विषानूचा उपयोग करतात.
खते -N:P- २५:५० प्रमाणात व १२५ केजी डी.ए.पी. हेक्टरी पेरणीचे वेळी पेरवून द्यावे.
हरभ-याच्या कोवळ्या पानात असणारे अऍसिड – मॅलिक ऍसिड
उत्पादन – १०० ते १२५ दिवसात पीक तयार होते. यात जिरायती क्षेञातील चाफावाणाचे हेक्टरी ९ ते १० क्वि उत्पादन मिळ्ते ,तर बागायतात चाफा वाणाचे १२ते १५ क्वि. उत्पादन मिळते.
विश्वास वाणाचे बागायतात हे. २० ते २५ क्वि. उत्पादन मिळते.

मळ्णी करून कडक उन ५-६ दिवस देउन ५% कडूलिंबाचा पाला घालून साठवणूक करावी.

३)मुग

मुगाच्या क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्राचा देशात प्रथम, तर सरासरी उत्पादनात चौथा क्रमांक लागतो.
राज्याच्या कडधात्य उत्पादनात मुगाचा दुसरा क्रमांक लागतो.
मुगाचे उत्पादन प्रामुख्याने मराठयावाडा विभागात होते.
हवामान – उष्ण, २१ ते ३५ अंश सेल्शिअस पर्यत तापमान मानवते. हे पीक कडाक्याच्या थंडीस फारच संवेदनशील आहे.
पेरणी – हे खरीप हंगामातील पीक आहे. पेरणी जुनमध्ये ३०X१५ सेमी, अंतरावर पेरणी करता हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे लागते.
जाती – कोपरगाव – दाणा हिरवा, चमकदार व टपारो असतो. गुण वाणा , भुरोलाब्ठने पडवारा
TARM 18 – विदर्भासाठी प्रसारीत, भूरी रोगास प्रतिकाराक्षम जात.
जळगाव – ७८१, टीएपी – ७, (पंजाबराव कृषी विद्यापीठ व BARC), एस – ८.
बीएनटी ४ – पुसा, वैशाखी, फुले मुग – २, जे ७८१, वैभव BPMR – 145
पीआयएस – १,२,३,४ – करपा रोगास प्रतिकारक्षम.
एच – ८ – करपा, पिवळा मोझॅइक रोगास प्रतिकारक्षम.
वैभव – खरीप व उन्हाळे हंगामाप्रति उपयुक्त, रोगप्रतिकारक व आर्थिक उत्पादन देणारे वाण.
खते – N:P – २५:५०

४)उडीद

उडीदाचे देशातील सर्वाधिक १७ % क्षेत्र व १५ % उत्पादन महाराष्ट्रात होते.
उडीदामध्ये फॉस्फोरिक आम्ल असते. उडीदापासून दाळ व पापड तरार करतात.
हे कोरडवाहू भागातील खरीप हंगामात घेतले जाणारे पीक असून यास उष्ण व कोरडे हवामान मानवते.
उडीदाची पेरणी ३० X१० सेमी अंतरावर करतात. यास हेक्टरी १५X२० किलो बियाणे लागते.
जाती -TAU-1 (विदर्भासाठी), उडीद नं५५, T PU -4, D, 6-7, BDU-I
TAU – 2, हवामानातील फेरबदलात टिकाव धरते. ही बुटकी जात असून भारी जमिनीस योग्य आहे. या जातीची विदर्भासाठी शिफारस केली जाते.
इतर – सिंदखेडा -१-१, मेळघाट. टी -९ – लवकर येते, जास्त लागवड व जास्त उत्पादन होते.
६५ ते ७० दिवसात पीक तयार होउन हे. १२ ते १५ क्विं. उत्पादन मिळते.

५)हुलता / कुळीथ / कुलथी

दुष्काळ ग्रस्त भागात डोंगर उतार, माळराण, उथळ व भरड जमिनीत हे पीक घेतात.
या भागातील मानव व जनावरांच्या आहारातील कुलथी हे प्रमुख कडधान्य पीक
या पीकाची पेरणी खरीप हंगामात करतात. ३० सेमी अंतरावर पेरणी केल्यास हे. १५ ते २० किलो बियाणे लागते.
जाती – प. महाराष्ट्रासाठी – सिता, मान, कुळीथ – १, नं ५५, टीएयु – १ इ.
मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारीत केलेली जात , पानावरील ठिपक्याच्या रोगास व पिवळ्या मोझॅइक रोगास प्रतिकारक्षम जात – एचपीके – ६ (दिपाली)

इतर कडधान्ये

चवळी - C- 112, V-16, RC-19 इ.
मटकी – नं – ८८ MBS – 27, सोनपुर नं – १, लातूर – १ इ.
मसूर – पुसा -१-१, पुसा – १-५, टी ३६ इ.
वाटाणा – बोनव्हिला, खापरखेडा, KPMR – 10 (रचना) इ. उत्पादन – १) उ. प्रदेश २) मध्यप्रदेश ३) बिहार
घेवडा (राजमा) – HUR – 15, 87, 137,POR – 14 इ.

व्यापारे पीके

१)उस(Saccharum.officinarum)

मुळ्स्थान – न्यूगिनी व भारत
जागतिक उसाच्या लागवडीपैकी भारतात ३७% क्षेत्र असून भारत जगात आघाडीवर आहे.
जगाचे साखरेचे कोठार म्हणून ओळखला जाणारा देश – क्यूबा
जागतिक साखर उत्पादनात अग्रेसर देश – भारत
साखर ज्त्पादनात अग्रेसर असणारे राज्य – महाराष्ट्र
उस लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र व उत्पादन असणारे राज्य – उ.प्रदेश, उत्पादन – ४४.६२% २) महाराष्ट्र ३)कर्नाटक ४)तामिळनाडू – १०.३९%
महाराष्ट्रात उसाखाली असणारे क्षेत्र ६.६० लक्ष हे. आहे.
भारताचे दरहेक्टरी उस उत्पादन – ६९ टन
उसाचे प्रतिहेक्टरी सर्वाधिक उत्पादन असणारे राज्य – तामिळनाडू (७४.९ टन)
भारतातील उस पीकाच्या ५% एस आय ला हे क्षेत्रापैकी २०.३६% क्षेत्र (१०.४९ ला हे.) महाराष्ट्र राज्यात आहे.
देशाच्या ३५५५.२ लाख टन उत्पादना पैकी २२.१% उस उत्पादन (७८५.६८ ला टन) महाराष्ट्रात होते.
राज्यचे दर हेक्टरी उत्पादन हे ७४.९ टन असून ते देशाच्या ६९ टन उत्पादन सरासरी पेक्षा जास्त आहे.
दर हेक्टरी उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक – चौथा (९० टन)
सरासरी उस उत्पदनात प्रथम क्रमांक – तामिळनाडू
भारतात साखरेचा उतारा-९-९%
भारताचा साखरेचा सर्वाधिक उतारा असणारे राज्य – महाराष्ट्र (११.७%) (राज्यसेवा पूर्व परीक्षा २००७)
महाराष्ट्रात उसाखलील सर्वाधिक क्षेत्र असणारा जिल्हा – कोल्हापुर (१७.७%)
महाराष्ट्रात उसाचे सर्वाधिक उत्पादन असणारा जिल्हा – कोल्हापुर (१६.६%)
महाराष्ट्रात उसाचे दर हेक्टरी सर्वाधिक उत्पादन असणारा जिल्हा – सांगली (९७ टॅन)
१९१२ मध्ये उस पैदास केंद्राची (शुगरकेन ब्रिडींग इन्स्टिटयूट) स्थापन कोईमतुर येथे कण्यात आली .(१९५९ पासून ICAR च्या अधिपत्याखाली)
अखिल भारतीय उस संशोधन केंद्र लखनौ येथे १९५२ मध्ये स्थापन झाले .(१९५९ पासून ICAR च्या अधिपत्याखाली)

महाराष्ट्रः-

राज्याच्या सिंचन क्षमतेपैकी उसासाठी वापर केला जातो – ७० %
राज्यात उसाखाली सर्वाधिक क्षेत्र असणारे जिल्हे – कोल्हापूर , अहमदनगर, पुणे, सातारा, नाशिक इ.
हवमान – उष्ण २२ ते ३० अंश सेल्शिअस तापमान, स्वच्छ सुर्यप्रकाश व कडक उन असल्यास साखरेचा उतरा जास्त येतो. धुके उसास हानीकारक ठरते.
पर्जन्य – १३५ ते १५० सेमी.
जमिन – मध्यम मगदुराची व चांगल्या निच-याची उत्तम ठरते. तसेच गाळाची व रेगूर मृदाही योग्य आहे.

महाराष्ट्रातील लागणीचे हंगाम

(संदर्भ म. फुले कृषी विद्यापीठाची कृषी दैनंदिनी)
हंगाम लागवडीचा महिना पीक तयार होण्याचा काळ हे. उत्पादन खताची माञा (NPK)
आडसाली

पुर्व हंगामी

एकसाली/

सुरू/हंगामी

खोडवा
१५ जुलै ते १५ ऑगस्ट

१५ ऑक्टो ते १५ नोव्हें

जानेवारी

१५ जाने. ते १५ फेब्र
१६ ते १८ महिने

१५ महिने

१२ ते १३ महिने

१२ ते १३ महिने
१५० टन

१२० टन

१०० टन

१०० टन
४००:१७०:१७०

३४०:१७०:१७०

२५०:११५:११५

२५०:११५:११५

बेणे – बेण्याचे क्षेत्र लागवडीच्या क्षेत्राच्या १:१० प्रमाणात असावे. १० ते ११ महिन्याचे जाड, कांडे, रसरसीत व मोठे डोळे असणारे असावे.
बेणे प्रक्रिया – उसाची टिपरी १०० पीपीएन मिरॅक्यूलान संजिवकात बुडवावी यामुळे फुटवा चांगला होतो.
लागवड – सरी व वरंबा पध्दतीने करतात. १) ओली व २) कोरडी या दोन पध्दती वापरतात.
उसाची तीन डोळ्याच्या हे. २५००० टिपरी वापरून टोकास टोक या पध्दतीने लागवड करतात. एक डोळा पध्दतीत दोन टिप-यामधील अंतर ३० सेमी ठेवावे. बेणे हेक्टरी ३३५०० डोळे वापरावे.
जाती – १) आडसाली – Co-470, Co-M-7125 (संपदा), को – ७४०, कोएम – ८८१२१, को – ८६०३२ इ.

२) पुर्व हंगामी – Co-419, Co 470, Co 740], Co 7219,62,175 इ.

३) सुरू – को – ४१९, को ७४० व संपदा – ही उत्तम जात आहे.

४) खोडवा Co – 470,Co 7219 (संजिवनी) Co 7527, Co-M-7125 इ.

५) दर हेक्टरी जास्त उस व साखर उत्पादन देणारी जात

१) को. ९४०१२ (फुले सावित्री)

२) को.एम. ०२६५८ (फुले २६५)

गुळासाठी उत्तम जात – संपदा, कृष्णा, निरा (८६०३२), को- ८०१४ (महालक्ष्मी) कोसी – ६-७१, को- ७२१९
विदर्भ व मराठवाड्याची सरस जात – को -४७०४
जास्त उस व साखर उत्पादक जात – को – एम – ८८१२१ (कृष्णा)
साखरेचे सर्वाधिक २०.४७% प्रमाण असणारी जात – को – ८०१४ (महालक्ष्मी)
सर्व हंगामासाठी योग्य जात – को – ७४०
कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली सुरू उसाची जात – को -४१९
रसवंतीसाठी उसाची लोकप्रिय जात – को ४१९
पाणीपुरवठा – महाराष्ट्राचे १०० % उस क्षेत्र जलसिंचनाखाली आहे. यापैकी ८० % क्षेत्रास विहीर व उपसा सिंचनाद्वारे २० % क्षेत्रास कालव्याने पाणी देतात.
उसास एकूण सरासरी २९० हे. सेमी पाणी लागते . ७० ते ८० सेमी पावसापासून मिळते . उरलेले १०ते१२ दिवसाच्या अंतराने ३६ ते ३८ पाळ्यांमध्ये देतात.
पाटाने पाणी दिल्यास आडसाली उसास ३४० हे.सेमी ,पुर्व हंगामी उसास ३२५ हे.सेमी व खोडवा उसास २७५ हे सेमी पाणी लागते . पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यासाठी ६% केओलिन फवारावे.
उसास पाण्याची कमतरता पडल्यास पोटॅशची मात्रा द्यावी .
उसासाठी तणनाशक –ऍट्रझिन व ऍट्रॉटॉप
मशागत – पीक ३ ते ३.५ महिन्याचे झाल्यावर नांगराच्या सहाय्याने बाळबांधणी करतात .पीक ४.५ ते ५ महिन्याचे झाल्यावर रेजरने उसास सरी पाडतात .त्यास मोठी बांधणी /खांदणी(पक्की बाधणी) म्हणतात.

यावेळी निंबोळी पेंड व नत्र १:६ प्रमाणात मिश्रण करुन रासायनिक खताचा शेवटचा हप्ता देतात

रोग व किड – खोडकिडा ,हुमणी (वाळणी),काणी पायरीला इ.
उसाचा गवत्या हा रोग विषाणूमुळे होतो.
उस व भातावरील खोडकिडा नियंत्रणासाठी वापरतात –ट्रायकोग्रामा
केवडा रोग नियंत्रणासाठी हिराकस फवारावे.
जुलै २००२ मध्ये आलेली नवीन कीड- लोकरी मावा (सेरॅटो व्हायकुला लॅनिमेअरा)
तोडणी – उसावर ग्लायफोसाइनची फवारणी केल्यास उस दर हे.उत्पादन ५.६५ % व साखरेचे प्रमान १३.५४% नी वाढते.उसाचा रस तपासण्यासाठी ब्रिक्स सॅक्रोमीटर किंवा हॅडरिफ्रॅ क्टोमीटर वापरुन त्यात विरघळलेले घन पदार्थाचे प्रमान १९ पेक्षा जास्त असल्यास उस तोडवा.
पक्व उसाचा ब्रिक्स निर्देशांक २१ ते २४ अंश असतो.
उसावर ५०० पीपीएम इथिलंची फवारणी केल्यास जास्त उत्पादन मिळते.
खोडवा - उस तोडल्यावर पुन्हा तोच उस वाढविणे म्हणजे खोडवा उस होय.

महाराष्ट्रात ३५ ते ४०% क्षेत्र खोडवा उसाखाली आहे.

१५ फेब्रुवारीच्या आत तोडणी झालेल्या व शक्यतो पुर्व हंगामी उसाचाच खोडवा घेतात.

उस पिकविणारे प्रदेश :-

१) उत्तर – पूर्व महाराष्ट्र –खानदेश,मराठवाडा व विदर्भ या विभागात साखर उतारा

१०.१०% तर उत्पादन हे ६० ते ६५ टन आहे.

२) मध्य महाराष्ट्र – नाशिक, अहमदनगर ,पुणे,सोलापुर,उत्तर सातारा हा दख्खन कालवा विभाग -१०.७३% उतारा व सरासरी उत्पादन १२० मे टन आहे.

३) दक्षिण महाराष्ट्र – द.सातारा ,कोल्हापुर व सांगलीचा समावेश होतो.येथील उतारा सर्वाधिक ११.७५% असून सरासरी उत्पादन १२० मे टन आहे.

उस वापर- राज्यातील ४५% उस साखरेसाठी ४५% गुळासाठी व १०% इतर कारणांसाठी वापरता.
गुळ – उसाची पक्वता चाचणी हॅड रीफ्रॅ क्टोमिटरने करुन निर्देशांक १९-२०पेक्षा जास्त असणारा उस गुळासाठी वापरतात .
गुळाचा सरासरी उतारा ११ ते १२ % असतो.
उसापासून गुळ तयार करतांना काकवी तयार करण्यासाठी तापमान ठेवतात – १०५अंशC ते १०६अंशC
गुळ तयार करण्याच्या प्रक्रियेत ढोरमळीव सोनमळी काढण्यासाठी वापर करतात

- भेंडीचा रस व सुपर फॉस्फेटचा

गुळाला तात्पुरता आकर्षक रंग आणण्यासाठी वापर करतात – हैड्रॉस,वाफा पावडर ,भेंडी पावडर
घसा खवखवतो, गुळ चवीस खारट लागतो – वाफा पावडर मुळे
खास गुळातील रासायनिक घटक – सुक्रोज – ८०%,ग्लुकोज – १० % पेक्षा कमी ,ओलावा – ६%
चुन्याची निवळी घातल्याने रसातील नत्रयुक्त टाकाउ पदार्थ अविद्राव्य होउन आड काळ्या मळीच्या (ढारमंळी)रुपाने रसावर तरंगू लागतात
काकवी टिकवितांना तिच्यात खडे होउ नये म्हणून सायट्रीक ऍसिडचा वापर करतात .काकवी कावीळ रोगावर उपयुक्त आहे.
गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिध्द ठिकाण – कोल्हापुर
चुन्याची निवळीचा गुळाच्या रंगावर विपरीत परीणाम टाळण्यासाठी व गुळ झड.

चिक्की सारखा बनविण्यासाठी वापरतात.

साखर उद्योग

साखर उद्योगात भाडवल – राज्यशासन – २५% वित्त संस्था -६५%,

शेतकरी – १०%,

महाजन समितीने कारखाना स्थापनेसाठी दोन कारखान्यातील अंतर १५ कि.मी.

वरून २५ कि. मी. केले. नव्या कारखान्यांना ८ वर्ष पुर्ण साखर विक्रीची मुभा मिळाली. सध्या नियंत्रित व खुल्या साखरेचे प्रमाण १:९ असे आहे.

जागतिक साखर उत्पादनात ८६ % साखर उसापासून तर १४ % साखर शुगरबीट पासून मिळ्ते.
भारतात सर्वाधिक सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रात असून देशाच्या साखर उत्पादनात राज्याचा ४० % वाटा आहे.
सध्या राज्यात २०१ साखर कार्खाने नोंदणीकृत आहे असून त्यापैकी १७३ व पैकी १०३ तोटयत आहेत त्यात १६५ सहकारी कारखाने चालू आहेत.
सर्वात जास्त (१९) साखर कारखाने असणारा जिल्हा – अहमदनगर
सर्वाधिक साखर कारखाने असणारा विभाग – प. महाराष्ट्र
साखर कारखाना विरहित जिल्हा – गडचिरोली
महाराष्ट्राचा साखरेचा दरडोई वापर – १३ किलो.
साखरेबरोबर मिळणारे उपउत्पादन – मळी
महाराष्ट्रातील फक्त महिलांचा सहकारी साखर कारखाना – जिजामाता सहकारी साखर कारखाना, तांबोळी, ता. भूदरगड, जि. कोल्हापुर.
साखर कारखान्यावर आधारीत इथिनॉल प्रकल्प – मीरज (सांगली), पानेवाडी (मनमाड – नाशिक)
उसाच्या रसापासून इथिनॉल निर्मितीचा आशिया खंडातील सर्वात मोठा कारखाना निर्माण होत आहे – कृष्ण क्रांती – इथेनॉल निर्मीती – परळी वैजनाथ
उस जोपासण्याच्या नव्या पध्दतींचा विकास करण्यासाठी १८९२ मध्ये पुण्याजवळ मांजरी येथे भारतातील पहिली प्रायोगिक संशोधन संस्था उघडण्यात आली. तिचे नामांकरण आता वसंदादा शुगर इन्स्टिटयूट असे झाले आहे.
सातारा जिल्ह्यात निरे जवळ पाडेगाव येथे १९३२ मध्ये मध्यवर्ती उस संशोधन केंद्र स्थापन झाले.
प्रादेशिक उस व गुळ संशोधन केंद्र – कोल्हापुर
प्रादेशिक उस संशोधन केंद्र – वसमतनगर (परभणी)

कापूस

कापूस

२)कापूस (Gossypium.hirsalum/arborium)

कापसाला पांढरे सोने, पांढरी लोकर म्हणून संबोधतात.
जगात सर्वाधिक कापूस उत्पादन करणारा देश – चीन
कापुस पीकविणा-या देशातील कापसाखालील ३३० लाख हे. क्षेत्रापैकी एकटया भारतात ९१ लाख हे. क्षेत्र असून ते जगाच्या २८% पेक्षा जास्त आहे. अशा प्रकारे जागतिक कापूस क्षेत्रात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. मात्र उत्पादन जागतिक उत्पादनाच्या ८% असून उत्पादनात भारताचा चौथा क्रमांक लागतो.
कापसाच्या संकरीत जातीचे उत्पादन करणारा एक मेव देश – भारत
संकटीत कापसाचे जनक – सी. टी. पटेल
भारतात कापसाचे सर्वाधिक क्षेत्र – ३१ लाख हे. एकट्या महाराष्ट्रात आहे. ते देशाच्या ३३.८% आहे . अशा प्रकारे महाराष्ट्र क्षेत्रात प्रथम आहे. उत्पादनातही सध्या महाराष्ट्र प्रथम क्रमांक लागतो. २) आंध्रप्रदेश ३) हरीयाना
देशाच्या कापुस उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा – २७.१३%
देशाची हेक्टरी उत्पादकता २६५ किलो रूई आहे. तर महाराष्ट्राची दर हेक्टरी उत्पादकता फक्त १६३ किले रूई आहे. मिझोरामची दर हेक्ट्री उत्पादकता सर्वाधिक ४४८ किलो रूई व पंजाबची ३६९ कि लो रूई उत्पादन आहे तर सर्वात कमी आसाम ७९ किलो रूई आहे.
जगात कापसाचे सर्वाधिक दर हेक्टरी उत्पादन करणारा देश – इस्त्रायल (१९०० किलो रूई)
कापसाचे सर्वाधिक क्षेत्र असणारा राज्यातील विभाग – विदर्भ (६२%)
महाराष्ट्राचे कापसाचे सर्वाधिक क्षेत्र यवतमाळमध्ये असून त्यानंतर अमरावती व जळगाव जिल्ह्याचा क्रमांक लागतो.
महाराष्ट्राचे कापसाचे सर्वाधिक उत्पादन .– १) जळगाव २) यवतमाळ ३) अमरावती
उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख कापुस पिकविणारा जिल्हा – जळगाव
सर्वाधिक दर हेक्टरी उत्पादन असणारे जिल्हे – १) पुणे (४८३ किलो) २) अहमदनगर
संकरीत जातीच्या कापसाखालील क्षेञात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो.

राज्यातील ४५ % क्षेत्र संकरीत कापसाखाली आहे.

महाराष्ट्रातील कापसाच्या बाजारपेठा – खामगाव, बाळपूर, पातूर व आकोट इ.
राज्यातील जिरायती कापसाखाली असणारे क्षेत्र – ९६%
कापसाच्या नवीन जातींचे प्रयोग शाळेत परिक्षण करून त्याच्या प्रति निश्चित करण्यासाठी १९२४ मध्ये मुंबई येथे कॉटन टेक्नॉलॉजि लॅबोरेटरीची स्थापना झाली. या संस्थेच्या देशात ११ प्रयोग शाळा असून एक महाराष्ट्रात नांदेड येथे आहे.
कोईमतुर येथे १९६७ मध्ये प्रोजेक्टफॉर इंटेन्सिफिकेशन ऑफ रिजनल रिसर्च ऑन कॉटन, ऑईल अँड मिल ही संस्था स्थापन झाली.
भारतातील विविध कापसाच्या जातीच्या संकलनासाठी १९७६ मध्ये नागपुर येथे सेंट्रल इन्स्टिटयूट ऑफ रिसर्चची स्थापना झाली.
कापसाच्या सरकीपासून उत्तम खाद्यतेल मिळते. याचा उपयोग खारा (फरसाण) तयार करण्यासाठी करतात. या तेलात गॉसीपॉल नावाचा घटक असतो.

आवश्यक भौगोलिक परिस्थिती –

तापमान – २५ ते ३५ अंश सेंटिग्रेड पर्यत तापमान, पिकास दिर्घकाळ उन्हाळा व धुके विरहित हवा आवश्यक असते.
जमिन – महाराष्ट्रातील लाव्हा रसापासून बनलेली काळी कसदार रेगूर जमिन योग्य आहे.
पेरणी – खरीप १) धुळ पेरणी – जिरायतीसाठी जुनचा पहिला आठवड्यात ७ ते ११ जुन पर्यत पेरणी केल्यास उत्पादन १५ ते ३५ % वाढते.

२)मान्सून पेरणी – जुन अखेर करतात. या हंगामाची वेचणी जाने – फेब्रुवारीमध्ये करतात.

उन्हाळी, बागायत कापुस – याची लागण प. महाराष्ट्रात मार्च-एप्रिलमध्ये करतात, व वेचणी ऑगस्ट- सप्टेंमध्ये करतात.
बियाणे – १) जिरायतीसाठी सुधारित बियाणे – १५ ते २० किलो, संकरीत बियाणे ३ ते ४ किलो. व अमेरिकन बियाणे १० ते १२ किलो लागते.
बागायतीसाठी सुधारित बियाणे – ५ ते ८ किलो व संकरीत ३ किलो लागते.
बिजक्रिया – बियाणे सिक्सीलीक आम्लात ६ तास बुडविणे.
जाती – १) देशी – अर्बैरियम, हर्बेरियम, एकेएच – ४,५ के ए ८४०१ इ.

२)अमेरिकन – बागायती – हिरसुरम, इजिप्शियन, बार्बोडेन्स इ.

अ) अमेरिकन – लक्ष्मी, एलआरए -५-१३६, कोपरगाव -४९३, नागनाथ, रेणूका

संकरीत – संकर – ४, एनएचएच-४४, एकेएच -४६८, वरलक्ष्मी, सावित्री, संकर ६,८,१०, फुले-४९२, डी सी एच-३२ फुले ३८८, एच-१०, एनएचएच-४४,

जिरायत – ज्योती, वाय-१, एकनाथ, रोहिणी, नामदेव, पुर्णिमा, सावता, पीकेव्ही – ८१, रेणूका, पीकेव्ही- हायब्रीड- २, जेएलएच -१६८ एलआरए – ५१६६ इ.

जिरायत वाणांच्या रोपांची हेक्टरी संख्या १८८१५ असावी.
विदर्भातील परंपरागत जाती – उमरान, विरनार, बुरी इ.
पंजाबराव कृषी विद्यापीठाने नुकतीच प्रसारीत केलेली कापसाची जात – CAHH-468
बोंड अळीस प्रतिबंधक नविन संशोधन केलेली जात – बी. टी. कॉटन (बॅसिलस थुलेंजेरिस)
देशी कापसातील सर्वात लांब धागा असणारी जात – नामदेव (पीए १४१)

देशातील प्रसिध्द लांब धाग्याच्या जाती – एफ -४, वरल्क्ष्मी, डीसीएच -३२ इ.

आंतरपीके – कापसात २:१ या प्रमाणात उडीद, सोयाबीन व मुग ही पीके घेतात. परंतु भाजीपाला घेतल्यास पांढरीमाशी व बोंड अळीचा प्रादुर्भाव होतो.
किड व रोग – १) बोंड अळी – बोंड अळी ही कापसावर पडणारी सर्वात महत्वाची कीड आहे. ट्रायकोग्रामा ही किड बोंड अळीचा शत्रु आहे.

२)पाने लाल होणे (लाल्या) – हा रोग नत्राच्या कमतरतेमुळे व ढगाळ वातावरणामुळे होतो.

३)दहया – हा बुरशीजन्य रोग असून पीकाचे मोठया प्रमाणावर नुकसान करतो.

वेचणी – सकाळी हवेत ओलावा असल्यामुळे कापसास काडीकचरा चिटकत नाही. त्यामुळे कापसाची वेचणी सकाळीच करतात.
उत्पादन – कुधारीत वाणाचे हे २० ते २५ क्वि., संकरीत वाणाचे २५ ते ३० क्वि. व कोरडवाहू क्षेत्रात ८ ते १० क्वि. उत्पादन मिळते.
कापसाची एक गाठ -१७० किलो.
कापुस एकाधिकार योजना – ही योजना १९७१ मध्ये सुरू झाली.यासाठी कापुस खरेदी कापुस मार्केटिंग फेडरेशन करीत असे. १९८४ पासून कापुस खरेदी करण्याचे कार्य कापुस उत्पादल पनन महासंघाकडे आहे. अशी योजना राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. वसंतराव नाईक हे या योजनेचे प्रवर्तक आहे.
उददेश – शेतक-यांना किफायतशीर भाव मिळवून देउन मक्तेदारी नाहीशी करणे, मध्यस्थांचे उच्चाटन करणे.

तंबाखू

तंबाखू

३) तंबाखू (Nicotina.tobacum./rustica)

तंबाखू हे शेतक-यास एकरी सर्वाधिक मोबदला मिळवून देणारे रोखीचे पीक आहे.
तंबाखूचे मुळस्थान अमेरिका होय. भारताचा तंबाखू उत्पादनात तीसरा क्रमांक लागतो, निर्यातीत सहावा. जागतिक तंबाखू उत्पादनात भारताचा ८ % वाटा आहे. जगात तंबाखूच सर्वाधिक उत्पादन व उपभोग चिन.
भारतात तंबाखू उत्पादनात उत्तरप्रदेश प्रथम क्रमंक लागतो. देशातील ५० % क्षेत्र आंध्रप्रदेशमध्ये आहे. तर दुसरा क्रमांक गुजरातचा लागतो. सध्या १) उत्तर प्रदेश २) गुजरात ३) आंध्रप्रदेश ४) कर्नाटक
तंबाखूचे प्रमुख संशोधन केंद्र – राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)
तंबाखूचे दर हेक्टरी उत्पादन ७९५ किलो असून महाराष्ट्रात १०६५ किलो दर हेक्टरी उत्पादन आहे.
सिगारेटच्या तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन – आंध्रप्रदेश.
महाराष्ट्रातील ८० % तंबाखू उत्पादन कोल्हापुर व सांगली जिल्हयात होते.
महाराष्ट्र तंबाखू उत्पादनात अग्रेसर असणारे जिल्हा – कोल्हापुर.
महाराष्ट्र तंबाखू उत्पादनात अग्रेसर असणारे इतर भाग – निपाणी, सातारा इ.
हवामान – १०० सेमी पर्यत पर्जन्य व तापमान २१ ते ३१ अंश सेल्शिअस पर्यत
जमिन – तंबाखूच्या वाढीसाठी जमिन पालाशने समृध्द असावी. यास हलकी व काळी जमिन मानवते.
लावणी – हे २०० ग्रॅम बियाणे घेउन रोप तयार करतात. सप्टें. दुसरा आठवडा ते ऑक्टो दुसरा आठवडा या कळात ९० x ९० सेमी अंतरावर तंबाखूची लागवड करतात.
जाती – सिगारेटसाठी – एचएस-९ (आंध्रप्रदेश व कर्नाटक), बीडीसाठी – के – १९,२०,४९ चिरूटसाठी – एस – २७ चघळ्ण्यासाठी – एमपी- २८, एच – १४२ इतर जाती – व्हर्जिनिया, स्थानिक, एस- २० इ.
तंबाशूत असणा-या निकोटीनचे प्रमाण – ३.५ ते ८ %
सर्वात मोठा उत्पादक व उपभोगक्ता – चीन

रबर

रबर

४)रबर

रबराचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश – थायलंड
भारताचे रबराचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य – केरळ (९०%)
महाराष्ट्रात रबर लागवड प्रकल्प – कोकण विकास महामंडळ, कळंबिस्त (सिंधुदुर्ग)
जाती – आबोर, बोजोंग, तिरांदजी, पारंग, वेसर, वसरंग, रूबान इ.
रबराच्या झाडापासून चिक काढण्यास संज्ञा – टॅपींग दर हेक्टरी सर्वाधिक (२००३) – भारत
२००४ -०५ भारतातील प्रती हेक्टर उत्पादन १७२७ कि. ग्रॅ. – जगात सर्वाधिक

कॉफी

कॉफी

५)कॉफी

उष्णकटिबंधीय क्षेञात ९०० ते १८०० मी. उंचीवर घेतात.
जगात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन करणारा देश – ब्राझिल
कॉफीचे क्षेत्र व उत्पादनात भारताचा क्रमांक – सहावा (जगाच्या ३.२%)
भारतात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन करणारे राज्य – कर्नाटक – ५६.५%
महाराष्ट्रात कॉफी लगवडीचे प्रयोग – चिखलदरा
कॉफीच्या पिकाला सुर्यप्रकाशापासून संरक्षण देण्यासाठी सिल्व्हर ओक वृक्षाची लागवड करतात.
प्रकार – अरेबिका, रोबेस्टा इ.
जाती – चिकटा ही अरेबिका प्रकारची जात असून हिची सर्वाधिक लागवड होते व सर्वाधिक भाव मिळतो.
कॉफी फळातील बियांपासून तयार करतात.
कॉफीच्या उत्पादनापैकी ८० % भाग निर्यातीसाठी वापरला जातो.

चहा

चहा

६)चहा

चहाला चांगला निचरा होणारी जमिन, २०० सेमी पर्यत पर्जन्य उष्ण व दमट हवामान मानवते.
भारतात चहाची व्यापारी तत्वावर लागवड सुरू – १९३४ पासून, उत्पादनाच्या २५ ५ निर्यात
चहाचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश – १) भारत (३०%) २) चीन ३) श्रीलंका
चहाची सर्वाधिक निर्यात करणारा देश – २००३ – १) श्रीलंका २) केनिया ३) चीन ४) भारत
भारतात चहाचे सर्वाधिक (५७%) उत्पादन करणारे राज्य – आसाम
जगात चहाचे उत्पादन व उपभोग – भारताचे स्थान प्रथम

७)पानवेल

भारतात पानवेलीची लागवड – ओरीसा, प.बंगाल
महाराष्ट्रातील पानवेलीच्या (विड्याचे पान) जाती – कुपरी – राज्यातील ७०% क्षेत्रावर लागवड करतात.
इतर जाती – रामटेक बंगला, कालीपत्ती, मधई, बनारसी मिठा, संचा इ.

मसाल्याचे पदार्थ

मसाल्याचे पदार्थ

मसाल्याचे पदार्थ

जागतिक मसाल्याच्या उत्पादनात अग्रेसर देश – मलेशिया
मसाल्याच्या जागतिक वापरात भारताचा वाटा – १८%
भारतात सर्वाधिक मसाले पीके – मलबार किनारा ( केरळ )
महाराष्ट्रात मसाला उत्पादनात अग्रेसर जिल्हा – रत्नागिरी

हळद

हे उष्णकटिबंधीय हवामानातील पीक आहे.
भारताच्या निर्यातीत हळदीचा १०% वाटा असून आंध्रप्रदेश व ओरीसा उत्पादनात अग्रेसर आहे.
जागतिक हळद उत्पादनापैकी भारतात ८०% उत्पादन होते.
महाराष्ट्रातील हळद उत्पादन ठिकाणे – सांगली, कोल्हापुर, ठाणे, खानदेश, सोलापुर इ.
राज्यातील हळद संशोधन केंद्र – डिग्रज (सांगली)
लागवड – मे महिन्याच्या दुस-या पंधरवड्यात करतात. लागवड ३० x ३० सेमी अंतरावर गादी वाफ्यावर करतात. लागवडीसाठी हळदीचे हेक्टरी २००० ते २५०० जेठे गड्डे लागतात.
जाती – राजापुरी, कराडी, टेकूर पेटा, कृष्णा, कडप्पा, सेलम, वायगाव, औषधी हळद – आंबे हळद इ.
केरळ कृषी विद्यापीठाने शोधलेल्या जाती – वर्णा व सोना – या जाती २४० ते २७० दिवसात तयार होतात.
हळदीमध्ये मुळा हे अंतरपीक घेतात. टॅफ्रिना रोगाला बळी पडत नाही.

काळी मिरी

भारताचा जागतिक निर्यातीत ९०% वाटा आहे. भारतास मसाल्याच्या पिकापासून मिळणा-या एकूण परीकय चलनात ७० % वाटा काळया मिरीचा आहे.
भारताच्या मिरीच्या उत्पादनापैकी ९८ % उत्पादन केरळमध्ये होते. त्यापैकी ४०% निर्यात करतात.
काळी मिरीला मसाल्याचा राजा, काळे सोने म्हणतात.

दालचिनी

दालचिनी सर्वाधिक उत्पादन करणारा देश – श्रीलंका
दालचिनी म्हणजे सिनॅमन झाडाची साल होय. याच्या पानांचा उपयोग तमालपत्रे म्हणून मसाल्यात करतात.

अद्रक (आले)

आल्याचे उत्पादन जास्त पावसाच्या प्रदेशात होते.
आल्याचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य – केरळ
आले हे भूमिगत खोड असून त्यापासून २०% सुंठ मिळते.
महाराष्ट्रातील आल्याची स्थानिक जात – महिम
इतर जाती – रिओ-डी-जानिरो, जमैका, जपानी, कोचीन इ.

जायफळ (बी), जायपत्री (साल)

हीचे मुळस्थान मलाक्का हे असून भारतात सर्वाधिक उत्पादन केरळ व तामिळनाडूमध्ये होते.

लवंग

लवंग ही झाडाची काळी असते.
लवंगाचे उत्पादन भारतात निलगिरीतील तनकशी भागात होते.
लवंगापासून १५ ते १७% तेल मिळते.]

वेलदोडा

वेलदोडयाचे ९०% उत्पादन भारतात होते.
भारतात सर्वाधिक उत्पादन केरळ राज्यात होते.
वेलदोडा पीकास मसाला पीकाची राणी म्हणतात.
जाती – म्हैसूर, मलबार, बझुक्का इ.

मिरची

मुळस्थान – ब्राझिल
भारताच्या मसाल्याच्या पीक उत्पादनात सुकी मिरचीचा प्रथम क्रमांक लागतो.
काळी मिरचीचे सर्वाधिक उत्पादन करणारे देश – केरळ
एकूण मिरचीचे व लाल मिरचीचे सर्वाधिक उत्पादन - आंधप्रदेश
महाराष्ट्रात सर्वाधिक मिरचीचे उत्पादन घेणारे जिल्हे – अमरावती, नागपुर
मिरचीची सर्वाधिक उत्पन्न देणारी जात – एनपी – ४६ए
उलटे फळे येणारी मिरचीची जात – पंत-सी-१, सुर्यमुखी इ.
हिरव्या मिरचीसाठी प्रसिध्द जात – अग्नीरेखा (दोंडाईचा + ज्वाला)
जीववसत्व भरपुर असणारी गोड मिरची – पापारिका
कोकण कृषी विद्यापीठाने प्रसारीत केलेली जात – कोकण किर्ती
जास्त उत्पन्न देणारी मिरचीची जात – फुले ज्योती
मिरचीच्या इतर जाती – ज्वाला, संकरेश्वर, मुसळवाडी, सुरक्ता, परभणी टॉल, अपर्णा, फुले साई इ.
नागपुरची मिरचीची प्रसिध्द जात – भिवापुरी
रोग – चुरडा – मुरडा (बोकडया) – हा रोग फुलकिडे व कोळी (माईट) मुळे प्रसार पावतो. (कारण व्हायरस)
प्रसिध्द मिरच्या – १) कोल्हापुर – लवंगी २) पुणे – ज्वाला ३) धुळे – दोंडाईचा ४) अहमदनगर – मुसळवाडी
प्रमुख पीकाखालील क्षेत्र (२००२ -०३ ते २००५ – ०६ ची सरासरी)

पीक महराष्ट्र क्षेत्र

(ह.हे.)
भारत क्षेत्र

(ह, हे)
भारताशी टक्केवारी
तांदूळ

गहू

ज्वारी

बाजरी

एकूण तृणधान्ये

एकूण अन्नधान्ये

उस तोडणी क्षेत्र

कापुस

भूईमुग
१५९९

७८५

४६४५

१४२९

९०२७

१२३४५

४२३

२८२६

४१६
४२७२०

२६४४७

९०३०

९८०९

९८८३७

१२१६९८

३९३४

८३५४

६४५४
३.६

३.०

१५.४

१४.६

९.०१

१०.१

१०.७

३३.८

६.५

महाराष्ट्रातील मुख्य पिकांखालील क्षेत्र, पीक, उत्पादन आणि दर हेक्टरी उत्पादन (२००७-०८)
पीक क्षेत्र ला.हे. उत्पादन ला. ट.

(ह, हे)
दर हेक्टरी उत्पादन
तांदूळ

गहू

ज्वारी

बाजरी

सर्व तृणधान्ये

तूर

सर्व कडधान्ये

सर्व अन्नधान्ये

कापुस

भूईमुग

उस (क्षेञ)

(तोडणी क्षेञ)

तंबाखू
१५.७५

१२.५३

४१.४८

१२.८३

९१.४९

११.५९

४०.५७

१३२.०६

३१.९५

४.०४

१०.९३

०.०६
२९.९६

२३.७१

४०.०३

११.२७

१२४.६०

१०७३

३०.२४

१५४

१०१५

४.७२

८८४.३७

०.०७०
१९०२

१८९२

९६५

८७८

१३६२

९२८

७४५

११७२

२१९

११६८

८०.४३

१४३०

कृषी निर्देशक – भारत व महाराष्ट्र

(महाराष्ट्राचे आर्थिक पाहणी २००८-०९)
क्षेत्र महाराष्ट्र भारत भारतात सर्वाधिक भारतात कमी
हेक्टरी उत्पादन

(कि.ग्रॅममध्ये)

२००३-०४ ते

२००५-०६ ची

त्रैवार्षिक सरासरी

१) एकूण तृणधान्ये

२) एकूण कडधान्ये

३)एकूण अन्नधान्ये

४) कापुस (रूई)

५)उस

६) दरडोई

७) दर हेक्टरी

खत वापर

(२००४-०५)

८) सिंचीत क्षेत्राची

पिकाखालील

क्षेत्राची %

९)दर शेतक-यामागे निव्वळ पेरणीक्षेत्र

(हेक्टर)
१००८

५४९

८८२

१८४

६७०३२

१००.६

७७.७५

७७.७५

१७.१४

१.५
१९४८

(४००५)

६०३

१६९८

३३०

६३७४५

१७८३.७

९६.२०

४१.९

१.१
पंजाब

(१२३०)

दिल्ली (२०००)

पंजाब (३९८५)

पंजाब (६६७)

गुजरात (४८४)

केरळ (१०६५००)

तामिळनाडू (१००३४०)

पंजाब (९८५)

हरियाणा (५६२)

पंजाब (१९३)

हरियाणा (१६३)

आं. प्रदेश (१४३.४७)

पंजाब (९९.६)

हरियाणा (८४.६)

उ. प्रदेश (७२.६)

गोवा (२.७)
अरूनाचल प्रदेश

तामिळनाडू (३७६)

महाराष्ट्र (८८२)

नागालण (६८)

दिल्ली (६.४)

केरळ (२०)

नागालँड (१.५८)

सिक्कीम (९.७२)

आसाम (४.३)

सिक्कीम (८.१)

हिमाचल प्रदेश (०.३)

शेतीशी संबंधित विविध संज्ञा

द्राक्ष शेती – विटी कल्वर

माती व त्याचे प्रकार – पीडीऑलॉची

लाकडाचा अभ्यास करणारे शास्त्र – Hylology

रेशमी कीडे संवर्धन – सेरी कल्चर

मधुकक्षिकापालन – ए पी कल्चर

तृणधन्य व कडधान्य पीके यांचा अभ्यास – ऍग्रॉनॉमी

झाडांचा अभ्यास करणारे शास्त्र – डेड्रॉलॉजी

मोती कमविण्याचा व्यवसाय – पर्ल कल्चर

फुलांचा विस्तृत अभ्यास करणारे शास्ञ - एथोलॉजी

जीवाणू संवर्धन – बॅक्टेरियल कल्चर/ इनाक्यूलंट

मत्स्य व्यव्सायाचा अभ्यास करणारे शास्ञ – Fishi culture

व्यापारी मत्स्य पालन – ऍक्वा कल्चर/ Pisce culture

माशांचा अभ्यास करणारे शास्त्र – Ichthyology

वर्मीकल्चर – गांडूळ पालन

फुल शेती तसेच त्यासंबंधी झाडांचा अभ्यास – फ्लोरी कल्चर (Floriculture)

-फळझाड लागवड व जोपासना – पोमोलॉजी (Pomology)

वनांतील वृक्षांचे तसेच त्यांच्या उत्पादनांचे संवर्धन व अभ्यास – सिल्व्ही कल्चर

बी रहीत फळांचा विकास करण्याचे शास्त्र – Parthe nocrphy

शोभिवंत झाडांची लागवड – Ornamental Horticulture

उद्यान विद्या शास्त्र-फळे, भाजीपाला व फुलांचे उत्पादन- हॉर्टीकल्चर

वृक्ष तसेच झाडांची शेती – अरनोरी कल्वर (Arbori culture)

पिकांचे उत्पादन न करता जमिनीचे मुळस्थान वर्गीकरण व वर्णन करणारे शास्त्र – पेडोलॉजी

पिकांचे उत्पादन काढण्यासाठी जमिनीच्या भोवती रासायनिक व जैविक गुणधर्मांचा अभ्यास करणारे शास्र - इडॅफॉलॉजी

वनस्पतीच्या वाढीनुसार प्रकार

खा-या मातीत वाढणा-या वनस्पती - हायग्रोफायटस

पाण्यात वाढणा-या वनस्पती – हायड्रोफायटस

दलदलीत वाढणा-या वनस्पती - मिझो फायटस

दगडावर वाढणा-या वनस्पती - लिथोफायटस

वाळवंटात वाढणा-या वनस्पती - झेरोफायटस

हवेत वनस्पती उगवणे - एरोपोनिक

मिरचीला तिखटपणा कशामुळे येता - कॅपससिन

पपईला लाल रंग येतो – कॅरिकाझॅन्थीन

कारल्याला कडूचव येये - कुकर बीटीन

टमाटयाला लाल रंग येतो – लायकोपीन

हळदीला पिवळा रंग येतो - क्यूरॉमिन

कांद्याला लाल रंग येता - ऍन्थोसायनीन

कांदयाला तिखट वारा कशामुळे येते – अलिल प्रापील डायसल्फाईड

भारतातील प्रमुख पिकांचे उत्पादन (२००८-०९)
पिक दर हेक्टरी उत्पादन (किलो/हे.) एकूण उत्पादन दशलक्ष (टन) सर्वाधीक उत्पादन करणारे राज्य व वाटा
अन्नधान्य

तृणधान्य

कडधान्य

तांदूळ

गहू

ज्वारी

मका

बाजरी

हरभरा

तूर

भूईमुग

उस (टन)

कापूस

ज्युट

बटाटे (टन)

मोहरी

सोयाबीन

सुर्यफुल

कांदा
१८९८

२१७५

६५५

२१८६

२८९१

९५२

२३५५

१०११

८८५

६७८

११८०

६२

४१९

२१९४

१८

१९९०

-

-

-
२२९.९

२२५.७

३.०२

९९.४

७७.६

७.३

१८.५

८.९

६.४

२.४

७.३

२८९.२

२३.३

९.५

२८.५

७.३

५.४८

०.५९

२८.५
उत्तर प्रदेश – १८.२४%

राजस्थान – १७.४७%

महाराष्ट्र – २०.४६%

पश्चिम बंगाल– १५.२२%

उत्तर प्रदेश – ३२.६८%

महाराष्ट्र

आंध्रप्रदेश – १९.९%

गुजरात – ३५.९५%

उत्तर प्रदेश – ४४.६५%

महाराष्ट्र – २५.४०%

गुजराथ – ३६.६१%

महाराष्ट्र – २३.१३%

पश्चिम बंगाल– १४.८३%

उत्तर प्रदेश – ४१.७७%

राजस्थान – ५४.३३%

मध्येप्रदेश – ४९.९५%

कर्नाटक – ४०.४%

महाराष्ट्र – २८.४४%

गुजरात – २४.७%

९ टिप्पण्या:

 1. can u pls give some information about below msg
  Physical fatures related to the local level such as drainage pattern shope analysis soil and rocks type physiography of the regin
  Agriculture water,energy,minerals ,soil , vegetation biotic resources

  उत्तर द्याहटवा
 2. खूप चांगली माहिती आहे. स्पर्धा परीक्षांसाठी त्याचा खूप चांगला उपयोग होईल.

  उत्तर द्याहटवा
 3. माहिती परीपूर्ण आहे.फारच उपयुक्त

  उत्तर द्याहटवा